डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही भाषा कोण्त्याही सुसंस्कृत ओथ मध्ये असू शकते का याचा विचार केला होता का त्या डोक्टरने ?
<<
रेव्युकाका,
त्या येड्याला डॉक्टर म्हणायलाच माझा आक्षेप आहे.
असल्यांच्या वागण्याने एकंदरित डॉक्टर्सना बदनाम करण्याला दुसरा.

ज्याप्रकारे मेधावि यांनी किस्सा लिहिलाय तसं घडलेलं नसणार हे खात्रीने सांगतो. अशा वेळी प्रोटोकॉल असतो, अन तो फॉलो केलाच जातो. <<<< दीड मायबोलीकर, प्रत्येकाकडून प्रोटोकॉल फॉलो केलाच जातो, याबद्दल तुमची १०० % हमी असेल तर प्रश्नच नाही. हे ऐकून मला आनंदच होईल.

अगदी ११०% हमी आहे गजानन.

त्यांनी किस्सा मालिशिअसली लिहिला आहे हे शब्दरचनेतूनच दिसतेय.

असला रेअर डिसीज असताना काय कुण्या शिकाऊकडे कन्सल्टेशनला नक्कीच गेलेले नाहीत हे लोक. दीनानाथला अ‍ॅटॅचमेंट मिळालेला कन्सल्टन्ट आहे, व पीजी टीचिंग करतो आहे. 'मित्रमैत्रिणींना" हाका मारत नाहिये.

आता जरा जास्तच होत नाही आहे का? 'मी पाहिले नाही पण डॉक्टर चुकीचा वागलेला नसणार' हे लॉजिक वरील प्रत्येकच घटनेला लागू करता येईल, हो की नाही? आणि म्हणे कोण डिफेन्सिव्ह होतंय!

धाग्याच्या सुरुवातीपासूनच हे होत आले आहे. धागा आहे डॉक्टरांकडून आलेले वाईट अनुभव लिहिण्याचा आणि ते लिहिले की काही जण म्हणत आहेत असे झालेलेच नसणार आणि काही जण म्हणत आहेत पेशंटने संपूर्ण शहानिशा करावी. ह्यातले काही नसेल तर 'त्याला मी डॉक्टरच समजत नाही'! (एखादा आयुर्वेदिक किंवा नेचरोपथी करून आला तर त्याला अ‍ॅलोपथीवाले डॉक्टर समजणार नाहीत हे तत्त्वतः: मान्य आहेच, कृपया त्यावरून वाद नको)

एकही डॉक्टर असे का म्हणत नाही की 'येथे डॉक्टरची फारच गंभीर चूक झालेली दिसत आहे'?

