डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या गायनॅकपैकी एकानेही इतक्या वर्षात पी सी ओडी आहे म्हणून सांगितले नाही?
कमाल आहे.

मी मागे वंध्यत्वाच्या धाग्यावर दिलेली माहिती परत लिहिते.

<<३. डॉक्टरांकडिल पहिल्या भेटीत काय अपेक्षित आहे.
बर्‍याच वेळा भारताततरी पेशंट आणि डॉक्टर यांच्यात योग्य तो संवाद होत नाही.लाजेमुळे पेशंट आणि वेळेअभावी डॉक्टर बर्‍याचश्या गोष्टींची चर्चा करत नाहीत.डॉक्टरांशी योग्य चर्चा झालीय किंवा कसे हे तुम्हाला खालील मुद्द्यांवरून कळेल.

अ. 'वंध्यत्वाविषयी स्त्री आणि पुरूष दोघेही जबाबदार असू शकतात म्हणून दोघांच्याही चांचण्या करणे गरजेचे
आहे तसेच वंध्यत्वाचे उपचार ही जोडप्याची संयुक्त जबाबदारी असून केवळ स्त्री किंवा पुरूष यांची वैयक्तिक
जबाबदारी नाही' हे तुमच्या डॉक्टरने तुम्हाला समजावलेय का?

आ.डॉक्टरांनी तुमची सगळी महत्त्वाची वैद्यकीय हिस्टरी विचारलीय का? तसेच एकत्र राहण्याचा वेळ,
शरीरसंबंधांची वारंवारता आणि काळ(पाळीच्या काळाच्या अनुषंगाने)या गोष्टी विचारल्यात का ?

इ. स्त्रीच्या पाळीसंबंधी खोल विचारणा केलीय का? कधी सुरू झालीय.रेग्युलर आहे का? किती दिवस रक्तस्राव
होतो इ.

ई. पुरूषाच्या आरोग्यासंदर्भात इतिहास विचारलाय का? उदा. बीपी,डायबेटिस,प्रजनन संस्थेसंबंधित संसर्ग,
अपघात इ.
उ. अपेक्षित चांचण्याच्या निदानानंतर ढोबळमानाने काय दोष निघू शकतात व त्यांचे निराकरण कसे करता येऊ
शकेल याची प्राथमिक,जुजबी माहिती दिलीय का?>>

वंध्यत्वाच्या उपचारात इमोशनल इश्यूज खूप असल्याने लुबाडणे जाण्याची उदाहरणे बरीच दिसतात.
आय होप पहिल्या भेटीत डॉक्टरशी संवाद साधण्यास उपयोगी ठरेल..

बाकी नन्तर लिहीते. काय माहीत वेळ मिळतो की नाही. पण एक गोष्ट ठामपणे सान्गते की परदेशापेक्षा उलट आपल्याकडे गायनॅक सविस्तर माहिती देतात आणी विचारतात देखील. मी लकी आहे त्याबाबतीत. डॉक ने टेस्ट सान्गीतल्या की पेशन्ट वैतागतात. पण कृष्णा याना आलेला अनूभव पण विचारात घेतलाय कारण सर्वच डॉ. चान्गले अथवा वाईटही नसतात.

परदेशात मी तपासले तर डॉ. नी सान्गीतले की तुम्ही आई बनु शकता, तर इथे भारतात आल्यावर काहीच पुढे प्रोग्रेस नाही म्हणून एका स्त्री गायनॅक कडे गेल्यावर त्यानी व्यवस्थीत माहिती विचारुन काही टेस्ट सान्गीतल्या, त्यात माझ्यात खूप कॉम्प्लिकेशन्स आढळले. पण त्या डॉ च्याच योग्य ट्रिटमेन्टमुळे मी आणी मुलगी सुखरुप आहोत.

बाकी नन्तर लिहीते.

दीमा
>>ते वर एक महोदय अमेरिकेतल्या डॉक्टरांच्या व्यसनाधीनतेचा विदा इथे लिहून पळून गेलेत.>>
मी दर तासाला मायबोलीवर येत नाही त्या मुळे उशीर झाला. मला इतर उपद्व्याप आहेत. त्या मुळे आपल्या सारखे उत्तर लगेच देता आले नाही. क्षमस्व.
मी उल्लेख केलेया पुस्तकात अमेरिकेतील उदाहरणे तसेच भारतात चेक लिस्ट इंट्रोडुय्स करण्यासाठी केलेले प्रयोग व त्याच्या निषपत्ती बद्दल लिहिले आहे. पुस्तकाचे लेखक स्व्तः डॉक्टर असून त्यांची टेड वर सुध्दा भाषणे आहेत.
मद्यपानाचा परिणाम व तसेच डायग्नॉसिस बद्दल त्यांनीच लिहिले आहे. ती उदाहरणे अमेरिकेतील आहेत.
माझ्या मते त्या पुस्तकातील निष्कर्ष विचार करण्याजोगे आहेत.
मला वाटते एवढे उत्तर पुरे असावे.

ती उदाहरणे अमेरिकेतील आहेत.

<<

धन्यवाद!

मी तसा रिकामाच असतो, व तासातासाने आपल्या पेशंट्सकडे पहात असतो. इतर वेळ इथेच Wink

@ अश्विनि दिक्षित
फर्टिलिटी च्या ट्रीटमेंट बद्दल मी काही लिहीलेले नाही. त्यातले चान्सेस किती असतात याबद्दल मला कल्पना होती. त्याबद्दल माझी तक्रार नाहीये. त्याचे साइड इफेक्ट्सही माहीत होते. घोले रोडजवलच्या श्री हॉस्पिटलच्या फडणीसांनी वय कमी असल्यास मी ट्रीटमेंट देत नाही असं सांगितलं. असेही असतात डॉक्टर्स. इथे ते अनुभव लिहीणे अपेक्षित नाही. तरी देखील मीरा हॉस्पिटलचा चांगला अनुभवच दिलेला आहे वर. मला त्यांचे नाव आठवत नाहीये. माईणकर किंवा माणकीकर. जेव्हां डॉक्टर्स अशी कल्पना देतात तेव्हां त्यांनी कमिशन काढलं किंवा काय हे आपण खोलात जाऊन बघत नाही. कुठेतरी कराव्याच लागणार असतात या तपासण्या. तुमच्या प्रतिसादामुळे माझी तमाम स्त्रीरोगतज्ञांबद्दल तक्रार आहे असा समज होण्याची शक्यता आहे. पुन्हा मागे जाऊन कुणी वाचणार नाही. त्यामुळे हा खुलासा.

