सही दही!

Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09

दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू. Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी , अगदी अगदी. मी ही माझ्या आईला मडक्यातच दही लाव अशी भुणभुण लावून कुंभारवाड्यातून मस्त लहानसे मडके आणवले. पन तितकी छान चव काही आली नाही. आपली संक्रांतीची सुगड असते तसली लाल मडकी किंवा काही ठिकाणी मटका दही मिळते तसले काळे मडके आणूनही ट्राय करून झालेय.

आमच्या इथे प्रकाश डेअरी म्हणून एक डेअरी आहे. त्यांचे दही फर्मास लागते. मी तरी लगेल तसे तिकडूनच आणते. किंवा मग वारणा, मदर डेअरी चे डबे. दोन्ही बंडल आहेत असे माझे मत आहेत. आमच्या इथल्या अगदी लोकल हलवायाकडून घेतले की ते दही हमखास आंबट निघते असा अनुभव आहे. Sad त्यामुळे कधी कधी फक्त दह्यासाठी प्रकार डेअरी ला नवर्‍याला पिटाळते.

दही रात्री खाउ नये असं म्हणतात ना?
>>>
मी तर पांढरे कुठलेही पदार्थ रात्री खाऊ नयेत असे ऐकले आहे. भातही म्हणे नाही खायचा. Uhoh
अर्थात एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून दिले आहे.

मडक्यात दही लावायला, दूध खुप दाट असावे लागते. शहरात मिळणारे दूध कामाचे नाही.
कोल्हापूर भागातल्या खेडेगावात मी असे दही खाल्ले आहे. ( सिंहगडावर पण मिळते ना ? )

गोरेगाव / जोगेश्वरीला मिळते तसे दूध, त्याचे लागेल तसे दही. ( तसेच गोठे कुर्ला आणि वसईला पण आहेत. )
वसईला, हायवेजवळच एक मोठी डेअरी आहे, तिथे खर्वस, लस्सी, दही, लोणी सगळे मस्त मिळते.

किंवा, जे दूकानात दही मिळते तेच आणून त्या मडक्यात ठेवायचे. थोड्या वेळाने आणखी दाट होईल. ( दूधाची तहान ताकावर Happy )

>>आपल्याला लावायचं असेल तसं दही तर
मला वाटतंय की आधी साध्या भांड्यात दुधाला विरजण लावून मग त्याचे निम्मेअधिक 'दहीकरण' झाले की मडक्यात भरून ठेवले तर जमेल.

अर्थात हे केवळ तर्काने. मला आत्तापर्यंत दही लावायला जमलेले नाही. इथले वाचून शनि-रविवारी प्रयोग करणार आहे.

माझं नॉर्मल दही कधी बिघडलं नाही आजवर हा गर्व या मडक्यांनी पार मोडून टाकला होता. त्यामुळे मला माझा इगो पोसण्यासाठी मटक्यात दही लावता येणं हे फार्फार गरजेचं आहे Happy

नीधप, दही लावण्यापुर्वी दुधाची पावडर दुधात मिक्स करून पाहिलीस तर? (दाटपणा हा इश्यु आहे असं गृहीत धरल्यास)

मी पावडरच्याच दूधाचे लावत असल्याने, किती दाट करायचे, ते माझ्या हातात असते. वाटलं तर थेट खवा किंवा चक्का पण होऊ शकतो. नंतर पाणी वेगळे करण्यापेक्षा, आधीच कमी घालायचे !

पण पावडर कुठली चांगली ते बघावे लागेल. क्रॉफर्ड मार्केटला, निडो चा डबा मिळू शकेल. ती बेस्ट !

बापरे केवढं हे दही पुराण Lol म्हणून तर मी मस्ती दही खाते अन मस्तीचंच ताक पिते. Wink नायतर फ्रुट योगर्ट. (ब्रिटानिया, डॅनन, अमुल असं कुठलंही).

खरं सांगायचं तर घरी लावलेल्या दह्याच्या वासानी सुद्धा मला सटासट शिंका येतात. (कुणाच्याही घरी). काही वर्षापूर्वी तर मी दह्याच्या डेअरीसमोरुनही जायचे नाही. पण मस्ती अन तत्सम दही खाल्ल्यानी शिंकाही येत नाहीत अन घसा/सायनस असा कुठलाच अ‍ॅलर्जीचा त्रास होत नाही. कारण त्यात हार्मफुल बॅक्टेरिआ नसतात. माझयासारखे कुणी असतील तर प्रयोग करुन पहा.

