क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज झिम्बाब्वे वि. वे.इंडीज सामन्याचा शेवट वे. इंडिजने कोणत्याही क्रिकेटींग देशाला शोभणार नाही अशा पद्धतिने केला. झिम्बावेला जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमधे ३ धांवा हव्या होत्या व त्यांचे ९ बळी गेले होते. शेवटच्या ओव्हरच्याच पहिल्याच चेंडूला गोलंदाजाने 'नॉन-स्ट्रायकर' फलंदाजाला तो 'स्टार्ट' घ्यायला किंचितसा क्रीजच्या पुढे होता [ क्रीजच्या रेषेवरच ] म्हणून अचानक चेंडू न टाकताच 'बेल्स' उडवून बाद केलं !! खिलाडूवृत्तीचा बळी देवून नियमांचा गैरफायदा घेण्याची ही दु:खद घटना !! Sad

खिलाडूवृत्तीचा बळी देवून नियमांचा गैरफायदा घेण्याची ही दु:खद घटना >> +१
मॅच पाहिली नाही. तुमची पोस्ट पाहून cricinfo वर कॉमेन्ट्री वाचली.
Mankading चा नियमच नीटसा माहित नव्हता. शोधल्यावर खालच्या लिंक वर चांगली माहिती मिळाली
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/604156.html

आधी बॅट्समन ला वॉर्निंग दिली असती आणि मग या पद्धतीने आउट केलं असतं तर 'कदाचित' हे कृत्य क्षम्य वाटलं असतं. असो... नियम बदलायची वेळ आली आहे Sad

भाऊ थोडा वेगळे मत मांडतो ....
बॉलर ने बॉल टाकायच्या आधी रनरने क्रीजमधून बाहेर निघऊन हेड स्टार्ट घेणे हे जर नियमबाह्य नि अनफेयर नसेल तर मंकड गिरी करणे खिलाडूव्रुत्तीच्या विरुद्ध का ठरावे ? क्रिकेट आधीच बॅट्समन च्या द्रुष्टीने बायस्ड आहे त्यात खिलाडूव्रुत्तीचा बोजा फक्त बॉलर च्या माथी का ? जेंव्हा रनर बॉल टाकायच्या आधी निघतो तेंव्हा त्याने जाणून बुजून घेतलेली ती रिस्क आहे. मंकड बनवणे हे अजिबात नवीन राहिले नाही अशा वेळी झिंब्बव्वे च्या खेळाडूने गाफील राहणे त्यांच्यावर बेतले असेही म्हणता येईल.

<< भाऊ विजेती टीम पुढच्या फेरीत जाणार होती... त्यामुळेच असले काही घडले असेल..>> खिलाडूवृत्तीची खरी परिक्षा तर अशा वेळीच होते ना !!
<< रनरने क्रीजमधून बाहेर निघऊन हेड स्टार्ट घेणे हे जर नियमबाह्य नि अनफेयर नसेल तर मंकड गिरी करणे खिलाडूव्रुत्तीच्या विरुद्ध का ठरावे ? >> << नियम बदलायची वेळ आली आहे>> नियम फलंदाजानी 'अनड्यू अ‍ॅडवांटेज' घेवूं नये म्हणूनच आहे. ९९% 'नॉन- स्ट्रायकर्स' गोलंदाज चेंडू टाकण्याच्या शेवटच्या पवित्र्यात असताना बॅट उचलतच असावेत व त्यांत कांहींच गैर नाही. शेवटचे एक-दोन चेंडू आहेत. एक-दोनच धांवा हव्या आहेत व ' नॉन-स्ट्रायकर' फलंदाज जर गोलंदाज चेंडू टाकण्याच्या पवित्र्यात येण्याआधींच पुढे जात असेल, तरच व फक्त तरच त्याला सावध न करतां असं बाद करणं कांहींसं समर्थनीय आहे, असं मला वाटतं.

हे रनर च्या पॅटर्न वर केले जाते सहसा. तो खूप आधीच निघतोय असे दिसले तर वॉर्निंग देतात. कपिल ने बहुधा तसेच केले होते.

