Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54
डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.
ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.
अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> मुख्य डॉ. बरोबर ५ / ६
>> मुख्य डॉ. बरोबर ५ / ६ असिस्टंट डॉ चे कोंडाळे. <<
+१११११११११११११११११११
अगदी अगदी. आणि मुख्य डॉक्टर ५ मिनिटे दर्शन देवून जाणार. ते हि आपल्याशी न बोलताच फक्त त्यांच्या अर्धवटारावांना विचारून आणि आपण विचारले की डॉक नक्की काय निदान आहे. .. तर म्हणणार अर्धवटराव सांगतिलच म्हणून पशार..... मला काही नीट ते बाकीच सहाय्यक समजावू शकले नाहीत.
>> मुख्य डॉ. बरोबर ५ / ६
>> मुख्य डॉ. बरोबर ५ / ६ असिस्टंट डॉ चे कोंडाळे. <<
+१११११११११११११११११११
अगदी अगदी. आणि मुख्य डॉक्टर ५ मिनिटे दर्शन देवून जाणार. ते हि आपल्याशी न बोलताच फक्त त्यांच्या अर्धवटारावांना विचारून आणि आपण विचारले की डॉक नक्की काय निदान आहे. .. तर म्हणणार अर्धवटराव सांगतिलच म्हणून पशार..... मला काही नीट ते बाकीच सहाय्यक समजावू शकले नाहीत.>>>+१
माझ्या व त्या पूर्वी च्या
माझ्या व त्या पूर्वी च्या पिढ्यांमध्ये डॉक्टरवर डोळे झाकून विश्वास ठेवणे, देव माणूस समजणे हाताला गूण आहे असे समजणे हे आता राहिलेले नाही. आता इंटरनेट/ गूगल सर्च करून आपण नक्की काय झाले आहे ती माहिती तरी मिळवू शकतो. तो सोर्र्स रिलायेबल असला तर उपचारासाठी जाताना निदान काय झाले आहे व काय उपचार दिलेजाणार आहेत ह्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे असते/ असावी.
मग गप्प बसून डॉक्टर काय बोलतो ते ऐकता येते. पटले नाही तर शंका विचारलीच पाहिजे.
सर्टिफिकेट चेक करणे आपली जबाबदारी आहे. असे मला वाट्ते. तसेच आता हे फील्ड( उपचार पद्धती ) फारच तांत्रिक झाली आहे. नाडी परीक्षा केली पुड्या दिल्या/ लाल औष ध दिले फेज पेक्षा फारच पुढे आलो आहोत. ६०-७० % डाटा कंप्युटर वर असतो. सर्वे चेकिंग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असते व हा आपल्या शरीरा बद्दलचा डाटा समजून घ्यायचा आपल्याला हक्क आहेच आहे. फिगर्स डोंट लाय. त्यात सब्जेक्टिव्ह काही नाही. आजारी पडण्या आगोदरची शुगर लेव्हल इसीजी/ क्रिएटीनाइन लेव्हल वगैरे जे काय संबंधित डाटा असेल तो ( एका हेल्धी लेव्हलचा) बेस म्हणून सेव्ह केलेला असेल तर काय बदल आहेत ते समजू शकते व काय कॉंप्लिकेशन्स आहेत ते देखिल. इथे अर्धे माहीती युद्ध तुमच्या हातात आलेले आहे.
बरीचशी ट्रीटमेंटही कंप्युटराइज्ड आहे अतिशय स्किल्ड सर्जन्स सुद्धा आयटी स्किल्स डेव्हलप केलेलेच असतात. ह्या व्यतिरिक्त देखील किती डॉक्टर स्वतःचे स्किल्स अपग्रेड करतात व करत राहतात? का आहे त्याच भांडवलावर चालवत राहतात. टिल समवन क्वेस्चन्स देम? हे ही तपासायला हवे.
एक महत्वाचा मुद्दा म्हणजे. तीच ह्युमन बॉडी, तेच डिसीजेस बदलणार्या नवनव्या ट्रीटमेंट्स, ह्यात एकदा घेतलेल्या शिक्षणाला अप्ग्रेड करणारा व काम करणारा डॉ. किमान कौशल्य स्वतः जवळ ठेवून असेलच. पण मग त्याचा अनुभव, मॅनेजरिअल स्किलस, पीपल स्किलस किती डेवलप्ड आहेत
त्यावर पेसंटचा अनुभव व डिलाइट अवलंबून आहे. आपल्याला चांगली ट्रीटमेंट वाजवी दरात मिळाली हे समाधान पेशंटच्या मनात ठे वून त्याला विदा करावे अशी मनोभूमिका किती डॉक्टर डेव्हलप करतात त्यांना तसे ट्रेनिन्ग मिळते का? तेवढा वेळ व इमोशनल इन्वेस्ट मेंट त्यांची असते का?
