तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या मायबोलीवरील हर्पेन यांनी अशी ट्रायथॅलॉन पूर्ण केली आहे. >>>

ही वाक्य तांत्रिक दॄष्ट्या बरोबर आहे. पण 'अशी' म्हणजे इतकी नाही मी हाफ आयर्नमॅन अंतराची स्पर्धा (कशीबशी) पार पाडली आहे Happy

मिलिंद सोमण - माझा आयडॉल आहे. कधीही भेटतो तर (पळताना पिंकॅथॉन मधे वगैरे ) तर पाय जमिनीवरच असतात. जुनी ओळख असल्यासारखा दिलखुलास बोलतो. तो सुपर मॉडेल / नट / उत्कृष्ट खेळाडू वगैरे असल्याच्या गोष्टींचे दडपण जाणवून देत नाही. हा अभिनय असेल तर तो खूप चांगला अभिनेता आहे आणि नसेल तर स्वभावतः असा असावा.

मी देखिल माझ्या पन्नाशीतच फुल आयर्नमॅन करणारे. तो पर्यंत भारतात पण चालू होईल ही स्पर्धा. सध्या नाहीये आणि बाहेरच्या देशात करायची म्हणजे लईच खर्च येतो. त्यामुळे सध्या माझ्या अग्रक्रमात नाहीये.

आयर्नमॅन जगभरात ठिकठिकाणी होत असते. अधिक माहीती साठी
http://eu.ironman.com/#axzz432NDiGMr

मिलिंद सोमण :डोळ्यात बदाम:. सॉलिड फोटो आहे तो.

हर्पेन, त्याचे पाय जमिनीवरच आहेत हे अनुभवलंय. काहिही ओळख नसताना, फोटोग्राफर्सच्या गराड्यातून बाहेरपडून जवळ येवून अत्यंत मृदू चार वाक्य बोलून म्या पामराचा मलाही तेव्हा हाताळायचा कसा हे न जमलेला फोन 'बघू बघू' करुन बघणे...... हे म्हणजे माझं हार्टफेल करायचाच बेत होता त्याचा. आधी मी आ वासून बघत राहिले. त्याने बोलायला सुरुवात केल्यावर अगदी ओळखीचाच कुणी असल्यासारखं टेन्शनफ्री होवून बोलले. त्याच्यामुळे सगळे कॅमेरेही रोखले गेले होते त्यामुळे तो येवून बोलल्याचा अनपेक्षित आनंदाचा धक्का आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं गेल्यामुळे "आता कुठे टेबलाखाली लपू?" अशी दोन टोकाची मनस्थिती एकाच वेळी अनुभवली होती. त्याने पन्नाशी गाठली असली तरी अजूनही मस्त दिसतो Wink

हे म्हणजे माझं हार्टफेल करायचाच बेत होता त्याचा. Proud

केश्वे - असं काही नसणार गं त्याच्या मनात

हर्पेनजी, हाफ असो वा फुल आयर्नमन, आपल्याला जाम आदर वाटला तुमच्याबद्दल. अभिनंदन व शुभेच्छा.
[ 'हाफ'वरून 'फुल'कडे जाण्याची लाटच आली असावी; संघ परिवारही वाढत्या वयात आतां 'हाफ'वरून 'फुल' पँटवर जातोय. तुम्हीही या लाटेवर स्वार होवून एखाद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर 'हाफ'वरून 'फुल' आयर्नमॅन होणारच. मनःपूर्वक शुभेच्छा.]

केश्वे - असं काही नसणार गं त्याच्या मनात >>>> अरे ए! मी ते भंकसमध्ये बोललेय :खोखो:. पण अनपेक्षितपणे घडल्याने गार पडायला झालं होतं खरं काही सेकंद Happy

अय्यो इतके लोक मिसो पन्खे आहेत.. नवरोबाला सन्गयला हवे... आजुन एक माहिती त्याने एका जपानी मुलीशी लग्न केले होते, मराथी पध्दतीने, नन्तर त्याचा घटस्फोट झाला.. तो आणी मधु सप्रे पण सुरुवातीला रिलेशनशिप मध्ये होते, पण ती दुसर्याशी लग्न करुन अमेरिकावासी झाली. मिसो, मधु सप्रे फ्याशन दुनियेतील आयकोन होते.

