रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
@ली - गुलाबाच्या रोपाचे अनेक
@ली - गुलाबाच्या रोपाचे अनेक बारकावे अगदी काबिल ए तारिफ .... मस्तच ... :- +१
क्र - ५ अत्युत्तम
टीना, शशांकजी, जागु, आत्मबंध
टीना, शशांकजी, जागु, आत्मबंध मनापासुन आभार..
जागु, रांगोळी शेयर केलीस, छान वाटले..:) तो लक्ष्मी पुजनाचा साचा पण खुप गोड आहे..:)
सगळ्यांच्या नवीन रांगोळ्या
सगळ्यांच्या नवीन रांगोळ्या एक्दम सुंदर
ह्याला लांबुन पाहिल्यावर
ह्याला लांबुन पाहिल्यावर लक्ष्मी दिसते.
>>
डोळे अगदी बारिक किलकिले करून पाहिले तरी दिसते लक्ष्मी
आवडला हा साचा मला
डोळे अगदी बारिक किलकिले करून
डोळे अगदी बारिक किलकिले करून पाहिले तरी दिसते लक्ष्मी >>>> +११११
मला पन दिसली.. मस्ताय साचे ए
मला पन दिसली..
मस्ताय साचे
ए सायली,
नागपुरात कितीला भेटतात सांग तर जरा..
गुलाब रांगोळी क्रं ७
गुलाब रांगोळी क्रं ७
एका समारंभा निमीत्य बाहेर
एका समारंभा निमीत्य बाहेर गावी गेले होते, त्यामुळे ईतके दिवस रांगोळी टाकु शकले नाही..
आणि हो जागु ला गोपद्माचा साचा मी दिला आहे, लक्ष्मी पुजनाचा नाही..
तो साचा मला पण खुप आवडला..
सायली - मस्तच आहेत हे गुलाबही
सायली - मस्तच आहेत हे गुलाबही ... वेली गुलाब आहे का ??
वा सुंदर गुलाब.
वा सुंदर गुलाब.
सायली - मस्तच आहेत हे गुलाबही
सायली - मस्तच आहेत हे गुलाबही ... वेली गुलाब आहे का ?? >> हो तोच दिसतोय
तरीच मी म्हणत होते आज रांगोळी
तरीच मी म्हणत होते आज रांगोळी कशी नाही?
सायु, तुला असे कुठे जायची परवानगी नाहीये हं(स्मित).
आम्ही तुझ्या रांगोळ्या मिस् करतो त्याच काय?
हो हो वेली गुलाबच.. तुम्ही
हो हो वेली गुलाबच..
तुम्ही सगळ्यांनी रांगोळ्या मीस केल्या वाचुन खुप आनंद झाला..
मी पण धागा खुप मीस केला... हात नुसते सळसळत होते, शेवटी तीथे लग्नात एक मोठी संस्कार भारतीची
रांगोळी काढलीच...
फोटो नंतर टाकते..
हात नुसते सळसळत होते, शेवटी
हात नुसते सळसळत होते, शेवटी तीथे लग्नात एक मोठी संस्कार भारतीची
रांगोळी काढलीच... >> जे ब्बात.. मस्तच.. लवकर दाखव आता फोटो..
सायु नेहमीप्रमाणे अप्रतिम
सायु नेहमीप्रमाणे अप्रतिम च!!! टिना, आत्मबंध खूप सुंदर . जागु छाप छान आहे.माझ्या कडे लक्ष्मी पावलां मधे ती सगळी चिन्हे आहेत .
गुलाब रांगोळी क्रं. ८
गुलाब रांगोळी क्रं. ८

ही लग्नात काढलेली.. (जास्त
ही लग्नात काढलेली.. (जास्त रंग नव्हते त्यामुळे खुप खास नाही आलीये)


सायुतै, तु आणि आत्मबंध तुम्हा
सायुतै, तु आणि आत्मबंध तुम्हा दोघांना "खुप खास नाही आलीये" हे वाक्य टाकायची परवानगी नाहीये.. खरी सुगरण कशी नुसत तिखट-मीठ दिल तरी पदार्थाला लज्जत आणते तसे आहात तुम्ही दोघे...
खरी सुगरण कशी नुसत तिखट-मीठ
खरी सुगरण कशी नुसत तिखट-मीठ दिल तरी पदार्थाला लज्जत आणते तसे आहात तुम्ही दोघे... >>> +++१११
मुग्धा, शब्दाली.. काही ही
मुग्धा, शब्दाली.. काही ही हा!..
सायुतै, तु आणि आत्मबंध तुम्हा
सायुतै, तु आणि आत्मबंध तुम्हा दोघांना "खुप खास नाही आलीये" हे वाक्य टाकायची परवानगी नाहीये.. खरी सुगरण कशी नुसत तिखट-मीठ दिल तरी पदार्थाला लज्जत आणते तसे आहात तुम्ही दोघे... >> +१
सायू, गुलाबाची अप्रतिम. या
सायू, गुलाबाची अप्रतिम.
या आठवड्याची थिम काय आहे??
चिऊ ताई, नविन थीम... फोटो
चिऊ ताई, नविन थीम...:)
फोटो साईज लहान आहे, उद्या मोठा फोटो टाकीन..
सायु, चरण दाखव बाई तुझे, एकदा
सायु, चरण दाखव बाई तुझे, एकदा नमस्कार करुनच घेते.
यु आर सिंपली ग्रेट
शब्दाली, काहीही हा!!
शब्दाली, काहीही हा!!
नुसता नमस्कार नको करुस श तै,
नुसता नमस्कार नको करुस श तै, फोटो काढ, त्याची फ्रेम कर आणि लाव घरात. फ्रेम करण्यापूर्वी फोटो मला पाठव कस्कायवर.
खरयं मुग्धा. आमच्या चिमुकल्या
खरयं मुग्धा.
आमच्या चिमुकल्या मेंदुत असल्या सुपीक कल्पनाच येत नाही मग हात वळणे वगैरे प्रकार लांबच
आमच्या नै राणी आपल्या म्हण.
आमच्या नै राणी आपल्या म्हण.
सायु, चरण दाखव बाई तुझे, एकदा
सायु, चरण दाखव बाई तुझे, एकदा नमस्कार करुनच घेते. >> +१
आमच्या चिमुकल्या मेंदुत
आमच्या चिमुकल्या मेंदुत असल्या सुपीक कल्पनाच येत नाही मग हात वळणे वगैरे प्रकार लांबच+++ मुळ ल्पना माझी नाई ग बाई, सुखद च्या शाळेत एका क्यालेंडर वर पाहीलेल चित्र आहे.. ते मी रांगोळीत उतरवण्याचा प्रयत्न केला, बस...
मुग्धा, शब्दाली, चनस खुप खुप आभार..:)
Pages