सेम एज्युकेशन, सेम स्किल सेट असला तरीही चांगला डॉक्टर व आउट स्टँडिंग वन ह्यात फरक पडतो बेस्ड ऑन हाउ ही / शी इज अॅज अ ह्युमन बीइंग. पीपल स्किल्स व मॅनेजमेंटचे ट्रेनिन्ग त्यांना वेळो वेळी दिले गेले तर पेशंट - डॉक्टर इंटर अॅक्षन सुधारेल असे वाट्ते.
तसेच कामाचे प्रचंड प्रेशर, अनियमित वेळा, स्ट्रेस, जीवनातील घडामोडी ह्यांच्याशी लढणारे डॉक्टर्स आपल्यासारखे माणसेच आहेत. ते देखील सिस्टिमचे बळी होत आहेत का ह्यावर विचार व्हावा.
काही इं डियन अमेरिकन सर्जन्स नी ह्यावर अनुभवावर आधारित पुस्तके लिहीले आहेत. शोधून लिंक देते.
ह्या व्यतिरिक्त देखील किती
ह्या व्यतिरिक्त देखील किती डॉक्टर स्वतःचे स्किल्स अपग्रेड करतात व करत राहतात? का आहे त्याच भांडवलावर चालवत राहतात. टिल समवन क्वेस्चन्स देम?
<<
समवन डझ क्वश्चन अस.
आमची स्वतःची गव्हर्निंग काउन्सिल. उर्फ मेडिकल काउन्सिल.
एक क्रेडिट पॉइंट सिस्टीम आहे, त्यानुसार दर पाच वर्षांत किमान ३० पॉइंट इंटेन्स अभ्यास होईल, असे सी.एम.ई. : करंट मेडिकल एज्युकेशन : अटेंड करणे गरजेचे आहे.
१ पॉइंट = १ दिवसाचा अभ्यासवर्ग.
हे पॉईंट्स नसतील, तर रजिस्ट्रेशन रिन्यू होत नाही.
रजिस्ट्रेशन नसेल, तर प्रॅक्टीस करता येत नाही.
***
ही सिस्टीम फक्त अॅलोपथीला लागू आहे
असे सीएमई खरेखुरे अभ्यासवर्ग आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल 'ऑब्जर्वर्स' नेमते. मी स्वतः अनेक सीएमई वर्गांच्या ऑब्जर्वेशनसाठी जात असतो.
या अभ्यासवर्गांत शिकविणार्या फॅकल्टी व ऑब्जर्वर्स यांची अॅक्रेडिटेशन क्रेडेन्शिअल्स एमएमसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
मुम्बई : बोरिवली : ऑर्थो .
मुम्बई : बोरिवली : ऑर्थो .
डॉ. कडे फार गर्दी असते , एका बैठकीत फक्त २० च पेशंट्स घेतात , अपॉईन्टमेन्ट साठी अगोदर पसून नम्बर लावावा लागतो वगैरे ऐकुन होतो . आई आणि साबा , दोघांचाही अनुभव सारखाच . डॉ एखाद्या पेशंट्वर ५ मिन. पेक्शा जास्त वेळ घालवत नाहीत.
आईला काही वर्शापूर्वी स्लिप-डिस्क चा त्रास झाला होता. पाय आणि कंबर परत दूखू लागली .
आईने हिस्टरी सांगायला सुरुवात केली .
डॉ ने मोबाईल मधलं डोक वर न करता म्हटलं " आता काय होतयं ते सान्गा. "
कसलाही चेक अप नाही . औषध लिहून दिली , १५ दिवसानी या .
नातेवाईकांच्या ओळखीने , साबांच्या गुडघेदूखीसाठी अपॉईन्टमेन्ट घेतली .
तेन्व्हाही जवळ जवळ सेम सीन. फक्त काही एक्स-रे आणि टेस्ट सान्गितल्या .
औषधांमुळे साबाना कॉन्स्टिपिशन चा त्रास झाला . दूसर्या वेळेला सांगितलं डॉ ना , तर त्यानी "बरं" म्हणून गोळ्या बदलून दिल्या.
साबा परत सांधेदूखीने हैराण . यावेळी डॉ बदलले.
