Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
३७ व्या ओव्हर नंतर आपल्याला
३७ व्या ओव्हर नंतर आपल्याला ९ विकेट्स हातात असताना सहाच्या खालच्या रेटने उरलेलीस्मॅच खेळायची होती ती जमली नाही इथे सगळा सामना संपला.
१३ ओव्हर्स, ७२ रन्स आणी ९
१३ ओव्हर्स, ७२ रन्स आणी ९ विकेट्स हातात असताना आपण मॅच हारलो हे अविश्वसनीय आहे. ऑस्ट्रेलिया च्या लढाऊ बाण्याला क्रेडिट देऊनसुद्धा हे पटू शकत नाही. आपलं डोमेस्टीक क्रिकेट चं infrastructure किती कच्चं आहे हे जाणवतं. मान, धवन, जडेजा हे सगळे डोमेस्टीक मधले रथी महारथी आहेत जे आंतरराष्ट्रीय पातळीवर ६ च्या रनरेट ने देखील खेळू शकत नाहीत. आयपीएल ने ह्या लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंबरोबर खेळायची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. मला सेहवाग, युवराज, झहीर, ह्यांचे सुरूवातीचे दिवस आठवतात. खुप लवकर ईंपॅक्ट केला होता ह्या लोकांनी. अगदी थोड्या काळासाठी आलेले मोहंती, सुरुवातीच्या काळातला आगरकर हे सुद्धा ईतके निस्तेज वाटले नव्हते. आजचे खेळाडू नशिबवान आहेत कारण ह्या लोकांना भरपूर संधी मिळताहेत, पण नविन खेळाडूंचा जो X factor असतो, तो मात्र दिसत नाहीये.
जाता जाता एक काडी: Dhoni the finisher, is either finished or on his way to do so. टीम डेव्हलप न करण्याचं पुण्य पदरात घेऊन तो ज्या दिवशी जाईल, तो सुदिन.
दादा / द्रविडची टीम बिल्डिंग
दादा / द्रविडची टीम बिल्डिंग लिगसी धोणी चालू ठेवू शकला नाही. हेच अंतिम सत्य आहे. धोनी काही प्लेअरला फेवर करतो हे तो स्वतःही मान्य करतो. त्यामुळे इथे कोणी, काही लिहिले तरी, "टीम डेव्हलप न करण्याचं पुण्य" ला माझं अनुमोदन आहे.
त्यामुळे इथे कोणी, काही
त्यामुळे इथे कोणी, काही लिहिले तरी, "टीम डेव्हलप न करण्याचं पुण्य" ला माझं अनुमोदन आहे. >> 'इथे' नाही 'तिथे' लिहि जा हे
मान, धवन, जडेजा हे सगळे डोमेस्टीक मधले रथी महारथी आहेत जे आंतरराष्ट्रीय पातळीवर ६ च्या रनरेट ने देखील खेळू शकत नाहीत. >> धोनीच्या आजच्या मुलाखतीमधे त्याने हे त्यांच्या अननुभवावर ढकलले आहे.
"धोनीच्या आजच्या मुलाखतीमधे
"धोनीच्या आजच्या मुलाखतीमधे त्याने हे त्यांच्या अननुभवावर ढकलले आहे" - जर हे सगळे (जडेजा सुद्धा?) अननुभवी आहेत आणी रहाणे जायबंदी आहे हे माहीत होतं, तर धोनी चा चौथ्या क्रमांकावर बॅटींग ला यायचा निर्णय अनाकलनीय आहे. एक तर त्याला ४५-४६ व्या ओव्हर ला बॅटींगला येऊन मॅच संपवण्याचा कॉन्फिडंस नव्हता किंवा ऑलमोस्ट जिंकलेली मॅच जिंकुन देऊन हीरो बनायचं होतं.
त्याने कप्तान म्हणून अधिक
त्याने कप्तान म्हणून अधिक जबाबदारी घेण्याच्या द्रुष्टीने वर यायचे ठरवले (असे तो म्हणालाय). अनुभव वगैरे बाजूला ठेवा, पण धवन बाद झाल्यावर आत येणार्यांना तुम्ही फक्त बॉल तटवा नि जाडेजाला strike द्या असे सांगितले नसेल का ?
