बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

आदल्या दिवशी करता येणारे, पोटभरीचे पदार्थ -

तिखटमिठाच्या पुऱ्या, भोपळ्याचे घारगे, कटलेट्स, पॅटिस, पावभाजीची भाजी, छोले, रगडा पॅटिस वगैरे. मटार उसळ-पाव.

शनिवारी रिपब्लिक डे निमित्ताने शाळेत काही कार्यक्रम आहेत. मुलाच्या वर्गात प्रत्येकाला एखादी रिजनल डिश सगळ्या वर्गाबतोबर शेअर करण्यासाठी घेवून जायची आहे. त्याने अर्थातच बाकी बहूतांशी मुलं पंजाबी पदार्थ आणतिल म्हणून मला काहीतरी मराठी दे (पुरणपोळ्या दे अशीच फर्माइश आहे खरंतर) असं सांगितलंय.
सकाळी लवकर बनवता येईल आणि अगदी सगळ्या ४५ नाही तरी किमान १५-२० मुलांना तरी प्रत्येकी २-३ घास खाता येईल असे सोपे मराठी पदार्थ सांगा. लेकाला थोडे ऑप्शन्स देवून त्यातला त्याला आवडणारा पदार्थ निवडायला सांगेन.
सध्या थंडीचं सकाळी ५-५.३० उठून रोजचा डबा बनवायचं पण जीवावर येतंय आणि आता हे नविन. परत मराठी पारंपारिक कपडे पण शोधायचेत आता

अल्पना, तिळाच्या मऊ वड्या?
सीजनल आहे आणि रीजनलही. शिवाय आदल्या दिवशी करून ठेवता येतील.

कोणत्याही वड्या प्रकरणाचा मी चांगलाच धसका घेतलेला आहे. आणि इथेही या दिवसात तिळगुळाच्या वड्या/लाडु इ विकत मिळतात. त्यामूळे इथल्या लोकांना हे महाराष्ट्राचं स्पेशल आहे यावर विश्वास बसत नाही. Happy

अच्छा!

खोबर्‍याच्या वड्या (:फिदी:) कर मग.
मलई बर्फी
बेसनाचे/ कणकेचे/ रव्याचे लाडू
पातळ पोह्यांचा चिवडा

बेसनाचे, कणकेचे लाडु जमतिल मला. आत्ता आठवलं घरात आईने आत्ता दिलेल्या थोड्या चकल्या( २०-२५ तरी असतिल) आणि चिवडा तयारच आहे. ते पण ऑप्शन देते.

(पण मला खात्री आहे माझं लेकरू हे काय डब्यात न्यायचे (म्हणजे पोटभरीचे) पदार्थ आहेत का म्हणून मला उलटा प्रश्न विचारेल.) Happy

इडल्या किंवा आप्पे हे पारंपारिक मराठी पदार्थ का नाहीत असं मला राहून राहून वाटतंय. एकदा एक स्टँड कुकरला लावला की १६ इडल्या तयार. अगदीच फास्ट आणि सोप्पं काम. Wink

हे काय डब्यात न्यायचे (म्हणजे पोटभरीचे) पदार्थ आहेत का>> हो! आमच्याकडेही हा प्रश्न आलाच असता. पण इतर ४४ मुलं आणतील तेही खायचंय ना असं विचार त्या क्यूटबॉयला.

एकदा एक स्टँड कुकरला लावला की १६ इडल्या तयार.>> हो ना! म्हणूनच मला वड्या करायला सोप्या वाटतात. ढवळून घोटून थापल्या कापल्या की झालं. वळत बसायची भानगड नको.

तुला खांडवीचाही विचार करता येईल. इडली रव्याचा गुळाचा शिरा करून थापायचा आणि कापायचा Wink

गुळपोळ्या किंवा खवापोळ्या...आधी करुन ठेवता येतील...आणि छोट्या छोट्या पुरी च्या आकाराच्या केल्या तर द्यायला पण बरं पडेल.
लाल भोपळ्याचे घारगे.
मोदक ( कणकीचे कींवा उकडीचे ) - कणकीचे आदल्या दिवशी करुन ठेवता येतील. उकडीचे आदल्या दिवशी करुन फ्रीज मद्धे ठेवायचे...सकाळी फक्त वाफ द्यायची.

तिखटात -
कोथिंबीर वडी
आळु वडी
छोटे बटाटे वडे

वड्याच करायच्यात तर पाटवड्या कर.
शंकरपाळ्या मराठी आहेत का? त्या कर.
कांदापोहे? वर मस्त शेव फरसाण घालून?
गूळपोळी जमत असेल तर आदल्या दिवशीच करता येईल. प्रत्येकी अर्धी.
भोपळ घारगे, डिंकाचे लाडू, शेंगदाणा लाडू.

