क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताची बॅटींग बघितली. बघताना एक फील येत होता की acceleration लांबवतायत आणी ३२५+ ची शक्यता कमी कमी होतीये. ३० ओव्हर्स नंतर १४९/१, ४० ओव्हर्स नंतर २१६/१ आणी ५० ओव्हर्स नंतर ३०९/3, ह्यात १५-२० रन्स कमी पडले असं वाटलं. दुसरी एक जाणवलेली बाब म्हणजे sustained attack नाही करू शकले शर्मा आणी कोहली. एखाद्या ओव्हर मधे एखाद-दुसरी बाऊंड्री बसल्यावर परत डॅब्स, शफलिंग (स्लॉग ओव्हर्स मधे) मुळे momentum मिळत नव्हतं.

Anyway, well played Australia!

डीआरएस विषयी: बीसीसीआय चा डीआरएस ला विरोध जितका अनाकलनीय आहे तितकाच आयसीसी ची बीसीसीआय ला मनमानी करू देणं बिनडोकपणाचं आहे. उद्या बीसीसीआय ने 'आम्ही नाही ५० ओव्हर्स टाकणार, आमचा त्यावर विश्वास नाही. आम्ही फक्त ४० च ओव्हर्स बॉलिंग करणार' म्हटलं तर चालेल का? डीआरएस हा खेळाचा एक भाग आहे, तुमचा विश्वास नसला तर तुम्ही दाद मागू नका, पण समोरच्या टीम ला अडवणारे तुम्ही कोण अशी भुमिका घेऊन डीआरएस राबवयला हवं असं माझं मत आहे. ज्या आयसीसी स्पर्धांमधे डीआरएस असते, तिथे भारतीय संघ वापरतोच ना! हा शुद्ध दुटप्पीपणा आहे.

बदललेले नियम काय आहेत नक्की ? >>>>>
लास्ट १० ओवर्स मधे ५ फील्डर ३० यार्ड बाहेर ठेवू शकतो
१ ते १० ओवर्स- २ फील्डर ३० यार्ड बाहेर
११ ते ४० - ४ फील्डर ३० यार्ड बाहेर
१ ओवर मधे २ बाउंसर allowed

हरलो तर हरलो .. पण रोहीत शर्माची इनिंग बघायला मजा आली.. आज आपली बॅटींग बघून हाल्फ डे ने ऑफिसला गेलो ते वसूल झाले.. म्हणून मला रोहीत शर्मा आवडतो.. अमर अकबर एंथनीचा अमिताभ बच्चन.. एकीच मारा पर सॉल्लिड मारा.. त्याचा बचाव गावठी असला तरी फटके क्लास असतात, पण हरल्यामुळे हायलाईटस बघायला मजा येणार नाही ईतकेच ..

हा सामना जरी आपण सहज हरलो असे वाटत असले तरी आपण सर्वच आघाड्यांवर चारी मुंड्या चीत झालोय असे नाही. रन आपलेही बनलेत. पुढच्या सामन्याला नेमके उलटे चित्रही दिसू शकते.. मालिका रंगतदार होणार असे वाटतेय.

वाका अगदि 'वाका' नव्हते त्यामूळे आपली फास्ट बॉलिंग झाली एव्हढी effective झाली हे कौतुकास्पद आहे. मला वाटते ह्या हरण्याचा मुख्य दोष दोन्ही फिरकी गोलंदाजांकडे जातोय.

भारत- १००-१ [ २० षटकं] रोहित व कोहली ५०+ नाबाद. आतां रन-रेट वाढवायला सुरवात झालीय, हें उत्तम !!

ऑस्ट्रेलिया - २; आपली गोलंदाजी - o असं म्हणणं अधिक औचित्यपूर्ण होईल कारण चांगल्या. किंवा 'पाटा' म्हणा हवं तर, खेळपटट्ट्यांवर आपली फलंदाजी कितीही चांगली झाली तरीही गोलंदाजी इतकी निष्प्रभ असते कीं बर्‍यापैकीं फलंदाजी असलेला विरुद्ध संघ कोणतीही धांवसंख्या विश्वासपूर्वक पार करूं शकतो. द. आफ्रिकेने आत्तांच्या दौर्‍यातही मर्यादित षटकांच्या सर्व सामन्यांत हेंच दाखवून दिलंय व ऑसीज तेच करताहेत .