काल नंतर आलेल्या सगळ्या
काल नंतर आलेल्या सगळ्या बॅट्समननी फक्त हाराकिरी केली..... दिसेल तो बॉल फक्त टोलवायचा प्रयत्न.. हर्षा भोगले जाम वैतागला होता सगळ्यांवर... स्ट्राईक रोटेट झाली असती तरी मॅच जिंकणे शक्य होते.. पण अजुन ४० बॉल आहेत तेव्हा शांत पण एक दोन एक दोन धावा काढून मग पुढे शेवटच्या तीन ओव्हर्स मध्ये मारामारी करु वगैरे सुद्धा ह्यांच्या डोक्यत येऊ नये ह्या सारखे वैचारिक दुर्भिक्ष नाही दुसरे कुठलेही...
धोनी तर पूर्णतः बाहेर जाणार्या बॉलचा पाठलाग करताना बाद झाला.. इतक्या बेजबादार पणे खेळताना तो सध्या दिसतोच आहे..
योगायोग पहा, कालच्याच मटा ला
योगायोग पहा, कालच्याच मटा ला बातमी होती की टी-२० च्या या जमान्यात सुद्धा द्रविड ने ज्युनियर वर्ल्ड च्या भारतीय संघाला क्रिकेट मधला सगळ्यात बेसिक फॉर्म्युला पाळायला सांगितला " स्ट्राइक बदलत रहा" . धवन-कोहली गेल्यानंतर इतरांसाठी याची सगळ्यात जास्त गरज होती खरं तर.
http://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/rahul-dravid/artic...
यादव ने खेळलेले १२ चेंडू
यादव ने खेळलेले १२ चेंडू जाडेजाला मिळाले असते तर. ११ मअे किमान २० रन्स तरी आाले असते
नंतरचे बरेच जण स्लिप आणि
नंतरचे बरेच जण स्लिप आणि विकेटकीपरकडे आऊट झाले
यावरून खेळता येत नाही असे म्हणा
<< यावरून खेळआजी केलता येत
<< यावरून खेळआजी केलता येत नाही असे म्हणा >> स्कोअरबोर्डचा दबाव न घेतां, ऑसीजनी अभ्यासपूर्वक आंखलेल्या योजनेनुसार प्रत्येक फलंदाजासाठी गोलंदाजी केली, असं म्हणणं अधिक योग्य नाही होणार ?
नाही भाऊ शेवटच्या ६ विकेट या
नाही भाऊ
शेवटच्या ६ विकेट या आपल्या चुकीमुळेच गेल्या आहे आपण विकेट दिल्या आंदन म्हणून
नविन दोघांनीही विकेट फेकलेल्या धोनी सुध्दा मारामारीच्या नादात गेला रहाणे हात वाचवण्यात गेला बाकी सगळे खालची मंडळी १ रन्स न काढता फक्त टोलवाटोलवीच्या मागे लागल्याने विकेट घालवून बसले जिथे समोर जाडेजासारखा अनुभवी फलंदाज आहे तेव्हा सुत्रे त्याच्या हातात द्यायला पाहीजे होते इथे मात्र जो तो मीच फिनिशर आहे करत होता
पण धवन बाद झाल्यावर आत
पण धवन बाद झाल्यावर आत येणार्यांना तुम्ही फक्त बॉल तटवा नि जाडेजाला strike द्या असे सांगितले नसेल का?
>>>
खरे तर हे त्यांना स्वतालाच समजायला हवे पण, बहुधा धोनीनेच सांगितले असावे की जडेजाला हिरो बनू देऊ नका, तुम्हीच मॅच काढा
खरे तर हे त्यांना स्वतालाच
खरे तर हे त्यांना स्वतालाच समजायला हवे पण, बहुधा धोनीनेच सांगितले असावे की जडेजाला हिरो बनू देऊ नका, तुम्हीच मॅच काढा >> तुलाच माहिती असणे शक्य आहे, शेवटी तुलाच धोनीच्या अंदरोनी बातम्या माहिती असतात
स्कोअरबोर्डचा दबाव न घेतां, ऑसीजनी अभ्यासपूर्वक आंखलेल्या योजनेनुसार प्रत्येक फलंदाजासाठी गोलंदाजी केली, असं म्हणणं अधिक योग्य नाही होणार ? >> कोहली नि धवन साठी नक्की केली पण बाकीच्यांबाबत अगदी फार मेहनतही करावी लागली असे वाटत नाही.
अगदी टेस्ट मॅच सारखे वनडे-
अगदी टेस्ट मॅच सारखे वनडे- टी२० मधे अत्यंत निरागसतेने स्लिप विकेटकिपरकडे कॅच देणारे भारतीय फलंदाज पाहिले की डोळे पाणावतात.
