
नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वेल्कम ब्याक !!!
वेल्कम ब्याक !!!
दिनेश , चांदण्यांच शेत आणि
दिनेश , चांदण्यांच शेत आणि राजस कांचन दोन्ही फार सुरेख. राजस कांचन हे नामकरण आवडलं खूप . आमच्याकडे ही आगरात मोठा चाफा आणि ही स्पायडर लिली आहे मी कालच हे दोन्ही फोटो टाकणार होते इथे सुतार पक्ष्यांचा टाकला तेव्हा ( स्मित) आता टाकते.
तुझ्या रिक्षेने फिरुन आले. तो जो मनिमोहोर आहे का म्ह्णून विचारलेस तो रोवन आहे. >>> नलिनी धन्स. मी गुगलुन पाहिल तु रोवन लिहीलस म्हणून खरच फॉल मध्ये हे झाड अप्रतिम दिसत .
टीना येल्क्म बॅक . किती दिवस होतीस कोमात ( स्मित)
इतक्या >>>>>>> दिवसांचे हे
इतक्या >>>>>>> दिवसांचे हे एव्हढे>>>>>>>>>>> फोटो, माहिती...... एक से बढकर एक.. काय काय पाहू आणी किती किती वाचू असे झाले होते.. हा...सगळा बॅकलॉग भरून निघाला आज..
मस्त मस्त फ्रेश वाटतंय..
सुप्रभात निगकर्स......
सुप्रभात निगकर्स...... डिसेंबरच्या एन्डास आली बै थोडीश्शी थंडी आमच्या नगरात!
फोटो, माहिती...... एक से बढकर एक.. काय काय पाहू आणी किती किती वाचू असे झाले होते.. हा...सगळा बॅकलॉग भरून निघाला आज.. स्मित>>>>>>> वर्षू डियर........सेम हियर!
टिने ....वेल्कम ब्याक गं बै!
हा तामणही आमच्याच कॉलनीतला.
हा तामणही आमच्याच कॉलनीतला. ही पण लवकर फुलणारी हायब्रीड जात आहे असे वाटते. जांभळ्या रंगाच्या दोन तीन छटा दिसताहेत,
ताम्हण, आ हा हा!... टीना आणि
ताम्हण, आ हा हा!...
टीना आणि वर्षु दी वेलकम बॉक..:)
दिनेश ते लवेन्डर कलरचं
दिनेश ते लवेन्डर कलरचं फूल...त्याच्या पाकळ्या कसल्या झिरमिरीत नाजूक आहेत. अहाहा!
हेमा ताई, चाफा आणि लीली कसली
हेमा ताई, चाफा आणि लीली कसली गोड आहे..
ऑफीस मधे, मझ्या खुर्ची जवळच
ऑफीस मधे, मझ्या खुर्ची जवळच एक खिडकी आहे ,तीथे एक औदुंबराचे झाड आहे, हिरव्या आणि अबोली फळांनी लगडलेले,
त्यामुळे बर्याच पक्षांची रेलचेल आहे.. चिमण्या, कावळे, बुलबुल, पारवे, सुर्यपक्षी, मैना, साळुंक्या नियमीत येतात..
सगळ्यांच्या वेळा देखिल ठरलेल्या...अधुन मधुन कोकीळ पण दिसते. आज दत्त जयंती, चक्क भारद्वाज पक्षी आनंदात विहार करतो आहे.. ( दत्ताच्या फोटो मधे असतो बघा भारद्वाज पक्षी) मी आत्ताच त्या झाडाला नमस्कार करुन प्रदक्षिणा घालुन आले...
असे म्हणतात ,ज्या झाडावर हा पक्षी असेल त्याला प्रदक्षिणा घातली की, नवर्याला दिर्घ आयुष्या मिळते,. असो..
खुप आनंद झाला, म्हणुन ईथे व्यक्त करते आहे..
(फोन वर फटो खुप धुसर येतोय, म्हणुन टाकत नाहीये)
सायु, किती ग्वाड लिहिलंयस
सायु, किती ग्वाड लिहिलंयस गं..
आणी वेल्कम बद्दल थांकु..
दिनेश, , चिंगमाय मधे असताना रोज भेटायचा तो हाच तामण, सुंदर, जांभळ्या रंगाच्या नाजूक लेस पासून बनलेला जसा..
मानु.. मला थंडी खूप्पच प्रिय आहे.. यू एंजॉय नगर थंडी.. काल मुंबई ही गार पडली होती असं वाचलं..
बरं वाटलं ऐकून..
