क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताकदीचा फटका आहे की भारताकडे ... धोनीचा हेलिकॉप्टर शॉट Happy

पुल शॉट मी पाहिलेल्या खेळाडूंमध्ये माझ्या आवडीचा ब्रायन लाराचा ..

हेलिकॉप्टर तूफान अंगावर येणार्‍या फाष्ट बोलिंगवर उडत नाही फार दादा ... नटराज गूगल करून पाहीन. आधी कधी नाव ऐकले नव्हते.

ब्रायन लाराचा पुल सुंदर आहे. खरंय.

इंद्रधनुष्यजी, लिंकबद्दल धन्यवाद.
आत्तांच नाही तर कारकिर्दीच्या शिखरावर असतानासुद्धा वीशी असाच नम्र, पारदर्शी व सालस होता. त्याची हुकमत व मक्तेदारी असलेली विशिष्ठ शैलीदार स्क्वेअर-कट दाखवली असती, तर बरं झालं असतं.

मला वाटतं या लिंकवरची कपिलची अ‍ॅक्शन त्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण पुल-शॉटची कल्पना देते -
http://im.rediff.com/cricket/2011/jul/21pic4.jpg
कपिल उजव्या यष्टीकडे न झुकतां नाकासमोरची माशी थप्पड मारून हांकलावी तसा हा शॉट मारत असे; हें तंत्र सदोष होतं कारण शॉट चुकलाच तर चेंडू सरळ नाकावरच आदळणार ! पण केवळ तीक्ष नजर व 'शार्प रिफ्लेक्लिस' यामुळेच कपिल हा शॉट बिनधास्त व अचूक खेळत असावा. म्हणूनच सर्वसाधारणपणे पुल-शॉटचा 'फॉलो-थ्रू ' फलंदाजाचं शरीर वळण्यात होतं तसं कपिलचं न होतां लिंकमधे दिसतं तसा तो एका पायावरच सरळ उभा दिसत असे.
[ तांत्रिक बाबींवर इतकं लिहीण्याचा मला अधिकार व माझा कलही नाही. पण कपिल हा माझा अत्यंत आवडीचा खेळाडू असल्याने, आम्ही त्याच्या अ‍ॅक्शन्सवर त्यावेळीं खूप चर्चा करत असूं; त्याचा हा दुष्परिणाम ! ]

विंडीज मधे म्हणे होल्डिंग च्या बोलिंग वर विश्वनाथ ला दोन थर्ड मॅन फिल्डर्स लावत आणि हा स्केवर कट मारून त्यातून फोर मारत असे Happy

भास्कराचार्य - शोधतो लिन्क नटराज ची. गावसकर ने ठेवलेले नाव Happy

अरे मीही हीच क्लिप देणार होतो, पण जसे फोटो त्याचे फेमस होते अगदी तसा डावा पाय हवेत वगैरे नाही, म्हणून दिली नाही. अजून दोन तीन इनिंग शोधल्या पण दिसला नाही तो शॉट.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानासुद्धा वीशी असाच नम्र, पारदर्शी व सालस होता.
>> ही गोष्ट बंगलोरच्या बहुतांश क्रिकेटपटूंना लागू होते

कारकिर्दीच्या शिखरावर असतानासुद्धा वीशी असाच नम्र, पारदर्शी व सालस होता.
>>
बेंगलोरचे च काय पण सगळेच सालस असत.अगदी दिल्लीचे ही. कारण तेव्हा पैसा फारसा नव्हता . त्यामुळे पैशामुळे आलेला माजही नव्हता ...एकनाथ सोलकर निवृत्त झाला तेव्हा कसोटीच्या प्रत्येक दिवसाचे ७५० रुपये मिळायचे आणि भत्ते. जाहिराती आणि स्पॉन्सरशिप नव्हतीच. टीव्ही नसे रंगीत तर नाहीच.मग कसले लोगो अन कसले काय.

अरे करंट्यांनो कधी नाही ते ऑस्ट्रेलियामधे २-० ने सिरिज जिंकली आनि तुमची एक पोस्ट नाही. कुठे फेडशीला पांग? हारत असताना शिव्या द्यायला कामधाम सोडून पळत येतात.
आणि जिंकल्यावर मात्र घर की डाल मुर्गी के बराबर ? ये नो चॉल्बे

कधी नाही ते ऑस्ट्रेलियामधे २-० ने सिरिज जिंकली
>>
दुसर्‍यांदा सिरिज जिंकतोय. कधी नाही ते नव्हे. २००८ ला एकदा जिंकली आहे. आप्लयाला बुमराह आवडला बुवा.... एकदम कॉन्फिडेन्ट. यॉर्कर मस्त आहे . मिनि मलिंगाच.

आज सामन्याचे फक्त 'हायलाइटस'च आत्तां बघूं शकलों. आपल्या संघाचं मनःपूर्वक अभिनंदन.
आपल्या फलंदाजीबद्दल शंका नव्हतीच. पण आज आपल्या गोलंदाजीने व क्षेत्ररक्षणाने प्रभावित झालो. धोनीने स्टंपिंग करताना आपले 'रेफ्लेक्सिस' अजूनही तितकेच 'शार्प' आहेत, हें दाखवलं; जडेजाने 'कॉट अँड बोल्ड'चं अप्रतिम प्रदर्शन करत आपली उपयुक्तता निर्विवाद असल्याचं जाहीर केलं; 'डायरेक्ट थ्रो'ने आपणही धांवचित करूं शकतो, हा दिलासाही मिळाला. एकंदरीतच आजचा दिवस खूप बरा गेला कारण सकाळीं आपला महिला संघही ऑसीज महिलाना हैराण करताना बघायला मिळाला [ पावसाने थांबवलेल्या त्या सामन्याचा निकाल मात्र कळला नाही ]. बुमराहने घेतलेली विकेट त्याच्याबद्दलच्या आशा अजून वाढवून गेल्या.

