सही दही!

Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09

दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू. Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनम सेम पिंच. फक्त मी दही लावून नेत नाही. दही घुसळून घट्ट मिश्रण फ्रिजर मध्ये ठेवून ते घेऊन जाते. ऑफिसला जाईपर्यंत गार राहतं त्यात फक्त गार पाणि मिक्स करते. पुर्ण ताक नेलं की ते आंबट व्हायचं.

रश्मी ,
सासूबाईंना विचारलेला मी तुझा दह्याचा प्रश्न. अंजू म्हणते ते बरोबर आहे, म्हशीच दुधाने कवडी दही होते. कारण फॅट जास्त.
तसच घरच दुध प्रोसेस केलेलं नसत आणि चितळेंच मला वाटत पाईस्च्राईज (सॉरी मराठीत हे कस लिहायच) केलेलं असाव त्यानेही फरक पडत असेल.

मी क्रीम घालून दही करते कधी कधी. तेव्हा पण दही जास्त घट्ट होते नेहमी पेक्षा. माझी एक मैत्रिण दही वड्यासाठी दही लावताना त्यात थोडी मिल्क पावडर घालते. त्याने घट्ट होते अस म्हणते. पण मी कधी करून बघितले नाही.
दुसरं म्हणजे विरजण लावताना सुरुवातीला मला अंदाज यायचा नाही तापमानाचा. मग मी सरळ फुड थरमॉमीटर वापरायचे. ११५ वर दुधं उकळुन गार होवून आले कि मस्त आणि घट्ट दही होते अस माझ्या लक्षात आलयं. नविन दही लावणार्‍या लोकांना एकदम सोपी ट्रिक आहे ही.

मी सध्या आई बाबांकडे नागपूरला आहे, अगदी विरजणाची तंतोतंत पद्धत वापरून अमुल ताजा दूधाचं दही लावतोय. टपरवेअरच्या डब्यात तयार झालेल्या दह्याची वरती छान पांढरीशुभ्र कवडी असते, चवही सुरेख (मला आवडते तशीच गोडसर आंबट) असते. मात्र कवडीखाली पाणी जमलेले असते. दही खातांना पाणचट वाटते, जणु वाटीत ताकच चमच्याने खात आहोत असे वाटते. तुलनेने मुंबईला घट्ट दही लागते. तर माझे काय चुकत असावे ज्यामुळे दही पातळ लागत आहे? किंवा दही घट्ट व्हायला काही युक्ती सुचवा.

नागपूर मध्ये मुंबई पेक्षा उष्णता जास्त असूनही दही असं लागतंय
कदाचित दूध गरम असताना विरजल्यामुळे बॅक्टरीया प्रोसेस आधीच क्षीण होत असतील?
कोमट(नेहमीच्या तापमानापेक्षा अगदी थोडं गरम) दूध घेऊन, विरजण त्यात घालून 50 वेळा एकाच बाजूने चमच्याने ढवळा. (5प बद्दल आग्रह नाही, 60, 58 किंवा काहीही चालेल).आणि बंद मायक्रोवेव्ह मध्ये किंवा एखाद्या बंद जागी ठेवा.हवा गार असेल तर दह्यात एखादी अख्खी हिफवी मिरची टाका उष्णतेला.
दुधाच्या योग्य तापमानात बॅक्टरीया सर्व जागी समान वाढले पाहिजेत, वाढून दही लागण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर ते आंबट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवले पाहिजे.

आज नेहमीच्या दूधाचेच पण दही घट्ट लागले. एरवी नागपूर मुंबईपेक्षा उष्ण असले तरी सध्या रोज येणार्या पावसामुळे इकडे अगदी थंड वातावरण झाले आहे. कदाचीत त्यामुळे विरजणाला पुरेशी ऊब भेटत नसावी असे माझ्या ध्यानात आले. मग काल विरजणाचा डबा कणकीच्या डब्यात दाबून ठेवला आणि आज नेहमीप्रमाणे कवडीखाली पाणी सुटले नाही; तसेच बर्यापैकी घट्ट दही तयार झाले होते. सध्यातरी विरजण बदलायचीही गरज वाटत नाही.
BTW thanks!

Pages