Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54
डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.
ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.
अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किरणू, तुमचं नक्की कुठे
किरणू,
तुमचं नक्की कुठे दुखतंय?
ज्या ठिकाणी सरळसरळ चुकीचे वा हास्यास्पद (डॉ. पान खाऊन आले) आरोप होताना दिसताहेत तिथेही ते गुपचुप बसून ऐकून घ्यावेत असा नियम आहे का? की दुसरी बाजू दाखवू नये असा नियम आहे?
डॉक्टरांच्या विरोधी बाजूचं वकीलपत्र तुम्हाला दिलंय का कुणी?
दीमा तुमचे ऑर्ग्युमेण्ट्स
दीमा
तुमचे ऑर्ग्युमेण्ट्स हास्यास्पद आहेतच शिवाय आता जे करताय ते ही हास्यास्पद आहे. आता इगो दुखावल्यामुळे तुम्ही प्रतिसाद देत आहात इब्लीस, ई-ब्लीस किंवा जे कुणी असाल ते, ज्याचं नावही अद्याप कुनाला माहीत नाहीये ते. तुम्हाला अनुभव खोटे वाटत असतील तर नाव, फोन नंबर जाहीर करा. लोक फायलींची प्रत पाठवतील तुम्हाला.
शिवाय चुकीचे अनुभव असतील, डॉक्टरांची नाहक बदनामी झालीये असं वाटलं असेल तर लिहा असंच म्हटलेलं आहे मी. मागे जाऊन वाचता येत असेल तर वाचा. तुम्ही आहे तो प्रतिसाद कोट करताना चुकवला होतात, त्याचेही उत्तर दिलेले नाही अद्याप.
डॉक्टरला समस्या असतात. पण इतर व्यावसायिकांनी असा उशीर केला आणि काही कळवले नाही तर त्याला आपण शिव्या देतो. त्याच्याबद्दल चार लोकांना अनुभव सांगतो. इथे डॉक्टरांणा साधा एस एम एस पण करता येऊ नये का ? यात कशासाठी बाजू घेतली ? तुम्हाला माहीत होतं का त्या डॉक्टरांना नेमका कशासाठी उशीर झाला होता त्या केस मधे ते ? हे हास्यास्पद आहे.
पेशंटला मेडीकल टर्म्स न कळल्याने त्याचा गैस झाला तर दूर करा की. कोण नाही मह्णतंय तुम्हाला ? इथे लिहीणारा प्रत्येक जण एकतर्फी होऊ नये म्हणून चांगले अनुभव सुद्धा आवर्जून देतोय. असं करताना या प्रोफेशनब्द्दल विश्वास उडायला आपण कारणीभूत होऊ नये हेच त्याच्या मनात असेल.
सगळेच्या सगळे अनुभव चुकीचे, डॉक्तरांना अमूक प्रॉब्लेम असेल , ते असेल, हे असेल या काल्पनिक गप्पा थांबवा प्लीज . कुणी डोक्याला बंदूक लावून डॉक्टर व्हा असं म्हटलेलं नसतं. त्या वेळी हा व्यवसाय कसा आहे याची पूर्ण कल्पना असते. डॉक्टरांची अपॉइण्टमेण्ट घेतल्यानंतर तिथे पाच पाच तास बसायचे आणि नंतर डॉक्टर आज येणार नाहीत, पुन्हा नवीन तारखा घ्या हे अनुभव मी ही घेतलेले आहेत.
दीमा
तुम्ही कोण ते तरी किमान आज इथे कळवाच राव. नाही तर मला फोन नंबर मेल करा. तुमच्याशी बोलतो मी. तुम्ही कुठल्यातरी बाईचे ड्युआय आहात असं मी इथेच वाचलेले आहे. असो.
किरणू, पुन्हा एकदा, नक्की
किरणू,
पुन्हा एकदा,
नक्की कुठे दुखतंय?
अहो बाई तुमचं नाव कळू द्या.
अहो बाई
तुमचं नाव कळू द्या. आता तुमचा फालतूपणा सुरू होईल. मी थांबतो.
ओरिजिनल आयडीने या .
डॉक्टरला समस्या असतात. पण इतर
डॉक्टरला समस्या असतात. पण इतर व्यावसायिकांनी असा उशीर केला आणि काही कळवले नाही तर त्याला आपण शिव्या देतो. त्याच्याबद्दल चार लोकांना अनुभव सांगतो. इथे डॉक्टरांणा साधा एस एम एस पण करता येऊ नये का ? यात कशासाठी बाजू घेतली ? तुम्हाला माहीत होतं का त्या डॉक्टरांना नेमका कशासाठी उशीर झाला होता त्या केस मधे ते ? हे हास्यास्पद आहे.