दीडमा, डॉक्टरी पेशाबद्दल इथे जे काही लिहिले जाते त्याबद्दल तुम्हाला वेदना होणे साहजिक आहे.पण व्यवसाय म्हणून जी समष्टी असते त्यातल्या ब्लॅक शीप्सच्या वर्तनामुळे सर्वाना एका मापात तोलण्याचा मोह अ‍ॅग्रीव्ड लोकाना होण टाळता येत नाही. इव्हन सांगणार्‍या / लिहिणार्‍यांनाही जनरलायझेशन करायचे नसते. 'डॉक्टर जगवतात की नागवतात ?'या सनातन प्रश्नाचे उत्तर जगवतात असेच अजून तरी आहे. इथे देण्यात आलेल्या केसेस अगदी व्यक्ती स्सापेक्ष आहेत . जनरल नाहीत. तुम्ही, साती , डॉ. शिन्दे व्यावसायिक मंडळी व्यवसायाच्या मर्‍यादा सांभाळून प्रामाणिक पणे काम करीत आहातच. पण सगळे तसे नाहीत. शिवाय रोज रोजच्या रूटीनमुळे काही बाबी मधला भावनात्मक सर्ज कमी होतो हेही खरेच. उदा> पोलीस स्टेशनला नेहमीच्या मारामार्‍या गेल्यास त्यातले सहभागी, पीडीत यांच्या भावनांचा उद्रेक झालेला असतो व आताच्या आता , ताबडतोब काहीतरी झाले पाहिजे अशा स्टेजला ते असतात. तर पोलीस स्टेशनचा स्टाफ हे नेहमीचेच किरकोळ गोष्टीआहेत अशा पद्ध्तीने निवांत सगळे चालू असते. परवा आमच्या मातोश्रीच्या चातीत डावीकडे चमका निघू लागल्या म्हणून सगळे घाबरून गेले . रात्रीची वेळ . सुदैवाने सोसायटीत एका मोठ्या ।ओस्पिटलात काम करणारे नवीन ज्युनिअर डॉक होते त्याना बोलावले. त्यानी शांतपणे तपासणी करून काही हिस्टरी घेतली आणि दोन सर्वसाधारण औषधे सांगितली. दोनेक तासात बरेही वाटले. हा परसेप्शन लेव्हलचा फरक असू शकतो. त्यामुळे गैरसमज होतात. पण वर वर्णन केले बरेचसे प्रकार ह्याच्याही पलिकडचे, अक्षम्य निग्लिजन्स ह्यात मोडतात असे मला वाटते. सातीनी देखील त्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आपल्या व्यवसाय बंधूंच्या पापाची ही टोकरी प्रत्येक व्यवसायातल्या सिन्सिअर लोकाना अपरिहार्य पणे वाहावीच लागते Happy
अ‍ॅप्रिसिअशन आहेच ते पलिकडच्या बीबी वर उत्कटपणे व्यक्तही होत आहे.
ओथचाही प्रश्न आहे . ते तर रिच्युअलच आहे . त्याला काही अर्थ नाही. ज्या देशात धर्मग्रंथावर हात ठेऊन शपथेवर खोटे बोलले जाते , संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन निवडून आलेले महाभाग पावलापावलावर संविधानाची ऐशी तैशी करून टाकतात., त्या देशात ओथबद्दल कोणती खरी- कोणती खोटी-त्यांचे कंटेंट काय यावर फार गांभीर्याने चर्चा करण्यात अर्थ नाही.
पुण्याच्या के ई एम ला डॉ वॅलेंटिन लोबो नावाचे चाळीशीतले नेफॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्याबद्दल एका अतिशय सिनियर डॉक्टरने बोलताना सांगितले ' आपला जन्म केवळ पेशंट बरा करण्यासाठीच झाला आहे ही या डॉक्टरच्या आयुष्याची थीम आहे. पैसा. फेम वगैरे या बाबी नगण्य आहेत त्यांच्यापुढे.' अशा व्यक्तींनी शपथ घेतली काय नाही घेतली काय. 'अ'शपथ घेतली की 'ब" शपथ घेतली की फरक पैंदा.?
बाकी प्रश्न एक दोन लूत भरलेल्या आयडींचा. छड दे यार ! ::फिदी:

दोन लिंफनोड्स (की काय ते) टण्णूसारखे दिसू लागले म्हणून सोसायटीतील एका डॉक्टरना कॅज्युअली विचारले तर त्यांना नीट शंकासमाधान करता आले नाही किंवा काही सांगताही आले नाही. फिजिशिअनला दाखवणार होतोच पण तसे त्यांनीही सुचवले. दुसर्‍या दिवशी फिजिशिअनला यायला वेळ होता म्हणून ई एन टी सर्जनला दाखवले. ई एन टी ला का दाखवले अशी शंका येत असल्यास त्या क्षणी मला असे वाटले की तोही त्याबद्दल सांगू शकेल, इतकेच! आणि त्याने सांगितलेही! तो म्हणाला ह्याबाबत काहीही करावेसे वाटत नाही आहे. सर्दी वगैरे असेल. त्याने एक साधे औषधही लिहून दिले नाही. मात्र हिमोग्रॅम करायला सांगितला व व्हॅल्यूज ओके असतील तर दाखवायलाही येऊ नका असे म्हणाला. व्हॅल्यूज ओके आल्या होत्या. काही दिवसांनी ते टण्णू हाताला लागेनासे झाले.

एक वाईट व एक चांगला अनुभव! पण वाईट अनुभववाल्याबाबत सहानुभुतीच वाटली कारण बहुधा ते त्याच्या आवाक्यात नव्हतेच व त्याने जुजबी वाक्ये टाकून फिजिशिअनला दाखवा हेच सुचवले.

एकदा अस्वस्थ वाटू लागले. घरी बीपी तपासले तर १८०-१२०. अधिकच टेन्शन आले. जनरल प्रॅक्टिशनरकडे जाऊन तपासले तर १७०-११०. त्याने लगेच गोळी घ्यायला सांगितली. घेतली. तरी डोके दुखत राहिले. अर्ध्या तासाने हॉस्पीटलमध्ये गेलो. तरुण डॉक्टर होता. त्याने खूप घाबरवले. म्हणाला तुम्हाला आय सी यू मध्ये ठेवावे लागेल. रात्रभर पॅरॅमीटर्स मॉनिटर करावे लागतील. तुम्ही म्हणताय तुम्हाला रक्ताची गाठही झाली होती. मी सगळ्या स्टाफसमोर त्याला म्हणालो, प्लीज मला घाबरवू नका. मला ह्याक्षणी आत फार काही त्रास वगैरे होत नाही आहे. पण त्याने त्याचे म्युझिक सुरू ठेवले.