माझ्या आईचा फार वाईट अनुभव आहे. आईला ४ वर्षांपुर्वी कॉलर बोनला बहीणीचा कोपर लागून फ्रॅक्चर झालं आणि ती ज्या डॉक्टरांकडे गेली त्यांनी हाडांचा टीबी झालाय म्हणून टीबी च्या गोळ्या दिल्या वरून तुमचं वय झालंय आणि कॉलर बोनचे फ्रॅक्चर सहजपणे जुळून येत नाही असल्या गप्पा केल्या. आई बाबांनी ठाण्यातल्याच दुसर्‍या डॉक्टरांना दाखवून सगळी हिस्ट्री सांगितली त्यांनी काहीही टेस्टस ऑर्डर केल्या नाहीत आणि परत तेच टीबीच्याच गोळ्या दिल्या.

परत २ वर्षांनी मग गोटीएवढी गाठ दिसायला लागल्यावर अमेरिकेतल्या लोकल आणि स्टॅनफर्ड हॉस्पिटलातल्या अश्या दोन डॉक्टरांना दाखवलं, त्यातल्या लोकल डॉक्टरांनी सांगितलं कि आईला ट्युमर झालाय आणि कॉलर बोन काढावं लागेल आणि त्यांनीच स्टॅनफर्ड हॉस्पिटलातल्या डॉक्टरांना दाखवायला सांगितलं, त्यांनी इकड्चेच नवीन रिपोर्ट्स पाहून सांगितलं कि फ्रॅक्चरमुळे गाठ दिसतेय पण शेवटी भरतात गेल्यावर खुप दुखायला लागल्यावर आईने ठाण्यालाच तिसर्‍या डोक्टरांना दाखवलं आणि त्यांनी शेवटी आईला थायरॉईड कॅन्सर आहे हे निदान केलं आणि कॉलर बोनला ट्युमर होता. पुर्ण ३ वर्षांत ५ पैकी ३ डॉक्टरांनी पुर्ण्पणे चुकिचं निदान केलं. आता थायरॉड ग्लँड्स आणि कॉलर बोन पुर्णपणे काढून टाकलंय.
पण बरोबर निदान झाल्यावर पुढचे दोन डॉ़क्टर देवासारखे भेटले आ णि पुढ च्या सर्जरी/ ऑपरेशन्स वेळेत झाले. पण हेच जर पहील्या डॉक्टरांच्या डोक्यात आलं असतं तर काही गोष्टी टळल्या असत्या. तसंही भारतात उठ्सुठ एम आर आय स्कॅन सांगतात्च कि आधीही सांगायला हरकत नव्हती.

अहो मनी, तुमच्या आईंची केस फार्फार रेअर आहे हो.
मीसुद्धा मागच्या २० वर्षांत अशी केस पाहिली नाही.

थायरॉईडमुळे कॉलर बोनला फ्रॅक्चर अशी शंकासुद्धा यायला वेळ लागेल.
आम्हाला 'थिंक अबाऊट रेअरेस्ट मॅनिफेस्टेशन ऑफ कॉमनेस्ट दीसीज दॅन कॉमनेस्ट मॅनिफेस्टेशन ऑफ रेअरेअट डिसीज' अशी संथा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात दिलेली असते.
बोन टीबी हा भारतात अत्यंत कॉमन आहे आणि तो आणि मॅटॅस्टायझिंग कॅन्सर यातला फरक कॉलर बोनमध्ये तरी ओळखणे अतिशय कठिण.
उलट अमेरिकेत जिथे बोन टीबी रेअर आहे आणि कॅन्सरचे बोन मॅटॅस्टॅसिस जास्त तिथे हे लवकर पिकप व्हाउअला हवे होते.नंतर गाठ दिसू लागल्यावर तिची एफ एन ए सी किंवा बायॉप्सी करणे आणि डायग्नोज करणे सोपे गेले असेल.

ज्या डॉक्टरांनी डायग्नोज केले त्यांनी ही एक रेअर केस म्हणून कुठेतरी नक्कीच मांडली किंवा प्रदर्शित केली असेल.

यात तुम्हाला झालेला मनस्ताप मी समजू शकते.

पण कुठल्याही डॉक्टरांची काही चूक आहे असे मी म्हणणार नाहीझ
(मगाशी मी जे डॉक्टरची लिमिटेशन्स लक्षात न घेण्याचे नातेवाईकांचे प्रकार म्हटले ते असे.)

साती...

एखाद्या माणसाला रेअर आजार आहे, हे कसे ओळखणार?

माझीच केस घ्या. १४ वर्षांपुर्वी माझी नुकतीच डिलिव्हरी झाली होती. मुलगी अंगावर पीत असताना मानेच्या उजव्या बाजुला भयंकर दुखायला लागले. त्या वेळेस आम्ही दादर ला रहात होतो. माने जवळ गाठ आली. न दुखणारी. सासरे प्रसिध्ध एंडोक्रोनोलॉजिस्ट शशांक जोशीं कडे घेवुन गेले बांद्र्याला. त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली. म्हणजे आधी कोणते तरी औषध पिवुन ते सोनोग्रफी करतात तो प्रकार ( मेडिकल नाव अत्ता आठवत नाही). तसेच बायोप्सी पण केली. ती केल्यावर कळले की हा ग्लँड चा टी.बी. आहे. शशांक जोशी अवाक झाले. ते म्हणाले हा प्रकार तुमच्या बाबतीत झाला हे आश्चर्य आहे. कारण माझे वजन वयाच्या १५ पासुन कधीच ८०-८५ किलोच्या खाली नव्हते. मला कधीच अशक्त्पणा, गळुन जाणे वगैरे नव्हते. त्या मुळे टी.बी. चे व्हायरस ( किंवा अजुन काय त्याला म्हणत असाल ते ) जेनेटिकल दोष असण्याचा संभव आहे. त्यांनी मग खुप प्रश्न विचारले. जसे कुटुंबात कोणाला होता का इ.इ.

नंतर १.५ वर्ष ट्रीट्मेंट घेतली. मी आयुष्यात पहिल्यांदा हा शब्द ऐकला.

त्यामुळे एखादा रोग रेअर आहे की नाही हे रुग्ण कसे ओळखणार? माझ्या बाबतित पहिल्याच डॉक्टर ने ओळखला मी सुदैवी. पण नसता ओळखु शकला तर काय काय दिव्य करायला लागले असते.

अशावेळी सहाजिकच रुग्णाला वाटणार ना की ह्या डॉक्टर ला काहीही कळत नाही. त्यावेळेस कोणी हा विचार करणार नाही की आपली रेअर केस आहे. रुग्ण जेंव्हा डोक्टर कडे जातो तेंव्हा तो पूर्ण शरीर त्याच्यावर सोपवतो. कायदा वगैरे ठीक आहे पण भावनीक गुंतवणुक असतेच ना.

