बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी +१ _/\_ >> आमच्या आजीची पण तयारी अशीच नीट असायची. सगळा नैवेद्द्याचा स्वयंपाक १०:३० वाजता तयार असायचा.

आता तीच सवय मला पण लागलीये थोडी तरी. जरा माणसं जेवायला येणार असतील तर असं प्लॅनिंग डोक्यात सुरू असतं. इथे तर अगदी आदल्या विकांता पासून कारण तेव्हाच ग्रोसरी होते. आणि उसळ वगैरे करायची असेल तर २ -३ दिवस लागतात मटकीला मोड येण्याकरता !!

मंजुडी छान पोस्ट.
आमची आई (आणि पप्पा पण)/माझ्या सासूबाई पण फार सुरेख प्लॅनिंग करतात. एक असा सिक्वेन्स ठरलेला असतो त्यांचा स्वयंपाक करण्याचा. डिशेस, स्वच्छ टॉवेल्स, बाथरुम मध्ये साबण आहे कि नाही इथपासून सगळ बारीक लक्ष. एवढ करुन शेवटी मस्त कपडे वगैरे घालून व्यवस्थित पाहुणे यायच्या अगोदर तयार.

मंजिरी ताई मस्त पोस्ट, खुप खुप धन्यवाद. खरचं तू किचन क्वीन आहेस. तु सांगितल्याप्रमाणे फ़ॉलो केल ना तर पाहुणे यायच्या वेळेला सगळं आवरुन मी छान तयार असेन. डाव्या बाजुचे पदार्थ एकत्र ठेवायची आयडीया पण आवडली.
तुझ्या त्या पोस्ट्ची प्रिंट-आऊटच काढून ठेवणार आहे.

मंजुताई अगदी अगदी आजी आणि आई सांगायच्या..... ते तर अगदी सेम .. माझी पण अशीच तयारी असते. माझ्या आईचा पण श्रावणातला पुपोचा नैवेद्य 10;30लातयार असायचा .

मस्त पोस्ट मंजुडी. कालच वाचली होती. मी त्या स गळ्या स्टेप्स चे वास अनुभवून पाहिले.

वरच्या सगळ्यांनां +१ Happy मंजूडी मस्त पोस्ट ..

(एकदम नॉस्टाल्जिया आला .. फार फार पुर्वी घरी होत असलेल्या अशा पारंपारीक जेवणांची आठवण आली .. :))

हॅट्स ऑफ्फ टू वाह शेफ ... लै भारी बनवलाय हा एपिसोड !! Lol

पण याचे व्हिडीओ बघून बघूनच बरेच नविन प्रकार करायला शिकलोय !

मंजुडी मस्त !!

मी पण मोठ्या प्रमाणातल्या स्वयंपाकाच्या दिवशीची स्टेप बाय स्टेप यादी फ्रिज वर लाऊन ठेवते. ऐन वेळी विचार करावा लागत नाही.
गणपतीच्या दिवसात पाचही दिवसांचा मेन्यू पण लिहून फ्रिज वर कागद लाऊन ठेवते

आणखी एक. पंगत असेल तर कोणी आधी बसायच वगैरे मनात ठरवून ठेवायच म्हणजे ऐ. वेळी पहले आप पहले आप अस होत नाही ( मनातून सगळ्यांनाच आधी बसायच असत )

दोन दिवसापूर्वी झालं हळदी कुंकू. मस्तपैकी छोले चाट केल होत. सगळ्यांना खूप आवडलं.
दणदणीत एक किलो काबुली चणे भिजत घातले. पुरून उरले मंडळी. भेळवाल्याकडे जाऊन एक एक मुठ साहित्य आणायची वेळ नाही आली.
यापुढे मायबोलीवर फक्त वाचक म्हणुनच. सल्ला बिल्ला मागायची सोय नाही राहिली.

व्हेरी गुड.छोले उरले तरी छोले भात छान लागतो.
आम्हाला मुलीच्या वाढदिवसाला सामोसे ऑर्डर केल्याचा पश्चात्ताप झाला होता.२५ मुले होती.प्रत्येकी दिड असा हिशोब धरुन सामोसे लहान बनवायला सांगितले होते. पण त्या माणसाचा लहान हात पण ऐसपैस होता.
आम्ही पोटभर खाल्ले, मुलांनी पोटभर खाल्ले, थोडे सिक्युरीटी वाल्यांना चालतील का विचारुन त्याच दिवशी दिले, आणि आम्ही पुढचा दिड दिवस सकाळ संध्याकाळ सामोसा चाट खात होतो म्हणजे हिशोब करा. Happy
छोले, पावभाजीची भाजी, उसळी,इडल्या या गोष्टी उरल्या तरी काही वाटत नाही.

