तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिमाऊ धन्यवाद. वाचलं होतं हे, पण लक्षात नव्हते राहीले डीटेल्स. काल गुगलायचा कंटाळा केला.

हर्पेन वा, अभिनंदन आणि शुभेच्छा.

माझ्या काही शंका आहेत.

१. वृद्ध लोकांचा क्रश असू शकतो का ? तो वृद्धच असायला हवा का ? नसल्यास चारीत्र्यस्खलन होईल काय ?
२. एकही क्रश नसलेल्यास नॉर्मल म्हणावे की पोटनॉर्मल ?
३. स्वतःच्याच प्रेमात पडलेल्यांना इतर कुणात क्रश मटेरियल दिसते काय ? की आपण कुणाकुणाचे क्रश आहोत याचा ते विचार करत असतात ?

तूर्तास एव्हढाच होमवर्क.

३. स्वतःच्याच प्रेमात पडलेल्यांना इतर कुणात क्रश मटेरियल दिसते काय ? की आपण कुणाकुणाचे क्रश आहोत याचा ते विचार करत असतात ?

>>>>

मी स्वतःच्या प्रचंड प्रेमात असणारा माणूस आहे. तर स्वतःच्या अनुभवावरून् सांगतो, आमचेही क्रश असतात. आणि ते क्रश आम्हाला जगात भारी वाटतात. Happy

गेल्याच महिन्यात मुंबईला गेलो होतो तेव्हा रात्री १ वाजता सलमानला बघण्यासाठी त्याच्या घरासमोर जाऊन उभी होते तेही नवरा आणि मुलीला सोबत घेऊन फिदीफिदी (पण त्यांना गाडीतच बसवुन ठेवले होते, बाहेर न येण्याची ताकीद देऊन हाहा )

>>>>

वाह! याला खरे बोलतात क्रश जोपासणे Happy

क्रश नं१- मी ५ वर्षांची आणि तो ८वीत होता. माझ्या एका दादाचा मित्र. Grey brown डोळे, गोरा रंग, एकदम handsome. मी तर ५च वर्षांची होते, त्याच्या वयाच्या किती मुली त्याच्यावर भाळल्या असतील कल्पना नाही. नंतर त्याने घर बदललं. जवळपास १० वर्षांनी त्याच्या सारखा एक मुलगा भेटला. सगळं match झालं. त्याचं नाव, त्याच्या बहिणीचं नाव, त्याच्या आणि माझ्या वयातलं अंतर , त्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या वयातलं अंतर, पण डोळे match नाही झाले. Sad तो त्या सोसायटीतही रहात नव्हता.

क्रश नं२- राहुल द्रविड. याच्या प्रेमात कधी, कसे आणि का पडले, हे कळलंच नाही. याचं लग्न ठरलय हे कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं. त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याचं एक sketch काढलं होतं. ते सुंदर नाही आहे, पण माझ्या भावना गुंतल्या आहेत त्यात. माझ्या एका कलिगने त्याच्या भावाचा आणि राहुल चा फोटो WhatsApp group वर टाकला होता. फार जळफळाट झाला होता. अजून २० वर्षांनी जरी राहुल प्रत्यक्षात भेटला तर १६-१७ वर्षाच्या मुली सारखं वागेन की काय असं वाटतं. Beating Heart

क्रश नं३- हा राहुल द्रविडसारखा दिसायचा. आमच्या सोसायटीचा राहुल द्रविड म्हणायचे त्याला. आमच्या सोसायटीतून एक पनवेल बस सुटायची. त्या बसला असायचा आमच्या बरोबर. सुरुवातीला रोज असायचा. नंतर नंतर कधीतरी यायचा. पण ज्या दिवशी यायाचा, तो दिवस छान जायचा. कधीच बोले नाही त्याच्याशी. या बाबतीत ऋन्मेष म्हणतो तसं होतं. त्याच्याशी बोलावं, ओळख वाढवावी असं कधी वाटलं नाही. माझ्या मित्राचा मित्र होता तो, सहज शक्य झालं असतं. तसं मला तो आवडतो हे त्याला माहित होतं. मी काढलेलं एक sketch त्याने पाहिलं आहे, मैत्रीणीला दाखवताना, डोळ्याच्या कोनातून. खुप गम्मत वाटली होती.

अतुल कुलकर्णी.
दहावी फ, वास्तुपुरूष, देवराई, पेज ३, सत्ता हे चित्रपट बघता बघता अधिकाधिक आवडायला लागला. कॉर्पोरेटमधे त्याचा नुसता आवाज ऐकायलाही मस्त वाटतं.
साधारण दहा वर्षांपूर्वी DSK गप्पांमधे सुधीर गाडगीळांनी घेतलेली त्याची मुलाखत पाहिल्यावर तर crush म्हणण्याइतका आवडायला लागला Happy
त्याच सुमारास SNDT जवळ त्याचा फोटो असलेलं एक खूप मोठं पोस्टर बरेच दिवस लावलेलं होतं. जाहिरात कसली होती लक्षात नाही, पण त्याचा फेटा बांधलेला रूबाबदार फोटो आणि तिथून जाताना रोज होणारी धडधड तेवढी लक्षात आहे Happy

क्रश नं १ - मिलींद सोमण <3

क्रश नं २ - Rafael Nadal

क्रश नं ३ - सगळ्यात पहिल्या ओफिस मधला माझा टीम लीड.. अती देखणा.. <3

धागाकर्ता असल्याचा फायदा उचलत ३ निरीक्षणे मांडू इच्छितो.