क्रिकेट मधे अनेकदा नियमावर काटेकोर पणे बोट न ठेवता प्रतिस्पर्ध्याला फेअर चान्स दिला जातो. निदान तसा दिला जात असे. रन घेताना बॅट्स्मन फिल्डर ला धडकला व घसरला/पडला तर रन आउट न करणे हे त्यातलेच (त्यामुळेच त्या १९९९ च्या कलकत्ता टेस्ट मधे शोएब ने तसे न केल्याने पब्लिक चिडले होते).

मला तरी मंकड पद्धतीनं बाद करण्यात गैर वगैरे काहीही वाटत नाही. तो नियम आहे आणी तो पाळून बाद करणं ह्यात काही गैर नाही. मध्यंतरी आयसीसी ने सुद्धा नॉन-स्ट्राईकर ने असं बॅक-अप करण्याविषयी टिप्पणी केली होती.

ह्यात दोन मुद्दे आहेत; एक वॉर्निंग चा आणी दुसरा खिलाडूवृत्तीचा.

वॉर्निंगः मंकड सोडून कुठल्या पद्धतीत वॉर्निंग देऊन बाद करणं अपेक्षित आहे? आणि जर कुठल्याच नसेल, तर ह्याच का? (कारण मंकड ने ब्रॅडमन ला असं आऊट केलं होतं म्हणून?)

खिलाडूवृत्ती: स्लेजिंग करणं, बॅट ची किनार घेऊन गेलेला बॉल विकेटकीपर ने झेललेला असताना स्वतःहून क्रीझ न सोडणं, स्विच हीट, डबल वूडेड बॅट्स हे सगळं जर 'स्पिरीट ऑफ द गेम' असेल, तर मंकड अखिलाडू आहे असं म्हणणं मला तरी दांभिकपणाचं वाटतं. एकानं गाय मारली म्हणून दुसर्यानं वासरू मारू नये असं जरी असलं , तरी क्रिकेट बॅट्समन च्या बाजुनं झुकलेला खेळ आहे, की ह्यात बॉलर ची सगळ्याच बाजूनं नाकाबंदी करणं हे जास्त अखिलाडू वाटतं.

हो पण रुल मधे आधी एकवेळेस वॉर्निंग देणे आवश्यक आहे. या पंचाच्या निर्देशनास आंणून देणे.>> एक मिनीट तुमचा काहितरी गैर समज असावा, वॉर्निंग देणे हा कुठेही नियमाचा भाग नाही. ते ज्या त्या खेळाडूवर अवलंबून आहे. खर तर ICC ने हा नियम नुकताच बदलून पूर्ण ग्राह्य केला आहे. इथे बघा
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/604156.html

फेअर चान्स >> मला वाटते ज्या क्षणी पीटरसन ने आपला स्टान्स बदलून स्विच हिट मारला त्याबरोबर सगळा फेअर चान्स चा मुद्दा निकालात निघालाय Wink

गोलंदाज चेंडू टाकण्याच्या पवित्र्यात येण्याआधींच पुढे जात असेल, तरच व फक्त तरच त्याला सावध न करतां असं बाद करणं कांहींसं समर्थनीय आहे, असं मला वाटतं. >> भाऊ पण मग गोलंदाज चेंडू टाकण्याच्या पवित्र्यात असताना रनर ने गुपचूप पुढे सरकणे तेव्हढेच निंदनीय ठरेल. बॉलरचे लक्ष पूर्णपणे बॅट्समन वर असताना रनरने घेतलेला undue advantage म्हटला पाहिजे. केवळ ह्याच कारणामूळे फिल्डरने आपली जागा बॉलर delivery stride च्या आसपास आल्यावर बदलू शकत नाही ना ?

