Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09
दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे माझा मुलगा दुरावणार
म्हणजे माझा मुलगा दुरावणार याची खात्रीच.
>>>
बयो, तू तर लिहिलंयस की "मी लोणी जमा झालेलं ताक फ्रीजमधे ठेवते. दुसर्या दिवशी कडक झालेलं लोणी चमच्याने पातेल्यात .".... नाहि गो दुरावणार तुझा लेक तुला.
सगळ्या बायकाच दिसतात इथे.
सगळ्या बायकाच दिसतात इथे. कुणी बाप्ये (अर्थात दिनेशदांचा सन्माननीय अपवाद वगळता) ताक करत नाहीत वाटते! :अवांतर साठी एक बाहुली हवी अशा अर्थाची बाहुली:
माझी आई आमच्या लहानपणी असे बडबडगीत म्हणत असे "आईच्या कामाला मदत करू, ताक घुसळून लोणी काढू". ताक करताना ह्या ओळी हमखास आठवतात मला ! :नॉस्टॅल्जिक बाहुली:
आणि अर्थातच
:अवांतर साठी एक बाहुली हवी अशा अर्थाची बाहुली:
अगं पण लोणी संध्याकाळीच काढते
अगं पण लोणी संध्याकाळीच काढते ना. फक्त कडक झालेलं लोणी धुवुन दुसर्या दिवशी कढवते. पण अच्छा हा एक्सक्युज चालतो का? चला राहिल म्हणजे माझा मुलगा माझ्याकडे.
हल्ली शिक्षणासाठी हॉस्टेल आणि नोकरीसाठी परदेश यामुळे लोणी संध्याकाळी न काढता मुलं दुरावतातच.
अगं म्हणजे ताक करायचे नाही
अगं म्हणजे ताक करायचे नाही असं नाही काही. ताकापासून लोणी वेगळे करायचे नाही. जनरली ताक केल्या केल्या आपण लोणी वेगळे करतोच की.
तू हुश्शार आहेस, तोडगा शोधणारी!
आमच्या शेजारी एक कुर्गी
आमच्या शेजारी एक कुर्गी कुटुंब रहात होते. त्यांच्याकडे ताक ( त्यांच्या भाषेत कट्टी मोर ) काढायची एक
वेगळीच पद्धत होती. मोठ्या तोंडाची ( साधारण जॅम किंवा हॉर्लिक्स ची असायची तशी ) काचेची बरणी घ्यायची,
दही / साय / दही / साय असे थर त्यात देत, फ्रिजमधे ठेवायची. मग वर थोडी जागा राहिली कि त्यात बर्फाचे खडे + पाणी टाकून झाकण घट्ट लावून, बरणीच उभी हलवायची. ( बारवाले कॉकटेल मिक्स करतात तसे. )
त्या आँटी आणि माझी आई खिडकीत उभ्या रहात गप्पा मारायच्या आणि त्या आँटी असा हाताचा व्यायाम करत
असायच्या. २०/२५ मिनिटात मस्त लोणी येत असे. हातही स्वच्छ रहात असत.
मी घरी फक्त हौस म्हणून ताक करतो आता, गल्फ मधे ( लबान ) आणि केनयात ( माला ) अशा नावाने तयारच ताक मिळते.
दिनेशेदा यावरून आठवलं ... आई
दिनेशेदा यावरून आठवलं ... आई सांगते, टांझानियामध्ये साय एका चामड्याच्या पिशवीत घालून ती पिशवी हलवत बसायचे मसाई लोक. तासंतास चालायचा हा उद्योग. विरजण तरी घालत का माहित नाही. लोणी निघायला फार वेळ लागला म्हणजे मला ही गोष्ट आठवते

हे अवांतर असलं तरी लोणी काढायची एक पद्धत म्हणून या धाग्यावर चालेल बहुतेक
गौरी, तिथे आपल्यासारखे दही
गौरी, तिथे आपल्यासारखे दही नाही तर वेगळ्या कल्चरने दूध आंबवतात. वेगळे तरी छान लागते त्यांचे ताक.
तिथे लोणी / तूप पण भरपूर. ( त्यांची दूधाबाबतची एक समजूत मात्र मी इथे लिहू शकत नाही. सगळे वाचक पळून जातील ! ) तिथल्या दूधात नैसर्गिकरीत्याच जास्त स्निग्धांश असतो.
मंजूडी तेरी बात में दम है
मंजूडी तेरी बात में दम है
माझ्याकडे गायीचं आणि म्हशीचं (चितळे कंपनीचं) दूध उरलं होतं. यावेळी सही दही लाविन असा चंगच बांधला होता. एरवी फ्रिजातलं दूध बाहेर काढून मावेत नॉर्मल ला आणून लगेच दही लावत होते. यावेळेला, दोन्ही दूधं एकत्रं करून उकळवनून गार करून मग दही लावलं. काल सकाळी लावलेलं, रात्री चेक केलं तर अधमुरं लागलेलं. मग रात्रभर बाहेरच ठेवलं.. आज चांगलं लागलेलं सकाळी. आजिबात तार नाही.
