डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर नंदिनी ह्यांनी म्ह्टल्याप्रमाणे प्रोफेशनल एथिक्स वै. काही असते हे ह्यांना माहित नाही असे दिसते.
संपूर्ण पोस्ट कै च्या कै आहे.

>>मला वाटतं प्रत्येकाने स्वतःचे अनुभव लिहिताना इथे खरे अनुभव लिहावेत, स्वतःचे भावूक शब्द घालून लिहू नयेत. तसेच सांगोवांगीचे अनुभवसुद्धा लिहु नयेत. कारण सांगोवांगीच्या गोष्टी असतात एक आणि पाहिल्या जातात दोन, सांगितल्या जातात तीन आणि लिहिल्या जातात चा>>>>

मी लिहिलेले अनुभव पुर्णपणे खरे आहेत. कोणास येऊन तपासायचे असल्यास कागदपत्रे दाखवू शकते.

नंदिनी, ऑफिसातच काय, माझ्यासमोर एखादा जातक त्याचे वैयक्तिक अडीअडचणीचे प्रश्न घेऊन येतो, तेव्हा देखिल तेथिल वातावरण विषयास साजेसे ठेव्ण्याची आम्ही जबाबदारी मानतो, वैयक्तिकरित्या मी, व तिथे उपस्थित माझे कुटुंबिय/मित्र.
टीव्ही चालु असेल, कितिही आवडीची सेरियल असेल, तरी लिंबी टीव्ही बंद करते.
विषय/प्रश्न जरा "खाज्गी" स्वरुपाचे असतील, तर मित्र/धाकटी तिथुन न सांगावे लागताच उठुन जातात व चर्चेसाठी पुरेसा एकांत/खाजगीपणा देतात.
त्यांचे समोर विनाकारणचे जोक्स/हसणेखिदळणे वा अचकट विचकट बोलणे होत नाहीच्च, पण मी वा माझे कुटुंबिय वैयक्तिक/प्रासंगिक/आर्थिक/शारिरीक वा अन्य कोणत्याही प्रश्नांनी कितीही त्रस्त असलो , वैतागलेले असलो, दिवसभरच्या इतर कामांमुळे श्रमलो/दमलो असलो , तरीही त्याचा यःश्किंतितही परिणाम वा दृष्य्ता जातकासमोर मांडली जात नाही. कारण जातक स्वतः अडचणीत असतो व तुमच्यकडून कुंडलीद्वारे मानसिक्/भावनिक/बौद्धिक आधार शोधत असतो. तिथे तुमच्या स्वतःच्या खाजगी आयुष्याला काहीच अर्थ नसतो, अगदी तुमच्य घरात तुम्ही बसलेला असला तरीही.... हे आमचे बिझनेस इथिक्स की काय म्हणतात ते, ...
आता यापुढे वैद्यकीय पेशातील "एथिक्स" कितीतरी उच्च कोटीचेच असणार ना? पाळतात का डोक्टर्स /नर्सेस्/ऑपरेटार्स?
अहो एकदा पेशंटाला पैसे उकळण्याकरताचा " बळीचा बकराच" ठरविल्यानंतर एखादा कसाई जितक्या निर्विकारपणे शेळी वा कोंबडी तंगडीला धरुन उलटी करीत तिच्या मानगुटिवर सुरी चालवेल व ति चालविता चालाविताच सोबत्याबरोबर हास्यविनोदही करेल, तीच कसायाची गत या नवश्रीमंत होऊ पहाणार्‍या डॉक्टारांची अस्सते, व त्यांचे पाहुन त्यांचे हाताखालचेही तितकेच बेशिस्त असतात.
त्यातुन सरकारी इस्पितळातल्या त्रुतियचतुर्थश्रेणी सेवकांच्या "कम्युनिस्टाधारीत" युनियन्सचा रुबाब तर बोलायलाच नको.... भयानक माजोरडे पणा... एकेक किस्से आहेत यांचेही म्हणुनच सरकारी इस्पितळेही खाटिकखाने बनल्याप्रमाणे झाली आहेत असे अनुभवास येउ शकते.

