निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संत्राईच है साधना.. इथे सर्वच काही ऑर्गेनिक..त्यामुळे वेगळा शिक्का लावण्याची गरज पडत नाही.. ऑल फ्रेश फ्रॉम द गार्डन..

जागुली की तारीफ जितनी करो कम है भाई.. Happy

वर्षू, डीझायनर संत्री ! मस्त दिसताहेत. आणि हातानी झाडावर पिकलेली फळे तोडून खाण्यासारखे सुख नाही.

मी मागे वाचले होते, कि थायलंड मधे असे एक गार्डन आहे.

माझ्या आठवणीत बडोद्याला एक पेरुची बाग होती अशी. बागेत खाऊ तितके पेरु फुकट.. बाहेर न्यायला चार आणे रत्तल भाव होता... ( माझ्या लहानपणी Happy )

पादुकानंद... मला नैरोबीमधे फ्रि़जची गरजच वाटली नाही. सर्व ताजे मिळायचे आणि तिथल्या थंड हवेत अगदी दूधही बाहेर ठेवले तरी नासायचे नाही.

कोरडे मसाले, डाळी, रवा साठी मात्र मला फ्रिज हवा असतो ( मी सध्या अंगोलात आहे ) हे पदार्थ बाहेर ठेवले तर त्यात अळ्या होतात. भाज्या पण फ्रोझनच मिळतात बहुतेक. फ्रीजमधल्या मिठाया मायक्रोवेव्ह मधे थोड्या गरम करुन घेतल्या तर चांगल्या लागतात.

केळी, स्ट्रॉबेरीज आणि टोमॅटो मात्र कधीही फ्रीजमधे ठेवू नयेत. चव उतरते त्यांची.

चव उतरतेत् त्यांची.
>>
ही कुठली मराठी ? अंगोलातली का? ::दिवा:
नैरोबी म्हणजे इट्सेल्फ फ्रीज आहे तर.

रच्याकने, मायक्रोवेव्ह मधे केले ले पदार्थ खायला नॅचरोपाथ लोकांचा विरोध का असतो ?

मागच्या पानावर मी टाकलेले टायगर स्ट्राईप्ड फुपा.. पुष्कळ निगप्रेमींच्या नजरेतून सुटलेलं वाटलं..
म्हणून.. चलो इक बार फिर् से

आणी हे अजून एक अनोखे.. काळ्या आणी गुलाबी पंखांचे

फुलपाखरं अन मांजरी मस्तच .. Happy
बर माझ्या मार्जारप्रेमी मित्र म्हणतो कि मांजरी जास्त एक्स्प्रेसिव्ह असतात.. चेहर्‍यावरचे हावभाव वगैरे.. मी नाही नै म्हणत पण तो म्हनतो कुत्रांपेक्षा जास्त.. तिथे माझ्या हळव्या मनात असंतोषाची ठिणगी पडली आणि मैने उसको करारा जवाब दिया..
तर जाणकार प्रकाश टाका कि मांजर जास्त एक्स्प्रेसिव्ह असत कि कुत्रा ?

उतरते ... टायपो झाला होता.

आफ्रिका म्हणजे वाळवंट, जंगल, उष्ण प्रदेश असे चित्र लोकांच्या मनात असते. नैरोबीच नव्हे तर हरारे, जोहान्सबर्ग, अदीस अबाबा हि थंड हवेची ठिकाणे आहेत ( अति उंचीवर आहेत ) या उंचीवरील विमानतळांवरून विमाने उडवताना जास्त इंधन जाळावे लागते.

किलिमांजारो आणि माऊंट केनया हे दोन पर्वत आफ्रिकेत असून दोघांवरही बर्फ पडतो. किलिमांजारोवर कायमस्वरुपी बर्फ असतो ( आता तो कमी कमी होत चाललाय )

भारतासाठी खुपदा खंडप्राय असा शब्द वापरतात आफ्रिका हे खरोखरीच महाकाय खंड आहे. ( गेली ११ वर्षे या खंडात आहे मी ) आजवर या खंडाची केवळ लूटच झालीय. अजूनही चालूच आहे.