धाग्याचा लईच उपयोग झाला. 
दक्षिणा, धाग्याचा उपयोग
दक्षिणा, धाग्याचा उपयोग दह्याचा धागा घालवायला झाला काय ?
घरी केलेले तूप किती दिवस
घरी केलेले तूप किती दिवस टिकते - फ्रीजमध्ये आणि बाहेर
१०० पोस्ट्स झाल्या तरी अजून
१०० पोस्ट्स झाल्या तरी अजून दही नीट लागेना
देशी तूप अनेक वर्षे टिकू शकते .आयुर्वेदात शत धौत तूप वगैरे सिद्ध करावे लागते ना? म्हणजे १०० वेळा धुवून काढलेले तूप. त्यामुळे त्यात पाणी रहात नाही आणी शुद्ध स्निग्ध असल्याने टिकते व औषधी वापरही करता येतो. जाणकार सांगतीलच...
दक्षे २४ तास लागतात म्हणजे
दक्षे २४ तास लागतात म्हणजे काहीतरी नक्की चुकतय. मी रात्री १० ला लावलेले दही सकाळि ६ ला फ्रीजमधे टाकते. आज सकाळी ८ ला लावलेले घरचे ३ वाजता फ्रीजमधे टाकतील.
तरीही लगेच लोणी न आल्यास थोडे
तरीही लगेच लोणी न आल्यास थोडे थोडे फिरवून तसेच ठेवावे >> हमखास उपाय म्हणजे त्यात आधिच थोडं लोणी घालव.. मग घुसळावं , लगेच लोणी येतं
दक्षे २४ तास लागतात म्हणजे
दक्षे २४ तास लागतात म्हणजे काहीतरी नक्की चुकतय. >> दूधात भेसळ असेल काय?
आणि वर्षे माझ्या इथे थंडावा
आणि वर्षे माझ्या इथे थंडावा जास्ती असेल तर वेळ लागू शकतो ना?
माझे पण सकाळी विरजण लावलेले
माझे पण सकाळी विरजण लावलेले दुध दुपारपर्यंत किंवा रात्रीपर्यंत लागते.
मी चितळे / वारणाचे म्हशीचे
मी चितळे / वारणाचे म्हशीचे दुध वापरते. आम्ही दुध कधीही तापवुन ठेवत नाही. आर्धा लिटरची पिशवीतले आपल्याला हवे तेव्हडे घेतल्यावर परत पिशवी उभिच भांड्यात घालुन फ्रीजमधे ठेवतो.
सांगायचा उद्देश हा की.. नेहमी दुध पहिल्यांदा तापवुन गार पाण्याच्या भांड्यात ठेवुन कोमट करते.. हाच काय तो तुझ्या आणि माझ्या पध्दतीत बदल आहे. दुध सेम आहे
वर्षा, म्हणजे तुला डाएटिंग
वर्षा, म्हणजे तुला डाएटिंग करायची जरुरी भासत नाही तर.
आम्ही ( म्हणजे मी तरी) चितळे दुध तापवुन गार झाल्यावर फ्रीजकधे ठेवुन देते. दुसर्या दिवशी अगदी जाड साय निघते ती लोण्यासाठी काढुन घेतली की खालचं फॅटस विरहित दुध वापरतो. लो फॅट दुध घेण्यापेक्षा हे सोयीस्कर. 
जितके जूने तूप तितके चांगले
जितके जूने तूप तितके चांगले असे म्हणतात की!
मने अनुमोदन तुला. मी ती साय
मने अनुमोदन तुला.
मी ती साय रोज एक चमचा चहात वापरते..
निंबे पण तुप जुनं झालं की
निंबे पण तुप जुनं झालं की त्याला खवट वास यायला लागतो.
गायीचे तूप तर खुपच टिकते.
गायीचे तूप तर खुपच टिकते. माझ्या आजीने खुप साठवुन ठेवले होते. मला जेंव्हा १० वीत चष्मा लागला. तेंव्हा काजळा सारखे ते एका डबीत मला दिले आणि रोज रात्री झोपताना डोळ्यात घालायला सांगितले. मी त्या प्रमाणे २ वर्ष घातले.
त्या वेळेस माझा नंबर -०.५ होता. आश्चर्य हे की साधारण ४-५ वर्षांनी माझा नंबर -०.२५ झाला ( जो नगण्य आहे) आणि अजुनही २० वर्ष झाली तोच आहे.
गायीचं तूप खुप गुणकारी असतं त्याचा मला स्वतःला प्रत्यय आला.....