आजच्या सामन्यात फलंदाजाने स्टार्ट घेण्यासाठी बॅट फक्त किंचित उचलली होती, कोणताही 'अनड्यू अ‍ॅडव्हांटेज' घेतला नव्हता; गोलंदाजानेच नियमाचा अतिशय 'अनड्यू अ‍ॅडव्हांटेज' घेतला, हें माझं ठाम मत. अर्थात, इतरांचा दृष्टीकोन वेगळा असूं शकतो

मी सामना बघितला नाही पण क्रिकैंफो वरचे description असे आहे

Here's what really happened: Kemo Paul, the bowler, did not enter his delivery stride, but was aware of the Mankad rule and broke the stumps down. The non-striker wasn't trying to gain an advantage by taking a head start. The bat was on the line as the bails came off. Both umpires converged, decided to refer it upstairs after they asked Hetmyer, the West Indies captain, if he wanted to uphold the appeal. According to the rules, he was out. What a dramatic end to the contest. How many of us saw this coming?

तसे असेल तर हे अधिक brilliant आहे. जर रनरला undue advantage घ्यायचा नसेल तर मग he should have been aware of surroundings. It seems that he was not and WI was smart enough to take advantage of the rule. Is it disgraceful ? well that will differ from person to person I guess.

<< ".... Both umpires converged, decided to refer it upstairs after they asked Hetmyer, the West Indies captain, if he wanted to uphold the appeal. ">> अंपायर्सनी वे.इंडीजच्या कर्णधाराला असं मुद्दाम विचारणं, यांतच नियमाच्या योग्य वापराबद्दलची त्यांच्या मनातील शंकाच दाटलेली होती, असं नाहीं वाटत ?

यांतच नियमाच्या योग्य वापराबद्दलची त्यांच्या मनातील शंकाच दाटलेली होती, असं नाहीं वाटत ? >> असेलही पण नियमांचे interpretation and implementation हे त्यांचे काम आहे. त्यांना त्याबद्दल शंका असेल तर त्याबद्दल ते निर्णय घेऊ शकतात. अगदी योग्य नियम असतानाही किती वेळा अंपायर्स कप्तानाला विचारतातच कि. ICC ने हा नियम २०११ मधे नीट स्पष्ट केल्यावरही अंपायर्स त्याबद्दल शंका घेतल्या आहेतच. वानगीदाखल खालची दोन उदाहरणे बघा.

But umpires have undermined the regulation by victimising bowlers who are only trying to stop batsmen sneaking an advantage. Consider these two recent examples.

Last February in an ODI at the SCG, Lahiru Thirimanne continually left his crease far too early. R Ashwin warned Thirimanne and when the batsman kept doing it, Ashwin ran him out. Instead of raising his finger, the umpire, Paul Reiffel, consulted his square-leg colleague and asked India's captain, Virender Sehwag, if he wanted to go through with the appeal.

In doing so, Reiffel implicitly suggested Ashwin's act of removing the bail was underhanded. It told the crowd India were borderline cheats, made Thirimanne think his behaviour was okay, and placed undue pressure on Sehwag, who ended up withdrawing a legitimate appeal. Thirimanne batted on, continued to back up unfairly, scored 62 and set up a Sri Lankan victory.

Later in 2012, Surrey's Murali Kartik mankaded Somerset's Alex Barrow during a County Championship match. Like Ashwin, Kartik had warned the batsman, though he wasn't compelled to do so. Still, the umpire, Peter Hartley, wasn't happy. He asked the fielding captain, Gareth Batty, three times if he would withdraw the appeal. Rightly, Batty refused, and later Surrey were booed off the field.

Reiffel and Hartley should simply have raised a finger, as they would for any other run-out, but instead they added to the ill-feeling by suggesting the bowler was in the wrong. The ICC's playing condition 42.11 explicitly states that a mankad is fair. An additional clause should be added to state that an umpire must not consult the fielding captain before making his decision, unless the conversation is instigated by the captain.

The non-striker wasn't trying to gain an advantage by taking a head start. The bat was on the line as the bails came off. >> यावरून मी भाऊंशी सहमत आहे.