ममो, चाफा आणी लिली किती
ममो, चाफा आणी लिली किती टप्पोरी आहे, सुंदर
शार्लेट मधील एक गार गार
शार्लेट मधील एक गार गार दुपार!!!!!!!!!
आमच्याकडंबी आली बरका थंडी.
आमच्याकडंबी आली बरका थंडी. आत्ताच कुड्कुडाय लागलेय. थांबा वाईच. स्वेटर घालून येते.
सायु, उंबराखालून जाताना एकतरी
सायु, उंबराखालून जाताना एकतरी उंबर खायचे असाही दंडक आहे !
वर्षू, काय मस्त जागा आहे. मी तर त्या खुर्चीतच झोपून जाईन...
ज्यांना ज्यांना थंडी प्रिय
ज्यांना ज्यांना थंडी प्रिय आहे त्यांनी या बरे माझ्याकडे.
आमच्या घराच्या भिंतीखालुन
आमच्या घराच्या भिंतीखालुन (बाहेरच्या बाजुने) जवळपास पाचव्यांदा साप निघाला.
हा साप पुर्ण हिरवा (परंतु हरणटोळ का काय म्हणतात तेव्हढा हिरवाकंच नाही. डार्क मेंदी कलरचा).. पुर्ण वाढ झालेला होता. बहुतेक खालच्या बाजुने थोडा पिवळसर होता (असे स्मरते). त्याने नुकत्याच एका बेडकाला अर्धे खाल्ले होते.
त्याला कसेबसे मोठ्या बरणीत धरुन (कारण लोकांचे मत होते कि तो विषारी नव्हता) सोसा. मधल्या मुलांनी सर्पोद्यानात नेऊन दिले. त्यांनी सांगितले कि "हा साप कोब्राच्या खालोखाल विषारी असून झाडावर राहातो.. तेव्हा पुन्हा दिसल्यास सावध रहा". (पण सापाची जात ना यांनी विचारली.. ना त्यांनी सांगितली) सर्पोद्यान वाल्यांनी एक फॉर्म भरुन घेतला आणि सोसा. मधले लोक्स घरी आले.
मी त्या सापाची जात शोधण्याचा (गुगल वरुन) बराच प्रयत्न केला पण "ग्रीन स्नेक्स इन इंडिया" असे टाकल्यावर ज्या इमेजेस येतात त्याच्याशी तो मॅच होतो असे वाटत नाही. सोसा. मधल्या लोकांनी फोटो दिले कि इथे टाकेनच. (पण ते फार लांबुन काढलेत कारण तो जवळ गेल्यावर दंश करायचा प्रयत्न करत होता).
तोवर कोणी वर्णनावरुन सापाची जात ओळखु शकेल का?
* बराचसा ग्रीन कीलबॅक सारखा दिसत होता.
(तो जर ग्रीन कीलबॅक असेल तर गुगल सांगते कि ग्रीन कीलबॅक नॉन पॉयझनस आहे. मग सर्पोद्यान वाल्यांनी असे का सांगितले असावे?)
नलिनी.. बघ हाँ.. मै फ्रीच
नलिनी.. बघ हाँ.. मै फ्रीच रहती हूँ.. इन्विटेशन अॅक्सेप्ट कर लेती हूँ
पियु, सांभाळून... माहिती देतीलच कुणी तरी इथे..
Indian Pit Viper: The Indian
Indian Pit Viper: The Indian Green Pit Viper is also known as bamboo snake or tree viper, it is one of the most common of the Pit Vipers family, mainly live on arboreal, living in vines, bushes and bamboos. There is a group of snakes that are known as Pit Vipers, Not only are these snakes venomous they also have a very ‘cool’ heat sensing system. The green snake feed frogs,lizards and insects, it grows to a length of 2.5 feet. Another species of pit viper is Malabar pit viper, highly venomous snake found mostly at western ghat of India.
Indian-Pit-Viper असेल का? वरची माहिती आंतरजालावरून आहे.दुसरा कॉमन वाईन स्नेक (हरणटोळ?) दिसतोय.
http://www.toxicologycentre.com/snakesimg/vinesnakes/commonvinesnake.jpg
थँक्स देवकी. तो
थँक्स देवकी. तो https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bc/Bamboo_Pit.jpg... असाच दिसत होता. हॅट्स ऑफ. एवढ्याश्या वर्णनावरुन सांगितलंस तू मला.
बहोत दिनो बाद, मेरी भी रिक्षा
बहोत दिनो बाद, मेरी भी रिक्षा
http://www.maayboli.com/node/56921
सायु, किती छान लिहीलयस ग.
सायु, किती छान लिहीलयस ग. वाचुन झाल्यावर ही किती तरी वेळ छान वाटत राहिल.