बाकि नवर्याचा क्रश म्हणजे प्रियन्का चोप्रा, प्रिटी झिन्टा, आणी माधुरी दीक्षित (आय मीन म्हातारी दीक्षित असे मी तिला म्हणते)

निल्सन | 15 March, 2016 - 02:56
माझा क्रश one and only Salman Khan. इश्श !

सलमान आणि अ‍ॅशचे प्रकरण चालु होते तेव्हा अ‍ॅशही मला आवडायची. जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हापासुन ती माझ्या नावडत्या लिस्टीत. त्यानंतर सेम कॅटरीनासोबतही. अशी मी वेगळीच सलमानवेडी स्मित

<<<<< सेम पिंच (अ‍ॅश आणि कॅट आधी आवडायच्या पण आत्ता अज्जिबात आवडत नाहीत. Angry )

अपना तो एकिच क्रश बोले तो सल्लू बेबी. Blush

अरे हो! मिलिंद सोमणच्या विचारात हर्पेनचे अभिनंदन आणि पुढील प्लानसाठी शुभेच्छा द्यायच्याच राहिल्या Lol

मिलिंद सोमणच्या विचारात हर्पेनचे अभिनंदन आणि पुढील प्लानसाठी शुभेच्छा द्यायच्याच राहिल्या>>> बीबी काय बोलताय काय!!!!!!!

(तरीही हर्पेनला शुभेच्छा आहेतच)

सलमानभाईखेरीज इतर काही कायम्स्वरूपी क्रश: ह्रितिक, सोनू, माधवन, मिसो, रणबीर कपूर, एशान (याचं आडनाव मी लिहिणार नाही पण हा फार मोठा व्हिलन होणार आहे असे माझे भाकित आहे), आणि शम्मी कपूर.

काही त्यात्या वयातले टेम्पररी क्रश : जुगल हंसराज, फरदीन खान, प्रियांशु, गौरव चन्ना, रणवीर सिंग, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ (आय नो!!!!! काय तरी चॉइस आहे!!!!) Lol

टायगर श्रॉफ काय नंदिनी. Uhoh त्यापेक्षा पाशा की भाषा जाननेवाला तरी म्हणायचेस.

होता म्हणले असेल कारण टायगर भूतकाळात गेला सुध्दा. इथे SavetheTiger नको.

आश्विनी दिक्षित,
जर हे तुमचे लग्नानंतरचे नाव असेल आणि माधुरी दिक्षित तुमच्या नवऱ्याचा क्रश....
तर क्रशमध्ये असे दिक्षित दिक्षित चालते? Happy

पाय जमिनीवरच असतात. जुनी ओळख असल्यासारखा दिलखुलास बोलतो. तो सुपर मॉडेल / नट / उत्कृष्ट खेळाडू वगैरे असल्याच्या गोष्टींचे दडपण जाणवून देत नाही. हा अभिनय असेल तर तो खूप चांगला अभिनेता आहे आणि नसेल तर स्वभावतः असा असावा.
>>>>>> खर आहे . संहिताच्या प्रीमियरला गेलो असताना त्याने सहजपणे स्वाक्षरी दिली . बोलणं देखील दिलखुलास आणि मनमोकळं आहे . मराठी मात्र थोडं कच्चं आहे . का ते संहिताच्या बाफवर आहे Wink

माझेसुध्दा अनेक क्रश होते, आहेत अन पुढेही होत रहातील अशी लक्षणे आहेत. Happy

वरप्रमाणेच स.खा., मिसो, म.कु., असे अप्राप्य तर होतेच. पण त्या त्या वयात गल्लीत, शाळेत, कॉलेजात पण होतेच. Happy

कमाल आहे रुन्मेष! मिसो मॅरेथॉनमध्ये पळतो वगैरे सगळं माहीत आहे पण तो मराठी आहे माहीत नाही?
अनेक मराठी चित्रपटांत मिसोने काम केलंय हे पण माहीत नाही?
आपल्याला काय माहित आहे आणि काय नाही हे दाखवायचं बेअरिंग सुटतंय हं तुमचं!

