Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54
डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.
ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.
अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लीज ह्या धाग्यावर ज्याची
प्लीज ह्या धाग्यावर ज्याची त्याची अक्कल वगैरे काढून कुणाचा स्वाभिमान दुखावयाला जाईल, चार चौघात त्याचा अपमान होईल असे वाक्य टाळा. धन्यवाद.
या धाग्यावर रुग्णांना आलेले
या धाग्यावर रुग्णांना आलेले वाईट अनुभव लिहावेत अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे मी लिहीले.
त्यात करप्शनचा एक आहे आणि दुसरा अॅलोपथीच्याच डॉक्टरांचा पण वेगळं स्पेशलायझेशन असणारा. ते ही साठीच्य पुढचे वय असणारा. शिवाय यांच्याकडे आधीच्या डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड साठी वेळोवेळी पाठवल्यावर त्यांनी विश्वास संपादन केलेले. या केसमधे सर्टिफिकेट पाहिले गेले नाही. पण त्यावरून धाग्यावर जे प्रतिसाद आलेत त्यांची संख्या लक्षणीय आहे. सर्टिफिकेट्स पाहणे गरजेचे होते हे कळण्यासाठी तरी हा अनुभव इथे कुणीतरी मांडायला हवा होता. पण त्या व्यक्तीने अशी प्रॅक्टीस करू नये, अशा प्रेक्टीस करणा-यांपासून इतरांनी सावध रहावे हा या धाग्याचा हेतू त्यामुळे साध्य नाही होत.
इथे लिहीणारा मेडीकल एक्स्पर्ट नाही. त्यामुळे तो डॉक्टरांवर अन्याय तर करत नाही ना, हे पाहणं आवश्यक आहे हे मी सुरूवातीलाही म्हटलेलं आहे. पण चूक पेशंटची आणि डोक्टरांची चूक नाही असा सूर नको लागायला. त्यामागचा हेतू काही का असेना. अशाने धाग्याचा हेतू मागे पडत जाईल. हे पटतं का ?
उदाहरणं देताना पण इतकी सरमिसळ झालेली आहे की कुणी काहीही न वाचताच प्रतिवाद करत आहेत असा भास होतो . दिमांनी माझा प्रतिसाद कोट करताना देखील अनर्थ केला, मग पुढे चर्चा कशी होईल. इतक्या महत्वाच्या विषयात त्यांच्याकडून अशी चूक होती, मग पेशंटला त्याच्या अज्ञानातून झालेल्या चुकांसाठी झापून डॉक्टरांना फायदा कशासाठी द्यावा ?
माझ्या वडिलांच्या केसमधे तर गूगलल्यानंतर मी जास्त कन्फुज झालो. काही कळाले नाही. मला हे ज्ञान ठेवणे आवश्यक आहे का ? अशाने घरटी एखादा डॉक्टर असावा लागेल. कोर्टात वकीलाने फसवू नये म्हणून प्रत्येकाला लॉ बुक्स चा अभ्यास करून बसावा लागेल. कुठेतरी विश्वास नावाची वस्तू वापरावी लागते कि नाही व्यवहारात ?
दीमांनी चितळेचं उदाहरण दिलंय. त्यानंतर एसटी बसच्या ड्रायव्हरचं उदाहरण दिलेलं आहे. त्याचं उत्तर दिल्यानंतर यांची तुलना का असा प्रश्न देखील तेच विचारतात. किती फाटे फुटत चाललेत ?
मला गाडी चांगली लागली नाही तर नेटवर रिव्ह्यू लिहीता येतो. डॉक्टर चांगला लागला नाही, त्याचा अनुभव वाइट आला तर इतरांना सावध करणे हा पण उपायच आहे ना ? अशा प्रकारे रिव्ह्यूज लिहायला सुरूवात झाली तर डॉक्टर्स सुधारणार नाहीत का ?
पुढच्या प्रतिसादात गैरलागू उदाहरणांबद्दल लिहीतो. स्कीप केला तरी चालेल. इथून पुढे आपणास आलेले अनुभव लिहीता यावेत. अवांतरासाठी वेगळा धागा उघडावा ही सर्वांना विनंती.