बाकी वरती अखिलाडूवृत्तीची उदाहरणे दिलेली आहेत तसे वेगवेगळे प्रकार क्रिकेटमधे कायमच होत आले आहेत. पण त्याचबरोबर अशा सहसा नियम एन्फोर्स न केल्याची उदाहरणे ही आहेत. त्यामुळे एका पीटरसन ने स्विच हिट मारली म्हणून क्रिकेट मधला फेअर प्ले संपला असे होत नाही. मुळात स्विच हिट म्हणजे अखिलाडूपणा आहे असे मला वाटत नाही. फलंदाजही त्यात रिस्क घेत असतो. आणि बोलर ला एकदा तो असे करतोय असे कळू लागले की त्याप्रमाणे बोलिंग ही तो करू शकतो. याउलट फील्ड पोझिशन पाहून खेळणार्‍या बॅट्समनच्या नकळत स्लीप चा फील्डर लेग स्लीप वर गेला व तेथे कॅच देउन बॅट्समन आउट झाला, तर तो मला अखिलाडूपणा वाटतो.

येथे मी या नियमांकडे ऑब्जेक्टिव्हली न बघता क्रिकेटमधे प्रचलित परंपरा या दृष्टीकोनातून पाहात आहे. यातून जे नियम तयार झालेले आहे ते सर्वांना मैदानावर जाताना माहीत असतात. रनर ने बोलर क्रीज जवळ आला व बोलिंग अ‍ॅक्शन मधे आला की चालायला सुरूवात करायची हा संकेत आहे. तो त्याआधीच चालू लागला तर वॉर्निंग देउन मग आउट करणे बरोबर आहे (त्यामुळे मंकड, कपिल ने केले ते चूक नव्हते). पण हे इतके अचूकपणे बघितले जात नाही. कोण गैरफायदा घेतोय हे मैदानावर असलेल्यांना बरोबर कळते. अंपायरलाही कळतेच.

स्पेसिफिक उदाहरणांबद्दलः स्विच हिट, स्लेजिंग, रनर ची जेन्युइन स्टार्ट हे मला अखिलाडू वाटत नाही.

फिल्डर ला धडकून बॅट्समन पडल्यावर रन आउट होणे (सचिन - कलकत्ता वि पाक १९९९),
बॅट्समन चे शतक होउ नये म्हणून बोलर ने मुद्दाम नो बॉल टाकणे (रणदिव - सेहवाग २०१०),
बॅट्समन खरोखरच स्वतःला वाचवण्याकरता बॅट मधे घालतोय का हे नक्की नसले तरी अपील करणे (भारत वि इंझमाम - २००६)

यातली पहिली दोन अखिलाडूवृत्तीची आहेत, तर इंझी च्या विरूद्धची बॉर्डर केस आहे. विशेषतः इंझी जर म्हंटला की मी क्रीज मधे नाही हेच मला माहीत नव्हते, तर त्याची रन आउट बद्दलची ख्याती पाहता ते खरे असू शकेल Happy

आणि आपण आउट आहोत हे माहीत असूनही अंपायरने दिले नाही तर न जाणे म्हणजे अखिलाडूपणा असे मी समजत होतो. पण गावसकर ने (जो स्वतः 'वॉक' साठी फेमस होता) जे स्पष्टीकरण दिले तेही पटण्यासारखे आहे. अनेकदा बॅट्समन आउट नसताना अंपायरच्या चुकीने आउट दिले जातात. ते बॅट्समन च्या कंट्रोल मधे नसते. त्यामुळे हा निर्णय स्वतः घेण्यापेक्षा अंपायरलाच ठरवू द्यावे कायमच. २००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे सचिन ला इतक्या वेळा चुकीचा आउट दिला होता त्यावरून तरी ते पटते.