भाऊ, बर्याच दिवसात तुमच्याकडून व्यंगचित्र आलेलं नाहीये... सहज आठवण करतोय Happy

australia बरेच खेळाऊ फिरवत आहेत हे धरले तरी आपले खेळाडू कुठेही वीक लिंक न ठेवता सामने जिंकत आहेत हे बघून बरे वाटतय.

एकंदर ह्या सिरीजवरून धोनीला दोनापेक्षा अधिक स्पिनर्स (पार्ट टाईमही चालतील) कि मॅचवर नीट कंट्रोल ठेवता येतो नि T-20 सारख्या छोट्या कालावधीत मधे ते अधिक चांगल्या तर्‍हेने जमते असे वाटतेय. युवी नि पंड्याला बॅटींग मिळायला हवी. वरचे तिघे देमार धावा काढत असले तरी खालचे untested आहेत.

<< बर्याच दिवसात तुमच्याकडून व्यंगचित्र आलेलं नाहीये... सहज आठवण करतोय >> महिला संघाचं अभिनंदन व आपल्या आज्ञेनुसार हा प्रयत्न; घ्या गोड मानून -

vishI_0.jpg

<< australia बरेच खेळाऊ फिरवत आहेत >> टी-२० मधे अनुभवच निर्णायक ठरतो, अशी भावना जोर धरतेय असं वाटतं. आपणदेखील नेहरा, युवि इत्यादीना खास टी-२०साठी पाचारण केलंयच ना.

तख्त सलामत, ताज सलामत
धोनी तेरा, राज सलामत Happy

हे मी नाही बोलतेय, तर आजच्या बातम्यांची हेडलाईन आहे.

आजचा सामना बघता नाही आला, पण मजा आली अधून मधून स्कोअर चेक करताना..

या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिली जोडी फुटताच आपण हा सामना फिरवू शकतो असा मला विश्वास वाटलेला.. आणि तो सहजपणे सार्थ ठरवला याचे फारसे नवल वाटले नाही.

माझ्यामते आपण वर्ल्डकपसाठी सर्वात फेव्हरेट टीम आहोत.
स्पिनर आपल्याइथे धुमाकूळ घालणार, यॉर्कर्स मारणारे बॉलर भेटलेत, फलंदाज तर आपले कर्दनकाळ आहेत, नेत्रुत्वाला धार आलीय, संघात जिंकण्याची भूक दिसू लागलीय, सर्वांचे फॉर्म आणि फिटनेस उत्तम दिसत आहेत.. आता आपल्याला नकोय तो एखादा वाईट दिवस .. किंवा समोरच्या संघातील एखाद्याची सर्वोत्त्म कामगिरी..

नेहरा T20 स्पेशालिस्ट होऊ घातला आहे. ( किंवा झाला आहे ऑलरेडी) मागच्या वर्षी तो चेन्नई कडून एस बॉलर होता त्यामुळे चैन्नई मध्ये एकदा आला की परत भारतासाठी खेळाणार हे ओघाने आले. पण त्याचे कमबॅक T20 साठी चांगलेच आहे.

धोणी उगाच नं ४ अडवत आहे. युवीला संधीच मिळाली नाही तर तो काय खेळणार? एंकदरीत नं ४ वर धोणी क्लेम सांगत आहे.

धोणी उगाच नं ४ अडवत आहे. युवीला संधीच मिळाली नाही तर तो काय खेळणार? एंकदरीत नं ४ वर धोणी क्लेम सांगत आहे. >> त्याने आज असे सांगितले कि पंधरा ओव्हर्स बाकी असतील तर तो येणार. नाहितर बहुधा इतर कोणी असे मी ग्रुहित धरतो.

भाऊ, Aus अनुभवी खेळाडू (Lyon, Tait) हेच नाहित तर Big Bash मधे जे कोणी चांगले खेळून गेले आहेत त्या सगळ्यांना फिरवतेय. आजच्या सामन्यात मागच्यापेक्षा सहा जण वेगळे होते.

गेल्या IPL मधे नेहरा ने मि बघितलेल्या सुरूवातीच्या मॅचेस मधे तरी बर्‍यापैकी accurate गोलंदाजी केली होती. शेवटि शेवटि धोनी त्याच्यावर वैतागला होता असे पन अंधुकसे आठवते कुठल्या तरी सामन्यामधे त्याने अतिशय विचित्र बॉलिंग केल्यामूळे. तसेही शमी injured, भुवी directionless म्हटल्यावर शेवटच्या ओव्हर्ससाठी हुकुमी बॉलर्स उरलेत कोण ?

<< शेवटच्या ओव्हर्ससाठी हुकुमी बॉलर्स उरलेत कोण ? >> बुमराह - लेट स्विन्गर्स, यॉर्कर्स व चेन्ज ऑफ पेस ; शिवाय, ' समव्हाट अ‍ॅन अननोन अ‍ॅन्ड सर्प्रायझीन्ग एलीमेन्ट ' !!

Pages