
नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
झाड आहे हे !! प्लीज कापलेस कि
झाड आहे हे !!
प्लीज कापलेस कि परत फोटो काढ ( एखादे नवीन फळ बघितले कि मला फार उत्सुकता असते ! )
वोक्के.. पिकत ठेवलंय.. नक्कीच
वोक्के.. पिकत ठेवलंय.. नक्कीच टाकते फोटो..
नवीन वर्षाच्या सर्व
नवीन वर्षाच्या सर्व निसर्गप्रेमींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
सर्वांचे फोटो आणि माहिती मस्तच. अजून एकदा नीट वाचतेय!
रत्नागिरीहून आमच्या गावाकडे(कशेळी) जाताना ही भाट्याची तर(खाडी) लागते.





मस्त फोटो मानुषीताई. मी
मस्त फोटो मानुषीताई.
मी सोडून माहेरचे कोकणात गेलेत. गणपतीपुळे, पावस वगैरे. मला शक्य नव्हतं नाहीतर मी कोकणात असते आत्ता
.
मानुषीतै आहाहा
मानुषीतै आहाहा
हे ते वर टाकलेले चायनीज
हे ते वर टाकलेले चायनीज पॅशन्फ्रूट नांव असलेले पण चवीला पपाया सारखे लागणारे.. कापून
इतकुश्या फळात बिया पुष्कळ आहेत, त्याही मोठ्या आहेत आकाराने ,
मानुषी...सुंदर फोटोज... शांत
मानुषी...सुंदर फोटोज... शांत निळे...
मानुषीतै आहाहा>>>>+१
मानुषीतै आहाहा>>>>+१
मानुषी ताई, मस्त फोटोज....
मानुषी ताई, मस्त फोटोज....
वर्षू, चव कशी आहे ? हे फळ
वर्षू, चव कशी आहे ? हे फळ म्हणजे अनेक फळांचे मिश्रण दिसतेय.
मानुषी,
आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेले..
बेतात राहु दे नावेचा वेग, नावेचा वेग
रातीच्या गर्भात चांदाची रेघ, चांदाची रेघ
हे गाणे ऐकलेय का ? खुप दुर्मिळ आहे हे गाणे पण कुठे मिळाले तर अवश्य ऐका. हेच गाणे आठवले फोटो बघून.
वर लिहिलंय ना ,चव पपया
वर लिहिलंय ना ,चव पपया सारखी.. पण इकडे या फळाचा गर खाण्यापेक्षा त्याचा रस काढून पितात ,
सुप्रभात निगकर्स! आमच्या
सुप्रभात निगकर्स! आमच्या गावात बरी थंडी आहे.
दिनेश काय सुंदर शब्द आहेत! मी ऐकलं नाहीसं वाट्तंय. पण शोधते.
वर्षू...वेगळंच फळ दिसतय.
वर्षूताई फळ मस्त. मानुषीताई
वर्षूताई फळ मस्त.
मानुषीताई मस्त फोटो. गोमू माहेरला जाते रे नाखवा...
खंड्याभाऊ कशाने त्रासलेत कोण जाणे.

सर्वांना धन्यवाद कसला
सर्वांना धन्यवाद

कसला कलर्फुल्ल आहे हा खंड्या!
आम्ही इयर एन्डास देवरुखात होतो. तिथे एक किंगफिशर अगदी माझ्या समोरून उडत होता. अगदी निळ्या मोरपंखी रंगाचे हवेत फवारे उडवत. काय मस्त दिसत होता. आणि समोरच्या लॉनवरून अर्थवर्म्स पकडत होता. छप्पर ते लॉन असंख्य फेर्या मारल्या. पण मला काही कॅमेर्यात प़कडता आला नाही त्याला. (तिथे जागूच पाहिजे!)
हा आपला अगदीच "हा" फोटो
मानुषीताई मस्त फोटो. मी पण
मानुषीताई मस्त फोटो.
मी पण २५/१२ च्या विकेंडला वेंगुर्ला / देवबाग / सावंतवाडी परीसरात होते. असेच खंड्या, कोतवाल, सनबर्ड वगैरे खुप दिसले पण.......... एकतर आमचा चिमुकला कॅमेरा, त्यात ते भराभर उडणारे पक्षी..... फोटो काढलेत पण ते असेच छोटे छोटे आलेत. मलाच ओळखता येतात त्यातले पक्षी

(तिथे जागूच पाहिजे!) >>>> + १
वर्षू, बिया घेऊन ये !
वर्षू, बिया घेऊन ये !
मलाच ओळखता येतात त्यातले
मलाच ओळखता येतात त्यातले पक्षी
मानुषी ताई कसले हिरवे, निळे
मानुषी ताई कसले हिरवे, निळे गार फोटोज.. मस्त. शेवटचे दोन तर एक दम चकचकीत...:)
दा, सुंदर ओळी, मी नाही ऐकल हे गाण..
वर्षु दी, पपई सारखी चव, छानच लागत असणार हे फळ..
जागु खंडेराया मस्त..
मलाच ओळखता येतात त्यातले पक्षी हाहा
ओक्के घेऊन येते बिया.. बरी
ओक्के घेऊन येते बिया.. बरी आठवण करून दिलीस..
मलाच ओळखता येतात त्यातले पक्षी..
जागु , मानु मस्त आहे खंडेराव ..
चमच्या, दर्वीमुख
चमच्या, दर्वीमुख
इन्द्रा मस्त फोटो, मस्त
इन्द्रा मस्त फोटो, मस्त पक्षी. कुठले आहेत?
शिरवळ जवळच विर धरण
शिरवळ जवळच विर धरण
अगदी चमच्यांसारख्या चोची
अगदी चमच्यांसारख्या चोची आहेत.
भाट्याची तर(खाडी) त्रासलेले
भाट्याची तर(खाडी)
त्रासलेले खंड्याभाऊ
आणि चमचा - सारेच फोटो अतिशय सुंदर ....
चमच्या नाव आणि पक्षी दोन्ही
चमच्या नाव आणि पक्षी दोन्ही खुपच गोड..:)
चमच्या नाव आणि पक्षी दोन्ही
चमच्या नाव आणि पक्षी दोन्ही खुपच गोड..स्मित+ १००



कोकणात एका लग्नाला गेलो होतो. निसर्गाशी निगडित वाटले म्हणून इथे डकवते
अशी केळीच्या पानावरची पंगत सध्या दुर्मीळच....नाही का?
इन्द्रा मस्त फोटो.. वॉव
इन्द्रा मस्त फोटो.. वॉव पक्षीज बॉर्न विथ सिल्वर स्पून इन माऊथ!!!
मानुषी, केळीच्या पानावर ची पंगत.. खरोखरंच दुर्मिळ आहे आता..
इन्द्रा मस्त फोटो.. वॉव
इन्द्रा मस्त फोटो.. वॉव पक्षीज बॉर्न विथ सिल्वर स्पून इन माऊथ!!!
मानुषी, केळीच्या पानावर ची पंगत.. खरोखरंच दुर्मिळ आहे आता..
गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग
मानुषी ताई, काय मस्त फोटोज,
मानुषी ताई, काय मस्त फोटोज, छान सारवलेल आंगण, त्यावर सतरंज्या आणि केळीच्या पानाची पंगत व्वा!
आणि तो मांडव पण कीती छान सजवलाय..:)
रच्याकने, माझ्या माहेरी, सणा सुधीला आजही भोजन पट्या आणि त्या समोर केळीच्या पानाची पंगत असते,
वर्षु दी कसलं ग्वाड फुल आहे ते.:)
Pages