एखादा टॅक्स कंन्सल्टंट चुकला तर पेनल्टी भरुन सुटण्याचा पर्याय आहे. परत ती पेनल्ती तुम्ही त्याच्या फी मधुन कापु शकता. किंवा सरळ सी. ए. इंस्टीट्युट ला तक्रार करु शकता ( आठवा सचीन तेंडुलकर ची केस). पण डॉक्टर च्या बाबतीत जीवाशी खेळ आहे.

मुळातच हे प्रोफेशन हे "सेवा" ह्या कॅटेगरीत येते. म्हणजेच जीवनावष्यक सेवा. म्हणुनच ते सर्व्हीस टॅक्स ला लागु होत नाही. म्हणजेच त्या वर रुग्णांनी काहीही कर भरु नये हा विचार आहे. करमुक्त सेवा. हे खुप नोबल प्रोफेशन आहे. आमच्या सारखे बॅक ऑफिस नाही. अम्ही नसलो तरी जग चालेल.... तुम्ही नसलात तर मात्र पदोपदी अडेल.

म्हणुनच सामान्य माणुस डॉ. ला देव मानतो. त्याला मान देतो. डॉ लोकही स्वतःच्या नावामागे 'डॉ" ही पदवी अभिमानाने लावतात. सगळे सामाजिक संदर्भ जरी खरे असले तरीही एक जीव वाचवणार ही प्रतिमा नकळत त्यांनाही आवडत असते. असे सगळे असते म्हणुनच अपेक्षा वाढतात. डॉ. चे सर्टीफिकेट पहावे वगैरे सगळे ठीक आहे..... पण विश्वास....? त्याचे काय?

मो कि मी, ट्यूबरक्युलस लिंफॅडिनोपथी हा भारतातला अगदी कॉमन आजार आहे.
दुसरं कॉमनेस्ट डायग्नॉसिस आहे.
तुम्ही अशी हिस्टरी घेऊन दहा डॉक्टरांकडे गेलात तर नऊ किंवा कदाचित दहाही डॉक्टर हेच निदान करतील.

मी वर म्हटलंय तसं कॉमनेस्ट डिसीज चं हे अगदी कॉमन मॅनिफेस्टेशन आहे.

डॉक्टर म्हणजे सर्वज्ञ नसतोच.

वरच्या केसमध्ये भारतातल्या दोन आणि अमेरिकेतल्या एक जणांना आजार कळला नाही म्हणजे नक्कीच रेअर किंवा गुंतागुंतीचा होता.

आणि कितीही अ‍ॅनॉलॉजी लावलीत तरी टॅक्ससारख्या ठोकळेबाज गोष्टीचे मॉडेल डॉक्टरी डाय्ग्नोसिसला लावता येत नाही.

उदा. दोन वर्षांपूर्वी जेव्हा स्वाईन फ्ल्यू आला तेव्हा सुरूवातीस अगदी डॉक्टरकडे गेलेल्या आणि ट्रीटमेंट घेतलेल्या लोकांनाही सिव्हीअर स्टेजला जाऊन मृत्यू आला. (माझ्या एकटीकडेच नाही, अख्ख्या भारतात)
एकदा अशा केसेस रँपंट झाल्यावर दुसर्‍या तिसर्‍या आठवड्यानंतर आम्ही प्रत्येक केसलाच स्वाईन फ्ल्यू झाला नाही ना हे पहायला लागलो. चौथ्या आठवड्यापासून माझ्याकडे एकही केस बॅड स्टेजला गेली नाही. आणि मग इतरत्रही.
आता पहिल्या एक्स्पायर झालेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी माझ्यावर 'यांना साधी सर्दी की स्वाईन फ्ल्यू हे ओळखता आले नाही' अशी केस केली तर!
मला दोन वर्षांपूर्वीच गाशा गुंडाळायला लागला असता.
उलट एक्स्ट्रा प्रिकॉशन्समुळे 'स्वाईन फ्ल्यू' चा दवाखाना म्हणून आमच्या भागात नाव झाले, सरकारने फुकट औषधे वाटायचे एक केंद्र म्हणून डिक्लेअर केले आणि जी पहिली बाई वारली होती तिच्या अख्ख्या नातेवाईकांनी त्यांना माहित झालेला एकूण एक स्वाईन फ्ल्यूचा संशयित आमच्या हास्पिटलात आणला.

डॉक्टरांचा प्रामाणिकपणा आणि पेशंटचा विश्वास याचे हे एक माझ्या दृष्टीने महत्त्वाचे उदाहरण आहे.

आहो हा आजार कॉमन आहे......

पण माझ्या बाबतीत तो कॉमन असणे कोणत्याही डॉक्टर ला शंका आली असणे हे रेअर आहे. कारण इतर काहीही लक्षणे नव्हती. उलट नुकतेच बाळ झाले होते. माझे त्या वेळचे फॅमीली डॉ. सुध्धा म्हणाले की बहुतेक कँसर असावा.... लौकर तपासा..... त्यांनी टाटा मधे चिठ्ठी पण दिली होती. टाटा मधे जायच्या आधी आम्ही शशांक जोशीं कडे गेलो. सासरे त्यांचे पेशंट होते आणि त्यांच्यावर अतिषय विश्वास होता. त्यांनी तो सार्थ ठरवला.

कॉमन आजार कधी कधी अन्कॉमन रुप धारण करतात. तो ओळखणे रुग्णासाठी कठीण असते. जी लक्षणे स्वाइन फ्लु ची असतात तीच लक्षणे साध्या खोकल्याचीही असतात. मग मला झालेला आजार कॉमन आहे की नाही हे मी कसे ओळखणार......?

माझ्या आईला वयाच्या ३२ व्या वर्षी मधुमेह झाला. घरात काहीही हिस्ट्री नसताना. डॉ. म्हणाले की संततीनियमाच्या गोळ्यांच्या दिर्घ काळ सेवनाने असे होवु शकते. लाखात एक केस आहे. ( ही गोष्ट ४० वर्षां पुर्वीची आहे)
आता ते कॉमन वाटेल कदाचीत पण तेंव्हा वेगळे होते. गेली ४० वर्ष ती ह्या आजाराशी सामना देत आहे.

एक्झॅक्टली.
आता डीएम कॉमन आहे.
तेव्हा नव्हता , पण रेअरही नव्हता.

पण डि एम ची लक्षणे आणि टेस्ट क्न्फ्यूजिंग नसतात.
त्यामुळे तपासण्यानंतर योग्य औषधोपचाद कठिण नव्हते.

जुन्या काळातल्या डायबेटीस डिटेक्शनच्या एका केसबद्दल डॉ सुरेश शिंदे यांनी लिहिलेला एक छान लेख माबोवर आहे.
ती केस म्हणजे लहान मुलांत डी एम ही त्यावेळीही रेअर केस होती.