<<
तुम्हाला ठाऊक आहे का, उशीर का झाला होता ते?
की फक्त तुम्ही म्हणता म्हणून शिव्या देणे जस्टीफाईड आहे असे मान्य करून गप बसायचं मी? किस खुशी मे?
मी कुणाची बाजू केव्हा घ्यावी हे ठरवणारे तुम्ही कोण?
दी मा त्या पोस्ट मधला आक्षेप
दी मा
त्या पोस्ट मधला आक्षेप डॉ पान खाऊन आले हां नसून १० किंवा ९ पासून येतील येतील म्हणून लटकवत ठेवून रात्री १ ला यायचे हां आहे असं वाटतं.
(संपादित: क्लिनिकचे नाव वगळले
(संपादित: क्लिनिकचे नाव वगळले आहे.)
पंचविसेक वर्षापूर्वी मुंबईत चेंबुर येथिल अनुभव.
मला पहाटे कुडकुडुन थंडी भरुन ताप येणे सुरु झाले, उलट्याही झाल्या. पण नंतर जरा बरे वाटले. दुसर्या दिवशी ऑफिसला गेलो पण अशक्तपणा भूक नसणे वगैरे जाणवले. आणि तिसर्या दिवशी पहाटे परत कुडकुडुन थंडी वाजुन ताप. मग एका डॉक्टर कडे गेलो. त्यांनी काही औषध देउन काही रक्त चाचण्या करायला सांगितल्या.
त्यात मलेरिया पॅरासाईट / अॅन्टिजन की काय ते सापडले नाही. बिलिरुबीन जरा वाढले होते.
उलट्या, भूक कमी, वाढलेले बिलिरुबीन - म्हणजे काविळ, पण अगदी सुरवात आहे बिलिरुबीन थोडेसेच वाढले आहे असे डॉक्टरांनी सांगितले. काविळीची ट्रिट्मेंट सुरु झाली पथ्य पाणी आणि काही औषधे. बरे काही वाटेना. एक दिवसाआड थंडी भरुन ताप येणे, उलट्या होणे, अंग दुखणे सुरु झाले. चार दिवसांनी परत डॉक्टरकडे गेलो. त्यांनी औषधात काही बदल केला (बहुतेक इतर सिम्पटॉ्म्स - अंग दुखी, अशक्तपणा) , पण निदानात नाही.
मला या पूर्वी एकदा मलेरिया झाला होता. सकाळी कुडकुडुन थंडी भरणे हे अगदी तेव्हा सारखेच आहे हे मी डॉक्टरना सांगितले होते. पण रक्त तपासणीत मलेरिया आढळला नव्हता, त्यामुळे ती शक्यता नाकारली. अजून चार पाच दिवस गेले. अजिबात आराम पडला नाही. ऑफिसला जाणे शक्यच नव्हते.
मग मी दुसर्या डॉक्टर कडे गेलो. चेंबु्र कॅंपात एक पॉलिक्लिनीक होते. तिथे परत तपासण्या, मलेरिया पॅरसाईट निगेटिव्ह. बिलिरुबीन जरा जास्त. काविळच म्हणण्या इतपत वाटत नाही पण त्याची काळजी घ्यायला हवी. काही अॅंटिबायोटिक्स, आठवड्याने येउन भेट. हे डॉक्टर जरा कमी बोलणारे होते.
चार पाच दिवस गेले पण काही फरक नाही. आता अंगदुखी असह्य झाली होती. नीट चालता येत नव्हते. माझे मित्र एकदम काळजीत पडलेले.
मग कोणी दुसरे पॉलिक्लिनिक सुचविले. तिथे मित्रांबरोबर गेलो. सगळ्या तपासण्या झाल्या. त्या डॉक्टर चांगल्या बोलल्या. धीर दिला, चौकशी केली, एकटा रहातोस, शक्य झाल्यास आईला / बहीणीला बोलावून घे म्हणाल्या. रिपोर्ट्स येई पर्यंत मी काही ट्रिटमेंट सुरु करते म्हणाल्या. बहुतेक पेन किलर इंजेक्शन दिले. ज्याने नंतर खुप बरे वाटले त्या दिवशी. दोन दिवसांनी रिपोर्ट्स आले, मलेरिया आढळला नाही. त्यांच्या ट्रिटमेंटने ही काही फरक पडला नाही.
