क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यानं शेवटच्या बॉलला विकेट काढली ही दणदणीत कामगिरी विसरू नका.>>>

तर तर किती महत्वाचे! ३५० करण्यापासून रोखले त्याने!!

शर्मा खूप घटिया पद्धतीने बाद झाला.. दुर्दैव आपले.. अन्यथा आज त्याने चिरडला असता.. आज ठरवून आलेत आपले फलंदाज.. रहाणेला लागलेय हे आणखी एक दुर्दैव.. कोहली धवन दोघांच्या सेंचुर्या लागायला हव्यात.. शक्य वाटतोय आजचा सामना !

धवन-कोहली जोडीवर सारा खेळ आहे .. ही जोडी नाही फुटली तर सामना वेगाने ऑस्ट्रेलियापासून दूर जाणार.. विकेट पडली तर सामना अचानक अडचणीत येईल.. खेळत राहिले तर ४५ व्या ओवरलाही संपवतील !

Sad Sad Sad

विकेट पडली तर सामना अचानक अडचणीत येईल.. खेळत राहिले तर ४५ व्या ओवरलाही संपवतील !
>>>>>>

४५ व्या ओवरला संपवतील असे वाटतानाच विकेट पडली .. आणि.... अडचणीत म्हणजे कायच्या कायच अडचणीत.. अशक्य आहेत.. जडेजा समोर असताना कसेही बॅट का फिरवत आहेत हे बॉलर.. आपल्या तळाच्या फलंदाजांचा काहीच गेमप्लान कधीच कसा नसतो .. अशक्य आहेत.

३०९ - ७ !
गेल्या दोन व आजच्या सामन्यात खेळपट्ट्या फलंदाजांच्या सोईच्याच आहेत व दोन्ही संघांचे फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत. दोन्ही संघांचे गोलंदाज खास प्रभाव पाडूं शकत नसले तरीही महत्वाचा फरक जाणवतो तो हाच कीं ऑसी गोलंदाज चिकाटीने शिस्तबद्ध व योजनाबद्ध गोलंदाजी करताहेत तर आपली गोलंदाजी याबाबतींत अगदींच ढिसाळ वाटते. इतकी अप्रतिम, आक्रमक फलंदाजी करुनही अशा पीचवर आपल्यासाठी लक्ष्य गाठणं इतकं कठीण करण्याचं श्रेय म्हणूनच ऑसी गोलंदाजानाच जातं !

भाऊ काका +१
धवन-कोहली असताना आरामात जिंकू वाटणारी मॅच गेली!
रहाणे ला आता फक्त ८-१० व्या स्थानावर खेळवायचंच बाकी राहिलंय Happy

मानला ऑस्ट्रेलिया आणि स्मिथला.. कुठेही खांदे न पाडता खेचली मॅच.

जेव्हा कोहली धवननी शतके मारून रनरेट ६ च्या आत आणलेला तेव्हा त्याने विकेट काढायला ६ प्लेअर आत ठेवलेले.. आणि धवन सापडलाच.. पुढे धोनीला स्लिप लावत ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलिंग करणे, रहाणेच्या दुखापतीचा फायदा उचलत त्याला स्लिपमध्ये घेणे वगैरे अगदी पद्धतशीर लाईन लावली भारताची.

साला आधीचे तीन सामने सलग हरताना कोणाला एवढे वाईट वाटले नसेल जेवढे आज..

<< मानला ऑस्ट्रेलिया आणि स्मिथला.>> +१
<<...तेव्हा त्याने विकेट काढायला ६ प्लेअर आत ठेवलेले.. आणि धवन सापडलाच.. पुढे धोनीला स्लिप लाटरॅप ' लावून....>> कोहलीलाही शतकापासून रोखण्यासाठी स्मिथने त्याच्या ९० झाल्यावर 'ऑफ-साईड ट्रॅप' लावून ऑफ स्टंपबाहेर मारा ठेवला [ व गोलंदाजानीही त्याला अचूक साथ दिली, हें महत्वाचं].. तो सापळा भेदूनही कोहलीने कांही अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारले, हेंही कौतुकास्पद !!

कोहलीलाही शतकापासून रोखण्यासाठी स्मिथने त्याच्या ९० झाल्यावर 'ऑफ-साईड ट्रॅप' लावून ऑफ स्टंपबाहेर मारा ठेवला
>>>
हो, आणि कोहलीच्या पुर्ण इनिंगमध्ये तेव्हाच तो बाद होईल अशी शक्यता निर्माण झालेली.
पण मला त्या स्थितीत धवनच आधी जाण्याचे जास्त चान्सेस वाटत होते, बरेचदा तो संघविजयापेक्षा स्वताची जागा फिक्स करण्याच्या विवंचनेत खेळताना दिसतो.

Pages