दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह्ह्ह!!!! Sad श्रद्धांजली!!! Sad Sad

अरेरे Sad

जैन उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री भवरलाल जैन यान्चे दु:खद निधन :अरेरे:.
http://www.jains.com/index.htm

भारत सरकारने त्यान्च्या विज्ञान आणि अभियान्त्रिकी क्षेत्रातल्या कार्याचा पद्म पुरस्काराने सन्मान केला आहे (२००८). त्यान्चे ठिबक सिन्चनाचे (पाण्याचा प्रत्येक थेम्ब पिकाच्या वाढीसाठी वापरणारी इस्रायली सिन्चन पद्धत) कार्य वाखणण्यासारखे आहे. ते कट्टर गान्धीवादी होते.
https://en.wikipedia.org/wiki/Bhavarlal_Jain#cite_note-Forbes-1

लोकसभेचे माजी सभापती पी ए संगमा यांचे दु:खद निधन!

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! Sad

मार्टिन क्रो..
पी ए संगमा..
अरेरे.. भावपूर्ण श्रद्धांजली!

पी. ए. संगमा यांना श्रध्दांजली !

भारतीय चित्रपटसृष्टीवर अनंत उपकार करणारे चित्रपट-संग्राहक श्री. पी. के. नायर यांचं निधन.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ही संस्था केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे उभी राहू शकली. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसाठी नायरसाहेबांनी अथक परिश्रम घेतले. बारा हजारांहून अधिक चित्रपटांचा संग्रह त्यांनी केला होता. 'सेल्यूलॉईड मॅन' हा त्यांच्या आयुष्यावरचा अप्रतिम चित्रपट सर्वांनी जरूर पाहावा.

८३ वर्षांचे नायरसाब गेल्या वर्षीपर्यंत 'पिफ'ला रोज चार-पाच चित्रपट बघायचे. यंदाच्या महोत्सवात त्यांची अनुपस्थिती जाणवली होती.

Pages