तब्येत एकदम ढासळली. अन्न पचत नव्हते, अगदी अशक्त झालो. मित्रांनी ठरवले याला घरी पाठवायचे. त्यांनी घरी तार केली मी या या ट्रेन ने येतोय तब्येत बरी नाही स्टेशनवर या. रात्री ट्रेन मध्ये बसवून दिले आणि गावी आलो. बाबा आणि बहिण स्टेशनवर आले होते. त्यांना मला पाहुन धक्काच बसला. लगेच फॅमिली डॉक्टर ना बोलावले. त्यांनी तपासले, विचारले, रिपोर्ट पाहिले. म्हणाले मला तर हा मलेरिया वाटतोय, मी ब्लड सॅंपल घेउन जातो. कधी कधी मलेरिया पॅरासाईट्स लगेच डिटेक्ट होत नाहीत. आता तीन आठवडे झाले आहेत, असेल मलेरिया तर कळेलच. पण तो पर्यंत त्याची ट्रिट्मेंट सुरु करायला हरकत नाही. आधीच सुरु करुन पहायलाही हरकत नव्हती.
तेव्हा आमच्या गावी लॅ्ब्ज नव्हत्या. यवतमाळ / अमरावती वरुन करुन आणाव्या लागत. पण दोन दिवसातच मला फरक जाणवु लागला. पहाटेची हुडहूडी आधीपेक्षा कमी झाली आणि आलेला तापही लौकर उतरला. दोन/तीन दिवसांनी डॉक्टर आले रिपोर्ट्स घेउन. मलेरियाच होता. तीच ट्रिटमेंट सुरु ठेवली, अजून काही औषधं दिली, अशक्तपणासाठी. आठवड्यात मलेरिया गेला पण चालु फिरु शकत नव्हतो, अशक्तपणा जायला महिना लागला.
मुंबईतच राहिलो असतो आणि तीन आठवड्याने टेस्ट रिपीट केली असती तर तिथेही मलेरिया पॅरासाईट डिटेक्ट झाले असते. पण सिम्पटॉम्स वरुन मलेरीयाची ट्रिट्मेंट देउन बघुयात असा चेंबुरातील त्या डॉक्टरांनी का निर्णय घेतला नाही याचे आश्चर्य वाटते.
कॉमन सेन्स आहे. इथे आलेले
कॉमन सेन्स आहे.
इथे आलेले वाईट अनुभव लिहायचे आहेत. तुम्हाला आलेले पेशंटसचे वाईट अनुभव लिहायची ही जागा नाही. त्यासाठी वेगळा धागा काढा. पेशंटच चुकीचा हे ठरवणारे तुम्ही तरी कोण ? साधा प्रतिसाद व्यवस्थित कोट करता येत नाही तुम्हाला. तुम्ही कोण दुस-यांणा जाब विचारणारे लागून गेलात ?
मी तुम्हाला जशास तसे उत्तर देण्याचे यासाठी नको म्हणतोय की सत्यमेव जयतेच्या मेहनत घेऊन बनवलेल्या एपिसोडवर जो धागा निघाला तिथेही तुमचे असेच बेसलेस ऑर्गुमेण्ट्स होते. तिथे तुम्ही आणि आ़णखी एक तीन अक्षरी आयडी यांनी पाच सहापाने एकमेकांना शिव्या देण्यात खर्च केली. तिथेही तुम्ही सर्वांचे वकीलपत्र घेतले होते.
तुम्हाला काय लिहायचे ते लिहा. ते हास्यास्पद आहे इतकेच तुम्हाला सांगतोय. बाकी तुमची मर्जी !
मला त्या डॉक्टरांना उशीर का झाला हे माहीत नसेल तर मी बाजू घेनार नाही. सिंपल. शिवाय अनेक शस्त्रक्रिया असतात हे पण का पटण्यासारखे नाही हे सुद्धा लिहीलेले आहे. इतर कुणी असं लिहीणार नाहीत. त्यांना पटेलच असं नाही. तरी सुद्धा तुम्हाला ओरोगन्ट व्हायचेच तर कोण रोखणार तुम्हाला ?
या मैदान आपलंच आहे. पण किमान ओळख तरी जाहीर करा आधी.
मानव मलापण आश्चर्य
मानव मलापण आश्चर्य वाटतंय!
कपोचे , माझ्या प्रश्नाला सोयिस्कर बगल दिलीत का?
की शुभेच्छा संपल्या?
तुमच्या कुठल्या प्रश्नाला बगल
तुमच्या कुठल्या प्रश्नाला बगल दिली ?
इथे विनाकारण प्रतिसाद खोडून काढणारे, यात तुम्ही पण आलात. इतकेच स्पष्टीकरण.