माझ्याकडे बेत खुप छान झाला,
४ लिटर फुल क्रीम दुधाचा चक्क १ किलो पेक्षा जास्तच झाला. फ़्रुट-श्रीखंड खुप सुंदर झाले होते.
बाकी पण अंदाज बरोबर जमला.
मी जोडीला कोथिंबीर वड्या ठेवल्या. २ मोठे गड्डे कोथिंबिरीच्या भरपुर वड्या झाल्या. आदल्या दिवशी करुन ठेवल्या, आयत्या वेळी तळल्या.
घाई-गडबडीत ताटाचा फोटो काढायचा राहीला.
सगळ्यांचे खुप खुप आभार.
मंजिरी ताई तु सांगितल्याप्रमाणे सगळं मस्त मॅनेज झालं. मनापासुन आभार.

थोडं अवांतर:- मायबोलीचा खरचं खुप आधार आहे, कोणतीही गोष्ट असो निरपेक्ष आणि आपुलकीचा सल्ला मिळतोच.
इकडे आधी बरेच दिवस मी फ़क्त रोमात होते, आता बर्‍यापैकी सक्रीय आहे.

मायबोलीचा खरचं खुप आधार आहे, कोणतीही गोष्ट असो निरपेक्ष आणि आपुलकीचा सल्ला मिळतोच.
इकडे आधी बरेच दिवस मी फ़क्त रोमात होते, आता बर्‍यापैकी सक्रीय आहे.
>> अनुमोदन. मी सक्रीय होते आता रोमात अस्ते पण फ्रूट श्रिखंड कसे केले लिहाच.

उद्या माझ्याकडे हळदीकुंकू + बोरन्हाण आहे. १८ मोठे आणि १२ लहान लोक. मेनू ठरलाय.
बाकरवडी चाट (म्हणजे मिनि बाकरवड्या भरडून त्यात फरसाण, शेव, बारीक चिरून कां-टो-को आणि भेळेच्या चटण्या.). तर मिन बा व किती लागेल? २ किलो पुरेल का?

मसाला दुधाला दूध किती घेऊ? बाजारात मिळणार मध्यम आकाराचा डिस्पो. कप हे माप.
जिलबी विकत. किती लागेल?

तिळगूळ घरी. मऊ लाडू वळणार. लगेच संपतील अशा बेताने किती करू कळत नाही. तीळ, दाणेकूट, गूळ किती लागेल?

एका लिटरमध्ये साधारण सहा ते आठ जणांना पुरते मसाला दूध. त्या अंदाजाने सहा लिटर आणि छान आटवून दाटसर करणार असलीस तर वर एकलिटर एवढे लागेल.
जिलबी जास्त खपत नाही, दोन किलो पुरेल.
तीळाचे लाडू मुले मटामट खातील त्यामुळे त्यांचे प्रत्येकी दोन व मोठ्यांचे प्रत्येकी एक आणि वर जादाचे सात आठ असे चोवीस + अठरा +आठ पन्नास लाडू. (बापरे!)
बाकरवडीचे माप मंजूडी सांगेल.

प्लेटमध्ये जिलेबी आणि चाट आणि नंतर दूध असं देणारेस का?
१) जिलबीचे नग मोज किती हवेत ते. ३० माणसं आहेत ना? पाहिजेत तितके नग (६०/७०/८०/९०) वजनावर हलवाई देईल.
२) एका व्यक्तीला किमान एक वाटी चाट तरी देशील ना? म्हणजे २०० ग्रॅम तरी? २ किलो बाव कमी पडेल असं वाटतंय मला.
३) एक ग्लास म्हणजे २०० मिलि धर. असे ३० ग्लास दूध. कर हिशोब Happy दूध आटवणार ना? त्यामुळे हिशोबात आणखी एक लिटर अ‍ॅड कर.
४) तीळाचे लाडू कधी केले नाहीत. त्यामुळे त्याचा अंदाज मला नाही.

Pages