नविन डॉ कडे आमचा नम्बर आला तेन्व्हा त्यान्च्या रूम मध्ये २०-२५ मिन. बोलत होतो.
साबांची हिस्टरी , एक एक सांधा , हात- पाय हलवा , इकडे दूखतय का , तिकडे दूखतय का . सग्गळ व्यवस्ठित तपासलं . काही नविन टेस्ट सांगितल्या - आणि त्या का करायच्या तेही सांगितलं .
औषध लिहून देताना , कसला त्रास आहे का वगैरे विचारलं .
एक ३ महिन्याचा कोर्स लिहून दिला . त्या गोळ्या का घ्यायच्या , कशा घ्यायच्या , कशा नाही घ्यायच्या . प्रत्येक गोष्ट तपशिलवार्पणे. साबानां बहुतेक नुसत्या विजिटने १०% बरं वाटलं .
मी प्रत्येक डॉक्टर हा, माझे
मी प्रत्येक डॉक्टर हा, माझे एक एम. डी - मायक्रोबायोलॉजी(जी.एस. मेडिकल कॉलेज) असलेल्या मित्राच्या सल्ल्याने निवडतो. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट(स्वभावानेदेखील) डॉक्टरांशीच संबंध आला आजपर्यंत(माझ्या शहरातल्या).
वाईट असा अनुभव सांगण्यासारखा नाही. एमर्जन्सी सोडल्यास डॉक्टरची शहानिशा करून त्याच्याकडे जावे हे मला पटत आहे आणी मी सहमतही आहे त्याच्याशी.
शिवाय धडधाकट असताना आपाप्ल्या
शिवाय धडधाकट असताना आपाप्ल्या शहरातले निष्णात डॉक्टर कोण आहेत ह्याचे सामान्यज्ञान वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करणे फायद्याचे ठरते असा स्वानुभव!
हे पॉईंट्स नसतील, तर
हे पॉईंट्स नसतील, तर रजिस्ट्रेशन रिन्यू होत नाही.
रजिस्ट्रेशन नसेल, तर प्रॅक्टीस करता येत नाही.
>> आपण ज्या डॉक्टर कडे जाणार, जो आपली सर्जरी करणार त्याचे रजिस्ट्रेशन अपडेटेड आहे का ते कोणत्या वेब साइट वर चेक करता येते? जसे पॅन नंबर टाकला तर आयटी रिटर्न कि ती परेन्त अपडेटेड आहेत ते लगेच दिसते तसे काही आहे ? पॅन नंबर, यू ए एन नंबर सारखी देशभरातील डॉक्टरांची काही नंबरिंग सिस्टिम असते का? उदा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडे कंपन्यांची लिस्ट व प्रत्येकीचा अपडेटेड डाटा अस्तो. व युनिक नंबर असतो. तसे काही उपलब्ध आहे का? करता येते का? प्राक्टो सारख्या अॅप मध्ये हे एक फील्ड अपडेट करता येइल. व पेशंट ला समजेल. अश्या अपडेटेड डॉक्टरा कडेच जावे. म्हणजे तक्रारीचे अर्धे कारण खलास होईल.
कॉर्पोरेट चेन हॉस्पिटल्स मध्ये निदान प्रॉफिट दाखवीण्याची जबाबदारी सीएफ ओ व गैरे लोकांवर असते पण जे काही रिसोर्सेस पूल करून कर्जे घेउन क्लिनिक्स काढतात व त्यातून रिटर्न मिळवून ती कर्जे फेडायची असतात अश्या प्रायवेट प्रॅक्टिशनर वर फारच आर्थिक प्रेशर असते. अश्या नर्सिंग होम मधील वैमनस्यातून खून आत्महत्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. ( परसो हैद्राबादमें ऐसा एक केस हुआ.)
आपल्याला वाट्ते की डॉक्टर म्हणजे काय दाबून पैसे कमवित असणार पण जर तो प्रमाणा बाहेर आर्थिक प्रेशर खाली असेल व मार्जिन्स धोक्यात येउन त्याचे इनकम व आउट गो ह्यात त्याच्या हातात काही फारसे येत नसेल तर तो वैतागलेला असणार त्याकडून फार पेशंट प्रेमाची अपेक्षा केली तरी पूर्ण होणार नाही त्यांच्या वर्क लाइफ बॅलन्स बद्दल तर काय बोलावे. तो जर अनियमित असेल तर स्ट्रेस वाढणार व तो प्रेम स्वरूप / कारुण्य सिंधू २४/७ वागेल अशी अपेक्षा करून जाउच नये. तू प्रोफेशनल आणि मी पण प्रोफेशनल. एवरी थिंग इज डॉक्युमेंटेड पेड फॉर/ इन्सुअरन्स विल पे तर किस्सा खलास.