तोवर सिनिअर कार्डिओ आले. तपासले. हॅबिट्स विचारल्या. गोळी बदलली. लिप्रिल चालू होती ती बदलून ओल्सार सुरू केली. घरी जा म्हणाले. तरुण डॉक्टर त्यांना 'सर, नोन केस ऑफ पल्मनरी एम्बॉलिझम' वगैरे सांगत राहिला.

आम्ही निघाल्यावर नुसतेच बाय म्हणाला. पण मला हा अनुभव वाईट आहे की कसा हे नीट सांगता येत नाही. त्याने मला घाबरवले, माझ्या कुटुंबियांना घाबरवले हे वाईट होते. पण तो जी काही काळजी घेऊ पाहत होता ती त्याच्या अल्प अनुभवानुसार कदाचित योग्य असावी. अनुभवी डॉक्टर आल्यावर त्याची बोलती बंद झाली ह्याचा आनंद मी मानून घेणे हे मलाही वाटले नाही. पण इतकेच वाटले की त्याला नीट माहीत होते की मोठे डॉक्टर येणार आहेत. अश्या परिस्थितीत त्याने खूप काही पुढचे बोलून बसायला नको होते. क्षणभर वाटले की हा उद्या क्लिनिक उघडून बसला तर पेशंट्सना घाबरवण्यातूनच भरपूर कमावू शकेल.

बेफिकीर, मी याच धाग्यावर लिहिलेल्या अगोदरच्या पानांवरच्या पोस्टस एकतर तुम्ही वाचल्या नाहीत किंवा वाचून दुर्लक्ष केलंत.
असो.

मानव पृथ्वीकर, तुमच्या मलेरियासारखा अनुभव मीही घेतला आहे. बाकीची लक्षणं आठवत नाहीत पण उलट्या आणि ठणकणारी डोकेदुखी तेवढे अजून लक्षात आहे. त्यावेळी तिथे टायफॉईड, मलेरिया, साधा फ्लू इ. साथीचे रुग्णही भरपूर होते. दोन आठवड्यांत दोनदा (एकदा ताप असताना, एकदा नसताना) रक्ताची तपासणी करूनही काही निदान होत नव्हते. उलट्यांमुळे फारसे काही पचत नव्हते आणि तब्बेत खालावत चाललेली. परिक्षेपूर्वीच्या अभ्यासासाठी मिळणारी अर्धी सुट्टी यातच संपून गेली. योगायोगाने त्याच वेळी दुसरा एक रुग्ण आमच्या डॉक्टरांकडे आला. त्याच्या आजाराचीही लक्षणं माझ्यासारखीच होती. फक्त त्याच्या चाचण्यांमध्ये मलेरिया आढळला. मग डॉ. नी मलाही ताबडतोब मलेरियाचे औषध चालू केले आणि दुसर्‍याच डोसानंतर बराचसा आराम वाटू लागला.

यात आमचे डॉ. प्रत्येक भेटीत व्यवस्थितरित्या, काय असू शकते, सध्या आपण काय औषधे घेत आहोत, आणि पुढे कोणत्या आधारावर काय ठरवता येईल, हे सांगायचे. त्यामुळे डॉक्टरांचाच मोठा आधार वाटायचा.

दीड मायबोलीकर
तुम्हाला उद्देशून शेवटची पोस्ट लिहीतो जी विषयाशी संबंधित नसेल. इथे तुम्ही माझे प्रतिसाद खोटेच आहेत असे समजून भाजपच्या फोटोशॉप युनिटप्रमाणे कट पेस्ट करून उपरोधिक शेरा मारलात. दुखण्याची सुरूवात तुमची होती आणि शेवटपर्यंत तुमचंच दुखतंय. कुणा कुनाच्या नावाने संबोधताय, ही सुरूवात तुमचीच. मग तुम्हाला तुमच्याच आयडीने संबोधलं की शेपटाला आग लागलेली दिसतेय. तुम्ही आणि तुमचे ते जिवंत पोर्कवाले मित्र मला सातत्याने टार्गेट करताय.