तामण माझं खूप आवडत फुल. फोटो ही मस्त . ह्यातले सगळेच रंग सुंदर असतात.
वर्षु, गारेगार दुपार बघुन खरच गार वाटलं . तुझ्या रिक्षातुन आले फिरुन वर्षु.
मी पण थंडी प्रिय असणारी अगदी जीव घेणी असली तरी ही.
पियुला उत्तर मिळाल ही इतक्या लगेच. . देवकी ग्रेट आहेस.
आमच्या़कडे गावाला खूप तर्हेच्या जास्वंदी आहेत त्यापैकीच ही एक
जय गुगलकाका!
जय गुगलकाका!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/55016?page=2
ही आपल्याच नि. ग. ग्रुपची भाग २७ पृष्ठ ३ ची लिंक आहे.
श्रीलंकेतील Green Pit Viper चा प्रचि शेअर केलाय..
कृपया सर्वात शेवटी पहा..
थोडे नवलाचे आहे पण मी
थोडे नवलाचे आहे पण मी इथिओपियन एअरलाइन्सच्या इन फ्लाईट मॅगझिन मधे वाचले होते, कि आफ्रिका खंडात विषारी साप कमी आहेत आणि सर्पदंशाच्या केसेस पण कमी आहेत कारण इथली माणसे आणि साप एकमेकांच्या वाटेला जात नाहीत.
नाही म्हणायला क्लीओपात्राने सर्पदंश करवून घेतला होता. ( क्लीओपात्रा आणि तिचा मिस्र देश म्हणजेच इजिप्त आफ्रिका खंडात आहे. ) व त्यानेच तिचा मृत्यू झाला होता.
आफ्रिका खंडात विषारी साप कमी
आफ्रिका खंडात विषारी साप कमी आहेत >> मी आत्ता काही दिवसांपूर्वी एका सापाबद्दल वाचत होती.. मधे मधे कस्काय वर सोनेरी सापाची फेक पोस्ट फिरत होती ना त्या अनुषंगाने.. तर तो दाखवलाय तितका नै पण सोनेरी रंगाचा सर्प आहे जो आफ्रिका कि दक्षिण अमेरिकेजवळच्या एका आयलॅण्ड वर असतो.. त्याचा अधिवास तिथे संपूर्ण सुरक्षित करण्यात आला आहे म्हणून तिथे कुणालाही जायला मनाई आहे अस वाचण्यात आल..
तो गोल्डन पिट वायपर नव्हे.. आता परत नाव विसरली म्हणून शोधणे आले..
परत बघीतल... तो गोल्डन पिट
परत बघीतल...
तो गोल्डन पिट वायपरच आहे.. आणि ब्राझिल जवळच्या Queimada Grande island वर असतो..
मी माझे आधीच्या पोस्टीतले शब्द मागे घेते ..
नायजेरियात पिवळे अजगर बरेच
नायजेरियात पिवळे अजगर बरेच दिसतात... आणि तिथे ते खातात
आडगावातल्या बाजारात रस्त्यावरही विकायला असतात. ( नायजेरिया आफ्रिकेत आहे
)
सायु, उंबराखालून जाताना एकतरी
सायु, उंबराखालून जाताना एकतरी उंबर खायचे असाही दंडक आहे !++ हो दादा माहिती आहे..
वर्षु दी क्रीसमस ट्री मस्तच.. आणि गार गार दुपार इथे नागपूर ला सुद्धा बर का! नागपूर चक्क ८...:)
हेमा ताई, कसला गोड रंग आहे त्या जास्वंदीचा..
पियु, सावध रहा.. मला ऐकुनच काटा आला आंगावर..
यवतमाळ पासुन अगदी १२ १३ किमी
यवतमाळ पासुन अगदी १२ १३ किमी वर मनदेव नावाच एक ठिकाण आहे..
ठिकाण म्हणजे हेमाडपंथी शिवालय.. आता तिथ त्यांनी एक मस्त गार्डन सुद्धा केलय शिवालयाच्या विरुद्ध दिशेला.. ५रु फि ठेवली तेवढाच गावात एक दोन पोरांना रोजगार म्हणून.. तिथ एक झाड दिसल ज्यात नैसर्गिक रित्या बनलेली ढोली आहे.. आय वंडर त्यात रात्री एखाद घुबड वगैरे राहत असेल का ते ?.. फोटो टाकते २ मिनटात..
हि बघा ती ढोली : साईझ
हि बघा ती ढोली :
साईझ मुद्दाम मोठी टाकली.. एखाद्याला त्या ढोलीत व्हर्चुअली बसायच सुख घ्यायच असेल तर पटापट लाईन मधे लागा
Pages