भावनिक गुंतवणूक इज नॉट पार्ट ओफ द डील. हे पेशंट व नातलगांनी समजूनच वागले पाहिजे.
युरोप मधे जे गॅस्ट्रो सर्जन्स चे ऑनलाइन वर्क शॉप्स होत अस्तात त्यातील एका मॉड्यूलचे डॉक्युमेंटेशन फ्रेंच मधून इंग्रजीत होत असे ते एडिट/ चेक करायचे ( भाषे साठी ) काम मी एक वर्श केले आहे. म्हणून हा रिस्किलिंग चा मुद्धा आणला.
माहिती बद्दल धन्यवाद दिमा
रजिस्ट्रेशन काही कारणांनी
रजिस्ट्रेशन काही कारणांनी कॅन्सल केले वा गोठवले, तर त्याची माहिती कलेक्टरच्या अध्यक्षतेखालील व्हिजिलन्स कमिटीस दिली जाते. यात पोलिस अधिक्षक व सिव्हिलसर्जनही असतात.
हे लोक दुकान बंद आहे की नाही हे पहात असतात.
मेधावि, प्लीज शीर्षक असे कराल
मेधावि, प्लीज शीर्षक असे कराल का?
भारतातील कुख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव - पुढच्यास ठेच मागचा शहाणा
कुख्यात - हे सब्जेक्टीव्ह
कुख्यात - हे सब्जेक्टीव्ह आहे.
आहे तेच शीर्षक योग्य वाटत आहे.
अमा, पोस्ट आवडली. मोकिमी,
अमा, पोस्ट आवडली.
मोकिमी, माझ्याच क्षेत्रातल्या मालप्रॅक्टीसबद्दल मी काय लिहू म्हणण्यापेक्षा कित्ती लिहू असे आहे.
सो, मी इथेतरी काही लिहिणार नाही.
खूप झोल आहेत आणि मला स्वतःलाही भयंकर राग येतो असे झोल आहेत.
जशा सगळ्याच सिस्टीम करप्ट असतात तशी ही सिस्टीमही करप्ट आहे.
मात्र इथे जीवंत माणसाचा प्रश्न असतो म्हणूनतरी डॉक्टरांनी मनापासून पेशंटच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशी माझी अपेक्षा आहे.
ती अपेक्षा क्षणोक्षणी तूटताना मी स्वतःच अनुभवते त्यामुळे इथल्या कुणाच्या अनुभवावर मी संशय घेत नाही.
मात्र कधी कधी पेशंटना डॉक्टर काय सांगतात तेच अजिबात क ळून घ्यायचे नसते, डॉक्टरांच्या लिमीटेशन्स समजून घ्यायच्या नसतात हे ही खरेच आहे (तो या धाग्याचा विषय नाही.)
एक व्यावसायिक म्हणून मात्र इथे कुठल्याही डॉक्टरांचे नाव आले की मला मनापासून वाईट वाटतेय.
अमा.. प्रत्येक डॉक्टरांचा
अमा.. प्रत्येक डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि तो प्रिस्क्रिप्शनवर कम्पल्सरी असतो. त्यावरुन तुम्ही म्हणताय ती माहिती मेडिकल कॉउन्सिल कडून मिळायची शक्यता आहे.. त्यांची एखादी वेबसाईट असेल ज्यावर डॉक्टर्सची लिस्ट असेल तर त्यात हे सापडू शकेल..
असे काही असेल तर दिमा सांगू शकतील..
मात्र कधी कधी पेशंटना डॉक्टर
मात्र कधी कधी पेशंटना डॉक्टर काय सांगतात तेच अजिबात क ळून घ्यायचे नसते, डॉक्टरांच्या लिमीटेशन्स समजून घ्यायच्या नसतात हे ही खरेच आहे
जरा अवांतर:
साती, दिमा आणि आणखी कोणी डॉक्टर्स: पेशंट्सचे अनुभव असा एखादा धागा काढा ना.
अर्थात या धाग्याला प्रत्युत्तर म्हणुन नव्हे (इन केस इतर कोणाला असे वाटले तर.).
एक उत्सुकता आहे, डॉक्टरांना काय अनुभव येतात वेगवेगळ्या पेशंट्सचे? त्यांना कसं तोंड द्यावं लागतं वगैरे.