पोस्ट ग्रॅज्युएट होई पर्यंतचा शिक्षणाचा खर्च मग क्लिनिक सेटप करायचा खर्च .. तो काय स्वतःला बरं करायचय म्हणून क्लिनिक उघडून बसलाय का? मग तो त्याने कुठून परत मिळवायचा? आणि डॉ ला घर नसतं का चालवायचं, त्याच्याही घरात माणसं असतात ज्यांच्या औषध पाण्याचा, शाळेचा खर्च त्याला करायचा असतो. मग त्याने फी का नाही घ्यायची. एखादा डॉ कमी पैशात ट्रीटमेण्ट करतो म्हणून सगळ्यांनीच करायची का? >>> माझ्या बघण्यात काही डॉ. आहेत जे दूरच्या नातेवाईकांच्या नावाने लॉकर घेवून त्यात पैसे ठेवतात.

वेल, संपुर्ण पोस्ट अर्थहिन.

पण मला सांगा तुम्हाला कोणी थांबवले होते का त्या डॉ च्या कॅबिन मध्ये घुसायला? तिथे आरडा ओरडा करायला?<<< म्हणजे पेशंटने गुंडागर्दी करायची? त्या रिसेप्शनिस्टला दोन चार फटके देखील हाणायचेच नाही का? हेवी ब्लीडींग हा काय प्रकार असतो तो माहित आहे का?

हे वरचे विधान माझ्याबद्दलचे. नंदिनीने ऑलरेडी लिहले आहेच त्यात भर म्हणुन सांगतेय, मी माझ्या पोस्टीत लिहलयं की नवरा चिडचिड करत होताच पण ती रिसेप्शनिस्ट ५ मि. थांबा म्हणुन विनवत होती. गुंडगिरी करुन केबिनमध्ये घुसणेच काय तर डॉ.ला मारायलाही कमी केल नसतं अशा टाईपचा नवरा आहे माझा पण त्यावेळची परिस्थिती लक्षात येतेय का तुमच्या? रिसेप्शनिस्टने आत जाऊन दिले नसते तर डॉ.च्या केबिनमध्ये डायरेक्ट घुसु शकतो पण इथे तो डॉक्टरच इंन्टरेस्टेड नव्हता. त्यामुळे अशा अतातायीपणामुळे काही साध्य झाले असते का?

गजानन +१

हे थोडं पर्सनल होईल पण वेल, तुमचा नवरा डॉ. (डेन्टिस्ट) आहे म्हणुन सगळ्यांना अक्कल शिकवताय का?

वेल , पोस्ट अजिबात पटली नाही.
नंदिनी सोबत पुर्णतः सहमत. माझ्या मनात जे विचार आले तेच तिने मांडले असे वाटले.
इकडे अनेकांचे अनुभव वाचून अंगावर काटा आला. देव करो आणि कुणावर अशी वेळ न येवो.

वेल ह्यांचे मत अजिबातच नाही पटले. शब्दा- शब्दात मग्रुरी जाणवते. नंदिनीचा शब्द न शब्द पटला.

गंभीर आजार झालेल्या मुलाचे आईवडिल "त्या" प्रसंगाच्या आठवणीने आजही जर का ओक्शाबोक्शी रडत असतील, तर "कुठे" आणि "किती" चा प्रत्येकाचा हिशोब कदाचित वेगळा असेल पण "काहीतरी" नक्कीच चुकलंय एवढे समजूच शकतो आपण.

साती वगळता, इतर सर्व डॉक्टरी पेशाशी निगडीत असलेले लोक, सर्व आरोप स्वतःवर केले जातायत अश्या प्रकारे का प्रतिक्रिया देतायत? ह्या पेशात वाईट प्रवृत्ती आहेत व दिवसेंदिवर वाढत चालल्या आहेत हे सर्वमान्य आहेच व ज्या लोकांना वाईट अनुभव आलेले आहेत ते इतरांना कळावेत म्हणूनच हा प्लॅटफॉर्म आहे. डॉक्टरांनी देखील त्यांची बाजू मांडावी, अनुभव लिहावेत, अडचणी सांगाव्यात की. तसेच इतर प्रोफेशन्स..जसे की सी.ए, किंवा सॉफ्टवेअर इं वगैरेबद्दलची त्यांची मते जरूर लिहावीत.