धोनी ० बरोबर नाही वाटत
जर एकही बॉलर परफॉर्म करत नसेल तर कप्तान काय करेल आपली गोलंदाजी - o >>>>>++१

कालच्या मॅच मधे आपण लवकर acceleration सुरु केलं हा बदल सुखावह होता. रोहित, कोहली आणी रहाणे मस्त खेळले (रहाणे चा खेळ बघत रहावा असा असतो, एकदम क्लासी!). धोनी is nearing end of his prowess. he is unable to play those big shots in slog overs and his timing is patchy. पण बॉलिंग ला मात्र जबरदस्त makeover ची गरज आहे. If Ashwin (out of subcontinent), Jadeja are the best bowlers we have, then our definition of best needs to be looked at.

टॉस जिंकून ऑसीजनी भारताला प्रथम फलंदाजी दिलीय.
भारत- ४५व्या षटकात २४४-३ [ कोहली १०९ नाबाद, रहाणे -५० बाद]
इजा-बिजा तिजा , नको रे बाप्पा !

चला फायनली चुकांमधून काहीतरी शिकलो..
अखेर आज आपण गेम प्लान चेंज केला..
शर्माच्या जागी कोहलीला सेंचुरी मारायला सांगितली Happy

पण काही म्हणा, कोहली आणि रहाणेला पुढे येत मारावे लागते तेच शर्माची फटकेबाजी एफर्टलेस आणि खडे खडे असते, बघायला जास्त मजा येते.

गेली सिरीज... ३ - ०... तिन्ही मॅचेस मध्ये भारतीय प्लेयर्सची शतके वाया... वाया म्हणजे पार वाया... पहिल्या मॅचचा एक्शन रिप्ले पुढच्या दोन्ही मॅचेस..

'यॉर्कर' चेंडू नियमबाह्य आहे असं आपल्या गोलंदाजाना वाटतं कीं काय ? मॅक्सवेल जणूं 'शॉर्ट पीच' चेंडूना घाबरतो असा त्याच्यावर मारा करतात व तो आरामात ४-६ धांव काढतो त्या चेंडूंवर !! खरंच नाहीं कळत मला आपली 'बोलींग स्ट्रॅटीजी' !! Sad

आता नेमके आजच्या मॅचला आश्विन हवा होता असे उगाचच वाटत राहणार..
तसेही पुढची मॅच बहुधा सिडनीला आहे तर तो दिसेलच..

वा! आज भारताला ४०० ते ४५० धावांचा किरकोळ पाठलाग करावा लागणार असे दिसतेय!!

अत्यंत अचूक अश्या आपल्या गोलंदाजी समोर केवळ बिनबाद ११२ धावा झाल्यात तब्ब्ल १७ षटकात!!!

त्याच त्या प्रकाराने जिंकण्याचा ऑसीजनाही कंटाळा आला असावा, म्हणून आज टॉस जिंकूनही पहिली बॅटींग घेतली आहे!

जिंकण्यासाठी किती धावा काढाव्या लगतात हे ऑसीज आज आपल्याला शिकविणार . नाहीतर ३०० काढल्या म्हणजे आभाळाला हात टेकले असे आपल्या लोकाना वातते.

वा!! सुरेख गोलंदाजी! तब्बल ६० ते १०० धावा कमी दिल्यात!
अवघ्या ३४८ मध्ये रोखले!!

इशांत ने शेवटच्या षटकात फक्त १८ धावा दिल्यात! ग्रेट बॉलिंग फिल्डींग!

इशांत ने शेवटच्या षटकात फक्त १८ धावा दिल्यात! ग्रेट बॉलिंग फिल्डींग! <<< त्यानं शेवटच्या बॉलला विकेट काढली ही दणदणीत कामगिरी विसरू नका.

Pages