मीसुद्धा नेहमी असामीचा युक्तिवाद करत असलो तरी आत्ता भाऊंच्या बाजूने आहे. विशेषतः मी व्हिडीओ पाहिला आहे आणि त्याची बॅट अगदी लाईनवर होती. ड्युरिंग प्ले असे काही झाले तर ऑब्व्हियसली आउट असेलच, पण बीफोर प्ले त्याची बॅट इरादा नसताना दोन इंच इकडची तिकडे झाली तर त्यात त्याची विकेट जाऊ नये असेच मला वाटते. त्या बोलरने इन द हीट ऑफ द प्ले आउट करण्यातही काही वावगे नाही, परंतु स्पेशली रीप्लेजच्या जमान्यात जेव्हा अंपायर व कॅप्टन ते नंतर बघतात, तेव्हा शांतपणे निर्णय घेणे जास्त चांगले आहे असे मला वाटते. थिरीमानेच्या केसमध्ये सेहवागने अपील मागे घेतल्यावरही मी चिडलो होतो, पण ती केस खरेच वेगळी होती.

फा, त्या ०३-०४ च्या वेळेस अतिशय फ्र्स्ट्रु झाला होता राव! लोक म्हणतात की तो सलग ५-६ इनिंग्ज अपयशी ठरत होता आणि मग त्याने कव्हर ड्राईव्ह न मारता द्विशतक ठोकले वगैरे, पण त्यातले किती चुकीचे आउट होते ह्याविषयी कोणी बोलत नाही!

<< Ignorance of the law, is not a proof of innocence.>> There is no question here of ' ignorance of Law' and that is also NOT the point of discussion here. अखिलाडू वॄत्तीने नियमाचा गैरफायदा घेण्यात आला का, केवळ हाच इथं मुद्दा आहे. विशेषतः कालच्या सामन्याच्या संदर्भात, माझ्या मतें याचं उत्तर होकारार्थीच आहे व त्याची कारणं मीं दिलीं आहेत. वरच्या किंवा आजच्या वर्तमानपत्रांतील चर्चेमुळें तें उत्तर बदलावसं मला वाटत नाहीं, हेंही प्रांजळपणे कबूल करतो.

"Chasing 300+ vs Indian bowling and chasing 300+ vs New Zealand bowling, big difference!!" क्रिकैन्फो>>>>

ह्याचे श्रेय खरे तर भारतिय गोलंदाजाना द्यायला हवे न्युझिलंडने!

कशीही वन डे सिरिज मध्ये बॅट फिरवायची सवय लावली ऑस्ट्रेलियन फलंदाजांना! Wink

Vipin: "Chasing 300+ vs Indian bowling and chasing 300+ vs New Zealand bowling, big difference!!" क्रिकैन्फो >> स्कोअर पाहिला नाही पण बोल्ट वगैरे जोरात होते का? तो बोल्ट जबरी आवडतो मला. वर्ल्ड कप च्या वेळेस त्याचे बनाना स्विंग खत्रा असत.

भास्कराचार्य - सहमत.

त्या वरच्या ऑसी-भारत-न्यूझीलंड लॉजिक प्रमाणेच पॉण्टिंग किंवा हेडन ची भारताविरूद्धची सेन्च्युरी व सचिन, लक्ष्मण वगैरेंची ऑस्ट्रेलियाविरूद्धची यात "गुणात्मक" फरक आहे :). ८०ज मधे रिचर्ड्स ची भारताविरूद्धची व गावसकरची विंडीज विरूद्धची - तसेच :). प्रवाहाच्या दिशेने पोहणे व प्रवाहाविरूद्ध, इतका फरक Happy

"Chasing 300+ vs Indian bowling and chasing 300+ vs New Zealand bowling, big difference!!" >>

म्हणजे भारतीय बॅट्समन जगाच्या कुठल्याही देशाविरुध्द कुठल्याही ठिकाणी ३००+ करु शकतात मग ते दुसरा डाव असो या पहिला. Wink

तुम्ही आमच्या कमकुमवत बॉलिंग विरुध्द करतात आम्ही तुमच्या बलाढ्य बॉलिंग विरुध्द करतो

तो सामना ऑकलंड मधे आहे. हाच ऑस्ट्रेलिया मधे असता तर फरक पडू शकतो. हे पण लक्षात घ्या. किवीज ची बॉलिंग जेव्हढी न्यूझीलंड मधे धारदार असते तेव्हढी तिथून बाहेर पडली कि राहात नाही हे नेहमीचेच आहे.