वेल
साड्या निवडण्याचं उदाहरण छान आहे. पण साडी विक्रेत्यावर फसवणुकीचा खटला सुद्धा दाखल करता येतो. साडी खराब लागली तर बदलून दिली जाते. दोन भिन्न व्यवसायांची तुलना करताना सांभाळून करावी. साडीचं दुकान कुणीही टाकू शकतो. पण डॉक्टरसाठी कायद्याने अर्हता लागते. त्यामुळे पूर्वी डॉक्टर्स कमीच असायचे.

सिव्हील इंजिनियर्स सुद्धा पूर्वी कमी असत. पण शासनाने असा कायदा केला नाही कि घरं बांधण्याचा व्यवसाय करण्यासाठी सिव्हील इंजिनियर असावा. त्यामुळे मारवाडी, गुजराथी या धंद्यात शिरले. आता तर सिव्हील इंजिनियर नसलेल्यालाही साईट सुपरवायझर म्हणून नेमतात. प्रोजेक्ट पूर्ण होताना एखादा फ्रेशर पकडून त्याच्या सह्या घेतात.

वकील, डॉक्टर यांना कायद्याने व्यवसाय करण्याचे संरक्षण आहे. हा फरक लक्षात ठेवा.

>>मान्य आहे की काही डॉ पेशंट च्या समोर स्वत:चे पर्सनल कॉल घेतात, ओटी मध्ये ऑपरेशन करताना गप्पा मारतात जोक्स करतात. पण का करु नये त्यांनी. जर एखादा डॉ दिवसभर काम करत असेल आणि पर्सनल लाईफ जगायला पुरेसा वेळच नसेल तर त्यांनी कॉल्स घेतले आनि इतर कलिग्ज बरोबर जोक्स मारले तर त्यांचे काय चुकले?>> भयंकर इरिटेटींग प्रकरण आहे जेव्हा पेशंट तुमच्यासमोर बसलेला असतो आणि डॉक्टर पर्सनल फोनवर अवांतर गप्पा मारतात हे बघणं. भारतात हे खूप पाहिलंय आणि इकडे अजिबातच बघण्यात आलेलं नाही. जशी डॉक्टरच्या वेळेची किंमत असते तशीच पेशंटच्या वेळेची (डॉक्टरसमोर बसलेल्या आणि बाहेर नंबरची वाट बघत बसलेल्या) का असू नये आणि डॉक्टरना हे का कळू नये?

वेलच्या पोस्टमधला 'प्रत्येकाने सतर्क असावं' हा आणि इतकाच भाग पटला.

ह्यांचे लोकांनी सतर्क रहावे म्हणून सांगणेसुद्धा खरे नाहीये. कारण लोकांना सतर्क करण्याचा एक प्रयत्न असलेल्या ह्या धाग्यासाठी मात्र नाराजी दिसते.

वेल,
पोस्ट अजिबातच पटली नाही. तुमची पोस्ट डॉक्टर मंडळींच्या चुकीच्या वर्तनाचे जस्टिफिकेशन देणारी वाटली. प्रोफेशनल एथिक्स न पाळता केलेले वर्तन हे गैर आहे. त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येत नाही.

एक आयुर्वेदिक डॉक्टर होते. प़ण सर्रास पेनिसिलिनचे इन्जेक्शन द्यायचे. तापाचा पेशंट आला की पेनिसिलिन इन्जेक्शन ठरलेले. आयुर्वेदिक डॉक्टरला अँटीबायोटिक्स देता येतात का? अशा अतिरेकी प्रतिजैविकांच्या वापरामुळे जंतु जास्त कणखर बनतात आणि हळूहळू ते प्रतिजैविक काम करेनासे होते असे मी वाचले आहे.
एका मुलीला असेच पेनिसिलिनचे इन्जेक्शन दिले. साधा ताप. पण तिला त्याची अ‍ॅलर्जी होती. आणि डॉक्टरसाहेब ते विचारायच्या भानगडीत पडले नाहीत. नंतर घरी गेल्यावर तिला चक्कर येऊन ती पडली. भिंतीचा टोकदार कोपरा लागून मोठी जखम झाली. नशिबाने डोळ्याला दुखापत होता होता वाचली.
अर्थात डॉक्टरला असे का केलेत असा जाब विचारण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.