पण मी तेच सांगतोय की तुमचे प्रतिसाद अनाठायी आहेत, त्यामुळे लोकांचे मनोरंजन होईल फारतर . एकाच वेळी चार पाच प्रतिसाद पडतात तेव्हां एखादा दुर्लक्षित राहतो तसा साती यांचा एक प्रतिसाद नंतर वाचनात आला. त्यांनी चुका मान्य केल्या आहेत हे पटले. बाकी तुम्ही हास्यास्पद होऊ नये म्हणून सांगितले दुसरं काही नाही. काय करावे हा तुमचा प्रश्न आहे.

शपथ मी विचारली होती. त्ती मी शोधून काढली. पण ती इतकी जुनी आहे की डॉक्टर्स ही शपथ घेत असतील यावर विश्वास बसेना. ती बंधनकारक नाही हे वाचलं. मॉडर्न ओथ म्हणून जी सापडली ती डॉक्टर्स डे आणि डॉक्टर असं नाव लावणारी व्यक्ती पाहून इथे दिली. त्यावर तुमचे विनोद पाहून मौज वाटली. अहो मला नाही कळत या क्षेत्रातलं. मी हेच सांगतोय पहिल्यापासून. गूगल केलं तर काय होतं हे त्यातून समजतंय.

तुम्ही एका ठिकाणी डीजेलच्या कारमधे सीएनजी भरायचा प्रतिसाद दिला होता. लिंक देऊ का ? तिथे मी अशा स्मायल्या टाकल्या नाहीत. कारण ते तुमचं क्षेत्र नाही. काहीतरी चुकतंय, ते काय असावं म्हणून फक्त डिझेल मधे एलपीजी शक्य नाही असं सांगितलं तर तुम्ही मी स्वतः पाहीलय. घरातला सिलींडर आणून लावतात असा प्रतिसाद दिला. दुस-या आयडीने पण सेम चूक केली. डिझेल इंजिनमधे एलपीजी किंवा सीएनजी लावता येत नाही. त्यामुळे तुम्ही असं का लिहीताय याबद्दला कन्फ्युज्ड असताना दुस-या आयडीने सेमच चूक करणं ही हाइट होती. पण तुम्ही चेक करा. मी तिथे तुमच्या अज्ञानावर हसलेलो नाही. असल्यास मायबोलीवर येणार नाही.

शांतपणे लिहीले असते, उपहास नसता केला तर कुणी वाद घातले नसते. डॉक्टर आहात तुम्ही. यापलिकडे माझ्याकडे शब्द नाहीत समजावून सांगायला.

अगदी ११०% हमी आहे गजानन. <<< दीड मायबोलीकर, तसेच होवो. अशा कडवट प्रतिक्रिया उमटतात तेंव्हा त्यामागे तसेच काही कडवट अनुभव कारणीभूत असतात.

एकदा सहा महिन्यांच्या बाळाला सर्दी आणि ताप आहे म्हणून नव्या ठिकाणी एका लहान मुलांच्या एम डी डॉक्टरांकडे गेलो. गेल्यावर पहिली दहा मिनिटं त्यांनी तुम्ही बाळाला कसे हाताळले पाहिजे, त्याला दूध पाजताना कसे धरले पाहिजे, पाजल्यावर ढेकर काढण्यासाठी काय करायला पाहिजे, या गोष्टी खेकसत सांगितल्या. सुरुवातीला आम्हा दोघांना नेमके कळेचना की या सगळ्यांतून, खेकसण्यांतून त्यांना नेमके काय सांगायचे आहे. त्यानंतर बाळाला तपासायला घेतले. बाळाच्या श्वासोच्छवासाची गती बघून स्टेथेस्कोप टेबलावर आपटला आणि पुन्हा आमच्यावर खेकसले. म्हणाले की तुमचे बाळ किती आजारी आहे याची तुम्हाला थोडीतरी कल्पना आहे काय? एवढे आजारी होईपर्यंत तुम्ही स्वस्थ कसे काय बसू शकता? मग बरेच हिताचे उपदेश करून औषध दिले, रात्री प्रत्येक दीड तासांनी वाफ द्यायला सांगून, उद्या सकाळी पुन्हा बोलावले. आम्ही दोघेही अर्थातच हबकून गेलो.