१) पुरुषांपेक्षा स्त्रियांना आपले क्रश सांगायला जास्त आवडते.

२) स्त्रियांमध्येही विवाहित स्त्रिया यात आघाडीवर असतात.

३) मिलिंद सोमन या मराठी नटाने सलमान, शाहरूख, आमीर या तीनही खानांना क्रश मीटर मध्ये मात दिली आहे. आणि याचा एक मराठी मुलगा म्हणून मला फार्फार आनंद झाला आहे Happy

Lol

ह्यावरून पुरूष स्त्रीयांपेक्षा जास्त हिपोक्रिट असं कन्क्लुजन मी मांडू इच्छीते .. Wink

पुरुषांना आपले क्रश लक्षात ठेवणे सोपे नाही. त्यातून लक्षात राहण्यासारखे सेलेब्रिटीजचे असतात ते लिहू नका असं फर्मान निघाल्याने गोची झाली असावी. ख-या आयुष्यातले लिहायचे तर पाळण्यातून उचलून घेणा-या नर्सपासून..

माझे लहानपणीचे क्रश होते ३ international cricketers- Imran khan, Ian Botham and Steve Waugh.
देशी क्रश मात्र एकच. त्याला बघितल आणि मागचे सगळे विस्मरणात गेले. मरेपर्यंत आता त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तो आहे
The one and only KING KHAN- शाहरूख खान.

मानसकन्या ईंटरनॅशन क्रिकेटर सही आहेत.. ऑलराऊंडर व्यक्तीमत्वे.. आणि कॅप्टन्स..
आणि शाहरूख सुद्धा ईंटरनॅशनल स्टार्र आहे.. कोई शक Happy

नंदिनी Proud
गर्लफ्रेंडशप्पथ, मी ते लिहिलेले खोडले. आधी ईंटरनॅशनल लिहिल्याने पुढे सुप्परस्टार्र ऐवजी स्टार्रच पुरेसे आहे असे वाटल्याने.

माझा लहाणपणी स्टेफी ग्राफ आणि पाचवीला मराठी शिकवणार्‍या बाई असा डबल क्रश होता. नंतर कॉलेजात सोनाली बेंद्रे झाला.
आता सध्या फवाद खान आहे. Proud

समीर धर्माधिकारी...

आणि आत्ता THOR - क्रिस हेमस्वर्थ (अगदी नवरा समोर असतानाही.. ह्याची स्तुती थांबवण जमतच नाही )

बरेच जण आहेत ब्वा नावं तरी कोणाची लिहायची ;).

पहिला रवी शास्त्री, काय दिसायचा एकेकाळी. खेळला कसा हे विचारु नका ब्वा ;), आपुनका फर्स्ट क्रश. नंतर बरेच आहेत मिसो अगदी आहाहा. अतुल कुलकर्णी, सुनील बर्वे पण आवडतो. नवीन पण खुप आहेत. नावं नाही लिहीत, किती लिहु. जाऊदे.

माझा वर्षानुवर्षे न बदललेला क्रश: नाना पाटेकर.

एकदा मी नाना पाटेकरला पेट्रोल पंपावर बाईक वर बघितले होते. कुडता, जीन्स आणि करकर वाजेल अशी दिसणारी कोल्हापुरी. तेव्हा मी नुकतीच स्कुटी चालवू लागले होते. तो पेट्रोल भरत असेपर्यंत मी खूप विचार केला. भेटायला जावं का, काय म्हणावं वगैरे वगैरे. पण तोपरेंत माझ्यापेक्षा धीट लोक त्याला भेटायला गेले आणि त्यांच्याकडे फार लक्ष न देता तो निघून पण गेला. Sad

नाना पाटेकर आवडल्याबद्दल माझा नवरा माझी खूप टर उडवतो. पण त्याला सोनम कपूर आवडते! सो माझी अभिरुची जास्त चांगली आहे.

सोनम कपूर ही फार चांगली अभिरूची आहे. किंबहुना अश्या सिप्मल गोड चेहर्‍याची मुलगी आवडणार्‍या पुरुषांबद्दल मला आदर वाटतो.

माझा पहिला आणि आत्ता पर्यंत चा क्रश शाहरुख खान ..
बाकी मधे छोटे मोठे येउन गेलेत शाखा म्हातारा झाला/दिसतो पण अजुन तरी रिप्लेस झाला नाहीये. Happy

स्टेफी ग्राफ आणि पाचवीला मराठी शिकवणार्‍या बाई असा डबल क्रश होता. नंतर कॉलेजात सोनाली बेंद्रे झाला.
आता सध्या फवाद खान आहे. << साजिरा असा सडन चेंज कसा झाला?? :प कपुर अ‍ॅन्ड सन्स नंतर का ? Lol

Majha pahila crush ५ vi la navin shakat gele tevhacha classmate hota ani ajun hi ahe, mala vatate majha tyachyavar kharach khup prem aahe..
Ani itar crush mhaneve. Tar Salman Khan ,mag Shahid Kapoor , mag julun yeti madhala Aaditya lead ha...

पहिला क्रश 6 वित असताना.. तो क्लास मध्ये होता... मस्त कुरळे केस, घारे डोळे, उंच .. Blush मला अगदी कृष्णाची भूमिका करायला हाच योग्य अस वाटायचं.. बोलले कधीच नाही त्याच्याशी... परवा दिसला बायको आणि मुली सोबत... तो मला ओळखण्याचा प्रश्नच येत नाही पण मी मात्र बरोब्बर ओळखलं त्याला.. मुलगी अगदी बापावर गेली होती.. क्यूट होती फार...

Pages