सिंहगडावरच्या दहीवाल्यानी सांगितलं होतं की ते लोक ती मडकी काही वेळ (५-७ मि.) अगदी गरम पाण्यात ठेवतात. अन त्यातनं काढून लगेच त्यात दही लावतात. खखोदेजा.

>>खरं सांगायचं तर घरी लावलेल्या दह्याच्या वासानी सुद्धा
हे एक आहे.
मलाही भारतातल्या घरी लावलेल्या दह्याचा वास/ चव सहन होत नाही! पण इथे इंग्लंडात इतरांच्या घरी लावलेले दही खाल्ले आहे, ते आवडले आहे. मला वाटते दूधात नाही तर जिवाणूंच्या जातीत फरक असावा.

मातीच्या मडक्यात दही करायचे असेल तरः
कोलकात्याला 'तिकडच्या' घरी पाहिलेय. दूध मातीच्याच मडक्यात उकळतात त्यातच साखर वगैरे टाकून आटवून मग दही टाकून मिसळून ठेवतात. मस्त मिश्टी दोय लागते.

फ्लेवर्ड दही करण्यासाठी आमच्याकडे उत्तम फ्लेवर्स आहेत. त्यांच्याकडे रेसीपी असल्यास इथे लिहीते. भारतात एक
कोकोबेरी ब्रँड दही तर्‍हे तर्‍हेच्या फ्लेवर्स मध्ये येते. दिल्ली, मुंबई( जुहू/ बांद्रे) इथे दुकाने आहेत. इथे कोणी खाल्ले आहे का ते?

दह्यावर कोणीतरी रीसर्च पेपर घ्यायला आता >> झंपे, आहेच मुळी तो जिव्हाळ्याचा विषय. हा बीबी नुसता वाचून माझ्या ज्ञानात अश्शी भर पडलेय.

परवा दिवशी लावलेलं दही मस्त लागलंय, घट्ट, ऑल थँक्स टू मंजूडी आणि पौर्णिमा..
फ्रिजात ठेवलेलं दूध, उकळून गार करून मगच दही लावणे हा धडा शिकले.

बाप रे! 'दही' हा मुद्दा इतका कळीचा आहे याची मला खरंच कल्पना नव्हती. किती वाहतोय हा बाफ !!

सायीच्या दह्याचं ताक करून लोणी काढून ताक टाकून देणे - हे वाचून फार हळहळले. सायीचं ताक हेच तर खरं ताक. त्याला जी चव असते, ती साध्या दह्याच्या ताकाला मुळीच नसते. आमच्याकडे सायीच्या ताकासाठी भांडाभांडी होते Lol

विरजण लावताना दूध कोमट असलं पाहिजे. तसंच, विरजण म्हणून जे वापरणार ते ही त्याच तापमानाचं असलेलं उत्तम. (यासाठी मी गार दूध आणि विरजण एकत्र करून ते भांडं मंद गॅसवर ठेवून ८-१० वेळा ढवळते. कोमट तापमानाला आलं की उतरवून झाकून ठेवते.)

एकहाती स्वयंपाकघर असल्यास -
पुण्यासारख्या थंडीच्या दिवसांत सकाळी ८:०० वाजता साध्या दुधाला कोमट करून विरजण लावून ते भांडं अलगद कणकेच्या डब्यात अर्ध रुतवून झाकून ठेवावं. संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत मस्त दही लागतं. (एकहाती स्वयंपाकघर अशासाठी, की एकीनं दही ठेवलं आणि नंतर दुसरीनं खस्सकन डबा बाहेर ओढला असं होऊ नये Lol )

ग्रॅनाईटचे ओटे असतील, तर ते जात्याच थंड असतात. अशा ओट्यांवर विरजण लावून भांडं ठेवलं तर काहीवेळा दही लागत नाही. ते टाळण्यासाठी भांड्याच्या खाली एखादा नॅपकिन / कापडी टेबल मॅट ठेवावं आणि वरून एखादा मोठा कुंडा / पातेलं पालथं घालावं. दही काय, दह्याचा बापही नाक घासेल. Wink

एकदा विरजण लावून ठेवून दिलं की पूर्ण दही लागेपर्यंत ते ढवळू / हलवू नये. थोडक्यात त्याला डिस्टर्ब करू नये. दही लागलंय की नाही हे पाहण्यासाठी भांड्याला बाहेरून अलगद एक टिचकी मारावी. ते सुध्दा विरजण लावल्यानंतर ५-६ तासांनीच करून पहावं.