दुसर्‍या दिवशी पुन्हा गेलो. गेल्यावर बाळाला तपासले आणि तिथल्या नर्सच्या हाती द्यायला सांगून तिला रक्तातली ऑक्सीजनची पातळी मोजून आणायला सांगितले. तोपर्यंत आम्हाला त्यांनी सांगितले की बाळ अतिशय गंभीर आजारी असून त्याच्या छातीची क्ष-किरण चाचणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी पॅथॉलॉजीचे नाव आणि पत्ता लिहून दिला. नर्सने बाळाला आमच्या हाती दिल्याबरोबर आम्ही पॅथॉलॉजिकडे धाव घेतली. तिथे बाळाची क्ष-किरण चाचणी केली. आणि रिपोर्टांची वाट बघत तिथेच थांबलो. इतक्यात दुसर्‍या एका मुलाला उचलून घेऊन डॉ. स्वतः त्या पॅथॉलॉजिमध्ये घाईघईत शिरताना दिसले. मागून थोड्या वेळाने त्या मुलाचे आईवडील येताना दिसले. त्यानंतर काऊंटरवर त्या मुलाला त्यांच्या आई वडिलांच्या हाती सोपवून त्यांनी मोर्चा आमच्याकडे वळवला आणि विचारले, की तुमची क्ष-किरण चाचणी झाली का? ती झाली आहे आणि आम्ही रिपोर्टची वाट बघत बसलो आहोत, हे सांगितल्यावर ते थेट आत लॅबमध्ये घुसले आणि थोड्या वेळाने बाहेर आल्यावर परस्पर निघून गेले.

आम्हाला रिपोर्ट मिळाले. त्यात छातीत कफ साचलेला वाटत होता. (हे मी मला तो रिपोर्ट वाचून जे कळले त्या प्रमाणे. हे माझे अर्धवट शहाणपण असू शकते.) ते घेऊन डॉ. कडे गेलो. त्यांनी ते रिपोर्ट पाहिले आणि मग पुन्हा अचानक गळ्यातला स्टेथोस्कोप काढून टेबलावर आपटला आणि बाहेरच्या स्वागतिकेला बंद दरवाज्यातूनच मोठमोठ्याने हाका मारायला सुरुवात केली. "अगं ये अमुकतमुक. कुठे आहेस? या बाळाला ताबडतोब NICU मध्ये अ‍ॅडमिट करायची व्यवस्था करायला सांग." पण बाहेरून काहीच प्रतिसाद आला नाही. बहुधा ती जागेवर नसावी. आम्ही हादरलोच. डॉ. काय झालेय? आमचे बाळ ठीक तर आहे ना? यावर हे बघा बाळ अतिशय गंभीररित्या आजारी आहे, आणि आता ते कोणत्याही क्षणी बेशुद्ध पडू शकते. त्याला ताबडतोब NICU ची आवश्यकता आहे. इ. सांगितले. काय करावे कळेना. तो पॅथॉलॉजितला प्रकार, कालचे खेकसणे, आताची रिपोर्ट बघितल्यावरची प्रतिक्रिया... इतक्यात त्यांचा फोन वाजला. बहुधा मित्रमंडळींचा असावा. फोनवरचे संभाषण हे येणार्‍या आठवडाखेरीस कोणा एका नवीन जोडप्याच्या घरी आयोजित करण्यात येणार्‍या सर्प्राईझ ओल्या पार्टीसंबंधी असावे असे त्यातून समजत होते. हा कॉल अत्यंत रिलॅक्स मूडमध्ये २० मिनिटे चालला. तोपर्यंत आम्ही त्यांच्या समोरच्याच खुर्चीत जीव मुठीत घेऊन कॉल संपायची वाट बघत बसलोय. आमच्या संयमाचा कडेलोट व्हायला आला होता. एकदाचा कॉल संपला. मग त्यांनी तोंड उघडण्यापूर्वी आम्हीच त्यांना सांगितले की ठीक आहे. आम्हाला अ‍ॅडमिट करण्यापूर्वी घरी एकदा माहिती द्यायला लागेल, आम्ही कसलीच तयारी करून आलेलो नाही. त्यात संध्याकाळी आमचा प्रवासाचा प्लॅन आहे, तेंव्हा आधी घरी सगळ्यांशी बोलणे आणि कल्पना देणे गरजेचे आहे.

यावर हे बघा, या अवस्थेत तुम्ही इथून जावे, असा सल्ला मी देणार नाही. त्यातूनही तुम्ही गेलात तर तुमच्या जबाबदारीवर. बाळाला काही झाले तर मी जबाबदार नाही, असे आम्हाला सांगितले. आम्ही 'हो' म्हटले आणि निघालो.

