सही दही!

Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09

दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू. Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या शनिवारी दही गट्ग करूत.>>>

नक्कीच अमा... त्यातुनही आज संध्याकाळी जाउन त्यांचे सगळे फ्लेवर्स चेक करते.....

खवा, चक्का असल्या अवघड गोष्टी नका बोलू. माझी मजल तिथवर नाही. सध्या मटक्यात दही लावता आलं तरी पुरे आहे >>>
अगदी अगदी!

सायीचं ताक हेच तर खरं ताक. त्याला जी चव असते, ती साध्या दह्याच्या ताकाला मुळीच नसते. आमच्याकडे सायीच्या ताकासाठी भांडाभांडी होते >>> अगदी अगदी. साक म्हणतात ना त्याला? असे ताक फार आवडीचे आहे घरात.

निंबे ताकात पादेलोण घालून पिऊन बघ कधीतरी आणि थोडं थंड करून प्यायचं. आहाहा, गार झोप नाही लागली तर बघ Happy

माझी दही करण्याची पद्धत अशी : रात्री दूध थोडेसे कोमट करायचे.(चितळे- म्हशीचे). ज्या भांडयात दही लावायचे त्यात थोडे विरजण घेऊन थोडसे कोमट दूध घालून चमच्याने चांगले मिक्स करायचे. मग उरलेले दूध त्यात घालून चांगले हलवून, झाकण ठेऊन द्यायचे. सकाळी छान गोड दही तयार किंवा सकाळी लावले तर रात्री तयार. Happy

सायीचे दही करताना : स्टीलच्या भांडयात साय घेउन पहिल्याच दिवशी थोडसे विरजण लावून फ्रीजमधे ठवायचे.
दुसर्‍या दिवसापासून फक्त साय त्या भांड्यात घालून चांगले हलवून ठेवायचे. शनिवार-रविवारी (आठवड्याने) हे साईचे दही बाहेर काढून ठेवायचे. तासानंतर फूडप्रोसेसर मधून ताक करायचे.लोणी काढून स्वच्छ पाणी येइपर्यंत ते लोणी धुवून मस्त पैकी कढवायचे. मीठाची कणी टाकली तर छान तूप निघते. बेरी पण अगदि थोडीशी असते.

दक्षे, मी येऊ का तुझ्याकडे दही लावायला शिकवायला . Wink

बरं दही लागलं ताकही झालं आता लोणी तुपाचं बोला की थोडं Wink

मी जर इलेक्ट्रीक ब्लेंडर वापरुन सायीचं दही मोडलं तर लोणी एकदा काढल्यावर पण परत परत ब्लेंडर फिरवल्यावर थोडं थोडं लोणी येतच रहातं (अर्रे काय हे काम खतम ही नही होंदा ऐसेतो :फिदी:) कोणी ब्लेंडर वापरत असेल ह्या कामासाठी तर त्यांची पद्धत टिप वाचायला आवडेल

अजून एक, लोणी कढवलं तरी तुपाला एक वेगळाच जळका वास येतो (वेगवेगळ्या भांड्यात, कमी अधिक वेळ ठेवून टेस्ट करुन झालय आधीच) त्याच कारण काय असावं आणि ते कसं टाळावं (हे काम बहुतेक वेळा आउट्सोर्स होत आलय आजवर माझ्याकडून Wink पण ह्यावेळी जर नीट टिपा मिळाल्या तर माझ्या खात्यावर ढकलेन म्हणते हे काम :फिदी:)

कविन, लोणी कढवताना त्यामधे एक कोवळे विड्याचे पान घाल. त्याने तुपाला मस्त वास येतो आणि तूपदेखील कणीदार होते.

कविन

माझ्या साबा इलेक्ट्रीक ब्लेंडर वापरतात. त्या आधी सायीच्या दह्यात थंड पाणी घालतात. मग ब्लेंडर ने साय मोडुन घेतात. लोणी एकदा काढुन परत थोडे गार पाणी घालतात. परत ब्लेंड करतात. मग मात्र सगळ लोणी बाहेर येतं.