साती

हेच मला म्हणायचे आहे. की जिथे तुम्हाला कळला नाही तिकडे आम्हाला काय कळणार की रेअर आजार आहे...... पण चार डॉक्टर कडे खेटे घालणे म्हणजे काय ते त्या चक्रातुन गेल्यावर समजते. पैसा आणि मुख्य म्हणजे पेशंस.... तो कुठुन आणायचा? म्हणुन तर डॉक्टर कडुन अपेक्षा वाढतात.

आणि कितीही अ‍ॅनॉलॉजी लावलीत तरी टॅक्ससारख्या ठोकळेबाज गोष्टीचे मॉडेल डॉक्टरी डाय्ग्नोसिसला लावता येत नाही.

मी ही तेच म्हणते आहे. आमच्या चुकीला ठीगळ लावता येईल..... पण तुमच्या व्यवसायाचं तसं नाही.

तुमच्या वरच्या उदा. मधे पेशंटच्या नातेवाईकांचा तुमच्या पर जो "विश्वास" होता त्या मुळेच त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं.

माझे वडिल वारले तेंव्हाही काहीही नीदान झाले नाही. ते का आणि कशाअ मुळे गेले हे आज तागायत माहिती नाही. मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाले साधारण १५ तासात. ठाण्याच्या च्या डॉ. आलेगावकरांनी प्रयत्नाची शर्थ केली. पण यश आले नाही. ते स्वतः मला म्हणाले की "मी गोल्ड मेडॉलीस्ट आहे... पण आज पहिल्यांदा ते फोल वाटते आहे. काकांना वाचवु शकलो नाही." गरीब घरातला बाबांच्या कल्याणात झोपडीत रहाणारा गोल्ड मेडॅलिस्ट डॉक्टर म्हणुन बाबांना त्याचा अतिषय अभिमान होता.

पण आम्ही त्यांच्यावर केस करायला नाही गेलो. आम्हालाही त्यांचे प्रयत्न दिसत होते.

हा विश्वास महत्वाचा आहे. तो ह्या प्रोफेशन मधे अगदी सहज प्रामाणिक प्रयत्नांनी कमावता येतो. जेंव्हा ते प्रयत्न " प्रामाणीक नाहीत" हे स्मजते तेंव्हा मात्र रुग्ण खचतो. आणि ह्या धाग्यावर प्रतिक्रियांचा पाउस पडतो.

आपण केलेला पदार्थ बिघडला तर तो नेमका कशाने बिघडला हे प्रत्येक वेळी सांगता येतं का?

डॉक्टरांचा अंदाज प्रत्येकवेळी बरोबर येईलच असं नाही. कधी प्रथमदर्शनी आणखी शक्यता पडताळून पाहायची गरज भासत नाही. यात डॉक्टरच्या वैयक्तिक कौशल्याचाही भाग असतोच.

मला दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत.

जीपीने दिलेल्या टाचदुखीसाठीच्या गोळ्या घेतल्यानंतर पचनयंत्रणा वाईट बिघडली होती. गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्टने (बर्‍यापैकी ज्येष्ठ) त्या गोळ्या थांबवायला सांगितल्या. वर गहू, दूध, मासे यांची अ‍ॅलर्जी असल्याचं सांगितलं. हेही कायमचं टाळायला सांगितलं. काही आयुर्वेदिक औषधं लिहून दिली. (अ‍ॅलोपथीची डिग्री असूनही ते जास्त औषधे आयुर्वेदिक (ब्रँडेड) लिहून द्यायचे)
दोन अडीज वर्षे पथ्य पाळले. मग बदलीमुळे एकटं राहायचे वेळ आली तेव्हा नाईलाजाने पुन्हा दूध, गहू सुरू केले. काही झालं नाही.म्हणजे आधी जे भयंकर त्रास व्हायचं त्यातलं काही झालं नाही. आतल्याआत काय चाललं असेल कल्पना नाही.
ते माझ्या बाबांचे वर्षानुवर्षाचे आवडते, त्यांच्या शब्दांत नुसत्या बोलण्याने अर्धा आजार घालवणारे डॉक्टर.

मग आर्थ्रायटिसच्या वेळी रेअर डिसीज असूनही ऑर्थोने पहिल्या पाहण्यात निदान केले. त्याच डॉक्टरांनी व्हर्टिगोही असाच ओळखलेला.

तिसरा प्रसंग बाबांचा. घरात पडल्याने shin ला जखम झाली. जीपीने डॉक्टरांनी टिटॅनसचं इंजेक्शन दिलं. ड्रेसिंग केलं. दोनतीन दिवसांत जखम भरेल असं सांगितलं. मग काही दिवसांनी ती जखम चिघळून पू होऊन पाय ठणकायला लागला. बाबांनी दुसरा डॉक्टर गाठला, सात दिवस इंजेक्शनचा कोर्स आणि रोज ड्रेसिंग.

आता आपण मधुमेही आहोत आणि जखमा लवकर भरत नाहीत हे आम्ही पहिल्या डॉक्टरच्या लक्षात आणून दिलं नाही.त्यांना फॅमिली डॉक्टर म्हणता येईल. पण बाबा फक्त सर्दीखोकलातापासाठी त्यांच्याकडे जातात. त्यांना पेशंटची ही हिस्टरी ठळकपणे लक्षात नसेल किंवा त्याची गरज भासली नसेल.

पण आपल्याला कसला कसला त्रास आहे कसली अ‍ॅलर्जी आहे हे आपणही सांगायला हवं.

माझ्याच आर्थ्रयटीसच्या केसमध्ये बाबांनी पंधरा दिवस झाले तरी तुला काही फरक पडलेला नाही असं म्हणून सेकंड ओपिनियन घ्यायचा आग्रह केला होता. मग त्याच डॉक्टरांनी HLA=B27 टेस्ट करायला सांगितली. तो निगेटिव्ह आल्यावर दिलासा दिला.

तरीपण अनुभवलेल्या या स्पेशालिस्ट्सबद्दल एक तक्रार ही की शंकांना/प्रश्नांना धड उत्तरे देत नाहीत. काही नाही असं जे सांगतात ते उडवून लावल्यासारखं वाटतं.

तरीपण अनुभवलेल्या या स्पेशालिस्ट्सबद्दल एक तक्रार ही की शंकांना/प्रश्नांना धड उत्तरे देत नाहीत. काही नाही असं जे सांगतात ते उडवून लावल्यासारखं वाटतं.>>>>

+१

आधी काही प्रतिक्रिया आल्या होत्या की डॉक्टर ...नर्स ला चुक सम्जावुन सांगीतली.... इ.इ.

हल्ली एक प्रॉलेम सगळ्यांचाच होतो तो म्हणजे मनुष्य बळ कमी असणे!!! पुर्वी खुप भावंडे असायची. हल्ली एक किंवा दोन.... आमचेच उदाहरण घ्या.... मी एकटी, नवराही एकटा, आता मुलगीही एकटी!!!!

