तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि शेवटचा क्रश तर खतरनाकच होता... वेगळ्या देशात भेटला... वेगळ्या धर्माचा... पण अगदी शाहरुखची आठवण आली मला त्याला बघून... फक्त हा त्याच्या पेक्षा उंच... बोलायला मस्त.. स्माईल तर किलरच... पण आवरतं घेतलं मी स्वतःला.... Wink

बोलायला मस्त.. स्माईल तर किलरच... >>>> तुम्ही वर शाहरूखचे नाव घेतले नसते तरी या वर्णनाने मला नक्की शाहरूख आठवला असता Happy
माझे वरचे जे क्रश लिस्ट आहेत त्या त्या वेळी मला त्या सदृश्य दिसणारे चेहरे फार आवडायचे, अश्या बरेच एकतर्फी फिलिंग्स आल्या आणि मी सुद्धा त्या आवरतेच घेतल्या होत्या .. फक्त एक प्रियांका चोप्रासारख्या दिसणार्‍या मुलीने जरा जास्त वेडे केले होते. तिच्या कातिल अदा भावलेल्या आणि वयात येतानाच्या वयात त्यातून बाहेर पडणे अवघड जाते Happy

स्माईल तर किलरच... >> म्हणजे चेन स्मोकिंग करून काळ्या पडलेल्या ओठांवर पन्नाशीतही लिपस्टिक आणि ग्लॉस लावल्यावर दिसते तसे का?

स्माईल तर किलरच... >> म्हणजे जेव्हा शाहरुख ddlj मध्ये मेहेंदि लगा के रखना गाण्या मधल्या 'कुछ और अब ना करना कुछ और केहना ' या वाक्यानंतर ज्या खळ्या पाडून मान डोलवतो ती स्माईल.... या एका सेकंदा साठी माझा जीव तीळ तीळ तुटतो...

मला एक शाळेत असताना आवडायचा... बोलणं कधीच शक्य नव्हते...
आॅल टाईम फेवरेट... मिलिंद सोमण.. त्याला पहायसाठी त्याच्या पडेल सिनेमाची पण पारायणे...
२ नं समीर धर्माधिकारी...
३. अतुल कुलकर्णी..

मिसो ची सर नाही कोणालाच...

मिसो ची सर नाही कोणालाच >>>>>१००

मला तर ती अमुल माचोची ad लागते त्यातील तो नाचणारा पुतळा सुध्दा मिसो वाटतो Happy

अजुन कोणाला असे वाटते का ?
जाणून घ्यायला आवडेल Wink

माझ current crush , Dr. Sarang Chobe , हे औरंगाबाद येथे gynecologist आहेत. मी delivery साठी इकडे आल्यावर आमची ओळख झाली.
अत्यंत respectively बोलणारे, handsome, हुशार.
आणि हे च ते ज्यांना माझ दुखणे समजले असे वाटणारे.
बास अजुन काय पायजे...

मला वयात आल्यापासून क्रश नाही असे एकही वर्ष आठवत नाही... (मला मध्ये डिप्रेशन आले होते तो काळ सोडला तर ) पण असो.. हाल-ए-दिल, मायबोलीवर कशाला?

कुठे गेलाय ऋन्मेऽऽष आजकाल? ऋन्मेऽऽष जिथे असशील तिथून लवकर परत मायबोलीवर ये. तुला कोणीही काहीही बोलणार नाही. तू गेल्यापासून तुझ्या आयडीने जेवण सोडले आहे.

Pages