निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि मस्तच सगळे..
फुल कसल आहे ते ?
आपल्याइकडे डिसेंबर फ्लॉवर लागत ना त्याचे फुल गळल्यावर असच काहितरी दिसत.. नातेवाईक तर नै आहे हे नक्की..

वर्षू, तो कर्दळीचाच प्रकार आहे फक्त काही भागातच अशी फळे लागतात. तिकडे हमिंग बर्डस आहेत का ?
तसे छोटे पक्षीच याचे परागीवहन करतात.

रच्याकने, माझ्या माहेरी, सणा सुधीला आजही भोजन पट्या आणि त्या समोर केळीच्या पानाची पंगत असते, >>>>>
सायु मस्त वाट्तं ना!
इन्द्राचा चमचा पक्षी आणि सगळेच फोटो भारी.
वर्षू गुड मॉर्निन्ग. आता आमची सुदुपार होईल अर्ध्या तासाने.

हो, दिनेश, कर्दळी चं नातेवाईक दिस्तंय हे फूल.. इकडे असंख्य हमिंग बर्ड्स आहेत.. कोणी कोणी तर आंब्याच्या
रसरशीत पानांना ही टोचे मारताना दिसतात..
इन्द्रा द सलीम अली.. मस्त कलेक्शन आहे तुझ्याकडे!!! Happy

मस्तच फोटो आहेत सर्व.

गेले दोन दिवस एक सुखद अनुभव मिळतो आहे. सकाळी सकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडलं की मस्त चमकीचा वर्षाव सुरू असतो. चमचमणारा रस्ता. दिव्यांच्या प्रकाशात आणखीच उजळून निघणारी चमकी. समस्त वृक्षसंपदेने पांघरलेली पांढरी शाल. घरातून निघाल्यापासून ते बस घेईपर्यंतची ८ मिनिटातली ती निरव शांतता, वातावरणातला गारवा दिवसभर मन प्रसन्न ठेवते.

हे काये बरं?? अंह!! गुलाबाची टपोरी कळी नाहीये ही..

पाकळ्या उलगडल्या कि आतल्या पॉड मधे असंख्य पिटुकल्या, चौकोनिश चपट्या बिया असतात.. आणतेय्,आणतेय या बिया ही..
तर या पाकळ्यां च्या आंबट्ट जूस चा उपयोग पनामिनियन डिशेज मधे करतात.

अंबाडीचं बोंड, आंबट लागतं आणि बियांची चटणी करतात, वरची साल वाळवून सरबत बनवतात. मेक्सिकन दुकानात वाळवलेली साल मिळते. दिनेदांनीही खुप वेळा माहीती दिलीय याची.

माझी आई अंबाडीची रोपं लावायची त्यांना ही लाल हिरवी फळं खुप लागायची, ही बोंडं सुकवून, बिया काढून साधी दाण्याच्या चटणी सारखी चटणी बनवायची. मस्त लागते. वर्षू तुम्ही पण एखादी बी चावून बघा जरा नटी फ्लेवर असतो.

वर्षू, हिच आंबाडीची बोंडे. याचे सरबत खुप छान लागते, फक्त पाण्यात घालायची. सुंदर रंग आणि चव येते. सुकवून ठेवता येतात.

नले... चमकी Happy .. खरेच डोळ्यासमोर आले.

वॉव बोंड..
याच्या कोवळ्या पानांची चटणी क्लास लागते भाकरीसोबत..काय आठवण करुन दिली मस्त..
या फुलांची चटणी सुद्धा मस्तच लागते..

मानुषी, सुरेख फ़ोटो. भाट्याच्या खाडीतून खूप वेळा प्रवास केलाय. त्याची आठवण झाली, हे फ़ोटो बघून.
ती कागदी पताकांची सजावट, आणि केळीच्या पानावरचं जेवण, आहाहा! काय सुरेख वास येतो ना त्या पानाचा,त्यावर गरम गरम वरण-भात-तूप खाताना? (आठवणीत रमलेली बाहुली) Happy

खंड्याभाऊ कशाने त्रासलेत कोण जाणे.>>>>>...तु त्याचा एक्ट्याचा फ़ोटो काढतेस म्हणून. Proud

वॉव पक्षीज बॉर्न विथ सिल्वर स्पून इन माऊथ!!! Lol

चमचा छानच. सर्व फ़ोटो सुंदर. Happy

सायु.. धन्यवाद गा लिंके साठी.. माझ्या ही नजरेतून सुटली होती ही गम्मत..
एक प्रश्न.. बियां ची चव कशी लागते?? नटी??
गूळ घालायलाच हवा का????? म्हंजे इज इट अ मस्ट??

वर्षू....अगं अंबाडीची बोन्डं आंबट्ट्ट ढाण असतात. तुला गूळ सहन करावाच लागेल . Proud
काल हुरडा पार्टीला गेलो होतो. निसर्गाच्या सान्निध्यात. त्या मळ्यात गाई म्हशी शेळ्या सगळं आहे. खूप दिवसांनी म्हशीच्या आणि शेळीच्या धारा काढल्या जाताना पाहिलं. ज्वारीचा हुरडा ...जोडीने चटण्या........ . तीळ+जवसाची, लसूण खोबर्‍याची(या मीच केलेल्या )खोबरं + मिर्‍याची....ही मी घरी फारशी करत नाही., घरचं(त्यांच्या!!!!!!!!) दही. गूळ, रेवड्या, बोरं.



थंडीतल्या लोकांनो ऊब आली का?
वर्षू तू जास्त जवळून बघू नको. Proud

Proud Lol नाही पाहिले जवळून...

वॉव... लव हुरडा... २,३ वर्षांपूर्वी खाल्ला होता, कोणाच्या तरी शेतातला..हाँ.. ऑन वे टू कोल्हापूर बाय रोड.. मुंबई चा रिअल वाटत नाही अजिब्बात..

गूळ बिना चटणी ट्राय करूंगी रे

ओहो..हुरडा पार्टी मस्तच मानुषी ..
मी पन आठवणीत रमली खेड्यावरच्या..
आम्ही गव्हाच्या ओंब्या आणि हरभरे सुद्धा भाजतो सोबतीला .. वॉव .. आठवणीनच रमायला झाल..

मानुषी, तुम्ही हल्ली जे काही लिहता, ते पाहिले, वाचले की मन हमखास भूतकाळाकडे धाव घेते आणि ते तिथे रमले की खेचून बाहेर काढावे लागते.

Pages