येथे मी या नियमांकडे ऑब्जेक्टिव्हली न बघता क्रिकेटमधे प्रचलित परंपरा या दृष्टीकोनातून पाहात आहे. यातून जे नियम तयार झालेले आहे ते सर्वांना मैदानावर जाताना माहीत असतात. रनर ने बोलर क्रीज जवळ आला व बोलिंग अ‍ॅक्शन मधे आला की चालायला सुरूवात करायची हा संकेत आहे. >> फा नियम नि संकेत ह्यात गुणात्मक फरक आहे. नियम हे सर्वांना सारखेच बंधनकारक असतात (परिस्थितीशिवाय) ह्याउलट संकेत प्रासंगिक असतात, संकेत देशानुरुप बदलू शकतात. मुद्दा अतिशय साधा आहे, कि 'नियम काय आहे ? ' ह्याची दोन्ही बाजूंना नि सामन्यावर देखरेख करणार्‍यांना पूर्ण कल्पना आहे. शिवाय नियम नुकताच बदलून अतिशय सुस्पष्ट केला आहे. केलेली क्रुती कुठेही नियमबाह्य नाही. त्यामूळे जर नियमबाह्य नसेल तर अखिलाडूपणाचा प्रश्नच येत नाही. परत अखिलाडूपणाचा मापदंड वैयक्तिक आहे. स्लेजिंग आपल्याला अखिलाडू वाटते तर तेच एखादा ईअन चॅपेल not a big deal म्हणतो.

पीटरस नच्या स्विच हिट चे उदाहरण ह्यासाठीच दिले होते कि बॅट्मनच्या स्टान्स नुसार बॉलिंग स्टॅट्रेजी नि त्यानुसार फिल्डींग ठरवली जाते. मग बॉल टाकताना स्टान्स बदलला तर डेड बॉल हवा. बोलरलाही फैर चान्स मिळायला हवा. पण परत स्विच हीट लीगल झाल्यावर ह्या गोष्टींना अर्थ उरत नाही. तो शॉट हि रिस्क आहे हे मान्य आहे नि त्याच प्रमाणे स्वतःच्या surrounding कडे लक्ष नसणे हेहि तेव्हढेच रिस्की आहे. That can not be the defense. असो आय गेस वी कॅन अ‍ॅग्री टू डिसॅग्री ऑन धिस.

राईटहँडी बॅट्समन बॉल टाकल्यावर लेफ्टी बॅट्समन सारखा उभे राहून चेंडु खेळण्याच्या पध्दतीला स्विच हिट म्हणतात

ह्यावरून एक जनरल सुचले ते असे,
खेळाडू धावताना क्रिजकडे उडी घेतो. त्याची बॅट क्रीजच्या पुढे जाते, जमिनीवर आपटते नि परत हवेत उडते नि नेमके त्यावेळी स्टंप उडवले तर तो बाद धरला जातो कि नाही ? बहुधा धरला जातो. पण बॅट्स्मन ने जर स्टंपकडे येणार्‍या बॉलपासून स्वतःला वाचवण्यासाठी हलताना बॅट उचलली तर बाद धरले जात नाही. In short क्रिकेट मधे क्रिज हे प्लेन धरतात कि फक्त जमिनीवर धरतात ? बहुधा फक्त जमिनीवर असावे कारण मला एखाद दोन स्टंपीम्ग आठवतात जिथे पाय क्रीजच्या पाठी पण हवेत होता.

त्याने काय फरक पडतो? मूळ कल्पना अशीच आहे ना की बोलरने बॉल टाकून यष्ट्या ध्वस्त कराव्यात आणि फलंदाजाने बॅटच्याच साह्याने त्या यष्ट्यांचा बचाव करावा.बॉल स्टंप्सवर जाताना फक्त बॅटनेच अडवावे व तो अडवताना त्याला दूर फेकून धावा जमा कराव्यात. आणि त्याने क्रीजच्या लिमिटमध्ये असावे.मग काय फरक पडतो डावखोरा उभा राहिला काय अन उजखोरा राहिला काय? म्हणजे प्रिन्सिपली अडचण काय आहे?

Pages