माझा प्रश्न -
डॉक्टरांचा वाईट अनुभव आल्यास, यात हयगय, फसवणूक, योग्य डिग्री नसताना औषधोपचार , चुकीच्या पद्धतीने हॉस्पिटलमधील बिलिंग, गरज नसलेली औषधे, टेस्ट्स गळ्यात मारणे वगैरे झाल्यास भारतात दाद मागायची झाल्यास काय प्रोसेस आहे?

हा सगळा धागा वाचल्यावर खालील अनुमान/ प्रश्न पडले.
१. भारतात काही ठराविक सिम्टम्स असले की काही ठराविक गोष्टी केल्याच पाहिजेत, केल्या नाही तर तो हलगर्जीपणा मानला जाईल. असा काही नियम नाही.
२. भारतात पॅथलॉजी लॅब्स पुरेश्या रेग्युलेटेड नाहीत. जर टेस्ट करून मिळणारे रिझल्ट खात्रीशीर नसतील तर वरील '१' मधील नियम जरी केला तरी तो परिमाण कारण नसेल, रादर त्याचा गैरवापर होऊ शकेल.
३. वरील १ मधील नियम केला तर उगाच टेस्ट कराव्या लागतील/ टेस्ट न करताही काही गोष्टी समजतात तर टेस्ट कशाला/ खर्च भरमसाठ वाढेल इ. बचावात्मक विधाने करता येतील. पण हे सर्व जरी खरं असलं तरी त्यावर हातावर हात धरून काहीच न करणे हा उपाय कधीही असू शकत नाही. नियम फ्लेक्सिबल बनवता येतात. थोडा ग्रे एरिया राहिला तर त्याचा फायदा घेणे आणि नियमच न करणे यात निवड करताना नंतरचं निवडलं तर भयानक आहे.
४. डॉक्टर आणि त्याची सेवा ही कितपत रेग्युलेटेड आहे याबद्दल प्रश्न पडावा अशी परिस्थिती वाटली. एका डॉ ने किती रुग्ण तपासले, त्यांना काय औषधे दिली, का दिली इ. डॉक्युमेंटेशन वेळे अभावी न करणे, त्याबद्दल कुणीही प्रश्न न विचारणे, रादर ते करणे बंधनकारक नसणे हे पटलं नाही. रुग्ण ते डॉ गुणोत्तर बरोबर नाही, वेळ नाही, खर्च वाढेल हे सगळं त्या परिस्थितीत मान्य असलं तरी परत ते सोडवण्यासाठी काहीही न करणे आणि मग अशा परिस्थितीत डॉक्युमेंटेशन मधून कायमची सूट, याला काही अंत नाही असं वाटतं.
५. भारतात असताना आणि या धाग्यातही, डॉ एकूणच प्रतिजैविके सर्रास देतात असं वाटलं. त्याचा फक्त आणि फक्त बॅकटेरिअल इन्फेक्शन वर परिमाण होतो. फंगल आणि व्हायरल इन्फेक्शन असेल तर antibiotics काम करत नाहीत. हे बेसिक माहित आहे का नाही इतपत शंका यावी असं मला वाटलं.
६. आता डॉ. वर धड रेग्युलेशन नाही, डिमांड इतकी जास्त की नाव खराब होवूनही आयुष्यात काही फरक पडत नाही अशा परिस्थितीत हेच होणार असं वाटलं. दुर्दैवी. जे डॉ चांगले आहेत/ ओळखीचे आहेत/ ज्यांची ट्रीटमेंट करण्याची शैली आपल्याला पटते तिकडे जाणे या व्यतिरिक्त रुग्ण्याच्या हातात काही नाही इतकी हताश परिस्थिती वाटली मला.