त्या तूप करताना हे लोणी मंद आचे वर थोडे कढवतात पण जाड बुडाच्या भांड्यात. लोणी चकचकीत झालं (म्हणजे पारदर्शक) की जरा बेरी खाली बसु देतात आणि मग परत चांगले कढवतात. दर २०-२५ दिवसांनी हीच मेथड. पुर्वी आम्ही प्रोसेसर वर काढायचो. पण तो धुवत बसायचा खुप कंटाळा येतो, म्हणुन मग ब्लेंडर किंवा हँड ब्लेंडर.

प्रोसेसर वर तर काहीच मेहेनत नाही. प्रोसेसर च्या भांड्यात कणीक मळाय्ला वापरायची पात घ्यायची. हे सायीचे दही त्यात घालुन एकदम चिल्ल पाणी त्यात घालायचे आणि प्रोसेसर चालु करायचा. २ ते ३ मिनिटात मस्त लोणी तय्यार...

कवे, मी ब्लेंडरनेच करते सायीचं ताक.

१. विरजलेली कासंडी फ्रिजमधून बाहेर काढून ठेवणे.
२. कासंडीवर जमलेला थंडपणाचा शेद गेला की त्यात ब्लेंडर घालून फिरवणे.
३. बहुतेक तीन चार मिनीटात लोणी येतं, ते एकत्र मिळून आलं की त्यात थंडगार पाणी घालून जरावेळ ठेवणे.
४. पुन्हा एक-दोनदा ब्लेंडर फिरवून घेणे. लोणी काढणे.

तू म्हणतेयस तसं होत असेल तर किंवा लोणी तर दिसतंय पण मिळून येत नाहीये किंवा अरेच्या! साय तर भरपूर होती, मग लोणी एवढंसं फदकुलं येतंय असं होत असेल तर अर्धी वाटी उकळतं पाणी ताकात ओतून ब्लेंडर फिरवून घेते. मग व्यवस्थित लोणी निघतं.

लोणी एकदा काढल्यावर पण परत परत ब्लेंडर फिरवल्यावर थोडं थोडं लोणी येतच रहातं >>
मी तर एकदाच लोणी काधते. थोडं लोणी राहू दे ना. साक म्हणतात आम्च्याकडे अशा ताकाला. आवडीने पितात घरातले. Happy

दक्स, मला ताक कधीही मीठ/ जिरा पावडर / सैंधव इ. घालूनच आवडते. थोडक्यात मसाला ताक. मोदक (हा माझ्या नवर्‍याचा आयडी आहे Wink ) ला मात्र ताक नुसतेच लागते,. Happy

कवे, माझ्याकडे एक्दम जुने पातेले आहे. पितळ की तांबे माहीत नाही. आतून कल्हई केलेले आहे. त्यात तूप कधीच जळत नाही. मी बारीक गॅस वर लोणी कढवायला ठेवून अगदी आंघोळीला वै. पण जाते. तूप व्हायला लागले की मस्त खरपूस वास यायला लागतो. आणि द्रावण पारदर्शक झालेले दिसते. अधून मधून पाहत रहायचे. हळू हळू फेस विरळ होत जाऊन द्रावण जवळपास पारदर्शक होते व त्याच वेळी मस्त खरपूस वासही येतो. मग थंड पाण्याचा थोडा शिपका त्यावर मारून पहायचा. कडकड असा आवाज आला की समजायचे की तूप झाले. मग गॅस बंद करायचा.

तूप कणीदार होण्यासाठी मी लोणी गॅस वर ठेवल्यावर पूर्ण पाघळले की थोडे मीठ टाकते. मस्त रवाळ होते तूप. Happy विड्याच्या पानाचा प्रयोग करण्यासाठी खास जाऊन एकच विड्याचे पान कोण आणत बसेल? घरात कधी पूजेनिमित्त विड्याची पाने आणली असतील तर एकदा हा प्रयोग नक्की करून पाहीन. कुणीतरी इथे वेलचीचा प्ण उल्लेख केलाय ना ? तूपाला छान वास येण्यासाठी?

फदकुलं >>>
कित्ती गोड शब्द.! फदकुलं लोणी डोळ्यांसमोर आलं अगदी Biggrin

ढस्सुक आणि फदकुलं - २ शब्द ताक आणि लोण्याला बहाल झाले इथे! Lol

कवे, हिंडालियम चे जाड बुडाचे पातेले वापरून बघ, असे मागच्या पोस्ट मध्ये लिहायचे राहिले माझे! माझी आई करते. तिचेही तूप मी कधी जळलेले पाहिले नाही.