ऑस्ट्रेलिया ने शेवटपर्यंत हार
ऑस्ट्रेलिया ने शेवटपर्यंत हार मानली नाही हे खरय, पण त्यात नवीन काहीच नाही. ते असच खेळतात, सगळ्याच लेव्हल्स वरवरपण आपल्या फलंदाजांनी मात्र कुठलंही क्रिकेटींग लॉजिक न वापरता विकेट्स टाकल्या. ही लोकं आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळेपर्यंत काहीच शिकत नाहीत का? मग वर्षांनुवर्षं ग्रेड लेव्हल क्रिकेट मधे, फर्स्ट क्लास क्रिकेट मधे, लिस्ट ए क्रिकेट मधे ते कधी प्रेशर सिच्युएशन्स हाताळतच नाहीत का?
<< नाही भाऊ... शेवटच्या ६
<< नाही भाऊ... शेवटच्या ६ विकेट या आपल्या चुकीमुळेच गेल्या आहे आपण विकेट दिल्या आंदन म्हणून >> << आपल्या फलंदाजांनी मात्र कुठलंही क्रिकेटींग लॉजिक न वापरता विकेट्स टाकल्या. >> भरपूर विकेटस हातात असताना व लक्ष्य गाठणं सहज शक्य असताना जेंव्हा फलंदाज 'पाटा' खेळपट्टीवर खेळायला येतात, तेंव्हां गोलंदाजांची खरी कसोटी लागत असावी; अगदींच अननुभवी फलंदाजानी जरी आडवे- तिडवे मारलेले तीन- चार फटके लागलेच व सीमेपार गेले तरी सामना जाणार, ही भिती असतेच. आणि नेमकं तेंच, मला वाटतं , डोकं ठीकाणावर ठेवून ऑसी गोलंदाजानी होवूं दिलं नाही, हें श्रेय त्याना जातंच. उद्वेगाने आपण आपल्या फलंदाजांना दोष देताना , ऑसी गोलंदाजाना हें श्रेय नाकारणं योग्य नसावं.
[या मालिकेत ऑस्ट्रेलिया अननुभवी गोलंदाज घेवून पाटा विकेटसवर भारतासारख्या मजबूत फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध खेळत आहे, हें ही लक्षांत घेणं महत्वाचं. आजच्या 'इंडियन एक्स्प्रेस'मधलं देवेंद्र पांडे यांच्या लेखातील या ऑसी गोलंदाजांबद्दलचा हा भाग - They have a combined experience of 32 ODIs compared to the 192 games that Ishant Sharma, Bhuvaneshvara Kumar and Umesh Yadav have featured in]
शिवनारायण चंदरपॉलची
शिवनारायण चंदरपॉलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - http://www.espncricinfo.com/westindies/content/story/964587.html एक युग ह्याबरोबर खर्या अर्थाने संपले. त्याच्या झुंजार वृत्तीला आणि चिकटण्याच्या गुणाला मनापासून सलाम!
आजचा हिरो मनिष पांडे. सुंदर
आजचा हिरो मनिष पांडे. सुंदर फलंदाजी आणि ती सुद्धा दबाव असताना.
आय अॅम लव्हिंग इट!
२२ चेंडू ८ रन्स धोनी तो षटकार
२२ चेंडू ८ रन्स धोनी
तो षटकार मारला नसता तर धोनीला खरच मारला असता
आजची मॅच पण गेल्यातच जमा
आजची मॅच पण गेल्यातच जमा होती.. धोनीनी मॅच घालवायची पूर्ण तयारी करुन ठेवली होती... सुदैवाने दुसर्या बाजूने पांडे होता म्हणून वाचली मॅच...
परवाच्या मॅच मध्ये अनुभव कमी पडतो म्हणून स्ट्राईक रोटेट करता आला नाही वगैरे गोष्टी चालू होत्या.. आज धोनीने तेच केलं.. ती सिक्स मारे पर्यंत ५५ च्या स्ट्राईक खेळत होता.. आणि दुसरीकडे पांडे अत्यंत मस्त खेळत होता.. स्ट्राईक रेट साधारण १२० होता... असे असताना धोनीने गप गुमान एक रन काढून पांडे कडे स्ट्राईक द्यायच्या ऐवजी टुकू टुकू खेळत बसला होता... ९० चेंडूत १०० धावा हव्या होत्या त्या इक्वेशनची पार वाट लावली होती... दोन एक ओव्हर ठेवून मॅच संपायला पाहिजे होती तिथे पार शेवटच्या ओव्हरपर्यंत ताणली गेली..