नंतर दुसर्‍या एका डॉ.कडून तिथल्या दुसर्‍या बाळाच्या डॉ. चा संपर्क मिळवला. आणि त्यांच्याकडे जायचे ठरवले. तिथे गेल्यावर बाळाला काय त्रास आहे ते सांगितले. आणि आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे आहे, असे सांगितले. यावर ते म्हणाले. थांबा, आधी मी बाळाला चेक करतो आणि मग बोलू. मग त्यांना घडलेली सगळी हकीकत, आणि रिपोर्ट दाखवले. ते म्हणाले छातीत थोडे कफ झालेत असे वाटतेय. मी काही औषधे देईन ती द्या, उद्या पुन्हा घेऊन या, २४ तासात आराम पडेल. आम्ही म्हटले, अ‍ॅडमिट करावे लागणार नाही का? तर म्हणाले, सध्या नको. २४ तासात आराम पडेल, तसे काही वाटले तर माझा नंबर नोंद करून घ्या आणि गरज वाटली तर मला फोन करा. नंतर एक दिवस औषध घेतल्यावर बराचसा आराम पडला आणि नंतर अ‍ॅडमिट न होताच बाळाचा ताप आणि सर्दी पूर्ण गेली.

या उदाहरणात अगदी साधे प्रोटोकॉलही आधीच्या डॉ. कडून पाळले नाहीत, असे नाही का वाटत?

(हा माझा स्वतःचा फर्स्ट हँड अनुभव आहे.)

बेफि,

तुमच्या सारख्या केसमधे, नेक्स्ट टाईम इतकं बीपी वाढेल, तेव्हा प्लीज त्या ज्युनिअर डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या. सिनियरने तुम्हाला रामभरोसे कटवलंय.

बाकी तुमची मर्जी.

गजानन,

माझ्यासमोर पेशंट असला, तर मी कुणाचाही फोन उचलत नाही. मेडीकल इमर्जन्सी असेल तर असिस्टंट फोन घेऊन मला सांगू शकतो. पण तेही मी अ‍ॅब्सोल्यूट इमर्जन्सी असल्याशिवाय ऐकत नाही.

नेक्स्ट पेशंट सुरु करायच्या आधी मी कॉल बॅक करीन, नेक्स्ट पेशंटकडून २ मिनिटं मागून घेईन. पण ते कन्सल्टेशन सुरु होण्या आधी.

मला वाटतं या सिंपल गोष्टी आहेत, अन डॉक्टरच नव्हे तर सर्वच लोकांनी पाळल्या पाहिजेत. आमच्या कटिंग सलूनमधेही नियम आहे, की त्याचं काम चालू असताना तुम्ही फोन उचलायचा नाही, अन त्यानेही.

तेव्हा अशा प्रकारचा फोन केला असेल, तर तो माणूस मूर्ख आहे असे म्हणतो.

अन हो. खेकसण्याचे नो जस्टिफिकेशन. ते चूकच.

फोन येणं हे गंभीर नाही. बाळाच्या बाबतीत घाबरवून सोडणं हे गंभीर आहे. बेशुद्ध पडेल वगैरे सांगणं पण. गजानन त्यांचं नाव द्या म्हणजे इतर लोक ठरवतील त्यांच्याकडे जायचं की नाही ते.

'मागून' घेतलेल्या वा फुकट मिळालेल्या वैद्यकिय सल्ल्याची किंमत तुम्हाला नसते, हे मला ठाऊक आहे बेफिकिर. पण काये ना, माझा नाईलाज असतो. दिल्याशिवाय राहवत नाही.

गजानन, त्या डॉ.चे नाव बिनधास्त द्या.
अशा डॉ. उघडे पाडलेच पाहिजे थोडे लाज वाटुन सुधारतिल तर..

नीट समजले नाही. वरच्या बीपीच्या स्वानुभवासंदर्भात सल्ला मागितलेला नव्हता. अनुभव सांगितला. अ‍ॅसिडिटीच्या संभाषणाबद्दल बोलत असाल तर तेव्हा संबंध बरे होते. फुकट काहीच घेत नाही. कन्सल्टेशन चार्जेस कळाले तर नक्की धाडून देईन. तुम्ही ते कळवणार नाही हे माहीत आहे. कळवलेत तरी त्याकाळच्या बर्‍या संबंधांच्या स्मृतीखातर मी ते हक्काने पाठवणार नाही हे तुम्हालाही माहीत असेल. पण तुमच्याजागी कोणीही असता आणि नांव, पत्ता माहीत असते तर इथे उल्लेख करायची वेळही येऊ न देता पाठवले असते.

बाय द वे, ह्यावरून एक नवीन मुद्दा:

पेशंटला स्वतःला कसे वाटत आहे आणि त्याला कसेही वाटत असो, त्या परिस्थितीत त्या पेशंटचे काय करायला हवे ह्याबाबतीत पेशंटला स्वतःला कसे वाटत आहे हे डॉक्टर महत्त्वाचे मानत नाहीत का? मला वाटते की मानायला हवे.