मिसो ५० चा आहे?? त्याचे फेबु पान पाहिले आणि वयानुसार अधिकच सुंदर होत गेलाय असे जाणवले.आधी आवडायचा नाही पण आता आवडतो.अगदी क्रश म्हणण्याइतका नाही पण सरबत म्हणण्याइतका चालेल.
पांढरे वाढलेले केस मात्र चांगले नाही दिसत हो त्याला..हेअर कट मध्ये छान दिसेल.

कॉलेजमध्ये असताना सिरियल्सचे हिरोज क्रश मटेरियल असण्याचा ट्रेन्ड होता. सुजल (कही तो होगा) (राजीव खंडेलवाल), रोनीत रॉय (रिशभ बजाज) हे दोघं बर्‍याच मुलींना आवडायचे. माझा तेव्हाही आणि आताही ऑटाफे क्रश जॉर्ज क्लूनी.

वाह हर्पेन ! ग्रेट ! हाफ Triathlon सुद्धा सोपी नाही.
खरं तर मिलिंद सारख्या (जो पुर्ण वेळ फिटनेस आणि स्पोर्ट्स साठी देवु शकतो) अशा व्यक्तीने पुर्ण Triathlon करणं आणि नोकरीधंदा सांभाळत, संसारिक जबाबदार्या पार पाडत आपल्यासारख्या माणसाने हाफ Triathlon करणं, दोन्ही खरं तर एकाच लेवलचं आहे. या लॉजिकने I declare you the first IRON MAN of Mabo ! Happy

तुमच्या IRON MAN च्या स्वप्नासाठी तुम्हाला शुभेच्छा Happy

सगळेजण सेलेब्रेटीजची नावं काय लिहिताहेत? खर्याखुर्या आयुष्यात खर्याखुर्या.... अगदी अशा हाताच्या अंतरावर असणार्‍या व्यक्तीबद्दल लिहितच नाहीए कोणी.

जशी कि माझी लिस्ट - माझा एक माबो क्रश आहे, दुसरा एक माझ्या ऑफिस मधला VP ( वॉव Athletic body आहे), एक global resource आहे युरोपियन, जो माझ्या ऑफिसमधे आला कि FCB च्या गप्पा मारायला येतो ( आमचं कॉमन प्रेम आहे, मेस्सी आणि FCB वर). मग घराजवळच्या गुरुद्वारामधे येणारा एक biker सरदारजी, झालंच तर विकेंडला कॅज्युअल्स मधे माझा नवरा पण हॉट्ट वाटतो मला, कसं ना एकदम प्रेमातच पडायला होतं त्याच्या. अजुन लंबी लिस्ट आहे टेम्प. क्रशेसची. Wink

हो मनिमाउ, खरेच कि असे पण क्रश असतातच कि.... हम्म. ऋन्मेऽऽष भाउ... क्रश हा व्यक्तिचा असतो, आडनावाचा नाही. व्यक्तिचा क्रश असण्याचाच धागा आहे ना हा?

६वीत होतो मी जेव्हा ती माझ्या वर्गात आली. तेव्हा जास्त लक्षच दिलं नव्हतं तिच्याकडे पण आजूबाजूला असायची ती. ७वी-८वीत आल्यावर तिचं अस्तित्व जाणवू लागलं. ती दिसल्यावर मी स्वत:ला विसरू लागलो. हळूहळू ती आवडायला लागली. ९वी-१०वीचं वर्ष अभ्यास आणि ती यातच संपलं. १०वीत तिला विचारायचं ठरवलं होतं पण धाडस नाही झालं.

१० नंतर विचारलं पण तोपर्यंत ती दुस-याच्या प्रेमात पडली होती. सध्या आम्ही मित्र आहोत. ती इं. डिप्लोमा करतेय आणि मी सायन्सला आहे. पण तिच माझं पहिलं प्रेम, माझा पहिला क्रश आहे. जो मी कधीच विसरू शकणार नाही. Happy

ओके अश्विनीताई, गंमतीने म्हटले मी ते Happy

<<<<<कमाल आहे रुन्मेष! मिसो मॅरेथॉनमध्ये पळतो वगैरे सगळं माहीत आहे पण तो मराठी आहे माहीत नाही?
अनेक मराठी चित्रपटांत मिसोने काम केलंय हे पण माहीत नाही?>>>

न्यूजपेपरमध्ये मी हेडलाईन आणि स्पोर्टस सेक्शन चाळतो. पेज थ्री मधे झालेच तर फोटो न्याहाळतो.

Pages