तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या माबोवरचा बीबी आठवला. Proud

मेरा फर्स्ट क्रश : सलमान खान. उसके बाद कितने आयले कितने गयेले लेकिन भाई की जगह कोइ ना ले पाया.

कॅडबरी पर्क च्या जाहिरातीपासून आजतागायत एकमेव अद्वितीय क्रश..

imagesCAM0QV81.jpg

शून्याचा शोध कुणी लावला की लावलाच नाही, ते आभाळातुन पडले वगैरे वादात मला पडायचे नाही, पण शून्याचा शोध लागला असला तरी आमच्या "क्रशेस" ची संख्या मोजणे तसेही अवघडच.. ! Proud
क्रशसारख्या मनाच्या "खाजगी" कोपर्यातल्या गोष्टी या बेडरुममधल्या गोष्टींप्रमाणे असतात, त्या सार्वजनिक जागी उघड करायच्या नसतात..... असे जनेजाणते सांगतात........ तेव्हा तुमचे चालुद्यात...

bhagya123, Happy

'नाही, माझे नाही. मी मॅप्रोचे वापरते, स्ट्रॉबेरी क्रश '.

असं लिहायचं ना.

क्रशसारख्या मनाच्या "खाजगी" कोपर्यातल्या गोष्टी या बेडरुममधल्या गोष्टींप्रमाणे असतात, त्या सार्वजनिक जागी उघड करायच्या नसतात.....
>>>>

हे तर तुम्ही आपल्या क्रशला कसे बघता यावर अवलंबून आहे. जर आपण कोणत्या देवाला मानतो हे आपण कोणालाही बेधडक सांगू शकतो तर क्रशबाबतही निर्मल भावना मनात असतील तर कोणाला सांगायची भिती वाटू नये Happy

असो,
आशा पारेख सुद्धा एके काळी माझे क्रश होती. काल धागा काढताना विस्मरणात गेलेली ते सांगायला ईथे आलो होतो Happy

असे जनेजाणते सांगतात......
<<

{स्क्रीण्शॉट आहेच तेव्हा एडिटूनका.}

""जने?""

खिक्क!

माझ्या आईला जुने चित्रपट आवडतात. लहानपणी ते आमच्याघरी टीव्हीवर सतत चालू असायचे. मला तेव्हा एवढी अक्कल नव्हती की हे चित्रपट जुने असल्याने ती आता वय होऊन त्या झाल्या आहेत. माझे क्रश पडद्यावर दिसणारी वीस-पंचवीस वर्षांची आशा पारेख होती. तिला बघून माझ्या चेहर्‍यावर जे भाव यायचे ते आईला समजणार तर नाही ना अशी भितीही कित्येकदा वाटायची.

आणि हो, मी वर मनिषा कोईरालाला सुद्धा मनिषा आंटी म्हणालो आहे ते ती आंटी दिसायची म्हणून नाही तर याच आमच्या वयातील फरकाच्या कारणासाठी Happy

तुमचे एखादे क्रश आहे का हो.>>>>>>>
हो आहे ना.. अं....
पहिली म्हणजे- मी बाल्वाडीत असताना आमच्या इथे राहणारी चौदा वर्षाची सीमा दिदी
दुसरी- आमच्या घरी गोष्टी सांगायला येणारी सीमाचीच गुबरेल गालाची छोटी बहिण मिना
तिसरी- मी बाल्वाडीला जायला लागल्यापासून आमच्या चाळीच्या टोकाला राहणारी (आणि सीमाच्याच वयाची असणारी) घगा
चौथी- पहिल्यांदाच सिनेमात पदार्पण केलेली आणि सेक्सी जिन्स घालून केसं झाडत- "चुराके दिल तेरा.. चली मै चली!" म्हणत खट्याळपणे हसणारी शिल्पा शेट्टी
पाचवी- मी पहिलीला जायला लागल्यापासून शाळेत रोज दिसणारी माझी सहशाळकरी शितल
सहावी- माझ्या शेजारच्या बेंचवर बसणारी सपना
सातवी- सारखीच शायनिंग मारत आमच्या घरी येणारी, आणि सतत माझा मुका घेत "ए- मला तुझी बायको करशील ना? म्हणून चिडवणारी, आमच्याच चाळीतली सोळा वर्षाची नीता
आठवी- आंम्हाला पाव विकणारी वाण्याची पोरगी (वय वर्षे बारा) निलिमा
नववी- तिसरी-चौथीत गणितं समजावून देणारी आमची वर्गमैत्रिण आणि वर्गातली हुशार मुलगी- अक्षता
दहावी- उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला- वडाखाली, वडापाव विकणार्‍या काकांची पुण्याहून येणारी गोरी-गोरी नात-(आता नाव नै आठवत)
अकरावी- गावात मजा म्हणून मोठ्यांबरोबर शेंगा फोडायला जात असताना तिथे अचानक पाहिलेली मालकीणची पोरगी सविता (वय वर्षे दहा)
बारावी- ताईची दहावीतली वर्गमैत्रीण (हिचंही नाव नै आठवत)
तेरावी- तिसरीत नवीन अ‍ॅडमिशन घेऊन आलेली आणि नंतर आमच्या टीममध्ये सामिल झालेली सहशाळकरी मैत्रिण वनिता
चौदावी- तिचीच, बाजुच्या क्लासमध्ये शिकणारी ओळखीची मुलगी निलांबरी
पंधरावी- कधीतरी छायागीतवर 'उनसे मिली नजर..' गाण्यात पाहिलेली- आणि "इतनी सी थी बस खबर" कडव्याला अचानक नाकावर आलेल्या बटा नटखटपणे फुंकरीने बाजुला सारणारी सायरा बानु
सोळावी- शाहरुखच्या दिवाना सिनेमात "ऐसी दिवानगी.." गाण्यात नाचणारी आणि "तेरी उम्मीद तेरा इंतजार" गाण्यात मोहकपणे गोड लाजणारी दिव्या भारती
सतरावी- मी सातवीला असताना- सहावीत शिकणारी आमच्या मास्तरची पोरगी- वर्षा
.....................
अजुनही खुप आहेत, कॉलेजची लिस्ट अनलिमिटेड आहे, त्यात मित्रांच्या सुंदर-सुंदर गर्लफ्रेंड्स बघून रोज एका नव्या क्रशची भर पडतेय ते वेगळंच.. Wink