निंबे पण तुप जुनं झालं की
निंबे पण तुप जुनं झालं की त्याला खवट वास यायला लागतो.>>
दक्षे... बरणीत पांढर्या कापडाने ( धोतराच्या) बरणी बांधुन प्रकाश नसलेल्या जागी ठेवले तर खुप टिकते. पण पाण्याचा स्पर्श अजिबातच नको... ( आजी ची मेथड)
निंबे पण तुप जुनं झालं की
निंबे पण तुप जुनं झालं की त्याला खवट वास यायला लागतो.
>>
नाही गं. मला असा अनुभव कधीच नाही आला. माहेरी आणि सासरी पण घरातच तूप कढवून करण्याची पद्धत आहे. खूप जुने राहिलेले तूपही वापरले आहे बर्याचदा. असे कधीच नाही जाणवले. उलट काही नातेवाईकांकडे/ स्नेह्यांकडे कधी कधी जेवायला गेलो असताना बाहेरून आणलेले टिन च्या डब्यातले तूप वापरलेले पाहिले आणि त्या वासाची व चवीची इतकी हिक्क बसली आहे की विचारू नकोस!
हे वाचुन.. आयुश्यात
हे वाचुन.. आयुश्यात पहील्यांदा दही लावलं.. आणि.. आणि काय अश्चर्य लागलं लाहं कवडी दही!
१ कप दुधाचं..
आता जास्त करायची हिम्मत करेन..
सर्व प्रेरणादायी सख्यांचे.. ( खा/खी included ) आभार..
दक्षे, तू घेत असलेल्या दूधात
दक्षे, तू घेत असलेल्या दूधात नक्कीच गडबड आहे. दुकान बदलून बघ. हल्ली ब्रँडेड दूधात पण भेसळ असते.
मुलींनो - मी सगळे प्रतिसाद
मुलींनो - मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीत, तरी माझी पद्धत सांगते.
दही जर- डाएट दही असेल तर २/३ द साय काढून लावाव, जर लहान मुलांना द्यायच असेल, तर पहिल दूध तापल्या नंतर कोमट झाल की विरजण लावाव, दही घट्ट लागत, विकतच्या सारख हव असेल तर, तुरटी चा एक वळसा फिरवावा, दही मस्त लागत.सायीच ताक रोज च्या रोज नाहीतर, दोन दिवसातून एकदा तरी कराव, फार दिवस सायय ठेऊन केल तर कडसर चव येते. साय आठवडा भर साठवून कधीही ताक करु नये म्हणजे फेकुन द्याव लागणार नाही, शक्यतो काचेच्या दगडीत दही लावाव.
दही लागायला २४ तास फारच जास्त
दही लागायला २४ तास फारच जास्त वेळ आहे.
पुण्याच्या तापमानात कमीत कमी ५ तास ते जास्तीत जास्त ८ तासांत दही नक्की लागते.. खूपच थंडी पडली तरच उशीर लागेल..
सध्याचे तापमान तर नक्कीच खूप थंड नाहीये..
जितके जूने तूप तितके चांगले
जितके जूने तूप तितके चांगले असे म्हणतात की! >>>> गाईच तूप जुन चांगल असत अस म्हणतात, म्हशी च्या तूपाला फार दिवस झाले तर नक्की वास येतो.
दिनेश दुकान बदललं तरिही
दिनेश दुकान बदललं तरिही चितळेंचं दूध सगळीकडे सारखंच मिळणार ना?
पुण्याच्या तापमानात कमीत कमी ५ तास ते जास्तीत जास्त ८ तासांत दही नक्की लागते.. >>> आता अजून बारिक लक्ष देऊन लावते चितळ्यांना दही. नाही लागलं तर दूधाच ब्रँड बदलून टाकिन.
मला एक सांगावे कृपया दही पूर्ण लागलंय हे कसं कळावं?
असो तुमचा कुणाचा विश्वास आहे की नाही माहिती नाही. एकेक व्यक्तीचा हातगुण असतो. माझ्या दोन काकू दही लावायच्या ते हमखास आंबट होत असे. तेच दही त्याच पद्धतीने माझ्यासमोर एकदा काकाने लावलं.. तर ते आंबट झालं नाही.
आता हे मी का सांगतेय.. तर लावलेलं विरजणयुक्त दूध किंचित आंबट झालं तर त्याचं दही झालं असं धरून चालायला हरकत नाही. पण मी लावलेलं दही अजिबात आंबट होत नाही (हातगुणच हो :इश्श:) त्यामुळे मला कळतच नाही, मी चव घेऊन पाहते आणि चमच्याने हलवून पाहते. अलिकडे त्या तारेच्या धसक्याने नुसती चव घेऊन भागत नाही. त्यामुळे थोडं जास्ती वेळ बाहेर ठेवते.
Pages