भोपळ्याचे घारगे किंवा केळपुऱ्या / बनपुऱ्या (असंच नाव आहे ना?) - पंधरा वीस तरी बनवायला / करायला लागतील.

मंजूडीने दिलेली मटार पॅटिसची रेसिपी. सारण आदल्या रात्री करून ठेवता येईल, बटाटे उकडून सोलून ठेवता येतील.

साबुदाण्याचे वडे / खिचडी.

तेल तिखट पोहे / दडपे पोहे / मटार पोहे / कांदेपोहे / बटाटा पोहे.

तिखटामिठाचा सांजा.

शंकरपाळ्या मराठी आहेत का? त्या कर.?>>> ते पंजाबी शक्करपारे आहेत असं कुठंतरी वाचलंय.

शिर्‍याच्या वड्या करता येतील का? ते एकदम बेस्ट आणि झटपट काम होइल. किंवा सरळ प्रसादाला देतात तसे मूद पाडून देता येतील.

कुक्या कर आणि प्रत्येक कुकीवर 'मराठी' किंवा 'मै मराठी' असं आयसिंग कर Proud

जोक्स अपार्ट, माझं मत बेसनचे लाडू / नारळीपाकाचे लाडू / तिखट मिठाची कुरकुरीत शंकरपाळी / कोथिंबीर वडी यांना.

तीळ्गुळाचे मऊ लाडू. एक अजून पर्याय. करायला तसे सोपे.
तीळ भाजून गार करून मिक्सरवर बारीक करायचे + गूळ किसून त्यात घालायचा. जेव्हढा बसेल तेव्हढा. जरा हातानीच चुरायचा. लाडू वळता येईइतपत झालं की लाडू वळायचे. तसे बिघडण्याची काहीही शक्यता नाही. पोट्भरीचे आहेतच. Happy

इथली निम्म्याच्यावर सजेशन्स वाचून मी खूप सुगरण आणि खूप उरक असलेली मुलगी आहे असा मायबोलीवर समज आहे हे लक्षात आलं. आईला आणि झालंच तर नवर्‍यालाही हे पटवून द्यायला हवं. Wink

योकु, ते लाडु माझे अतिशय आवडते आहेत.
वरच्या लिस्टमधुन पोहे, साबुदाणा खिचडी किंवा वडे, कोथिंबीर वडी, पावभाजी, बेसनाचे किंवा कुटलेल्या तिळगुळाचे लाडु, पुपो (हा लास्ट ऑप्शन आहे) हे पदार्थ अ‍ॅप्रुव्हल साठी ठेवण्यात येतिल. बघू आता लेक यातलं काय फायनल करतोय.
याशिवाय सजेस्ट केलेल्या पदार्थांपैकी बरेचसे पदार्थ मी २-३ जणांसाठी पण कधी करून बघितले नाही आहेत. शिवाय वरच्या लिस्टीतले पदार्थ माझ्या हातचे लेकानी खाल्ले आहेत आणि बहूतांशी वेळा त्याला हे पदार्थ आवडतातही. Happy

कांद्याचे थालीपीठ वर भरपूर अमूल बटर (किंवा घरचे लोणी. पण ४५ बच्चूलोकांना घरचे लोणी म्हणजे...).
थालीपीठ इतके मराठी दुसरे काही नाही. काहीच नाही तर दोन धम्मक लाडू दे. ते इतर कुठल्याच भाषिकात नाही Wink

अल्पना, भडंग हाही एक ऑप्शन आहे. (अमराठी लोकांत कितपत लोकप्रिय ते माहीत नाही.) चुरमुर्‍याचा ताजा खमंग चिवडाही भारी लागतो. लाह्यांचा चिवडा हाही एक पर्याय आहे. खरवस हा पदार्थ अमराठी लोकांना कितपत आवडेल आणि तेवढा चीक उपलब्ध होईल की नाही हे माहीत नसल्यामुळे सुचवत नाही.
शिपोचि किंवा मनोहर (हेच नाव ना?) हाही पदार्थ मराठीच असावा. आदल्या रात्रीच्या पोळ्यांचा सकाळी चिवडा झटपट होऊ शकतो. फोडणीचा भात / चित्रान्न हाही एक सोपा पर्याय आहे.

kadboli

२५-३० लोकांसाठी स्टार्टर म्हणून चिली पनीर करायचे आहे. किती लागेल पनीर आणि मिरच्या? कधी एवढ्या प्रमाणात केले नाहीये.

Pages