
नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
हा>>य उजू.. किती दिवसांनी
हा>>य उजू.. किती दिवसांनी दिसलीस इकडे..आणी कसला सुंदर रंग आहे डेलिया चा.. व्वा!!!
उजू.. मस्तच रंग आहे. आता
उजू.. मस्तच रंग आहे. आता साधना आणि जिप्सी कधी फोटो टाकताहेत ते बघू या प्रदर्शनाचे.
पहायला गेलो Goose आणि भेटला
पहायला गेलो Goose आणि भेटला Courser...
नविन वर्षाच्या पहिल्याच रविवारी स्थलांतरीत पक्षां पैकी Bar Headed Goose (पट्ट्कादंब) बघण्यासाठी शिरवळ जवळील विर धरण गाठलं. पावसा अभावी धरणाचे पाटलोण क्षेत्र पार अर्धा एक कि.मी. आत गेलं होतं. किनार्यावर सुरय, चमचा, सिगल, पाणकावळे, खंड्या, टिटवी, ब्राह्मणी बदक अश्या बर्याच पक्षांची वर्दळ दिसत होती. पण आम्हाला अपेक्षित असलेलं पट्टकादंब मात्र नजरेस पडत नव्हतं. त्यासाठी पाणथळ जागेतील चिखल तुडवत आत जाण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. दुसर्या टोकाला जाऊन पाहणी करु म्हणून मागे फिरलो... तोच चार-पाच लहान पक्षांचा थवा समोरुन उडत जाऊन काही अंतरावरील वाळलेल्या गवतात जाऊन लुप्त झाला. सोबत असलेल्या विनायक जोशीने त्यांची ओळखं पटवली. पण ते लाजरे बुजरे पक्षी जवळून फोटो काढू देईनात म्हंटल्यावर नरेशला गाडी सकट पाचारण करण्यात आलं. प्राण्यांच आणि पक्षांच एक अजब शास्त्र आहे. चालता बोलता माणूस जव़ळ आला तर दूर पळून जातील, पण तोच माणूस चारचाकी बसून आला तर बिनधास्त poses देत photo काढून घेतील. या संधीचा पुरेपुर फायदा घेत गाडीत बसून Indian courserचे मनसोक्त छायाचित्रण केलं.
Indian Courser (धाविक, महिदास)
एक नं .. काय मस्त पोझ
एक नं .. काय मस्त पोझ दिलीय..

कालचा फुलांचा पसारा मांडा आता इथं लवकर.. लॅपटॉपवर मोठालॅपटॉपवर्बघण्याची मजाच काही और असते
इंद्रा पक्षीदर्शन
इंद्रा पक्षीदर्शन मस्तच.
साधना, जिप्सी कालच्या प्रदर्शनाचा थोडक्यात वृतांत आणि फोटो टाका ना इथे.
आणि आगामी प्रदर्शनाच्या तारखा कोणाला माहीत असतील तर त्याही टाका.
नमस्कार.

वर्षू, अंबाडीच्या बियांची चव
वर्षू, अंबाडीच्या बियांची चव nutty अस्ते.
इंद्रा - सर्व पक्ष्यांचे फोटो
इंद्रा - सर्व पक्ष्यांचे फोटो अतिशय भारीएत .....
धन्यवाद आता फुलांचे फोटो
धन्यवाद
आता फुलांचे फोटो येऊद्यात..
हाय उजू. :स्मितः वॉव इंद्राचे
हाय उजू. :स्मितः
वॉव इंद्राचे पक्षी येताहेत अजून.
जागू.... तुला बुलबुल काय एकेक पोझ देतात गं!
हमखास भूतकाळाकडे धाव घेते आणि ते तिथे रमले की खेचून बाहेर काढावे लागते.>>>>>>
नलिनी ....मी कल्पना करू शकते. आणि लांब राहून जुन्या ओळखीच्या खुणा दिसल्या, पट्ल्या की जास्तच नॉस्टॅल्जिक व्हायला होतं.
हे काल घरातच पड्लं होतं.

ईंद्रराज सुरेख वर्णन आणि
ईंद्रराज सुरेख वर्णन आणि प्र.ची देखिल..
हा Indian Courser , टीटवी सारखाच दिसतोय..:)
जागु, बुलबुल मस्तच आलाय ग फोटो.
उजु खुप दिवसांनी, छान आहे फुल.
वर्षु दी, गुळा शिवाय ती चटणी अशक्य आहे...

