दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारे आयुष्य "शेतकरी" या विषयाशीच जुंपून घेतलेले एक प्रभावी नेतृत्व...अखेरच्या श्वासापर्यंत शेतक-यांच्या उन्नतीसाठीच जगत होते. शरद जोशी याना भावपूर्ण श्रद्धांजली.

साधना Sad

साधनाचा "मेरा साया" पाहिला आणि तिच्या अभिनयाची ताकद समजुन आली. एकाचवेळी अत्यंत सोज्वळ अशी भारतीय स्त्री अशी ती "परख" सारख्या चित्रपटामध्ये "ओ सजना बरखा बहार आयी" म्हणताना जाणवली होती. तर दुसर्‍या टोकाला तिच्यात एक मदनिकादेखिल दडली होती जी "वक्त" सारख्या चित्रपटांमध्ये समोर आली. हिन्दी चित्रपटसृष्टीत या दोन्ही बाजु सारख्याच सामर्थ्याने व्यक्त करु शकणारी उदाहरणे मला तरी फार कमी आढळली आहेत. आणि हेच मला साधनाचं बलस्थान वाटतं. एकाच चित्रपटात "झुमका गिरा रे" म्हणणारी रस्त्यावर धम्माल नाचणारी साधना आणि "नैनोंमे बदरा छाये" म्हणणारी सुनिलदत्तची प्रिय पत्नी या आपल्याला खटकत नाहीत. सोज्वळ भुमिकेत चपखल बसणारी ही अभिनेत्री "ओ मेरे बैरागी भवरा" म्हणत धर्मेंद्रला आपल्यासोबत संमोहित केल्यासारखं नेते. तिला आदरांजली वाहताना निरागस सौंदर्यात दडलेला शृंगार ही साधनाने आपल्याला दिलेली फार मोठी देणगी आहे असं मला वाटतं.

साधनाचा कपाळावर कट केलेले केस आननारा कट 'साधना कट 'म्हणून प्रसिद्ध होता. सलूनमध्ये खास करून लहान मुलींचा 'साधना कट 'करण्याबाबत फर्माईश केली जायची. ही मूळ फ्याशन ऑल्ड्रे हेपबर्न हिची. साधनाला भारताची ऑल्ड्रे हेपबर्नही म्हटले जायचे. त्या काळी हॉलीवूड तारका/ तारे यांच्याशी तुलना नट नट्याना सुखावून जायची. हल्ली बॉलीवूड स्टार हॉलीवूडवाल्यांपेक्षा स्वतःला कमी समजत नाहीत हा फरक झालाय खरा.

ओह Sad

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

आजोबांच्या खोलीत आता धुकं... धुकं... धुकं....

Pages