भाप्रवेनुसार ११:०४ चा प्रश्न
भाप्रवेनुसार ११:०४ चा प्रश्न हो कपोचे.
आणि मी ओळख लपवित नाही हो.

माझा पत्ता/फो नं सगळं काही तुमच्याकडे आहे.
साती, पुन्हा एकदा शुभेच्छा !,
साती, पुन्हा एकदा शुभेच्छा !, ओळख जाहीर करा हे तुम्हाला उद्देशून लिहीलेले का ? बरं. कि चुकून प्रतिसाद दिलात ?
मी आपला मला आलेले अनुभव लिहायला घेतो.
यात माझ्या अज्ञानामुळे (आजाराच्या ) , माझ्या लिमिटेशन्समुळे विनाकारण डॉक्टरांवर आरोप झाले असतील तर कुणीही ते दाखवून दिले तर स्वागत आहे. इन्शुरन्स संबंधी अनुभव आहेत. माझ्या मते ते करप्शन आहे किंवा अन्य काही शब्द असेल. मी हा अनुभव इतक्यातच कुठल्यातरी धाग्यावर मांडलेला होता. पण तो सापडत नाहीये. उपलब्ध झाला तर लिंक देईन.
सत्यमेव जयतेची लिंक इथे दिलेली आहे
http://www.maayboli.com/node/35239?page=15
यातल्या काही गोष्टी कदाचित उपयोगी पडतील
डॉ संजीव मंगरुळकरांचे पेशंट
डॉ संजीव मंगरुळकरांचे पेशंट बद्द्ल असलेले अनुभव त्यांच्या ब्लॉगवर वाचा
http://svmangrulkar.blogspot.in/
माझा एक मूलभूत प्रश्न आहे.
माझा एक मूलभूत प्रश्न आहे.
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते ग्राहक आणि पुरवठादार म्हणजेच कस्टमर -सप्लायर असे असतांना कस्टमर इज ऑलवेज राईट --- किंवा गांधीजींनी म्हटल्या नुसार पुरवठादाराचे अस्तित्वच ग्राहकावर अवलंबून आहे - हा सिध्दांत का लागू होत नाही वा अनेक दॉक्टर का अरेरावी करतात?
सेनेतून बाहेर पडलेले मनसे
सेनेतून बाहेर पडलेले मनसे वाले जास्तच सेनेवर दुगाण्या झाडताहेत. इतके दिवस अहो रूपं अहो ध्वनी चालले होते त्याचे का? (संजय निरुपम यांचीही उपमा चालेल )
अरेरावी : १. मी लय हुशार आहे,
अरेरावी :
१. मी लय हुशार आहे, माझ्यामुळे जीव वाचतात, याचा एक दंभ निर्माण होतो, अन मग तसे वागले जाते.
(२. पण क्र.१ सारखी वागणूक मी हुशार असल्याने लवकरच मला स्वतःलाच डाचू लागते, व वागण्यात सुधारणा घडून येते. )
३. मी काय सांगतो आहे, ते समोरच्याला माझ्याइतक्याच चट्कन समजेल अशा समजूतीने सांगण्याचा प्रयत्न, जो 'कर्ट' वाटू शकतो.
४. आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णय घेताना असलेल्या दबावामुळे घडून येणारी तुसडेपणाची वाटावी अशी वागणूक
ही अशी कारणे असावीत.
रश्मी, ओके. माझी दोनदा
रश्मी, ओके.
माझी दोनदा एन्डोस्कोपी आणि एकदा कलोनोस्कोपी झाली, अल्सर आढळला नाही. पण डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड करायला सांगितले नाही (या कारणा करिता). त्यामुळे मी विचारले होते.
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते ग्राहक आणि पुरवठादार म्हणजेच कस्टमर -सप्लायर असे असतांना कस्टमर इज ऑलवेज राईट --- किंवा गांधीजींनी म्हटल्या नुसार पुरवठादाराचे अस्तित्वच ग्राहकावर अवलंबून आहे - हा सिध्दांत का लागू होत नाही
<<
डॉक्टर हा कोणतीही 'वस्तू' विकत नसतो.
कस्टमर इज राईट अशी ट्रीटमेंट पद्धती विकसित करण्यात अजूनही कुणालाच यश आलेलं नाहिये. उदा. मला पोटात दुखतंय म्हणजे मला गॉलस्टोन्स आहेत, असे सांगणार्या पेशंटला, कस्टमर इज राईट म्हणून गॉलस्टोनची ट्रीटमेंट द्यायला हवी, असे तुमचे म्हणणे आहे काय?