>><<सामान्य लोकांना आलेल्या वाइट अनुभवांच्या चर्चेत मेडिकल टुरिझम कसं घुसलं बुवा? >>
दिगोची यांनी आत्ता पुन्हा लिहिलंच आहे.
इथून.
<<दिगोचि | 24 February, 2016 - 05:46

.... ते म्हणतात की सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या>>

मयेकर - परत एकदा, कायच्या काय! किरकोळ आजाराचा संबंध मेडिकल टुरिझम बरोबर? धन्य!

ते वाक्य असलेली सातींची ओरिजिनल क्मेंट परत जाउन वाचली. कमेंट्मध्ये कंपॅटिबल हा शब्द वापरला आहे; तिथे काँपिटंट हा शब्द हवा. डॉक्टर कंपॅटिबल असायला त्याच्याशी काय संबंध जोडायचेत?.. Lol

राज ,

Biggrin

मेडीकल टुरीझम आता एकदम कमी झालेल आहे, हे ईथल्या डॉक्टरना माहिती नाही ?

भारत असहिष्णु असल्याचा दावा केला असल्याने त्याचा परीणाम मेडीकल टुरिझमवर झालेला असेलच की,
आणी त्यात आता डॉक्टर सुद्धा असहिष्णु असले तर मग काय पाहीजे ?

५. भारतात असताना आणि या धाग्यातही, डॉ एकूणच प्रतिजैविके सर्रास देतात असं वाटलं.

+१ हे अनुभवलं आहे.

मला स्वतःला नाही पण जवळच्यांना डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे काही अनुभव आले आहेत. सगळ्यात वाईट होता तो जवळच्या मैत्रिणीचा. १५ एप्रिल २०xx हा प्लॅन्ड सिझेरिअयनचा दिवस ठरला होता. तिला ९ तारखेला बाळाची हालचाल खूपच कमी जाणवली म्हणून ती घाबरुन डॉक्टरांकडे गेली. तिथे फक्त बाळाच्या हृदयाचे ठोके बरोबर आहेत एवढे तपासून, तसल्ली देऊन घरी सोडून दिले. दुसर्‍या दिवशी काहीच हालचाल जाणवत नाही म्हणून घाबरुन परत गेली तोपर्यंत बाळ गेलेले होते. डिलिव्हरीच्या ५ दिवस आधी! हे बेंगलोरच्या मोठ्या, महागड्या दवाखान्यात. इथे फक्त डॉक्टरचा हलगर्जीपणा होता. जेंव्हा हालचाल कमी आहे तेंव्हा पहिली गोष्ट म्हणजे अल्ट्रासाउंड करुन बरेच तास मॉनिटर करत राहणे हे का केले नसावे. (खूप पेशंट्स, कमी स्टाफ, का काय महिती!!) बहुतांशी डॉक्टर्स हे करतही असतील पण ह्या केस मध्ये नाही केले. अमेरिका भारत ही तुलना नाही, पण माझा फर्स्टहँड अनुभवही असाच आहे. मी ही पॅनिक होऊन डॉक्टरकडे गेलेय, तिथे गेल्यावर मला पूर्ववत movement जाणवली, तसे मी सांगितले, पण तरी मला ४-६ तास मॉनिटर केले गेले. फक्त सगळे ओके आहे हे कन्फर्म करण्याकरता.

