निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना- ही ढोली जमिनीपासून जरा उंचीवर पाहिजे होती - फारच खाली आहे .... पक्ष्यांना सुरक्षित वाटणार नाही इथे ...

मला थंडी खूप्पच प्रिय आहे..>>>
+१

वर्षूतै आय लव्ह्ड दॅट क्रिसमस ट्री Happy

मला थंडीचा महिना फार आवडतो. सकाळही ही फ्रेश सते आणि रात्रही फारशी (पावसाळ्याइतकी) कातर नसते Happy
गरम गरम जेवण जेवायचं, आईच्या कुशीत हुडहुडत झोपी जायचं, रात्रीची शांतता अनुभवत रहायचं Happy कशाचाही आवाज नाही. प्राणी पक्षी चोर थोर सगळेच कुडकुडत झोपलेले असतात.

मला ही शांतता आवडते.

मी पण सुट्टीतल्या सगळ्या पोस्टी आता वाचून काढल्या. पोस्टी आणि फोटो दोन्ही सुंदर.

आमच्याइथेही थंडी पडली आहे. ह्या दिवसात झाडेही खुष असतात. आता भाज्यांचे मळे हिरवेगार होतात. सगळ्या पालेभाज्या, शेंगभाज्या मस्त तेजस्वी दिसतात.

काल खुप दिवसांनी कुंड्यांमध्ये खत घालायचे काम काढले. तर गुलाबार हे महाशय दिसले. कोणाच्या ओळखीचे आहेत का? मला भुत, किंवा ते कार्टून्समधले डेंजर कॅरॅक्टर सारखे वाटले.

हे जरा छोटो होते.

सायली आमच्याकडे भारद्वाज दिसत असतात इकडून तिकडे जाताना. तसे हे जास्त चपळ वाटत नाहीत. जास्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतात. त्यांचा आवाजही मंजुळ आणि मोठा असतो. कोकीळेपेक्षा मोठा असतो.

भारद्वाज दिसण लकी असत म्हणे ?
बरयं.. मला बरेच्दा दिसतो पण लक कशाशी खातात अजुनही नै माहिती Proud
काफी .. प्यावीशी वाटतेय आता फटू बघुन .. मला त्या बिन्स चा आकार बहोतच आवडतो..
काय त्या पायवाटीचे फटू टाकताय.. माझ्या घराकडला / फ्लॅटकडला टाकला तर झाड शोधत बसावी लागेल Wink

वर्षू दिनेश जागू मस्त फोटो.
वर्षू .....अगं माहेरी बागेत वडिलांनी कॉफीचं झाड लावलं होतं. त्याला मस्त कॉफी बीन्स याय्चे. वडील स्वता: त्या कॉफी बीया खुडून आणायचे. (बहुतेक वाळ्वायचेही)कढईत रोस्ट करायचे आणि मिकसरमधे ग्राइन्ड करून आम्हाला त्याची मस्तपैकी कॉफी करून द्यायचे.

दिनेश, ब्राझिलियन कॉफी का काय ते नाही म्हाईत, इकडे एका खेडेगावातील घराच्या आवारात लावलेली होती.
ओह वॉव सगळेच कॉफीप्रेमी दिस्ताहेत.. मानुषी, घरच्या कॉफीबिया दळून केलेली कॉफी.. मस्त्,सुवासिकच असणार.. फिल्टर्ड कॉफी सारखी लागत असेल ना??
भारद्वाज चा फोटो मस्त आलाय, झाडाच्या सर्वात खालच्या फांद्यांवरून उड्या मारताना , जमिनीवरून चक्क चालताना, दिसायचे जुहूला
मला तर वाटलं यांच्या भारदस्त वजनामुळे ते असे स्लो असावेत.. Happy
टीनिमिनी, लक करता पक्षी नै मदत करत , Happy
दिनेश , खूप सुंदर्,रेखीव आहे पायवाट!!!
जागू, कॅस्पर कुठे सापडला तुला?????

अब मेरी गुड मॉर्निंग हुई
ही फुलं मी पहिल्यांदाच झाडावर पाहिली, नाहीतर नेहमी बुके बनून एखाद्या फुलांच्या दुकानातच बघितली होती.