मागे साबा हॉस्पिटल मधे होत्या तर घरातली मेड, ड्रायव्हर्स वर सगळे धकुन नेले. नातेवाईक खुप आहेत पण ८-१० दिवस झाले तर हॉस्पि. मधे थांबायला कोणाला वेळ आहे? आम्ही अपेक्षा तरी कशी करणार!!!! अशा वेळेस डॉ. आणि नर्स वर लक्ष ठेवायला माणसे तर पाहिजेत!!!!!

मागे नवर्‍याचे मामा हॉस्पि. मधे होते. तर त्यांचे रीटायर्ड भाऊ जवळ होते त्यांनी धकुन नेले. मामांची दोन्ही मुले अमेरिकेत!!! सगळे भाचे आणि भाचेसुना ( म्हणजे आम्ही) पोटार्थी.... मग काय करणार. ज्या धाकट्या मामांनी मोठ्या भावाचे सगळे बघितले. ते नंतर १० दिवस स्वतः आजारी होते ब्लड प्रेशर वाढले म्हणुन......

बाकी सगळी सोंगे आणु( अगदी इंशुरंस क्रुपेने पैश्याचेही!!!) पण मनुष्यबळाचे काय करायचे? मी अत्ता सध्या ४ व्रुध्ध ( आई बाबा, साबा, साबु) आणि मी स्वतः अशी मिळुन ८ हॉस्पिटलायजेशन्स धकवली गेल्या ५ वर्षात!!!! त्यामुळे ह्या परिस्थीतीशी कायम लढते आहे!!! हा मनुष्यबळाचा प्रॉब्लेम सोल्व्ह करते आहे!!!! सपोर्ट सीस्टीम चांगली डेव्हलप केली आहे ( म्हणजे मेड, ड्रायव्हर्स इ.इ. )... तरीही........

ही तक्रार नाही... वस्तुस्थीती आहे.... माझ्या मुलीच्या पीढीला तर खुपच जाणवणार आहे!!!!!

मोकिमी, चीनमध्ये यालाच प्रॉब्लेम ऑफ सिन्गल्स असे म्हणतात.

तिथे ती सरकारी कृपेने झालीय.
इकडे भारतात आपण ओढवून घेतलीय.

Happy

इथल्या सगळ्या प्रतिक्रिया वाचून हे कळले कि माझ्या बाबतीत डॉक्टर चुकला हे पेशंट कितीही बोंबलला तरी त्या फिल्डमधले इतर डॉक्टर ते मान्य करणार नाही. हेच डॉक्टर इतरत्र फिरताना दुसऱ्या फिल्डमधले लोक कसे चूक आहेत हे मात्र अगदी छातीठोकपणे सांगणार.

ही तक्रार नाही... वस्तुस्थीती आहे.... माझ्या मुलीच्या पीढीला तर खुपच जाणवणार आहे!!!!!
>>
प्रायव्हसी, स्वतःची स्पेस, राजाराणीचा संसार, मानसिक कोंडमार्‍यापासून सुटका, ज्येष्ठांची लूडबुड यापासून सुटका याची किंमत मोजावी लागणार आहे. कुछ पानेके लिये कुछ खोना पडता है.

डॉक्टर जेव्हा पेशंट बनतात त्या वेळी त्यांना पेशंट या नात्याने काय अनुभव आले यावर एक पुस्तक वाचनात आले. पुस्तकाचे नाव एका पुनर्जन्माची कथा
बुक गंगावर असलेली समरी-
डॉ. मनोज भाटवडेकर यांनी सांगितलेली एका डॉक्टरचीच ही एक कहाणी आहे. इतरांना आजारातून बरे करणाऱ्या आणि जगण्याची उभारी देणाऱ्या डॉक्टरलाच एक दुर्धर रोगाने त्रासले, तर काय होईल....या कहाणीतील डॉक्टरला अशाच एका दुर्धर आजारानं ग्रासलं आहे. वैद्यकीय उपचारांना काही फारसं यश येत नाही. मनही खचल आहे;पण चारही बाजूंनी आलेल्या संकटातून एक मार्ग समोर येतो. जादू झाल्यासारखा तो आजारातून बरा होतो. खर तर चमत्कार झाल्यासारखा त्याचा पुनर्जन्मच होतो. एक वेगळं आयुष्य सुरु होतं.या प्रवासाचीच ही कहाणी आहे.
वाचनाचा वेगळा अनुभव देणारी आणि वेगळा विचार घेऊन वाचकापर्यंत पोहोचलेली.!!डॉ. मनोज भाटवडेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या आयुष्यात एका आजारानंतर घडलेल्या क्रांतिकारी बदलाची कहाणी दिली आहे. डॉ. भाटवडेकर यांनी आपल्याला ध्यानधारणेचा कसा फायदा झाला, तसंच या काळात त्यांच्यात जे बदल झाले त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. ओशो यांच्या तत्त्वज्ञानाचा भाटवडेकर यांच्यावर कसा प्रभाव पडला, ते त्यांनी यात दिलं आहे. यात आध्यात्मिक बाजूचा आग्रह नाही किंवा असं केल्याने आजार बरा झाल्याचा दावाही नाही. मन आणि बुद्धी यांचा वापर कसा करायचा, दोन्हींतील कुठली गोष्ट कधी ऑन ऑफ करायची, ते मला कळतं. असं भाटवडेकर सांगतात.

माझा अभिप्राय- डॉ मनोज भाटवडेकर हे स्वतः सायकियाट्रिस्ट आहेत. गेल्या वर्षी मटाच्या सदरात आपण त्यांना भेटलो असू. त्यांना जो एका विशिष्ट प्रकारच्या ऑर्थ्रायटीस चा त्रास झाला त्या काळात त्यांच्या मनाची आंदोलन चांगली चित्रित केली आहेत. वैज्ञानिक दृष्टि व विवेक या दृष्टीकोन बाळगणार्‍या त्यांच्या मनाला प्रत्यक्ष स्वतःच्या वाट्याला आलेल्या त्रासाचे स्पष्टीकरण व कार्यकारण भाव देताना काय काय गोष्टींशी तडजोड करावी लागली वा काही गोष्टींचे नव्याने आकलन झाले याचे चित्रण आहे. पुस्तक वाचनीय आहे. अश्रद्ध .अंधश्रद्ध.सश्रद्ध अशा सर्व लोकांना त्यातून काही ना काही नव्याने आकलन होते.

Interesting! वाचायला हवं.
असंच एक पुस्त्क वाचनात आलं होतं, Dr. Joe Dispenza यांचं "You are the placebo".