हो तो रजिस्ट्रेशन नंबर मी
हो तो रजिस्ट्रेशन नंबर मी पाहिला आहे. पण जर ऑनलाइन हा अपडेटेड आहे का शिक्षणाच्या बाबतीत संबंधित रिक्वायरमेंट भरून तर ते सोपे पडेलआहे
दुसरे म्हणजे, डॉक्टर हा फक्त एक इंटर फेस आहे जो पीपल फेसिंग आहे व सर्व भले बुरे परिणाम, तो झेलत असतो व रिस्पाँड करत अस्तो. परिस्थितीतला लीडर व डिसिजन मेकिंग मॅनेजर तोच आहे.
उदा: हार्ट अटॅक आला आहे व व्हायटल्स सिंक होत आहेत तर किती ही प्रार्थना भावनिक अपील वगैरे केले तरी ही परिस्थिती त्याच्या हाताबाहेर असू शकते व त्याला पेशंटची एकूण हेल्थ मॅनेज मेंट जबाबदार असते. माझे एक चांगले डॉक्टर मित्र आहेत ते म्हणतात कि आम्ही प्रयत्न कुठे विथ ड्रॉ
करायचे प्रयत्न ती लाइन समजते का ते बघतो. त्या लेव्हल ला पोहोचे परेंत हे हेल्थ मॅनेजर बेस्ट प्रयत्न करीतच असतात. अॅप्टिट्यड संपली किंवा दमलेले असले तरी प्रोफेशनल प्राइड व एथिक्स, अनुभ व
हे असतेच.
परंतु मागे बॅक ग्राउंड मध्ये कितीतरी हितसंबंध व साखळ्या कार्यरत असतात. बिग फार्मा, इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स, बिग हेल्थ इन्शुअरन्स, हॉस्पिटल मॅनेजमेंट, सरकारी पॉलिसीज, ह्यातील कुठेही
कधीही काही चुकू शकते. विमानप्र वासाचे उदाहरण घ्यायचे तर पायलट चालवत असला तरीही
विमानाचे कंप्युटर्स व मेंटेनन्स, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पार्ट्स व तयचे सप्लायर्स, इंधन पुरवठा करणार्या कंपन्या, कस्टमर सर्विस इंटरफेस, सरकारी पॉलिसीज इत्यादिंचे त्यावर बंधन असते. एखादा चुकीचा किंवा थोड्या वेगळ्या स्पेसिफिकेशनचा पार्ट लावला गेला तर सर्व फ्लाइट धोक्यात येउ शकते. हे लक्षात घ्यायला हवे. आहे पण आता १८ व्या शतकात नाही कि आप भगवान हो मेरे बच्चे को ठीक करदो म्हणून पायाशी लोळण घ्यायला. ही मानसिकता सोडायला हवी. आपण आता नॉलेज इकॉनॉमीत राहतो. ती वापरली पाहि जे,
रात्री एक वाजता जेवन झाल्यावर पान खाल्ले तरी डॉक्टर ला जज करायचे का? डाय हार्ड २ सिनेमात शेवटी एक वाक्य आहे. द बेस्ट फ्लाइट इज वन यू कॅन वॉक अवे फ्रॉम( आफ्टर अ सेफ लँडिंग) . तसेच द बेस्ट पेशंट इज वन यू कॅन वॉक अवे फ्रॉम ( आफ्टर ट्रीटिन्ग अॅंड डिस्चार्चिंग हिम्/हर) टू युअर होम अँड फॅमिली.
कुख्यात हा शब्द इथे वापरू नये अशी माझी धागाकर्तीला विनंती आहे.
डॉक्टरांचे रेकॉर्ड पाहून मगच
डॉक्टरांचे रेकॉर्ड पाहून मगच त्यांच्याकडे जाण्याविषयीव तशी पेशंटची जबाबदारी असल्याचे पेशंटला सुचविणारे इथे मायबोलीकरांच्या रोषाला बळी पडलेले दिसत आहेत. अर्थात यात नवल ते काय? धागाकर्त्याचे रेकॉर्ड पाहूनच प्रतिसादसंख्येचे शेपूट लांबवावे हा साधा कॉमन सेन्स नाही तिथे डॉक्टरांचे रेकॉर्ड कोण पाहणार? असो तर सदर धागाकर्तीचे जुने मायबोलीवरील रेकॉर्ड म्हणजे -
उंदराला कसे हाकलावे? - साडेचार ओळींचा धागा आणि साडेचारशे प्रतिसाद - केवळ स्वस्त मनोरंजनाचा उद्देश साध्य.