बेफिकीर,

बीपीच्या कमीजास्त होण्याच्या बाबतीत बरेचदा पेशंटला काहीही होत नसतं. पण वेळीच काळजी घेतली नाही तर जिवावर बेतू शकतं.

माझा काका हायपरटेन्शनसाठी गोळ्या घ्यायचा. त्याला एकदा पक्षाघाताचा झटका येऊन गेला होता. एका वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयातच तो नोकरी करायचा. त्यानं एका दुपारी सहज म्हणून तिथल्या रुग्णालयात बीपी मोजून घेतलं. ते १९०/१२० होतं. त्याला त्रास काहीच होत नव्हता. तिथल्या डॉक्टरांनी आणि नर्सेसनी त्याला तिथेच थांबायला सांगितलं. पण 'मला काहीच त्रास नाही, हवंतर घरी जाऊन झोपतो' म्हणून तो अकोल्याच्या मे महिन्याच्या उन्हात हट्टानं दुपारी जेवायला घरी आला. जेवण झाल्यावर हात धुताना त्याला उलटी झाली आणि तो कोसळला. बेशुद्ध झाला. घरी मावशी होती. तिनं आमच्या घरी फोन केला. माझ्या आईबाबांनी आणि मावशीनं ताबडतोब दवाखान्यात नेलं. पण तो कोमातून बाहेर आला नाही. तीन दिवसांनंतर तो गेला. आठवडाभरानंतर त्याच्या मुलाचं लग्न होतं.

दीमा सांगतायेत ते अतिशय योग्य आहे. कृपया यापुढे असं काही करू नका, ही कळकळीची विनंती.

चिनूक्स,

खूप खूप आभार प्रतिसादासाठी! मी कोणालाही अयोग्य म्हणत नाही आहे. इतकेच म्हणत आहे की मला एका सिनियर कार्डिओलॉजिस्टने ट्रीट केले व त्याने जसे सांगितले तसे मी केले. Happy

आजही मी त्यानेच दिलेली गोळी घेत आहे. Happy

मी डॉक्टरचे सल्ले न मानता काहीही करत नाही आहे. Happy

पुनश्च आभार!

>>ज्याप्रकारे मेधावि यांनी किस्सा लिहिलाय तसं घडलेलं नसणार हे खात्रीने सांगतो. अशा वेळी प्रोटोकॉल असतो, अन तो फॉलो केलाच जातो.<<

दिड मायबोलीकर - मेधावि यांची मांडणी चुकिची असु शकेल, पण तो प्रसंग खरा असु शकतो. त्यावर तुम्हि दिलेली छातीठोक प्रतिक्रिया, रेव्यु आणि इतरांच्या अनुभवांवर,केलेलं भाष्य - हे सगळं आता हास्यास्पद होत चाललेलं आहे असं तुम्हाला नाहि वाटत?..

या धाग्यावर चेंबुरच्या डायमंड पॉलिक्लिनिकचा उल्लेख झालेला वाचलाय.
हे डायमंड गार्डन जवळचेच हॉस्पीटल आहे का?

त्या हॉस्पीटलविषयी आम्हाला खरोखर चांगला अनुभव आला आहे. माझा मावसभाऊ १०वीत होता. रात्री तापाची कणकण होती म्हणून झोपला, आणि सकाळी जागा झाला तर काय हात-पाय अजिबात हलेनात. सगळ्या स्नायूंतली ताकद गेली होती. फक्त तोंडाचे स्नायू ठीक होते म्हणून ओरडून आई-बाबांना त्याने काय होते ते सांगितले.
तसाच उचलून त्याला डायमंड हॉस्पीटलला नेले. तिथे त्याला "जी.बी.एस." हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान केले आणि हा आजार लाखातून एखाद्यालाच होतो हे त्यांनी समजावून सांगितले. उपचार पद्धती, औषधे वगैरे नीट समजावून सांगितले.

हा आजार आम्ही कधी कोणाला झाल्याचे पण ऐकले नव्हते. पेशंटला भेटायला येणारे-जाणारे काही ना काही कुशंका काढत. काही जण भोचकपणे नर्सला पण विचारत की हा बरा होईल ना. शेवटी कंटाळून डॉ. नी २-३ पानी रोगाची माहिती देणारी पुस्तिकाच तयार करुन दिली होती.

सहा-सात महिन्यांनी मावसभाऊ बराही झाला.