अमा,
फनी आहात. डॉकला जज करू नये म्हणता मग तुम्ही कशाला नेमकी ओळ उचलून दुसर्‍याला जज करताय? जरा वाचा तर वाचाल. Happy
आयसीयु मध्ये नातेवाईक असताना आणि डॉ ९ वाजता रात्री येतो सांगून काहीच पत्ता नाही. ना धड आयसीयु बाहेर नातेवाईकांना उभे नाही राहु देत. आणि रात्रभर जागत डॉ आया क्या? कब आयेगा? पता नही उत्तर एकायच. वा छान. डॉ पान खावो नाहितर स्वतःच दुकान चालवत बसो वा काहिहि करो... पण ९ चे १ झाले तरी दर्शन नाही. पुढचे नक्की काय उपचार आहेत हे नर्सला विचारले तर वोह डॉ बोलेगा. आणि डॉ भेटतच नाही.

---------------------------------------------------

मला एक कळत नाही, पेशंटच्या नातेवाईकांना समज असावी, समजून घ्यावे अगदी 'रेअर' रोगाबद्दल, जबाबदारी असावी वगैरे आणि इथे डॉ ... तो काही देवमाणूस नाही वगैरे भाष्य. भलताच विरोधाभास. कमाल आहे. डॉला वेळ लागला तर चालेल पण नातेवाईक पटकन समजून घेवून समंजस असावे हि कशी काय नातेवाईकांकडून अपेक्षा?
-----------------------------------------------------------

प्रायोगिक तत्वाविषयी वाचले पण आतावर दिसलेलया, ह्या क्षेत्रातील अनुभवलेलया गोष्टीनुसार हो प्रयोगिक तत्वावर'च' चालतेच चिकित्सा. Happy

उलट मला तरी, दोन विभागात हि ट्रायल एरर चालते असे दिसते.
१) रोग चिकित्सा आणि २) उपचार पद्धती.

प्रत्येक रुग्णाची केस वेगळी( रोगनिदान तेच असले तरी) व उपचार पद्धती हि वेगळी असू शकते. मग इथे ट्रायल एरर चालतेच. किंबहुना, एका ठराविक निर्णयाला (अंतिम रोगनिदान होइतोवर) येइपर्यंत उपचार आणि त्यावरची औषधे हि बदलतच असतात/बदल करावे लागते. एकदा का रोगनिदान झाले की उपचार पद्धती सुरु होते.

उगाच का, वेगवेगळ्या टेस्टस करतात आणि एमआर लोकं नवीन कंपनीची ड्रग्स विकतात आणि डॉक मग वापरतो रोग्यांसाठी. कधी कधी कित्येक रोगाची जवळपास सारखीच लक्षणं असतात तेव्हा इथे डॉ चा डायरेक्ट दोष नसला तरी त्याची रोगचिकित्सा आणि उपचारपद्धती हि बर्‍याच फॅक्टर वर अवलंबून असते.

जसे की, त्या डॉक चा अनुभव, चिकित्सेला दिलेला वेळ, कशाप्रकारचा रोग(रेअर/कॉमन), त्याने आतावर हाताळलेल्या केसेस ,त्याची मिळालेलया माहितीचा उपयोग करायची पद्धत किंवा रोग्यालाच ज्यासीत ज्यास्त प्रश्ण विचारून माहीती काढायची पद्धत, रोग्याची ठळक लक्षणं आणि शेवटी आणि आजकाल डॉकचा मूड सुद्धा त्या रोग्याच्या केसमध्ये किती आहे(हे एकायला विचित्र वाटेल पण सत्य आहे.. ;)वगैरे नोट करायची वृती ह्यावरून काढलेले ठोकताळेच असतात ना सुरुवातीला?

मगच टेस्ट्स वगैरे सांगतात ना.

१) रोगी नवीन असताना, काही रोगावर एकदम "सही "मात्रा"(डोसेज) डॉक हि नक्की ठरवू (नोटः ठरवू शब्द) शकत नाही.
बरेच रोग जसे मधूमेह ज्याच्यात सुरुवातीला इन्सुलिन चे युनिट एकदम बरोबर नसले तरी सरासरी प्रमाण असते. त्यात एकतर साखर पटकन खाली जावून रोग्याला त्रास होवू नये असे असते. पण कित्येक वेळा हा अंदाज चुकू शकतो. किंवा कमी खाल्ले असल्यास रोग्याने तर हि चुकतो.
किती डॉक नीट अलर्ट करतात? किती रोगी समजतात असे बरेच प्रश्ण आहेत. पण आधीच रोगी घाबरलेला असेल आणि त्यात काहीच मेडीकल ज्ञान नसेल तर खापर रोग्यावर फोडून कसे चालेल. Doctor has to ensure that his patient understands the consequences of not following the treatment correctly. what security measures or actions to be executed if certain symptoms are found after new medicine? or new treatment?. at the time of discharge, there would be just one paper what dosages and medicine to be taken. very roughly diet instructions. that's it. how many doctors tell, there could be possibility of patient being dizzy , not responding so do this or do that?.
किती डॉक खरेच असं पडताळतात की रोग्याला व त्याच्या नातेवाईकाला नक्की समजलेय का? रोगी सुद्धा एका मानसिक पडावातून जात असतोच ना?

दुसरे उदाहरण,
२) ब्लडप्रेशर - कधी कधी कॉम्बो थेरपी असते. तर काहींना काही गोळ्या सूट होतात , काहिंना नाही होत. काहींना खोकला येतो, अचानक सोडिअम कमी होते. तेव्हा सरासरी अंदाजनुसारच सुरुवातील गोळी दिलेली असते. कधी ईलेक्ट्रोलाईट्स चढ-उतार होवु शकतात. रोग्याची इथे जबाबदारी असते की डॉकला कळवावे की काय होतेय. पण डॉकने सुद्धा सांगावे की बाबा रे, काहीही झालं की सांग मला.
३) न्युरो उपचारामध्ये सुद्धा किती पॉवरची गोळी किंवा पॅच (एक उदाहरणः डोपामाईन गोळी) द्यावी वगैरे डॉ काही एकदम ठरवू शकत नाही. पण डॉक साधारण ठोकताळा वर आधारीत देतो. कधी मनुष्य हायपर होइल (कधी, कशी , किती प्रमाणात द्यायची , रोग्याची अवस्था वगैरे) वगैरे. आता डॉक देव नाही ना. Wink

मलातरी वाटते, रोगी आणि नातेवाईक तेव्हा खचतात व चिडतात जेव्हा अगदीच रेअर नसलेल्या आजाराचे निदान करावयास लागलेला वेळ, उगाच भरमसाठ आकारलेलया फिया आणि टेस्टस(कमीशन खाण्याकरता ), केलेला निष्काळजीपणा, योग्य उत्तर न द्यायची पद्धत आणि लांबलच्चक शेपटाचा ईगो. Happy
---------------------------------------------------