एकहाती स्वयंपाकघर असल्यास ->>> अगदी अगदी लले Lol
म्हणजे काय की सृष्टी दृष्टीआडच असलेली बरी! कणकीच्या डब्यात विरजलेलं भांड ठेवलं म्हणून कोणी 'खरकटं-मरकटं' म्हणत बोंबाबोंब करायला नको Proud

खरकटं-मरकटं >>> आयला! हो की, मंजू! सासरी-माहेरी उपासाशी दुरान्वयेही संबंध येत नसल्याने हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही. Rofl

(बाकी, ती विरजण कणकेत ठेवण्याची आयडिया माझ्या साबांची आहे. पण आजकाल पुण्याला गेलं की त्या मलाच दही लावायला सांगतात. मंद गॅसवर ठेवण्याची माझी पध्दत त्यांना अधिक विश्वासार्ह वाटते. Wink )

नी, दह्यासाठी ती मटकी लावायची म्हणजे जाम भानगड असते. प्रत्येकवेळी दही संपलं ते सुगड स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात पाच-दहा इनीटे उकळवून मग एकदम कोरडं ठणठणीत करून त्यात दही लावायचं. यात शॉर्टकट म्हणजे ते स्वच्छ धुतलेलं सुगड अर्धा-अर्धा-अर्धा मिनिट मावेमधे फिरवून घेता येईल. आमची आजी निखार्‍यांवर ठेवून द्यायची.

मी एकदा ते छोटं मडकं पटकन कोरडं करण्यासाठी गॅसवर धरलं. (उन्हाळ्यात पाण्याचा माठ असा अधूनमधून कोरडा करावा लागतो.) पण ते बहुतेक कच्चं भाजलेलं होतं. तडकून त्याची दोन शकलंच झाली Lol

लले +१

खरच दही हा येवढा मोठ्ठा प्रश्ण असेल हे मला अत्ता कळतय.... रोज लावायची गोष्ट असल्याने तिकडे बारकाईने पाहिलं जात नाही.... मी वर दिलेली पध्धत मी गेली अनेक वर्ष बीन बोभाट चालवत आहे...

दुधाच्या गुणवत्ते बद्दल मात्र खुप शंका आहेत त्या रास्त आहेत. कारण आजकाल खरच त्या गुणवत्ते चे दुध मिळत नाही.

भारतात एक
कोकोबेरी ब्रँड दही तर्‍हे तर्‍हेच्या फ्लेवर्स मध्ये येते. दिल्ली, मुंबई( जुहू/ बांद्रे) इथे दुकाने आहे >>>>>>

अमा...

हे फ्लेवर्ड दही खाल्लय खुप. पवईला "हायको" मधे हव्या त्या ब्रँड चे फ्लेवर्ड दही मिळते. कोकोबरी आहे आणि इतरही दोन तीन आहेत. ( नावे आठवत नाहीत. संध्याकाळी भेट देवुन सांगते). मस्त असतात फ्लेवर्स. खास करुन मँगो... मदर्स डेरीचे मिश्टी दोइ पण मिळते... हायकोतच पंजाब डेरीचा एक काउंटर आहे, त्याच्या कडे दोन-तीन फ्लेवर च्या लस्स्य्या मिळतात आणि हो अप्रतिम चवीचे मसाला दुध...त्यांचं दही पण मस्त असत...

मोकिमी, यू सेव्ड माय लाइफ. पुन्नीने कोकोबेरी साठी बांद्र्याला ने असा हट्ट धरला होता. पवईत असेल तर नेणे सोपे आहे. एखाद्या शनिवारी दही गट्ग करूत.

Pages