सर्व अनुभव वाचले. खुप वाईट वाटले.
मला अजिबातच वाईट अनुभव आले नाहीत डॉक्टरांचे ( डॉक्टर म्हणून !!! )

असो वर पदवी लिहिण्याचा जो मुद्दा आला आहे त्याबाबत एक शंका. बी.ए.एम.एस. करुन नंतर एम.एस. केलेल्या
एक डॉक्टर पुण्यात आहेत. त्यांचे नाव घेण्याचा प्र्श्नच नाही. पण त्यांच्या क्लीनीकवर फक्त एम.एस. असेच लिहिलेले आहे. ही माहिती पूर्ण आहे का ?
तसेच आणखी एक शंका, कि हे एम. एस. शिक्षण अलोपथी आणि इतर शाखांसाठी वेगवेगळे अस्ते का ?

दिनेश.

माझ्या माहितीप्रमाणे एम. एस. ही शस्त्रक्रिया विशारद असल्याची पदवी असावी. त्याच्याशी पथीचा संबंध असतो का हे माहीत नाही. बी. ए. एम. एस. ही पदवी आहे की पदविका?(डिग्री ऑर डिप्लोमा)... पदवी असल्यास त्यानंतर एम. एस. करता येत असावे.

दीमा, साती ह्यांनी ऑथेंटिक माहीती द्यावी.

अरे बापरे!!!!

नाट्य संम्मेलन समारोप समारंभाला गेले होते काल. म्हणुन इकडे फिरकले नाही. तर लै च प्रतिसद आले आहेत. पण लै भरकटला हा धागा. तिकडच्या पेक्षा इकडे मनोरंजन जास्त झाले असते !!!!!

चांगला सहप्रवासी, आयुष्याचा चांगला साथी, चांगली गाडी, चांगला प्रवास, चांगले अन्न वगैरे बाबि मिळणे हे जितके १०० टक्के तुमच्या नशिबावर अवलंबुन असते, तितकेच चांगला डॉक्टर/वैद्य मिळणे हे देखिल नशिबावरच अवलंबुन असते अशा मताचा मी आहे. सबब, डॉक्टर्स म्हणजे सगळेच वाईटच असे जनरलाईज्ड विधान मी नक्कीच करणार नाही.
पण, चांगल्यापेक्षा वाईट अनुभवांची संख्या कितीतरि पटीने जास्त असते हे वास्तव.
हे वास्तव निर्माण होण्यामागे वैद्यकी शिक्षणाची बनलेली बाजारपेठ, ते शिक्षण घेण्याकरता झालेला अमाप (अर्धा कोटी?) खर्च, व नम्तर तो लौकरात लौकर वसुल करण्यासाठी चाललेली धडपड, ज्यातुन पेशंटला "बकरा" बनविण्याच्या रॅकेटमधिल सहभाग हे सर्व येते.
मला काही अतिशय चांगले अनुभवही आहेत, पण वाईट अनुभवांपुढे ते "काजव्याप्रमाणे" आहेत.
कोर्टाचि पायरि चढु नये असे म्हणतात पूर्वापार, पण हल्ली डॉक्टरची पायरी चढण्याचीही वेळ येऊ नये, हीच मी देवापाशी प्रार्थना करीत असतो. Happy
[माफच करा, पण याबाबतीत मी अ‍ॅलोपॅथी/आयुर्वेदिक्/होमिओपॅथिक असा भेद करीत नाही, सगळे एकाच माळेचे मणी असतात ]

फक्त त्याच्या चाचण्यांमध्ये मलेरिया आढळला. मग डॉ. नी मलाही ताबडतोब मलेरियाचे औषध चालू केले आणि दुसर्‍याच डोसानंतर बराचसा आराम वाटू लागला.>>

हे धोकादायक आहे. मलेरिया confirm नसताना ,मलेरियाच्य symptoms भघुन medication सुरु करने.reaction येउन partial blindness,skin burn झालेले patients आहेत.this time you were lucky.तसे झाले नसते तर doctor ला शिव्या घातल्या असत्या.
मुळात हा खुप subjective topic आहे.I know one senior doctor in pune, Marati actors/ writers मधेpopular आहे. त्यांनी केलेल्या चुकीच्च्या निदानाला बळी पदलेल्या एक patient मात्र त्यांना खुप नावे ठेवतात.
तीच कथा एका डोळ्यांच्या doctorची . काही लोक त्यांना देव मानतात. काही शिव्या घालतात.
शारंगपाणी grade1 /grade2 injuries physiotherapy exercise ने बर्‍या करुन दखवतात. it is no magic.any good physiotherapist can do that.

Pages