दुसरा मुद्दा डॉक्टरांच्या insensitivity चा, तुसडेपणाचा! तर मला वाटतं ते आपल्या देशातलया असंख्य लोकांचं अ‍ॅटीट्युडचे प्रातिनिधिक चित्र आहे. हे डॉक्टर्सच असायला पाहिजे असे नाही. दुकानदार, सरकारी नोकर, वकील, पोलिस, मायबोलीवरची लोकं, रस्त्यावरची/बसमधली रँडम माणसं वगैरे वगैरे. डॉक्टर्सही सामान्य लोकांमधुनच आलेले आहेत, आणि ते सर्वसामान्यांचाअ‍ॅटीट्युड रेप्रेझेंट करतात. बरीचजण वैतागलेली, कावलेली असतात. आजारी, शारिरीक/मानसिकरित्या दुर्बळ झालेल्या लोकांशी दिलासादायक वागावे हे काहींच्या गावी नसते. एक उदाहरण (वरती कोणी लिहिलं आहे तसं) म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी आपल्याकडच्या बर्‍याचश्या नर्सेस, आया वगैरे कमालीच्या इन्सेन्सिटिव्ह असतात, हेकट आणि तुसड्याही, कळवळणार्‍या बायकांवर खेकसणार्‍या. ह्याचे विरोधी चित्र परदेशात दिसते. तिथल्या नर्सेस, मिडवाइव्स ह्या तुमच्या आई सारखं प्रेमानी तुमचं करतात (दोन्हीही देशात अपवाद असतीलच). मी जिथे बाळाला जन्म दिला त्याला 'बेबी फॅक्टरी' म्हणतात. प्रचंड बिझी हॉस्पिटल, स्टाफ सतत लगबग करणार, स्ट्रेसफुल काम करणार, तरी चिअरफुल, आश्वासक. पण परत, माणसाला जास्त किंमत न देणे, ही आपल्याकडची बर्‍यापैकी कॉमन गोष्ट आहे. जोपर्यंत हे बदलणार नाही तो पर्यंत डॉक्टर, इंजिनिअर, वकील कोणातही बदल होणार नाही.

जसे हुशार, मठ्ठ, सामान्य, असामान्य, गलथान, स्वार्थी, खोटे लोक वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये असतात तसेच डॉक्टरकीतही! फक्त लोकांच्या तब्येतीशी, जीवाशी ह्यांचा संबंध असल्याने सगळ्यांकडूनच जास्त अपेक्षा असणारच. इथे आलेली उदाहरणं ही फक्त वाईट अनुभव आलेल्या डॉक्टर्सची आहेत पण ह्या सगळ्या लोकांना डॉक्टर्सचे चांगलेही अनुभव आलेले असतील. माझ्या अगदी जवळ्याच्या नात्यात अतिशय हुशार, समंजस, पेशंटशी माणुसकीने/प्रेमाने वागणारे, विविध शिबिरं भरवून गरजुंना सेवा देणारे डॉक्टर्स आहेत पण ते ह्या बाफचा विषय नाहीत. (त्यामुळे डॉक्टरांनी मनाला लाऊन घेऊ नये :))

मो उत्तम पोस्ट. पण इथल्या लोकांच्या पचनी पडणार नाही. यातून त्यांना काहीही आउटकम नकोचे. ४ डॉक्टरांचे अनुभव सांगा, कित्ती कित्ती वाईट अशी सहानुभूती जमा करा. यातून शिका, चूक झाली तर पुढच्यावेळी होणार नाही म्हणून तुम्ही शिका हे पहिली ३-४ पानं लिहूनही डॉ जवाबदार आहे इतकंच इथल्या बहुसंख्य लोकांना कन्क्लूजन हवंय. पण डॉ जवाबदार आहे ते तर मान्यच, पण तो तुम्हाला जवाबदार वाटतो तसा कायद्याला सरकारला वाटत नाही. त्याला शिक्षा होणे शक्य नाही, तर त्याबाबत कुणालाही काहीही वाटत नाही. व्हेंट आउट पेक्षा काहीही नकोय. जनरल भारतीय मानसिकताच आहे तशी.