डॉक्टर हा कोणतीही 'वस्तू'
डॉक्टर हा कोणतीही 'वस्तू' विकत नसतो.
>>
बँका, सॉफ्टवेअर कंपन्या, विमा कंपन्या व ईतर, कोणती 'वस्तु' विकतात?
मग हे सगळे ग्राहक कायद्यांतर्गत का आहेत? अगदी युरोप/अमेरीकेतसुद्धा?
आणि आपले ते सीए, शेअर
आणि आपले ते सीए, शेअर ब्रोकर्स सुद्धा!

स्पॉक, तुमच्या माहितीसाठी :
स्पॉक,
तुमच्या माहितीसाठी : डॉक्टर्सही त्या कायद्यात आहेत. भारतातसुद्धा.
तो प्रतिसाद "कस्टमर इज ऑल्वेज राईट"बद्दल होता.
कस्टमर्स इज ऑल्वेज राईट असा
कस्टमर्स इज ऑल्वेज राईट असा प्रतिसाद या धाग्यावर मला अद्द्याप दिसलेला नाही कुणाचाच.
पादुकानन्द
तुमचे स्वतःचे अनुभव असतील तर लिहा. मायबोली व्यवस्थापनाने ओझी इकडून तिकडे वाहण्यासाठी तुम्हाला कामाला ठेवल्यासारखं करू नका प्रत्येकवेळी. ते काय मनसे - सेना असेल त्याचा तुमच्याशी काडीचाही संबंध नाही. तुमच्याशीही नाही आणि या धाग्यावरही नाही. प्रत्येक धाग्यावर तुम्ही लिहीताय. तुम्ही राज्य शासनाचे अधिकारी आहात. या शासनात प्रचंड भ्रष्टाचार चालतो. बरेच अधिकारी, नोकर भ्रष्ट आहेत असं कुणी म्हटलं, वाईट अनुभव आलेत असं म्हटलं तर तुम्ही त्या सर्वांची बाजू घेत बसणार का एव्हढाच विषय आहे.
असा धागा निघाला आणि तुम्ही प्रत्येकाला मोडता घालायला निघालात, तुम्हाला कायदा कळतो का, नियम कळतो का असं विचारायला लागलात तर काय होईल हे फक्त सांगितलेय. यात तुम्ही वारंवार जे लिहीताय त्याचा इथे काय संबंध आहे ते उलगडून सांगा.
अच्छा. नजरचुकीने झाले.
अच्छा. नजरचुकीने झाले.
कस्टमर्स इज ऑल्वेज राईट असा
कस्टमर्स इज ऑल्वेज राईट असा प्रतिसाद या धाग्यावर मला अद्द्याप दिसलेला नाही कुणाचाच.
<<
न वाचताच गोळीबार?
कुठे आहे ? (तुम्ही अद्याप ओळख
कुठे आहे ?
(तुम्ही अद्याप ओळख दिलेली नाही).
रेव्यु | 21 February, 2016 -
रेव्यु | 21 February, 2016 - 13:30
↑ वाचा.
अन किरणू, मी कुणालाच ओळख देत नाही. तेव्हा ते विसरा.
इथं किरणू कौन हय?
इथं किरणू कौन हय?
मला तो प्रतिसाद अद्याप
मला तो प्रतिसाद अद्याप दिसलेला नाही. असं कुणी म्हटलं असेल तर चूक.
मी कुणालाच ओळख देत नाही. तेव्हा ते विसरा. >>> तुम्ही मला कुठल्या नावाने पुकारतायत, का पुकारताय ते मला कळत नाही. तुम्हाला कोण संताजी धनाजी सारखे दिसतात त्याबद्दल कल्पना नाही.
पण तुम्ही कुणाचा ड्युआयडी आहात हे मुद्दाम हून सांगण्याची आता आवश्यकता राहीलेली नाही. सिक्सरच्या पुढे पडलेला आहे ...
त्यांना वाटतंय की मी रॉबीनहूड
त्यांना वाटतंय की मी रॉबीनहूड आहे. आणि रॉबीनहूड म्हणजेच किरण असा त्यांचा संशय आहे. त्याला काय करणार ? मी रॉबीनहूड नाही.
अरे काय चाललय हे बास करा ना
अरे काय चाललय हे बास करा ना .... डॉ वे वाईट अनुभव लिहा.
म्हणजे त्यातुन डॉ. कसे अनुभव येऊ शकतात ते कसे टाळावेत याचा धडा तरी घेता येईल.
Pages