एक उदाहरण, साबुचा एक डॉक्टर होते(ते आता हयात नाहीत). ते नवीन औषध सुरु केले की साबुंना एक वही लिहायला सांगत, सकाळची, दुपारची आणि रात्रीची साखर आणि रक्तदाब. साधारण केलेला नाश्ता/जेवण/व्यायाम नोंद. नंतर असे कुठलेच डॉक भेटले नाहीत औषधे बदलल्यावर काय करावे म्हणून. आम्ही सवयीने नोंद करायचो व वही घेवून पुढे केली की, एका डॉकने, त्याची काहि गरज नाही हो. तसेही उगाच कष्ट घेताय. वय झालेय आता त्यांचे. Sad

अरे, आम्ही आमच्या घरच्यांचे वय झाले म्हणून उपचार करावे की नाही ते आम्ही ठरवू.( अर्थात त्या डॉकला राम राम केला).
----------------------------------
मी आईला नेहमी आठवण करते, कधीही नव्या डॉक कडे गेलीस तर तु स्पष्ट सांगत जा, तु मधूमेही आहेस.
आधी आई म्हणायची, अगं पण मी घेत असलेलय औषधांची फाईल देतेच त्यावरून डॉकला कळेलच ना.
मग मी सांगते, डॉक हि माणूसच आहे ना,तो विसरू शकतो, नजरचूक होवू शकते औषधांच्या मोठ्या लिस्टीत, तू आठवण कर जबाबदारीनं. Wink

झंपीताई,

कोणत्याही औषधाचे डोस ठरवण्याचं शास्त्र आहे. आपल्या शरीराच्या वजनानुसार, वय व लिंगानुसार किती मिलिग्राम प्रति किलो बॉडी वेट, असा डोस ठरलेला असतो. तो 'अंदाजपंचे' नसतो.

ज्या वेळी इन्शुलिनसारख्या औषधांचा डोस ठरवला जातो, तेव्हा तो व्यक्तीप्रमाणे अ‍ॅडजस्ट करावा लागतो, कारण प्रत्येक डायबेटिकला वेगवेगळ्या प्रमाणात इन्शुलीनची गरज असते. तोही अंदाजपंचे करीत नाहीत, तर रक्त, लघवी तपासून त्यानुसार डोस अ‍ॅडजस्ट केला जातो.

*

आयसीयू मधे अ‍ॅडमिट केलेल्या पेशंटला पहायला इन चार्ज कन्सल्टन्ट फिजिकली उगवला नाही, तरी तिथे आयसीयुचा इंटेन्सिव्हिस्ट डॉ. हजर असतो. पेशंटचे पॅरामीटर्स, उदा, बीपी, पल्स, ऑक्सिजन सॅच्युरेशन, ईसीजी, रक्त-लघवीचे रिपोर्ट्स हे सगळे आजकाल तो कन्सल्टन्ट आपल्या मोबाईलवर कन्टीन्युअसली पाहू शकतो, व त्यानुसार तो औषधोपचारांत बदल करण्याच्या सूचना वेळोवेळी देत असतो.

आपण ज्या प्रख्यात डॉक्टरकडे गेलो आहोत, त्याला आपल्यासारखे इतरही पेशंट तपासायचे आहेत, अन तेही वेगवेगळ्या ठिकाणी. तो प्रख्यात आहे याचा अर्थ त्याच्याकडे पेशंट लोड भरपूर जास्त आहे. मोठ्या शहरांतून तर तो बिचारा जास्त वेळ ट्रॅफिकमधेच अडकून असतो.

*

काही बेसिक गोष्टी पाळल्या जातात.
सहसा कॅज्युअल कपडे घालून मी पेशंटकडे वा दवाखान्यात जात नाही.
गावात असलो, तर कधीच दारू घेत नाही. कारण केव्हा पेशंट येईल सांगता येत नाही.
अन सगळ्यात महत्वाचे, अ‍ॅडमिट पेशंटला किमान दोन वेळा तोंड दाखवून येतोच येतो.

*

पेशंट त्याच्या घरून निघून, त्याच्या खर्चाने माझ्या दारापर्यंत आलाय, त्याने मला भेटायचे पैसे दिले आहेत, याचा अर्थ त्याला जेन्युइन प्रॉब्लेम आहे, व त्याचे निराकरण करणे माझे काम आहे, हा मझा बेसिक नियम आहे. त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न मी नेहेमीच करीत असतो.

पण काहीवेळा डोके तडकते :

१. नंतर उगवणारे नातेवाईक. म्हणजे एकाला एक्स्प्लेन केलं, की थोड्या वेळाने दुसरे येणार. डॉ. आमच्या पेशंटला काय झालं? त्याला सांगितलं की तिसरे. अशावेळी मी पहिल्याला एक्स्प्लेन केलंय त्याला विचारा हे सांगतो.
२. गुगलपंडीत पेशंट. नशीबाने मला बर्‍याच लोकांपेक्षा जास्त गूगलपांडित्य येते.
३. कुठेकुठे दाखवून आलेले व जुने रिपोर्ट्स लपवून ठेवून माझी परिक्षा घेऊ पहाणारे पेशंट्स.
आधीच्या ट्रीटमेंटने आजाराचं चित्रं बदललेलं असतं. हे दीडशहाणे मुद्दामच तिसर्‍याच कंप्लेंट्स सांगत राहतात. अँड सो ऑन.
४. ऑपरेशन/उपचाराचा खर्च अमुक लागेल म्हटल्यावर तो मान्य करून, हो डॉक्टर, आता इतके भरतो, बाकी ऑपरेशननंतर वाले नमुने. हे लोक हमखास नंतर पैसे बुडवतात.

"पैसे की फिकर मत करो डॉक्टरसाब" असा डायलॉग मारणारा नातेवाईक नंतर पुन्हा कधीच दिसणार नाही ह्याची मला ग्यारंटी असते.

मला फसवायच्या इंटेन्शनने आलेले असे लोक आजकाल ओळखू येतात, अन मी १००% अ‍ॅडव्हान्स घेतल्याशिवाय अशांचे ऑपरेशन करीत नाही. कारण माझे चॅरिटेबल हॉस्पिटल नाही.

शक्यतो मोठ्या सर्जन्सचं नियोजन चांगलं असतं. डॉ. रणजित जगताप हे पुण्यातले नावाजलेले हृदयशल्यविशारद (हार्ट सर्जन) सर्जन आहेत. त्यांच्या पेशंटसच्या बाबतीत ते एका तारखेला एकाच रुग्णालयात शस्त्रक्रिया करतात. त्यांना जास्त शस्त्रक्रिया कराव्या लागतात हा त्यांचा लोड आहे, हे मान्य. पण त्यांनी एक शस्त्रक्रिया चिंचवडला, एक चाकणला, एक भोरला आणि एक चंदन नगरला करायचं ठरवलं तर दोष कुणाचा त्यात ?