टीने..:D
मानुषी ताई, त्या फु,पाखराच्या पंखावरचे मणी खुप सुरेख आहेत..
इन्द्रा.. सुंदर आहे फोटो,
इन्द्रा.. सुंदर आहे फोटो, पहिल्यांदाच पाहिला हा पक्षी..
जागु, मानु.. बुलबुल आणी फुलपाखरू .. क्यूट..
इथे एका खेडेगावी फुपा संवर्धन केंद्राला भेट दिली पण तिथे सध्या खूप कमी होती फुपा तरी काही रेअर फुपा अगदी जवळून पाहायला मिळाली
कधी कधी उडताना ती चक्क आपल्या डोक्या खांद्यावर ही येऊन बसतात..
वो हाथ ठाकूर का नही..
गाईड चा आहे
वाळकं पान?
टायगर

हिरवंगार
या सुरवंटा पासून
ही सौंदर्यवती
गुलाबो

या केंद्रात एक फिल्म ही दाखवण्यात आली.. सुरवंटापासून फुलपाखरू बनण्याची प्रक्रिया आणी इतर माहिती खूप इंटरेस्टिंग होती. इथे पंखांपासून तयार केलेले ईअरिंग, ब्रेसलेट्स विकायला होते या शिवाय डब्यातून विकायला कोश ही होते लाईव्ह.. घरी घेऊन जाऊन कोष ते फुलपाखरू हा प्रवास अनुभवायला काही लोकांनी घेतले.
वॉव, हिरवगार आणि निळशार मस्त
वॉव, हिरवगार आणि निळशार मस्त
फोटो मागच्या आणि ह्या
फोटो मागच्या आणि ह्या पानावरचे फार सुंदर.
तो वरचा महीदास कीत्ती गोड आहे, पहिल्यांदाच पाहीला. छान फोटो इंद्रधनुष्य.
मानुषीताई केळीच्या पानावर मला रोज जेवायलापण आवडेल.
फुलपाखरं क्युट.
जागू पक्षांचे फोटो फार सुरेख काढते.
आहाहा काय सुंदर आहेत
आहाहा काय सुंदर आहेत फुलपाखरू.
वर्षूताई, अन्जूताई धन्यवाद.
खुप दिवसांनी श्रावणीच्या गॅदरींग मधील भरतनाट्यमच्या वेशभुषेसाठी बनविला.
आहाहा खुपच गोड, कलरफुल गजरे.
आहाहा खुपच गोड, कलरफुल गजरे. लेक भरतनाट्यम करते, अरे वा.
माती महती : सिमेंट
माती महती :
सिमेंट काँक्रिटच्या जगात माती कुठे दिसतच नाही. मातीशी नातं तुटत चाललं आहे. मातीशी जोडणारा सेतू म्हणजे पर्यावरणकदक्षता मंचचा माती मोहोत्सव. आकाशवणी मुंबई अस्मिता वाहिनीवर मातीविषयी बरीच माहीती आपल्यासाठी घेऊन येत आहे नि.ग. चा नविन सदस्य भरत गोडांबे. नक्की ऐका परीसर मध्ये १३, १४, १५, १६ जानेवारीला सकाळी ६.३० व दुपारी १.५० ला एम.डब्लू ५३७.६ आणि ऑल इंडिया रेडीओ लाईव्ह अॅन्ड्रॉईड अॅप वर.
भरत चे अभिनंदन व ही माहीती सगळ्यांनी ऐका.
भरत तुला एक रिक्वेस्ट आहे प्लिज ह्याचे रेकॉर्डींग आम्हाला इथे दे.
गजरा मस्त! निळी आणि जाम्भळी
गजरा मस्त! निळी आणि जाम्भळी फुले कसली?
नाही नाही महाराष्ट्र माझा हे
नाही नाही महाराष्ट्र माझा हे गाणे होते त्यात वेगवेगळ्या राज्यातील वेष होते. ती हीपॉप चांगले करते.
त्या अष्टरच्या पाकळ्या आहेत गुलाबी आणि जांभळ्या.
आहाहा खुपच गोड, कलरफुल गजरे.
आहाहा खुपच गोड, कलरफुल गजरे. लेक भरतनाट्यम करते, अरे वा.++१
मस्त फुपा ......
मस्त फुपा ...... वर्षू.......केळी आणि संत्रं ठेवलेल्या प्लेटीतलं फुपा बघून वाटलं ........ही साइड डिश तर नाही. मग लक्षात आलं ........वर्षू आता चायनात नाही. पनामात आहे.