कुत्र्याप्रेमींचं काय करायचं? - सव्वा तीन ओळींचा धागा आणि पावणे सातशे प्रतिसाद - कुत्राप्रेमींवर इतरांकडून आगपाखड घडवून आणण्याचा उद्देश साध्य.
आरटीओतून लायसेन्स कसे काढायचे? - पावणेसहा ओळींचा धागा आणि एकोणतीस प्रतिसाद - तमाम जनतेला माहीत असणारी आणि इंटरनेटवरही सहजरीत्या उपलब्ध असणारी माहिती मायबोलीकरांकडून वदविण्याचा उद्देश साध्य.
अशाच प्रकारे बॅंकेच्या सामान्य व्यावहारिक नियमांविषयी माहिती विचारण्यात एक साडेसात ओळींचा धागा आणि दुसरा लॉकरमधील दागिन्याविषयीचा किस्सा सांगून स्वतःचा प्रामाणिकपणा जाहीर करण्याचा आणि इतरांचे ७१ प्रतिसाद घेत बँकेची बदनामी करण्याचा साडेसतरा ओळींचा धागा.
या डॉक्टरांविषयीच्या धाग्यात एके ठिकाणी प्रतिसादात लिहिलंय -
{ खरं तर डॉक्टरांचे नुसते अनुभव लिहिण्याने इतरांना काहीही फायदा होणार नाही. डॉ. च्या नावासकट अनुभव लिहिले तरच काही अर्थ आहे अन्यथा इतरांना समजणार कसे? डॉक्टरकी हा बिजनेसच झालाय मग नावासकट रिव्ह्यु लिहायला हरकत का असावी? }
तर दुसरीकडे स्वतःच नाव न लिहीता असला प्रतिसाद दिलाय.
{ शनिवार पेठेतील एक नवरा-बायको दोघे डॉ.असलेले, अनेक वर्षाचे त्यांचे अनेक पेशंटस आहे. पण आता स्वतःच्या प्रायव्हेट कॉलेजमधून नापास होत होत कसाबसा डॉ. झालेल्या मुलाची प्रॅक्टीस चालावी म्हणून स्वतःच्या जुन्या पेशंटसना मुलाकडे जायला सुचवतात व तो फडतुस डॉ.मुलगा दिवसेंदिवस मस्तवाल होत चाललाय. वाईट बाब अशी की अश्या केसेस कुठे बोलल्यासुद्धा जात नाहीत. }
यामुळे त्या भागातल्या अनेक डॉक्टर दांपत्यांकडे संशयाने पाहिले जाणार. असो. भारतातील वैद्यकीय व्यवस्था इतर अनेक देशांच्या तुलनेत बरीच सुसह्य आणि परवडण्यासारखी आहे. जगभरातून इथे लोक वैद्यकीय पर्यटनांतर्गत अनेक शस्त्रक्रिया व दंतोपचार करून घेण्याकरिता येतात. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना इथे पिढ्यान् पिढ्या केवळ विश्वासावरच चालत आलेली आहे. जास्त मोठी वैद्यकीय समस्या असल्यास फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढचा तज्ज्ञ गाठल्यास अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागत नाही असा अनुभव आहे. तरीही या व्यवसायातील अनेकांवर शिंतोडे उडविणार्या या धाग्याचे प्रयोजन काय?
आताच इथल्या डॉक्टर व डॉक्टरेतर सदस्यांमध्ये ठिणग्या पडू लागल्या आहेत. डॉक्टरांची बाजू घेणारे किंवा पेशंटचीही काही जबाबदारी असते हे सांगणार्यांनाही झळ बसू लागली आहे. आग भडकण्याआधी आटोक्यात आणल्यास बरे होईल हे अॅडमीननी पाहावे.
माहितीसाठी धन्यवाद दीमा!
माहितीसाठी धन्यवाद दीमा!
>>एवढीशी कळ आली की पेशंट डॉ.
>>एवढीशी कळ आली की पेशंट डॉ. च्या दारात लगेच जात नाही. काही वेळा घरगुती उपाय वगैरे करुनही बरं वाटंत नसेल तर डॉ.कडे जातात.थोडक्यात काही दिवस वेदना/दु:ख सहन करत असणार्या माणसाची मानसिक अवस्था डॉचे सर्टीफिकेट बघण्याची कशी असू शकेल?<<
शुगोल +१
इथे ज्योतिषांसारखेच आहे,केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त असतात. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो.