ब-याचशा शस्त्रक्रिया प्लान्ड असतात. माझ्या पुतणीच्या वेळी सकाळी सातची वेळ ठरली होती. पण त्यांनी स्वतःच ती आठ वाजता केली. तसा एस एम एस तिथे ताबडतोब आला होता. हे कठीण नसावं डॉक्टरांना. किमान हॉस्पिटलच्या डीनला तरी एस एम एस , एखादा फोन जातच असेल ना ? चार पाच तास रुग्ण आणि त्याचे नातेवाईक गॅसवर असणं याचं समर्थन नाही करता येत.

बाकी एकाच आजाराच्या बाबतीत वेगवेगळं डायग्नॉसिस होणे, त्यानुसार औषधयोजना होणं हे प्रत्येक वेळी फसवणुकीचे प्रकार नाहीत हे मागे एका ठिकाणी लिहीलेलं आहे. आजही तेच मत आहे. माझ्या दुस-या पुतणीच्या वेळी खूप जणांनी सांगितल्याने डॉ. मानकरांना दाखवले. त्यांनी खूप वेळ तपासलं. घसा, डोळे समाधान होईपर्यंत पाहीलं. अनेक प्रश्न विचारले. आणि एका व्हायरसचं नाव सांगितलं. पाच दिवस ताप राहतो असं सांगून औषधं दिली. पण माझ्या भावाला ते पुरेसं वाटलं नाही म्हणून त्याने दुसरीकडे दाखवलं. त्यांनी टेस्ट्स करायला लावल्या. त्यात तेच निदान निघालं. यावरून डॉ. मानकर हुषार आहेत हे म्हणू शकतो. कारण त्यांना तीन तीनशे पेशंट्स तपासायला मिळत असल्याने चालू असलेल्या सर्व साथी माहीत असतात. दुसरीकडे गेल्यानंतर त्यांना याची कल्पना नसते. त्यामुळे त्यांची चूक आहे असं नाही.

ज्याला फसवणूक किंवा लुबाडणूक , निष्काळजी पणा म्हणता येतील असे आणखी अनुभव नंतर लिहीन. एक आहे , जवळचा नातेवाईक तेव्हां लढा देण्याच्या स्थितीत नसतो. तुलनेने तटस्थ मनुष्य लढा देण्याविषयी सुचवतो, पण आपाल्यावर आल्यावर तोच जाऊ दे म्हणू लागतो. माझ्या बाबतीतही असे झालेले आहे.

मला आलेला वाईट अनुभव.

७ वर्षांपुर्वीची गोष्ट, तेव्हा मी २ महिन्यांची गरोदर होती पहिल्यांदाच. एका रात्री थोडं पोटात दुखत होतं म्हणुन मी ठाण्यातले प्रसिद्ध गायनॅक डॉ. चिटणीसांकडे गेले होती. त्यांनी मला काही औषधे देऊन पुन्हा ८ दिवसांनी भेटण्यास बोलवले होते. परंतु दुसर्‍याच दिवशी सकाळी मला थोडी थोडी ब्लिडिंग सुरु झाली म्हणुन मी दवाखान्यात फोन करुन डॉ.ची अपॉईंटमेट मागीतली तर आजचे नंबर फुल्ल आहेत असे सांगितले त्यावर माझा प्रॉब्लेम सांगितल्यावर रीसेप्शननिस्टने तुम्ही या मी डॉ.ना सांगते असे सांगितले.

मी आणि माझा नवरा साधारण सकाळी ११.३० ला दवाखान्यात पोहचलो व रिसेप्शनवर पुन्हा एकदा सर्व माहिती दिली. तिथे दोन रिसेप्शनिस्ट आणि ३ नर्स पण होत्या/नेहमी असतात. तिने डॉ.ना फोन केला आणि मला बसायला सांगितले. त्यानंतर तिने मला नंबर दिला तो होता नं.३३ आणि चालु नंबर होता ५ की ७. मी तिला सांगितले की मला इतका वेळ बसणे शक्य नाही तर तीने डॉक्टरांनी थांबायला सांगितल आहे असे सांगितले.

थोड्या वेळाने मला खुपच त्रास होऊ लागला म्हणुन मी तिथल्याच टॉयलेटमधे गेली तेव्हा मला भरपुर ब्लिडींग झाले. माझ्या डोळ्यासमोर मी माझा गर्भ पडताना बघत होते Sad मी बाहेर येऊन नवर्‍याला सांगितले की आपलं बाळ गेलं तेव्हा तो रिसेप्शनवर जाऊन तिला बडबड करु लागला की माझ्या बायकोला त्रास होतोय तिला आत पाठवा पण तिचं एकच म्हणणं होतं की मी दोनदा डॉ.ना फोन केलाय, परत फोन केला तर ते ओरडतील.

५ मि. ५ मि. करत करत शेवटी तिने मला दुपारी ३ वाजता आत पाठविले. डॉ.नी चेक केल्यावर तो मलाच बोलायला लागला की एव्हढ्या वेळ कशाला बाहेर बसलीस, मिसकरेज झालयं आता अ‍ॅबोरशन (याला नक्की काय म्हणतात ते आठवत नाही आता) कराव लागेलं त्यावर नवरा चिडला तो बोलला की तुम्हाला दोनदा फोन केला पण तुम्हीच थांबायला सांगितलं तर डॉ.नी त्या मुलीला बोलवले आणि तिलाच ओरडायला लागला की तिने काही सांगितलेच नाही म्हणुन. तिने आमच्यासमोर फोन केला होता पण डॉ. ओरडत होता म्हणुन ती काहीच बोलली नाही. यावर नवरा मधे बोलायला लागला तर त्यांनी लवकर अ‍ॅबोरशन करा नाहीतर तिला जास्त त्रास होईल असं बोलुन ऑपरेशनची तयारी सुरु केली.

माझं पहिलं बाळ.....
जर त्या डॉ.नी मला वेळेत तपासल असतं तर कदाचित माझं बाळ जगलं असतं. खुप खुप राग येतो मला त्या डॉ.चा.
रात्री पोट दुखतय म्हणुन आलेली बाई जर सकाळी ब्लिडिंग होतेय म्हणुन परत आली तर तिला प्राधान्य देणं हे त्यांच कर्त्यव्य नाही का?
४ तास मी त्या बाकडावर बसुन मरणप्राय वेदना सोसत होती तेव्हा तिथे असलेल्या एकालाही वाटु नये का आपल्या नंबरवर हिला पाठवु म्हणुन.
रिसेप्शनवर असलेल्या नर्सेसलापण या गोष्टीचं गांभिर्य लक्षात येऊ नये का?

Pages