अय्यो, हे अन्नू अग्रवाल नाहीत, अन्नू मलिक दिसताहेत.
मी आपली पोरींची नावं वाचून चक्रावून गेले.
Wink

सुचित्रा कृष्णमूर्ती......
ओ दिलवाले, बाबू भोलेभाले वगैरे म्हणत ती तीचे गोबरे गाल फुगवायची आणि डोले डोले वर ताल धरायची ना...त्या वेळी मी फुल्ल वेडा झालो होतो Happy

मग मात्र आपली माधुरी दिक्षीत रादर मी म्हणीन आधी पासुन माधुरीच पहिली क्रश होती Wink ती आजतागायत !! ह्यात तिचे अभिनय गुण, तिचे दिसणे, लाजवाब नृत्य आणि तिचे दिक्षीत असणे [ह्यात कृपया प्रांतिक वाद आणत नाहीये, परंतु एक महाराष्ट्रीय मुलगी अक्ख्या देशाची धक धक वाढवते] ह्या सगळ्याच गोष्टी कारणीभूत होत्या !!

मी आपली पोरींची नावं वाचून चक्रावून गेले..>>>>
Biggrin Biggrin Biggrin
ओह! उशीरा लक्षात आलं- बाय द वे मी अन्नू आहे अनु नाही. Wink
आणि असंही वरची लिस्ट खरी आहे. त्यावर आंम्ही "जस्ट लव मी फॉर अ मोमेंट" नावाचा लेखही लिहिला आहे. लवकरच तो पुर्ण लेख माबोवर प्रकाशित करेन.
त्यातून मग, मुली आमच्याच कुंडलीत कशा फिल्ड लावून बसल्या आहेत ते तुंम्हाला समजेल! Wink

या सूचना कृपया हेडरमधे टाकाव्यात.

१. क्रश लिहीताना कोणत्या प्रोफाईलने लॉगिन झालेय याचे भान ठेवावे.
२. स्त्री प्रोफाईलने पुरूष तर पुरूष प्रोफाईलने स्त्री क्रशचे नाव लिहावे.
३. या पेक्षा वेगळे घडल्यास कारणे तयार ठेवावीत.

किती लोकांनी नुसतं भाऊकाकांचंच नाव प्रतिसादात लिहिलंय? भाऊकाका खरंच इतक्या लोकांचे क्रश आहेत? मायबोलीवरील एखादा आयडी आपला क्रश आहे हे सांगणं नियमांत बसतं का?

ऋन्मेष, माझी क्रशची व्याख्या अशी नाही नाही.

माझ्यामते ज्या कुणा व्यक्तीवर आपला क्रश असतो ती व्यक्ती आपल्या सानिध्यात असते. असे सिनेमात कुणाला पाहून त्याबद्दल प्रेम वाटणे ह्याला मी तरी क्रश म्हणणार नाही. बर्‍याचदा काल पाहिलेली व्यक्ती तेंव्हा आवडणार नाही पण एकदा त्या व्यक्तीशी संवाद साधला की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते. भले ती व्यक्ती इतर कुणाची तरी झालेली असेल तरीही तो प्रेमात पडायचा मोह आवरत नाही. असा हा क्रश म्हणे ३ महिने तरी नक्की चालतो. तीन महिने उलटले आणि तरीही ती व्यक्ती तुम्हाला तितकीच हवीहवीशी वाटत असेल तर त्याला क्रश न म्हणता प्रेम म्हणतात. मला क्रश ची ही व्यख्या खरी वाटली. माझा असाच अनुभव आहे.

मी सई ताम्हणकरला प्रत्यक्षात पाहिले आहे. इथे ती एका सिनेमाच्या प्रीमीअर शोसाठी आली होती. प्रत्यक्षात ती एकदम किरकोळ दिसते. हाईट एकदम कमी आहे आणि प्रत्यक्षात चुडीदारवर तिचा बांधा अगदी साधा दिसतो. आता मी गुगलवर तिचे फोटो पाहिले तर बाईसाहेब एकदम अबोली रंगाच्या बिकीनीवर दिसली Happy अगदी उर्मीला मांतोंडकरची आठवण झाली.

अहो ती सगळी कडे तुम्हाला गुगलवर दिसली तशी कशी दिसेल? चुडीदार वैगेरे वर लुक / बांधा साधाच दिसणार.

Pages