दीमा.. घाटपांडेंचे विधान
दीमा.. घाटपांडेंचे विधान चुकीचे नाहीये पण पूर्ण पणे बरोबर पण नाहीये....
कारण... नुसता खोकला झाली असेल तर कुठल्या औषधाने तो कमी होईल.. किंवा थांबेल हे डॉक्टर कदाचित एकाच फटक्यात सांगू शकणार नाहीत.. पण हार्ट अटॅक आलाय आणि त्यासाठी तातडीत उपाययोजना करुन तो आटोक्यात आणला आहे.. हे तज्ञ डॉक्टर लगेच करतील..
पहिल्या उदाहरणात ट्रायल अँड एरर वापरले जाईल.. आणि दुसर्या उदाहरणात नाही. कारण उपाययोजना नक्की माहिती आहेत..
आणि असे जर नसते तर मग औषधे बनवणार्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारामध्ये औषधे का काढली असती.. फक्त जनेरिक एकाच मॉल्युक्युलचे एक औषध काढले की काम झाले.. सर्दी झालीये हा मॉलिक्यूल घ्या बरी होईल.. पण सर्दी कशामुळे झालीये? ती बरी करणार्या एका मॉलिक्यूल बरोबर दुसरा मॉलिक्यूल जोडला तर जास्त परिणामकारक होईल असे वाटल्यामुळेच नवीन औषध तयार होइल..
घाटपांडे, You made a blanket
घाटपांडे,
You made a blanket statement. And it is absolutely stupid.
Apart from that, I am not interested in talking to you.
हिम्सकूल नुसता खोकला, अन तो
हिम्सकूल
नुसता खोकला, अन तो बरा करण्याची औषधे, याबद्दलचं ट्रायल अँड एरर ज्ञान.
थकलो मी.
असो. हॅव फन विथ युअर डॉक बॅशिंग लोक्स.
Apart from that, I am not
Apart from that, I am not interested in talking to you. स्मित
जशी श्रींची इच्छा
ट्रायल अँड एरर हा शब्द चुकीचा
ट्रायल अँड एरर हा शब्द चुकीचा आहे असे वाटते.
माझ्या माहितीनुसार फिजिशियन्स ना अनेकदा पक्के डायग्नोसिस करण्यासाठी टेस्ट्स, मेडिसीन्स ह्यांची परम्युटेशन्स कॉम्बीनेशन्स करायला लागत असावीत.
सर्जन्स आणि स्पेशालिस्टस ना हे करायची गरज पडत नाही.
श्रींची नव्हे, माझी इच्छा.
श्रींची नव्हे, माझी इच्छा. तसेच you left the part about stupidity out of your copy paste
ट्रायल अँड एरर हा शब्द चुकीचा
ट्रायल अँड एरर हा शब्द चुकीचा आहे असे वाटते.
>> हो. आहे.
दिमा, तुम्ही दिलेल्या साईटवर
दिमा, तुम्ही दिलेल्या साईटवर डॉक्टर्सची लिस्ट कुठेच सापडली नाही...
"रजिस्टर" डाउनलोड करा. पीडीएफ
"रजिस्टर" डाउनलोड करा. पीडीएफ आहे.
त्या रजिस्तरात नाव आहे, ते रजिस्टर्ड आहेत.
अमितव तुमचं सॉफ्टवेअर
अमितव तुमचं सॉफ्टवेअर इंजिनियरचं उदाहरण इथे गैरलागू आहे.