वर्षू... बरीच कॉमन आहेत हि फुले ( खरे तर ती फुले नाहीत, रंगीत पाने आहेत. त्यात एक छोटेसे वेगळे फुल असते. )

कूर्गमधे, एका फुलांचा काढा संग्रही असतो. तो खाद्यपदार्थात आणि औषधात वापरतात.

इथे बघा.

http://www.coorg.com/rainy-day-blues-madde-kool/

Common Grass Yellow Butterfiy... (Eurema hecabe)

नांव काय आहे या फुलाचं??? >>>> विकीपिडिया शोधल्यावर असे कळले की ही Hydrangea ची फुले आहेत जी रंग बदलणारी असतात - निळसर जांभळी व मग हिरवी होतात

more-bigleaf-hydrangeas-L-QRC4S_.jpeg

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
आणि दिनेशदा म्हणताहेत ती - Justicia wynaadensis --->
(कूर्गमधे, एका फुलांचा काढा संग्रही असतो. तो खाद्यपदार्थात आणि औषधात वापरतात.
इथे बघा. http://www.coorg.com/rainy-day-blues-madde-kool/ )

जस्टिशिआ जातीचे एक फूल -
(Common name: Wayanad Justicia • Coorgi: ಆಟಿ ಸೊಪ್ಪು aati soppu, ಮದ್ದೆ ಟೊಪ್ಪು madde toppu
Botanical name: [Justicia wynaadensis B.Heyne] Justicia wynaadensis Family: Acanthaceae (Barleria family)
Synonyms: Adhatoda wynaadensis, Ecbolium wynadense, Gendarussa wynaadensis )

Justicia.jpg

अजून काही वेगळे असल्यास जाणकार मंडळी सांगतीलच .... Happy

सुप्रभात निगकर्स.:स्मित:

जागु किन्वा ममो असतील तर या दोघीन्पैकी कुणीही माझ्या प्रश्नाचे प्लीज लवकर उत्तर द्यावे ही विनन्ती. तसेच इतर कुणी यातले जाणकार असतील तर त्यानी उत्तर दिले तरी चालेल.

शनीवारी अलिबागला फिरायला गेलो होतो. बीचवर ताडगोळे विकायला होते, ते आम्ही आणले आणी फ्रिझमध्ये ठेवलेत. काही वेळेस ताजा नारळ ( अख्खा, न सोललेला नारळ) पण फ्रिझमध्ये आम्ही ठेवतो, तो १५-२० दिवस तरी टिकतो. पण हे ताडगोळे अजून चान्गले असतील का? म्हणजे खाण्यालायक राहीले असतील का? मुलाना दिले तर चालेल का? हे विचारायचे आहे. कृपया सान्गावे.

काही वेळेस ताजा नारळ ( अख्खा, न सोललेला नारळ) पण फ्रिझमध्ये आम्ही ठेवतो, तो १५-२० दिवस तरी टिकतो. पण हे ताडगोळे अजून चान्गले असतील का? म्हणजे खाण्यालायक राहीले असतील का? >>>>>

रश्मी - न सोललेल्या नारळाला करवंटीचे संरक्षण असते - त्यामुळे तो टिकेल पण ताडगोळे हे सूक्ष्मजीव वाढायला प्रोन किंवा व्हल्नरेबल आहेत - त्यामुळे खाऊ नयेत - (एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होनेके नाते .... Happy Wink )
(फ्रिझचे तपमान हे फार थंड नाहीये - उणे ५ डि. से. किंवा त्या खालीही- त्यामुळे फ्रिझच्या तपमानात - साधारणतः ८ ते १२ डी. से. - सूक्ष्मजीव हळूहळू का होईना वाढणारच - बेटर डोण्ट इट ... )

अरेरे!
धन्यवाद शशान्क.:स्मित: पैसे वाया गेल्याचे दु:ख आहे, पण निदान ते खाल्ल्याने जी जास्त हानी होईल ती तरी टळेल. कारण हे ताडगोळे मुलानाच जास्त आवडले होते आणी लहान मुलान्ची प्रतीकार शक्ती तशी कमी असते, त्यामुळे न देणेच उत्तम. लवकर उत्तर दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.

Pages