विड्याच्या पानाचा प्रयोग करण्यासाठी खास जाऊन एकच विड्याचे पान कोण आणत बसेल?>>मंगळूरमधे आम्हाला हा त्रास नव्हता. बिल्डिंगच्या आवारातच विड्याच्या पानांचे वेल होते. Happy त्यामुळे अगदी कोवळे पान पण सहज मिळायचे.

दही कसे करावे यासाठी माबोवर धागा काधावा लाग्तो?
>>
अगदी नवीन धागा कसा काढावा ह्यावरही धागा निघू शकतो हो इथे! Wink

माझ्या साबा लोणी कढवताना हळदीचे पान टाकतात. मस्त वास हे सांगायला नकोच.
मी एकदा टाकलं तर ते पान मस्त तळून जळलं आणि जळक्या पानाच्या वासाचं तूप झालं Happy
थोडक्यात इलुश्याश्या लोण्याला कढवताना हे असलं काही करू ने Happy

अय्या, एक सांगायचं राहिलंच! लोणी झाले रे झाले की घरातल्या कान्हाच्या (कान्हा , कान्ही जे कोण असेल ते!) मुखात घालणे विसरू नये! Happy
लोण्याने तोंड माखलेला बाळकृष्ण फारच गोड दिसतो. तशीच त्याची लोण्यासकट पापी घेऊन टाकावी मग! Happy

पुर्वी सुमीत मिक्सरला खास ताक करण्यासाठी एक चकती ( ब्लेड नाही ) असायची. त्यात ताक, मिल्कशेक वगैरे छान व्हायचे.

कूकर स्वच्छ असेल तर कूकरमधे पण लोणी छान कढवले जाते. जळत नाही.

येस्स... माझ्या माहेरी सुमितचाच होता मिक्सर. हल्ली तशा नसतात का मग?? मला वाटले बजाज मध्ये नसते तसे. बाकी मिक्सर्स मधे असेल.

कवे मीठ आणि विड्याच्या पानासाठी अगदी अगदी.
नाहीतर माझ्या बहिणीला फोन कर.. मस्त तूप करते ती. तिच्यासारखं तुप कुणी कढवलेलं मी पाहिलेलं नाही. (बहिण म्हणून बायस असेन मी.. Wink पण चलता है :फिदी:)

दिनेश तुम्ही सांगा सईकडचं तूप कसं असतं ते..

बहिण करतच असेल तुझी मस्त पण दक्षे तू नुसतं डोळे मोठे करुन म्हणालीस तू स्वतः मस्त करतेस तरी मी मान्य करेन गं Proud कशाला उगाच साक्षी पुरावे Proud

इथे दुधाच्या गुणवत्तेबद्दल कोणीतरी लिहिलंय म्हणून ही माहिती..
बिबवेवाडीत महेश सोसायटीत साई डेअरी आहे. दूध बाजारभावापेक्षा महाग आहे, गायीचं ३५ आणि म्हशीचं ४५ रु. लिटर. पण चांगलं आहे. रोज १ लि. गायीच्या दुधावरची आठवड्याची साय = मूठभर लोणी. म्हशीचंही रोज निघत असेलच, आमच्याकडे नसतं म्हशीचं, सो ते माहिती नाही. आणि साय काढली तरी गायीचं दूध ठीक्ठाक असतं. अगदीच पांचट नाही लागत.

आणि दगडूशेठ दत्तमंदिराकडे तोंड करून उभं राहिलं, तर एक मावावाल्याचं दुकान डाव्या बाजूला आहे, (मधला त्रिकोणी रस्ता धरला तर उजवीकडे कराची स्वीट्स) आणि त्याच्या आजूबाजूला चपलांची दुकानं आहेत. त्या मावावाल्याचं दुकान कहर कळकट आहे, पण गायीचं लोणी अप्रतिम असतं! Proud बाकीचंही चांगलं मिळतं असं साबा म्हणाल्या.

बाकी दही प्रकरण इतकं किचकट असेल असं वाटलं नव्हतं. आईचं बघूनबघून मी शिकले, नो त्रास! Happy
ती रोज सायीचं लोणी काढते. दर ८/१० दिवसांनी साजूक तूप!

Pages