जागुले......मस्त कलफुल वेणी.
मानुषीताई केळीच्या पानावर मला रोज जेवायलापण आवडेल.>>>>>.... हो ना अन्जू. कित्ती छान होईल ना असं झालं तर. ताटं वाट्या भांडी घासायचा व्याप नाही. कित्ती इकोफ्रेन्डली !
मी जिथले फोटो दिलेत....तिथे जेवणातल्या पदार्थातले कित्येक इन्ग्रेडियन्ट्स म्हणजे अगदी होम ग्रोन च होते.
घरच्या भोपळ्याची तीळ, खसखस, खोबरं घालून केलेली चविष्ट भाजी, वडे......यातलंही बहुतेकसं घरचंच. म्हणजे तांदुळ, उडीद डाळ. आणि घरातलाच एक हौशी कलाकार इतर सर्वांच्या मदतीने स्वयंपाक करत होता. चांगला ढणढण जाळ पेटवून. हे सगळं खूप छान वाटतं गं पण इथे शहरात काहीच शक्य होत नाही.
आता पहा......आमच्या घरच्या नारळाच्या झावळ्या व इतर बरंच काही पडत रहातं. ते बघून मला माहेरच्या "जळणाच्या खोली"ची आठवण झाली. तिथे आवारात पडणारा सर्व जळणेबल कचरा साठवला जायचा. ...बंबात घालायला.
होना मानुषीताई पूर्ण वातावरण
होना मानुषीताई पूर्ण वातावरण किती प्रसन्न होतं, फोटोवरून जाणवतंय.
गावाला सासरी साठवतातना. आंघोळीचं पाणी तर जास्त करून पालापाचोळा चुलीत घालून तापवतात, बाहेरच्या बाजूला, माहेरीपण तसंच अंघोळीसाठी पाण्याचं. फक्त माहेरी माड नाहीत मात्र.
गजरे मस्तच.. अष्टर ची फुले/
गजरे मस्तच..
अष्टर ची फुले/ पाकळ्या ?
नवा भाग कधी ?
उद्या.
उद्या.
वॉव,, सुंदर्,कलरफुल गजरे..
वॉव,, सुंदर्,कलरफुल गजरे.. जागु,मस्तं गा
मानुषी..
वाचली बिचारी फु पा.
भरत. हार्दिक अभिनंदन...इकडे लिंक दे प्लीज!!! ऐकायला खूप आवडेल.
सगळे मस्त फोटो.. जागूबै..
सगळे मस्त फोटो.. जागूबै.. संक्रांतीला नवा धागा काढा बरं का !
सगळ्यांचे खूप खूप आभार,
सगळ्यांचे खूप खूप आभार, रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करीन मी .
Red Naped Ibis (काळा शराटी,
Red Naped Ibis (काळा शराटी, काळा कंकर)
उष्ण, दमट हवामानात वावरणारा हा काळा शराटी नेहमी पाणथळ जागी आढळतो. याच्या डोक्यावर लाल टोपी आणि निळ्या-राखाडी पंखा वर सफेद ठिपका असतो. या लांब पायाच्या पक्षाची चोच खाली वक्राकार वळलेली असते. पाण्यातले किडे, बेडूक, मासे खाऊन गुजराण करणारे हे पक्षी झाडाच्या शेंड्यांवर घरटी बांधतात.
इंद्रा खुप छान फोटो. ओके नविन
इंद्रा खुप छान फोटो.
ओके नविन धागा संक्रातीच्या शुभमुहुर्तावर काढूया.
इंद्रा - क्लाऽस फोटोग्राफी
इंद्रा - क्लाऽस फोटोग्राफी ....
मस्त फुपा ...... वर्षू.......केळी आणि संत्रं ठेवलेल्या प्लेटीतलं फुपा बघून वाटलं ........ही साइड डिश तर नाही. मग लक्षात आलं ........वर्षू आता चायनात नाही. पनामात आहे. फिदीफिदी >>>>>> मस्तच ...
वर्षूदी - फुपा मस्त ....
<<<<इंद्रा खुप छान फोटो.>>>>
<<<<इंद्रा खुप छान फोटो.>>>> +१
Pages