चिनूक्स यांच्या या धाग्याबाबत असलेल्या मतांशी मी असहमत आहे. अनेकांनी त्याचा योग्य प्रतिवाद केला ही आहे.
नावासकट लिहिलेल्या डॉ वा होस्पीटल यांचा आलेला वाईट अनुभव हा लिहिल्याने त्यांची बदनामी होते या मताशी मी सहमत नाही.पण त्यांच्या 'व्यवसाया' तील विश्वासार्हतेबाबत शंका निर्माण होते हे खरे. त्याचा त्यांच्यावर परिणाम होउ शकतो. चांगल्या अनुभवांबद्दलही धागा आहेच. एकाच डॉक्टर बद्दल एखाद्याचे वाईट तर एखाद्याचे चांगले अनुभव असू शकतात. शेवटी ते पण पेशंटवर ट्रायल अँड एरर प्रकारचे प्रयोग करत असतात. प्रयोग यशस्वी झाला तर चांगला डॉक्टर अयशस्वी झाला तर लगेच वाईट डॉक्टर.
लोक चांगल्या अनुभवावर एखाद्याला मखरात बसवतील तर वाईट अनुभवावा पायदळी तुडवतील. त्यांना जग कृष्ण धवल मितीत दिसत असते.
आताच हाती आलेल्या
आताच हाती आलेल्या अधिसुचनेनुसार,
या पुढे डॉकटरांवर किंवा संबंधित विषयाशी धागा काढण्याआगोदर खालील बाबिंची पुर्तता करणे कायद्याने बंधण्कारक झालेले आहे:
साती चांगली व प्रामाणीक
साती चांगली व प्रामाणीक पोस्ट.
स्पॉक:
स्पॉक:
शेवटी ते पण पेशंटवर ट्रायल
शेवटी ते पण पेशंटवर ट्रायल अँड एरर प्रकारचे प्रयोग करत असतात
<<
अतीशय बेजबाबदार व निर्बुद्ध विधान. घाटपांडे यांचा निषेध.
अमा तुम्हाला पाहिजे असलेली
अमा तुम्हाला पाहिजे असलेली माहिती इथे मिळू शकेल..
http://mciindia.org/InformationDesk/IndianMedicalRegister.aspx
पण माझ्या ओळखीच्या डॉक्टर्सची इथली माहिती अद्ययावत नाहीये..
ती कोण करते म्हणे?
वरील अनुभव धक्कादायक आहेत.
वरील अनुभव धक्कादायक आहेत.
ज्यु हॉ चा अनुभव बरा होता. आईचे ऑपरेशन तेथे झाले होते. तेव्हा ते हॉस्पिटल नवीन होते. आईला असलेल्या गाठीची तपासणी करण्यासाठी ते सँपल टाटालाच न्यायचे असे तेव्हा नुकताच ऑन्को सर्जन झालेला मित्र म्हणाला. पण हॉस्पिटलवाले तयार नव्हते ते सँपल बाहेर पाठवायला. भावाने आणि त्याच्या सर्जन मित्राने ते प्रकरण लावून धरले. तेव्हां कुठे त्यांनी ते सँपल टाटामध्ये तपासणीसाठी नेण्यासाठी भावाजवळ दिले. नंतर आइच्या केमोज कौशल्या हॉ मध्ये झाल्या. वडलांचे ब्लॅडर काढाले तेव्हा ह्या सर्जन मित्रानेच ऑप. केले होते. अर्थातच घरातला डॉक्टर असल्याने काहीच प्रॉबलेम आला नाही.
जळी (आंतरजालावर
) आणि स्थळी (प्रत्यक्षात इथे-तिथे) नेहमी चांगलेच डॉक्टर भेटले आहेत!
इथल्या डॉक्टरांपैकी काहींना वेळेवेळी सल्ले विचारले आहेत. त्यांनी व्यवस्थित सल्ले दिले आहेत.
स्पॉक
स्पॉक
हिम्सकूल, महाराष्ट्र मेडिकल
हिम्सकूल, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या साईटवर जा. एमसीआय व एमेम्सी मायलेकी असल्या तरी फंक्शन्स वेग्ळी आहेत.
http://www.maharashtramedicalcouncil.in/
इथे कुणाला नवल वाटेल. ८५ची ही
इथे कुणाला नवल वाटेल. ८५ची ही गोष्ट आहे. माझ्या आत्येबहिणीचे पोटाचे ऑपरेशन होते. एक छोटी कात्री पोटातच राहून गेली होती. ती कात्री परत काढायला सगळे टाके कापून परत तिचे ऑपरेशन करावे लागले.
