तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं कसं?
सस्मित उगाच का एक्सप्लेन करायला लावताय?
गहू पिशवीत ठेवले किंवा पिशवीवर तर एकच अर्थ होईल का? Wink

बिकीनीत थोडं तरी ठिक आहे, बिकीनीवर म्हंजे जरा डेंजरस हो!

आई गं !!!!!!

धाग्यावेताळ........काय नाव शोधुन काढलतं तुम्ही..............पर्फेक्ट.

धाग्यावेताळ Lol
कोणीतरी माबोवर एक फिशपाँडचा धागा काढा ना.. मी काढला असता पण मला भिती वाटते.

बाकी सई म्हटले की लोकांना बिकीनीच आठवायला हवी का Sad

तेच म्हणत्यो मी. साडीतली सई सुध्दा बांधेसुद दिसते पण लोकांच्या मनातच असेल तर भुमिका चावला सुध्दा बिकिनीत आठवेल. Light 1 (भुमिका चावला ही एकमेव अभिनेत्री माझ्या माहीतीतली आहे जिने आपल्या सर्व हिंदी चित्रपटात अंगभरून कपडे घातले आहे.) Happy

मी परत तिचे फोटो पाहिले माझा विश्वास बसत नाही ही सई तिच जी माझ्यासमोर भिंतिला टेकून उभी होती आणि तिच्याशी कुणीही बोलत नव्हते की फोटो द्या म्हणून तिला विनंती करत होते. तिला वाटले असेल काय बोअर लोक आहे इथले मी इतकी टॉप कलाकार आहे आणि मला भाव नाही Happy

गुगलवर तिचे फोटो बघून विश्वास बसत नाही.. Happy

तुमचे एखादे क्रश आहे का हो - >>>

कशाला उगाच प्रस्थापितांच्या पोटावर पाय द्यायचा.. महाबळेश्वर पाचगणीत आहेत क्रश बनवण्यार्‍या कंपनी.. माला, मॅप्रो, ब्लू बेरी वगैरे वगैरे वगैरे... त्यांच्याकडे मिळतोय वेगवेगळा क्रश... ऑरेंज, मँगो, लिची, पाईनअ‍ॅपल, अ‍ॅपल, ब्लू बेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, जिंजर लेमन, किवी, आणि इतर... ह्या झाल्या लोकल.. बरोबर इंटरनॅशनल कंपनी पण आहेतच क्रश बनवण्यार्‍या...

आपलं चाललय ते बरं चाललय आणि त्यांचं पण बरंच चाललंय.. कशाला उगाच त्यांच्या बिजनेस वर डल्ला मारा.. त्या पेक्षा आहे ते बरं आहे आयटी मधे डॅमजेर करुन क्रश करुन घेणे आणि सबॉर्डीनेट्सला क्रश करणे...

पण या धाग्यामुळेच तुम्हाला आपले सलमानवरचे क्रश व्यक्त करता आले>>> बाळा, मी गेली सात वर्षे मायबोलीवर माझे हे मत व्यक्त करत आलेले आहे. त्यात नवीन नाही.

जुन्या मायबोलीवरही क्रशचा धागा होता. (जुनी माबो लईच प्रोग्रेसिव्ह होती)

नंदिनी, तुझी पोस्ट वाचून सलमानवरचा तुझा क्रश आणि भाई म्हणून संबोधणे.. एकूण काहीतरी भारी औपरोधिक पोस्ट असावे असे वाटलेले. Lol

भले ती व्यक्ती इतर कुणाची तरी झालेली असेल तरीही तो प्रेमात पडायचा मोह आवरत नाही +१
पिछले ३ सालसे यही हो रहा है

<< पिछले ३ सालसे यही हो रहा है >> म्हणजे तीन साल एकीचा मोह आवरण्यातच फुकट गेले कीं तीन साल अनेकाना बघून असे मोह पडणं चालूच आहे ? Wink

Pages