तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण या धाग्यामुळेच तुम्हाला आपले सलमानवरचे क्रश व्यक्त करता आले>>> बाळा, मी गेली सात वर्षे मायबोलीवर माझे हे मत व्यक्त करत आलेले आहे. त्यात नवीन नाही.
>>>>>>

सेम पिंच नंदिनी, मी सुद्धा बरेचदा सई, स्वप्निल, शाहरूख मला आवडतात हे मत मायबोलीवर व्यक्त करतो.
आपल्या आवडीच्या माणसाबद्दल लोकांना पुन्हा पुन्हा सांगणे यासारखी मजा नाही.
बाकी या धाग्याने तुम्हाला हे मत व्यक्त करायची आणखी एक आयती संधी दिली हे तर मान्य कराल Happy

जुनी माबो लईच प्रोग्रेसिव्ह होती>> first kiss चाही धागा होता. डोळा मारा
>>>>
पण त्या धाग्यावर first kiss बद्दल सांगितले जायचे का खरेच, की तिथेही खोबर्‍याचा किस, रताळ्याचा किस, लोखंडाचा किस चालायचे. जसे इथे स्ट्रॉबेरी क्रश, माप्रो क्रश चालूय Happy

आणि हो उकसवू नका मला जुन्या मायबोलीच्या एक पाऊल पुढे जायला Happy

त्या चुंबनाच्या धाग्याला अ‍ॅडमिनने टाळे लावलेले दिसत आहे. म्हणजे अश्या विषयांवर संयत चर्चा करावी ईतपत मोडर्न विचारांचा समाज तेव्हा नव्हता. आता तरी ती प्रगती झाली आहे का हे एखादा धागा काढून चेक करायला हवे Happy

अहो ताई माझा जन्म ९८ चा. मी टीव्ही बघायला कदाचित २ री-३ री पासून सुरूवात केली असेल (नक्की आठवत नाही). आणि त्या वेळी माझं फेवरिट फक्त कार्टूनच होतं. हिरो हिरविणींची नावे ५वी-६वीत आल्यावर लक्षात रहायला लागली. अन् आयशप्पथ मी अजून त्यला कुठल्याच पिक्चरात बघितला नाय.

मी बघितलाय मिसोला सिनेम्यात. हाताच्या बोटावर मोजण्याइतके सिनेमे केलेत त्याने. मॉडेल वैगेरे तेव्हा माहित नसायचं आम्हाला. तेव्हा फक्त हा हीरो छान दिसतो ना एवढंच. क्रश मटेरीअल वाटला नाही तो कधीच. आणि आता तर कसा दिसतो.
माझा फर्स्ट क्रश डीडीएलजे चा शाखा. नववीत होते मी तेव्हा. कसला दिसलाय तो त्यात. मोजुन ५० पोस्ट्कार्ड साइज फोटो विकत घेतले होते मी त्याचे त्या सिनेमातले. खाऊतले ५० पैसे खर्चुन. Happy

माझा क्रश one and only Salman Khan. Blush

सलमान आणि अ‍ॅशचे प्रकरण चालु होते तेव्हा अ‍ॅशही मला आवडायची. जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हापासुन ती माझ्या नावडत्या लिस्टीत. त्यानंतर सेम कॅटरीनासोबतही. अशी मी वेगळीच सलमानवेडी Happy

गेल्याच महिन्यात मुंबईला गेलो होतो तेव्हा रात्री १ वाजता सलमानला बघण्यासाठी त्याच्या घरासमोर जाऊन उभी होते तेही नवरा आणि मुलीला सोबत घेऊन Proud (पण त्यांना गाडीतच बसवुन ठेवले होते, बाहेर न येण्याची ताकीद देऊन Lol ) पण तो शुटींगला गेलाय असं वॉचमेननं सांगितले Sad

कांदापोहे Happy
सोबत एक उंटही घेऊन जा.
Happy Happy

ऊंट 'मापाचा' घेऊन जायला सांगा नाहीतर 'माझे ऊंटाच्या XXX XX घेण्याचे विफल प्रयत्न ' हा धागा वाचायला तयार रहा.

Light 1

अर्रर्र... धागा कुठून कुठे गेला...
क्रश वरुन सईच्या बांध्यावर.. बिकीनीवर.. मग किसवर तिथून मिसोवर.. शुद्धलेखनावर.. आणि आता उंट???
काही दिवसांनी तो बैलावर गेला तरी आश्चर्य वाटणार नाही.. Wink
गैगैगै.. Wink

तो बैलावर गेला तरी आश्चर्य वाटणार नाही>> मग सोपा करायला हरकत नाही.

तसेही राकुंचा आयडी उडवल्या पासुन परत नव्या दमाने धाग्यावेताळ झाडाला लटकु लागला आहे.

त्या चुंबनाच्या धाग्याला अ‍ॅडमिनने टाळे लावलेले दिसत आहे. म्हणजे अश्या विषयांवर संयत चर्चा करावी ईतपत मोडर्न विचारांचा समाज तेव्हा नव्हता. >>> तेव्हाचे बेसिक मे लोचा असलेले आयडी अद्याप आहेतच की.

हो या संक्षी, राकु वगैरेबाबत खुप काही ऐकीवात आहे, 'धरसकट' सगळीकडे यांना बॅन करण्यात आले आहे, असं का?
अवांतर- सध्या डुआयडीचे खुप ट्रेन्ड वाढले आहे, यांनी (म्हणजे संक्षी राकु वगैरेंनी..) पण ते घेतले असावेत का? Uhoh

मिसो हा मायबोलीकरीणीचा सामुदाईक क्रश असावा .>>>> मिसो हा समस्त स्त्रीवर्गाचा सामुदायिक् क्रश आहे. तो या वयातही काय दिसतो. का य दि स तो!!!!!!

समस्त स्त्रीवर्गाचा सामुदायिक् क्रश=+१११
मिसो हा माझा आणि माझ्या लेकीचाही क्रश आहे.
ती एकदा वाई ला गेली होती. आल्या आल्या ' आई मी कोणाला बघितल असेल ओळख 'अशी आरोळी.
मिसो ला बघून एकदम खुश झाली होती.
बाकी पोरीना मिसो माहित नाही हे बघून आश्चर्य वाटल होत लेकीला

Pages