माझं काम इंजिनियरिंग रिसर्च शी संबंधित आहे. या कामासाठी आम्ही आयएसओ ९००१ -२००८ ही गुणवत्ता प्रणाली स्विकारलेली आहे. आम्ही कस्टमर रिव्ह्यूला प्राधान्य देतो. ग्राहकाचे म्हणणे काय आहे त्याप्रमाणे त्याला सुटसुटीत होईल अशी सिस्टीम डेव्हलप करून देणे. जर त्याला हाय फाय यंत्रणा वापरायला अडचणी असतील तर आम्ही ट्रेनिंग देऊ देऊ करतो. पण जर त्याला तरीही ते अडचणीचे असेल तर त्याच्या गरजा लक्षात घेऊन यंत्रणा विकसित करून द्यावी लागते. त्यानंतर त्याच्यासोबत ट्रायल्स घेणे. त्याप्रमाणे डिझाईनमधे सुधारणा करणे. शेवटी कस्टमर सॅटीस्फिकेशन हा एक महत्वाचा भाग असतो. हल्ली अनेक कंपन्या ग्राहकांना फोन करून अडचणी आहेत का हे स्वतःहून विचारत असतात.
आमच्याकडे असं चालतं म्हणून डॉक्टरांनी स्वतःहून आम्हाला फोन करावेत अशा अपेक्षा मी करीत नाही. आमच्याकडे आलेल्या ग्राहकाला एकदा यांच्याकडे काम दिले की आपल्याला बघायची गरज नाही असा विश्वास आला पाहीजे हा ट्रेण्ड सध्या आहे. हा डॉक्टरांनी स्विकारावा की नाही याबद्दल मी काही बोलत नाही. माझं फील्ड वेगळं त्यांचं वेगळं. मला माझं ज्ञान सतत अपडेट ठेवावं लागतं. त्यामुळे मला लागणा-या सेवांमधे त्या त्या प्रोफेशनच्या माणसांकडून फसवणूक होऊ नये एव्हढी साधारण अपेक्षा आहे माझी. त्यासाठी त्या त्या फील्डचं ज्ञान ठेवण्यासाठी मी का वेळ घालवू ? माझे सर्जन मित्र पण याला दुजोरा देतात.
एसटी ड्रायव्हर आणि पायलटचं उदाहरण का दिलं हे त्या उदाहरणातच लिहीलेलं आहे. जसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण विश्वासाने आपली मान त्यांच्याकडे देतो ( यू आर इन सेफ हॅण्डस हे परवलीचं वाक्य आहे) तसंच प्रवासाआ जाताना आपला जीव आपण त्या चालकाच्या हाती सोपवत असतो. विमान प्रवास करणारे शक्यतो टेक्नोसॅव्ही, उच्चशिक्षित, एलिट क्लासचे लोक असतात. यातले किती जण त्याचे प्रमाणपत्र पाहतात असा युक्तीवाद केला होता. हे उदाहरन संदर्भ सोडून कोट करण्याने विषय आणखी भरकटण्याशिवाय काय होईल आणखी ?
चितळे आणि डॉक्टरांची तुलना तर आणखी गैरलागू. चितळेंच्या दुकानात मिठाई मिळते हे सर्टिफिकेट न पाहताही कळतं. त्यांनी खिळे, टाचण्या विकल्या तर गोष्ट वेगळी. पण असोच. आणखी भरकटेल विषय. अत्यंत गैरलागू तुलना आहे ही.
आता लोकांना लिहू द्यात अनुभव,
माझ्या अनुभवामधे डॉक्टरांवर अज्ञानातून आरोप झाले असतील तर ते दाखवून दिले तर मला काहीही समस्या नाहीये. माझं म्हणणं काय आहे हे समजून घेऊन वादविवाद झाला तर जास्त बरे राहील. शक्यतो अशा प्रतिसादांना इग्नोर करीनच..
उद्या दीमाचा पेशंट झालो तर
उद्या दीमाचा पेशंट झालो तर डुख धरणार की काय?
काही पेशंट लोकांना आपण सेकंड ओपिनियन घेतले तर पहिला डॉक्टर डूख धरेल की काय अशी भीती वाटत असते.
१. चर्चा वैद्यकीय क्षेत्रातील
१. चर्चा वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही विषयावर होताना दिसत आहे. डॉक्टरांचे काही वाईट अनुभव आले तर लिहायचे होते ना?