शेवटी ते पण पेशंटवर ट्रायल
शेवटी ते पण पेशंटवर ट्रायल अँड एरर प्रकारचे प्रयोग करत असतात
<<
अतीशय बेजबाबदार व निर्बुद्ध विधान. घाटपांडे यांचा निषेध.
दीमा अस अजिबात घडतच नाही असे म्हणायचे आहे का? सर्वच बाबतीत ट्रायल अँड एरर असे होत नाही पण काही बाबतीत तरी होते ना? मला वाटत या विधानावर अन्य समंजस डॉक्टरांची मते देखील घेतली पाहिजेत.
डॉ ह वि सरदेसाई म्हणतात की ८५ टक्के शारिरिक व्याधींचे मूळ मानसिक अस्वास्थ्यात असते. मग डॉक्टरला मूळ शोधण्यासाठी पेशंटच्या मानसिक स्वास्थ्य जाणून घेणे आवश्यक ठरते ते सध्या च्या सिस्टिम मधे शक्य आहे का?
अवांतर एका नातेवाइक डॉकचे
अवांतर
एका नातेवाइक डॉकचे क्लिनिक चालले नाही, कारण काय तर तो इंजेक्शन देत नाही म्हणुन पेशंट येत नाहित. (तो पेडी आहे आणि खेड्यात क्लिनिक चालु केलंय)
ह्याचं म्हणन असं की इंजेक्शनची गरज नाहिये गोळ्यांनी ठिक होइल, पण तेव्ह्ढा पेशन्स नसतो ह्या लोकांना.
खेड्यात पेशंटस डॉकला सांगतात 'डाक्तर सायेब इंजेक्शन द्या, लवकर बरं वाटेल', 'आओ दोन सलायनं भरा की लगेच कसा चालायला लागतोय बगा'. 'म्हागल्या येळेला जुलाबावर ती पिवळी गोळी दिलती ना तिच द्या, लगेच थांबत्यात जुलाब'.
डॉक्टर म्हणजे जादूगार नव्हेत
डॉक्टर म्हणजे जादूगार नव्हेत तेही प्रयत्न आणि प्रयोगच करीत असतात. प्रत्येक पेशंतच्या शरीराची केमिस्ट्री वेगवेगळी असतेच. त्याच्याशी ट्यून अप करणे हे तंत्र आणि कला यांचा संगम आहे. डॉक्तराना सहानुभूती आणि कम्युनिकेशन स्किल असणे आवश्यक आहेत. प्रत्येक व्यवसायात जिनिअस, साधारण आणि वर्स्ट माणसे असतात. ह्या व्यवसायात प्राणाशी गाठ असल्याने बाब अतिशयच संवेदनाशील आणि सेंटी होते. सगळ्याच व्यवसायात आदर्श परिस्थितीत माणसांनी वागावे अशी अपेक्षा असते पण दुर्दैवाने नाही तसे होत.
डॉक्टरंच्या वागणुकीतल्या तर्हेवाईक पणाबद्दल म्हणाल तर कौटुम्बिक, सामाजिक संस्कारांचाही भाग असतो. ।ऑटेलवाल्याच्या, दुकानदाराच्या , मेकॅनिकच्या आणि डॉक्टरच्या तर्हेवाईकपणाच्या इम्पॅक्ट मधे जमीनास्मानाचा फरक असतोच. कनवाळू पणा काही व्यवसायांची पहिली गरज आहे उदा. शिक्षक , नर्स , डॉक्टर . एक वेळ स्किल कमी असले तरी चालेल.
निदान चुकण्याच्या बाबतीत आजाराच्य प्रत्येक स्टेजवर डॉक्ट्रांपुढे एकाच सिच्यु अॅशनम्धेय अनेक शक्यता निर्माण होतात, दिसत असतात , स्पेक्युलेट होतात त्या चाचण्यांच्या साह्याने रुल आउट करी नेमकेपणाकडे जाण्याचा प्रयत्न असतोच. कधी कधी एखादी नॉन ट्रॅडिशनल बाब प्रयोग म्हणून करूनही पहावी लागते . कधी मिरॅकलच्या हवालीही करावे लागते २गुणिले २ बरोबर चार असा हा व्यवसाय नाही. पण प्रयत्नात पारदर्शकता, प्रामाणिकता, सहृदयता असावी आणि ती दिसावी एवढीच अपेक्षा आहे. यशाचा आणि पैशाचाही प्रश्न तसा दुय्यम आहे.
Pages