सिस्टीममध्ये बदल हवे ते करणे एकट्याला शक्य नाही तर कमीतकमी त्यावर बोला, बदल हवे असं वाटतं तरी का? तर मान्य करा. पण नाही. वाईट डॉ आहेत हेच फक्त म्हणायचं. पण भारतातील काही डॉ मनाला येईल तशी practice करतात, त्यांना अडवू शकेल असा धरबंध नाही. भारतात तपासण्या रेग्युलेटेड नाही, डॉ साधं डॉक्युमेंटेशन करत नाहीत. असं भारताला कोणी काही बोल्लं की तुम्ही वाईट. भले भारताने अकौंटेबिलिटी/ जवाबदारी येण्यासाठी काहीही नियम केले नाहीत तरी ते लोकसंख्या, शिक्षण, अवाढव्य आकार, कमी उत्पन्न अशा सार्वत्रिक समस्यापोटी वर्षानुवर्ष देऊन टाकायचे. वर, 'पण आमचे ते हे डॉ होते ते अगदी धन्वंतरी हो' किंवा 'इथे इथे बघा उत्तम ट्रिटमेंट होते' किंवा 'मेडिकल टुरिझम होतं की!!!' . म्हणजे सगळं कसं छान चाललंय.
मेरा भारत महान म्हटलंच पाहिजे.

इथे डॉक्टरांच्या वाईट अनुभवांत 'दोन डॉक्टरांचं पेशंटच्या ट्रीटमेंटबाबत कम्युनिकेशन' ह्याबद्दल कुणी लिहिलंय का? दुर्दैवानं भारतात असलेल्या नातेवाईकांना अत्यंत वाईट अनुभव आलेत ह्या बाबतीत. आणि हा एकाच नातेवाइकाचा नाही तर ३ वेगवेगळ्या नातेवाईकांना आलेला अनुभव आहे.

कॅन्सर पेशंट एका हॉस्पिटलला अ‍ॅडमिट. त्याच्या नेफ्रॉलॉजिस्ट आणि ऑंकॉलॉजिस्ट ह्यांनी एकमेकांशी सल्लामसलत करून लवकरात लवकर काही निर्णय घेणं अत्यावश्यक अशी परिस्थिती. पण हे लोक एकमेकांशी बोलायला, त्यासाठी वेळ काढायलाच तयार नाहीत. पेशंटचे नातेवाईक ह्या दोन्ही डॉक्टरांशी बोलून एक डॉक्टर काय म्हणाले ते दुसर्‍यापर्यंत पोचवण्याची धडपड करताहेत. प्रत्येकजण 'मला काँटॅक्ट करायला सांगा' असं दुसर्‍या डॉक्टरांसाठी निरोप देताहेत. भयंकर फ्रस्ट्रेटिंग परिस्थिती होती. काय प्रॉब्लेम आहे? इगो? की आणखी काही? मधल्यामधे पेशंट आणि नातेवाईक ह्यांची होलपट चाललेली.

कम्युनिकेशन चे साधन? म्हणजे रिपोर्ट सिस्टीम मधून डॉ कडे जाणे, डॉ ने वेळ देऊन ते बघणे. बघितलेत का नाही हे कन्फर्म करायला सिस्टीम मध्ये चेक. बघितले की काय तो ओपिनियन सिस्टीम मध्ये असणे.
हे सगळं असतं का माहित नाही पण असलं तर फॉलो करायला इगो?

दोन्ही स्पेशालिस्ट्सनी काही टेस्ट्स सांगितल्यात. केलेल्या टेस्ट्सचे रिपोर्ट्स दोन्ही स्पेश्यालिस्ट्सकडे पोचवायचे आहेत. तसे ते पोचलेत. त्यावर पुढली ट्रीटमेंट ठरणार. पण दोन्ही डॉक्टरांनी आपाआपसात बोलून ठरवायची आहे. कम्युनिकेशनची साधनं आणि बाकी डीटेल्स माहिती नाहीत. पेशंटचे नातेवाईक अक्षरशः रडून 'प्लीज एकमेकांशी लवकर बोला' हे डॉक्टरांना सांगताहेत अशी परिस्थिती होती.

अतिशय उत्तम धागा. आपल्याकडे डॉक्टर देव, उपकार करणारा वगैरे समजुतींनी चुकीची ट्रिट्मेंट मिळाली तरी आवाज उठवला जात नाही. डॉक्टरांकडूनही प्रोफेशनलिझमची अपेक्षा आहे. वाईट सर्व्हिस दिली तर आपलं कंझ्युमर रेटिंग कमी होउ शकतं याची जाणिव डॉक्टरांनाही असली पाहिजे.

Pages