२. काही डॉक्टर्स डिफेन्सिव्ह का झाले आहेत माहीत नाही. अमितव ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या क्षेत्रातही काही लुच्चे, लफंगे असणार ना? (अमितव ह्यांचे ते विधान मी आत्ता वेगळ्या प्रकारे कोट करत आहे ह्याची जाणीव आहे. आधी वेगळ्या अर्थाने कोट केले होते ह्याचीही जाणीव आहे. दोन्ही संदर्भ निरनिराळे आहेत).
३. आया, मावश्या, मामे, अकाऊंट्स, विमा कंपन्या, रिसेप्शनिस्ट्स, अॅम्ब्यूलन्स चालक ह्यांचे अनुभव येथे नाही लिहिले तर जरा बरे होईल ना?
४. स्पॉ़क ह्यांची लेटेस्ट कमेंट फार आवडली.
धन्यवाद
ट्रायल अँड एरर हा शब्द खटकत
ट्रायल अँड एरर हा शब्द खटकत असेल तर आपण प्रायोगिक तत्वावर असा शब्द वापरु या
घाटपॅड्स डॉक्टर लोक
घाटपॅड्स
डॉक्टर लोक प्रायोगिक तत्वावर उपचार करतात, झाला बरा पेशंट तर ठीक. नैतर मरेल. बरोबर ना?
कस्ली प्रगाढ बुद्धीमत्तेची झेप हो तुमची!
अन हो. मी डूखबिख धरत नाही. तिथल्या तिथे, समोरासमोरच वाजवतो. तेव्हा कृपया आता आवरा.
"अरे" बेफिकिर, कोणते डॉक्टर
"अरे" बेफिकिर,
कोणते डॉक्टर डिफेन्सिव्ह झालेत ते सांगतोस का जरा?
अॅटॅक इज द बेस्ट डिफेन्स
अॅटॅक इज द बेस्ट डिफेन्स
हो का? नांव घेणार का जरा? की
हो का? नांव घेणार का जरा? की टिपिकल कुजबूज शिकवलिय तसे इन्सिन्युएशन्स अन खोटे आरोप फक्त?
ते वर एक महोदय अमेरिकेतल्या डॉक्टरांच्या व्यसनाधीनतेचा विदा इथे लिहून पळून गेलेत.
>>डॉक्टर लोक प्रायोगिक
>>डॉक्टर लोक प्रायोगिक तत्वावर उपचार करतात, झाला बरा पेशंट तर ठीक. नैतर मरेल. बरोबर ना? <<
१) काही विशिष्ठ क्रिटिकल केस बाबत हो असे म्हणता येईल. ऑपरेशन च्या अगोदर धोक्याची जाणीव असल्याबाबत नातेवाईकांची संमती फॉर्मवर सही घेतातच ना?
२) बरा होणे अथवा न होणे याच्या मधे आहे तसा राहणे ही अवस्था आहेच ना?
घाटपांडे, पुन्हा एकदा. तुम्ही
घाटपांडे, पुन्हा एकदा.
तुम्ही ब्लँकेट स्टेटमेंट केले आहे. अपवादात्मक नाही.
चू़क केली, तर मान्य करावी मोठ्या मनाने. लंगडे प्रतिवाद करू नयेत.
प्रायोगीक तत्वावर उपचार
प्रायोगीक तत्वावर उपचार करण्याचं लायसन्स मिळत असेल का?
उपचार पद्धती चाचण्या घेऊन एस्टॅब्लिश्ड झाली आहे.
विमानसेवा ही सुद्धा चाचण्या घेउन एस्टब्लिश्ड झालेली सेवा आहे.
लायसन्स मिळालेला पायलट जेव्हा विमान चालवतो तेव्हा शेवटी पायलट सुद्धा प्रायोगिक तत्वावर विमान चालवतात, केले नीट लॅंडिंग तर यशस्वी, क्रॅश केले तर बदनाम असे म्हणता येइल का?
नविन आजार, नविन शोध, नविन औषधे हे सुरु असते पण त्याचे प्रयोग, असे कोणीही डॉक्टर्स कोणाही पेशंट्सवर करु शकतात का?
