दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हॅरी पॉटर'च्या स्नेपचा मृत्यू, अॅलन रिकमनचे कॅन्सरने निधन .... Sad श्रद्धांजली

अत्यंत आवडती भूमिका करणाऱ्या अॅलन रिकमनला श्रद्धांजली, पुस्तकातली व्यक्तिरेखा जणू त्याला समोर ठेवून लिहिली असावी, इतकी उत्कृष्ट निभावली होती त्याने

अरेरे Sad

चिंचवड देवस्थानचे विश्वस्त श्री सुरेंद्रमहाराज धरणीधर देव यांचे निधन (आत्महत्या)
श्रद्धांजली. _/\_

ओह...... खुपच वाईट आणी विश्वास न बसणारी बातमी .. Sad
श्रद्धांजली. _/\_

लोक असेही बोलतायत...की
<<<<तपास ना करता आत्महत्या हा निष्कर्ष तातडीने काढू नये. जिथे मोठ्या स्थावर मालमत्तेचा संबंध आहे, त्यात ३.५% वाला समाज ती सांभाळतोय, तिथे तर अजिबातच नाही.>>>>>

http://www.loksatta.com/pune-news/chinchwad-temple-trusts-main-trustee-s...

निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक, लोकसत्ताचे माजी सम्पादक श्री अरूण टिकेकर यांचं निधन
श्रद्धांजली!

टिकेकरांना आदरांजली. लोकसत्तात त्यांनी सुरू केलेल्या अनेक सदरांतले लेख संग्राह्य असत.

अरेरे...

अरुण टिकेकरांना श्रद्धांजली.

लोकसत्तात त्यांनी सुरू केलेल्या अनेक सदरांतले लेख संग्राह्य असत. <<< अनुमोदन. ते संपादक होते तेंव्हा त्यांचे अग्रलेख आमच्या घरच्यांकडून आम्हाला आवर्जून वाचायला दिले जायचे.

अरुण टिकेकरांना श्र्द्धांजली.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता पाटील ह्यांचे निधन झाल्याची बातमी आज सकाळला ५ व्या पानावर वाचली.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रत्नमालांच्या निधनानंतर दादा कोंडकेंच्या मावशीचा रोल काही सिनेमांत त्यांनी केल्याचे ठळक आठवते.

Sad

Sad

घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें
किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाये ..... निदा फाजली
भावपूर्ण श्रद्धांजली !

Pages