दिनेश, बरोबर म्हणालास.. एका पॉइंट्ला आम्ही आदिस अबाबा ला जाऊन राहण्याचा विचार करत होतो.. सुंदर क्लायमेट, फ्रेंडली लोकं.. आफ्रिकेतील सेफ हेवन. मे बी!!! Happy

सुप्रभात.

हरभरे यायला लागलेत ना आता म्हणजे झाडे वाढलीच असणार Lol

वर्षूताई सगळे फोटो मस्त.

मागच्या पानावर नवीन वर्षाच्या शुभेच्छां सोबत माझ्या घरी आत्ता फुलतं असलेल्या गुलाबांचा फोटो टाकलाय तो कुणीच पाहिला नाही का? एकही Comment नाही Sad

जागुताई तुम्ही खरेच निसर्गकन्या आहात. तुमचे बी बी वाचताना एखाध्या डेरेदार वृक्षाच्या थंडगार छायेत बसल्यासारखे वाटते. तुमचे बालपण शेतावरच गेल्याने तुमच्या लिखाणाला एक मिट्टी की खुशबू आहे . तुमच्या लिखाणातून ही तुमच्या व्यक्तिमत्वातील मार्दव प्रतीत होते.++++ प्रतिसाद खुप आवडला. Happy

स्निग्धा छान आहेत गुलाब.

सायु माझा प्रतिसाद वाचलास का हरभर्‍याचा त्यासाठीच आहे. Lol

इंद्रा मस्त फोटो.

आमच्याकडे फूड पॉइझनिन्गची केस नक्कीच होणार आहे एखादे दिवशी...
>>>
असलं काही बोलू नये ओ Happy
यावर्षी सगळ्यांनी जानबुझके आपल्या आसपासची निगेटिव्हीटी दूर ठेवा. खुप गरजेचं आहे हे Happy

जागुकडे हरबर्‍याची झाडे बहरली असतील फुल्ल टू.. जागुले पडू नकोस बाई Wink Proud

ओह स्निग्धा.. स्वारी.. खूप क्यूटी आहे तुझा गुलाब!!!

इन्द्रा, मस्त आहे कॅसिया,ब्यूटिफुल रंग ..

उंदीरमारीच आहे तो. इतक्यात फुलायला पण लागला ?
वाशीला एक पुर्ण टेकडी या झांडानी गुलाबी होऊन जाते या दिवसात.

हो वर्षू, अदीस अबाबा त्या मानाने खुप सेफ आहे. हवामान तर सुंदर आहेच. आणि त्या देशात बघण्यासारखेही खुप आहे. त्यांची शीबा राणी भारतात येऊन गेली होती असे म्हणतात, पण आपल्याकडे तिचा उल्लेख कुठे वाचला नाही मी.

त्या देशात आपल्या कडच्या वेरुळ प्रमाणे, खडकात कोरून काढलेले एक चर्च आहे. अजूनही वापरात आहे ते.

ऑस्ट्रेलियन पत्रकार डॅव्हीड अ‍ॅडम्स याची, जर्नीज टूवर्ड्स एन्ड ऑफ वर्ल्ड नावाची एक मालिका यू ट्यूबवर आहे.
त्यात त्याने या देशांबरोबरच अनेक देशात केलेल्या अनोख्या सफरींचे चित्रण आहे. ( इथिओपियातली तीर्थ यात्रा आहे त्यात. )

या फळाचं काय नांव आहे बरं??इकडचे लोकल्स याला चायनीज पॅशन फ्रूट म्हणतात.. मोठ्ठ्या झाडावर हे लगडलेले दिसले.. फोटोत आकाराने मोठे दिसत असले तरी अ‍ॅक्चुली लहान मुलांच्या क्रिकेट च्या खेळातल्या चेंडू एव्हढाच आकार आहे..

हे झाड

Pages