मानवावर Clinical Trials घेण्यापूर्णी सुद्धा आधी काही चाचण्या व्हाव्या लागत असतील ना. आणि मग Clinical Trials झाल्यावर FCCI की FDA approve केल्यावरच, कुठल्या आजारावर, केव्हा, किती डोस इत्यादी बाबी निश्चित करुन उपलब्ध होते ना.
Or am I missing something?
अरे हाड. इथं पण आलं का?
अरे हाड. इथं पण आलं का?
मुख्य डॉक्टरांनी भेटण्याआधी
मुख्य डॉक्टरांनी भेटण्याआधी आणि पेशंटला तपासाण्या आधी केवळ इन्टर्नशिप वाल्या मुलांनी काही टेस्ट करुन घ्या हे सांगणे कितपत योग्य?
हा कालचा माझा संध्याकळचा अनुभव हैदराबदेतला! मी चक्कर येते म्हणून दाखवयला गेलो तर इन्टर्न शिप वाल्या विद्यार्थ्यांनी मला तपासले आणि ऑडिओमेट्री आणि नेसल एन्डोस्कोपी करुन मग मुख्य डॉ. समोर नेले. मग
त्यानी २-३ मिन ४ प्रश्न विचारले आणि vertigo ची औषधे आणि अॅन्टीबायोटिक दिली वर ताबडतोब ३-४ प्रकारच्य सिरम टेस्ट आणि एम आर आय काढा म्हणे! आधी खिश्यातले ३ ह संपल्याने औषधे ही न घेता मी काढता पाय आणि आखडता हात घेतला.. नंतर करीन टेस्ट म्हणून...
माझ्या एक दिड तासाच्या तेथील वास्ताव्यात असे निदर्शानास आले की उपस्थित पेशंट्स पैकी ९५ % जनांच्या ह्या टेस्ट केल्या जात होत्या!
येथिल डॉ. लोकांचे चे मत ऐकायला आवडेल.
हैद्राबाद! हाताची घडी,
हैद्राबाद!
हाताची घडी, तोंडावर बोट!
हो. डोळ्यावर हात, अन कानात
हो. डोळ्यावर हात, अन कानात स्टेथो पण.
आजकाल डॉक्टर , दवाखाना,
आजकाल डॉक्टर , दवाखाना, मेडीकल दुकान म्हणजे रुग्णाची लुट यात दुमत नाही.
दवाखान्यातील दुकानात उपलब्ध औषधी बाहेरील दुकानात खुप कमी किमतीत मिळतात. मी स्वतःआणी माझ्या मित्रांनी याचा अनुभव घेतलेला आहे. तक्रार केल्यानंतर दबाव आणतात.
पेशंटना आलेले वाईट अनुभव नाव
पेशंटना आलेले वाईट अनुभव नाव घेऊन लिहिल्यामुळे ज्यांना खंत वाटते आहे त्यांच्यासाठी शेजारीच एक चांगल्या अनुभवांचा धागा आहे. तिथेही नाव गाव सगळे लिहिले आहे. अजूनही ह्या पेशात खूप चांगले लोक व चांगल्या गोष्टी शिल्लक आहेतच. पण जिथे जाऊन आम्हा सामान्या माणसांना आर्थिक, मानसिक, शारीरीक त्रास झालाय तो आम्ही इतरांना सांगून सावध केले तर त्यात कुणाला प्रॉब्लेम का असावा ?
एक अनुभव-
एक अनुभव- (वाईट-चांगला)
रुग्णाचा खोकला ४-५ महिने होता...कमी जास्ती व्हायचा पण गेला काही नाही.
नेहमीचेच डॉ...... यांना दाखविले.
(एकही जास्तीचा शब्द बोलत नाहीत. डायग्नॉसीस उत्तम आहे पण खुप महाग आहेत)
त्यानी औषधे दिली. व Xरे सांगितला.
Xरे वाल्या डॉ. नी नॉर्मल असा शेरा दिला.