तिथे पार शेवटच्या ओव्हरपर्यंत
तिथे पार शेवटच्या ओव्हरपर्यंत ताणली गेली.. >>> धोनी आल्यापासून हेच चालू आहे अगदी टोकाशी आणून ठेवण्याचा अत्यंत घाणेरडापणा धोनी करतो या प्रकारात ७०% ते ८०% मॅचेस भारताने स्वतःच्या हाताने घालवल्या आहे. सुरुवातीला फार टुकुटुकु खेळून शेवट च्या ओव्हर मधे अचानक सिक्स फोर्स मारून जिंकून देणे म्हणजे स्वतःची इमेज बिल्डअप करणे होय. या सिक्स फोरच्या नादात आऊट झाल्यावर सगळे प्रेशर नविन आलेल्या बॅट्समन वर येते आणि लोकांच्या शिव्या त्याच बॅट्समनला पडतात.
चंदरपॉलने रिटायरमेंट घेतली.
चंदरपॉलने रिटायरमेंट घेतली. काही काही खेळाडू भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरायचे..त्यातला तो एक होता. !!
one of the finest batsmen ! पुढे प्रशिक्षक वगैरे झाला तर चांगलं आहे.
रोहीत -- ४४१ रन्स कोहली - ३८१
रोहीत -- ४४१ रन्स
कोहली - ३८१ रन्स
आणि या खाली नंबर आहे
यादव-- ३४५ रन्स (काढले नाही हो.. दिले
)
one of the finest batsmen !
one of the finest batsmen ! >> +१
भास्कराचार्य, पराग, सहमत.
भास्कराचार्य, पराग, सहमत. चंदरपॉल बद्दलच लिहायला आलो होतो.
तिकडे इंग्लंड द आफ्रिका मॅच मधे एक इंटरेस्टिंग योगायोग आहे. क्रिकेट स्टॅट्स वाल्यांसाठी - दोन्ही कडे एक ओपनर 'कुक' आहे. त्यातील एकाचे शतक झाले आहे व दुसरा मार्गावर आहे. बघू होते का उद्या.
या कुक्स बद्दल कुतूहलाने आणखी
या कुक्स बद्दल कुतूहलाने आणखी शोधल्यावर आणखी एक इंटरेस्टिंग माहिती मिळाली. १९९२ च्या "पहिल्या" आफ्रिका सिरीज मधे कपिल ने 'जिम कुक' ला पहिल्या टेस्ट च्या पहिल्या बॉल ला काढला होता हे काहींना लक्षात असेल. आफ्रिकेवरचा बहिष्कार संपल्यावर पहिल्या कसोटी सिरीज साठी त्यांनी भारताला बोलावले होते. हा कुक अनेक वर्षे क्रिकेट खेळूनही बहिष्कारामुळे आंतरराष्ट्रीय खेळला नव्हता. जेव्हा खेळला तेव्हा पहिल्याच बॉल ला आउट झाला होता :). नंतरही पुढे फारसा खेळला नाही.
हा जिम कुक म्हणजे आफ्रिकेचा ओपनर स्टीफन कुकचा बाप.
त्या मार्श बंधू पण बापाने
त्या मार्श बंधू पण
बापाने पहीले शतक भारता विरूद्ध आणि मुलाने पण पहीले शतक भारता विरूद्ध लावले
फारेण्ड येस्स, त्याचे शतक
फारेण्ड येस्स,
त्याचे शतक झाल्यावर क्रिकैन्फोच्या कॉमेंटरीमध्ये सुद्धा या आशयाची पोस्ट आहे.. की कूकचे पहिल्या सामन्यात झालेले शतक फादर कूक बघत आहेत जे पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाले होते .. वगिअरे..
वेरी ईंटरेस्टींग.. आणि फुल्लटूफिल्मी
धोनी आल्यापासून हेच चालू आहे
धोनी आल्यापासून हेच चालू आहे अगदी टोकाशी आणून ठेवण्याचा अत्यंत घाणेरडापणा धोनी करतो या प्रकारात
>>>>
असे वाटते पण तसे ते नसते... अन्यथा तो फिनिशर म्हणून नावाजला गेला नसता..
असो,
पण आजच्या सामन्यात मात्र त्याचा फॉर्म आणि टायमिंग गंडल्याने तशी स्थिती झालेली.. या पार्श्वभूमीवर मनिष पांडे सरसच खेळला.. कारण धोनीने वाढवलेल्या प्रेशरमध्ये पांडे आऊट झाला असता तर धोनी खरेच मॅच का मुजरीम ठरला असता.. पण पांडेने क्लास आणि टेंपरामेंट दोन्ही दाखवले.. या सिरीजमधील एक बेस्ट इनिंग ! आणि बेस्ट मॅच..
Pages