तर यानीं सांगीतले की जरी नॉर्मल शेरा असला तरी अगदी छोटासा निमोनीआ चा पॅच आहे. चेस्ट स्कॅन करावा लागेल. लगेच पुना (लुटारु) हॉ. रेफ़र केले.
त्या आधी रुग्णाने. स्कॅन कस करतात याचा वीडीओ पाहिला. रुग़्ण घाबरला. हा. डॉ. नकोच (बिपी चा नेहमीचा असुन ही) असे झाले.
(या डॉ. शी बोलता येत नाही. हे डॉ. बोलत नाहित. दोष रुग्ण आणि नातेवाईकांचा असेल पण हे आहे)
मग--रुअग्णाच्या परिचिताने डॉ. बर्डे-वय वर्षे ७५ (ना.पेठेत क्लिनिक आहे) यांचे नाव सुचवीले. हे अयुर्वेदिक आहेत पण अलोपॅथी करतात.
यानी आधी मेडि. दिले. मग ३ दि. नी. परत बोलावले. ३र्या दिवशी खोकला जवळपास ४०% कमी झाला होता.
ते म्हणाले-'इतक्या मोठ्या डॉ बद्दल मी काय बोलणार. पण त्यांना. न्युमोनीआ आणि अस्थमा हा फ़रक कसा कळला नाही?'
(अस्थमा ची हिस्ट्री आहे. रुग्णाची आई च. आणि ती पण ...लिकरांची रुग्ण आहे.)
स्पेशल डिग्री, अनुभव, नेहमीचे, विश्वास सगळे होते..पण?????
कपोचे तुमच्याशी सहमत.. मी
कपोचे तुमच्याशी सहमत..
मी स्वतः याच treatment ( for fertility) गेलीय. हा सर्व अनुभव आहे.१-२ नव्हे तर तब्बल ७ वर्शे. त्या वेळेत मनस्थिती अतिशय वाईट असते. डॉक्टर चान्गला कि वाईट हा अनुभव काही दिवसानी येतो.कसेहि करुन बाळ हवे या विचाराने मी घायकुतीला आले होते. मी बोरिवली मधील डॉक्टर कौस्तुभ कुलकर्णी याच्याकडे जात होते.हे डॉक्टर जर्मनी हुन आले होते. १५-२० वर्शयाची प्रक्टीस वगैरे.. नन्तर ह्ळुहळु कळत गेले कि त्याची, pathology lab, sonography डॉक्टर याची चेन होती. किती IUI झाले याची गणना नाही आणी IVF 4 वेळा झाले. याच्या आधी एका गायनेक कडे जात होते तेही रेफरन्सने.. पार लिलावती मध्ये डॉक्टर पालशेतकर कडेही जाउन आले. कोणीहि डॉक्टर नेमका problem सान्गत नव्हता. नन्तर कळले कि problem पी सी ओ डी होता. पण या सगळ्यामध्ये औशधे आणी इन्जक्श्न मुळे वजन भयानक वाधुन नैसर्गीक रित्या आई होण्याची शक्याता कमी होत चालली होती. मग मात्र सगळे सोडुन दिले , वर्शभर treatment घेतली नाही, वजन योगा आणी आहाराने कमी केले, आणी लग्नानन्तर ८ व्या वर्शी नैसर्गीक रित्या आई झाले. यातच एका महान डॉक्टरने surrogacy, Adoption, हे ही सुचवले.मुलगा झाल्यावर काही दिवसानी एका वेगळ्या टेस्ट मधुन पी सी ओ डी problem कळला.
माझ्या अल्प मती प्रमाणे
१) कारण विचारायला गेल्यास काही डॉक्टरचा इगो दुखावतो.
२) hospital administration मध्ये बरीच मग्रुरी पाहायला मिळाली.
३) जु. डॉक्टर पेशट्ला काही कळत नाही असे वागतात.
हे वर्शे माझ्या आयुश्यातली तापदायक होती. या पोस्ट च्या अनुशन्घाने लिहीली आहेत. यावर धुळवड नको... ही विनन्ती.
Pages