निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ग सायली, माझा जीवच थाऱ्यावर नव्हता, मीच अस्वस्थ झाले, गुदमरले अक्षरशः ते एक फुल आतल्याआत घुसमटले बघुन. आता रोज लक्षच ठेवणार.

धन्यवाद जागू.

लहान कुंडीत मी ठेऊन अन्याय करतेय त्यांच्यावर ही भावना आहेच. सोसायटीत खाली लावणार होते पण बरीच रोपे इथे काढून टाकली आणि रोज पाणी घालायला जायला मला जमणार नाही.

अन्जु ताई, आम्ही समजु शकते तुमची अवस्था..:)
मी शमी समजुन लावलेल्या तरवडीला जेव्हा फुलं आलेली, तेव्हा मी चक्क झोपेत बडबडत होते,, ही शमी नाहीच, आता काय करायचे!!!....

दुसर्‍या दिवशी सकाळी चहा घेतांना नवर्‍याने खुप फिरकी घेतली... सारख सारख तेच तेच म्हणत होता.. ही शमी नाहीच, आता काय करायचे!!!.... Happy

Lol

नवरा त्या ग्रीलमध्ये जाऊन कुंड्या पण बघत नाही. मीच त्याला नेऊन नेऊन दाखवत असते आणि फोटो काढून घेत असते.

सर्वांना धन्यवाद.
अर्रे....म्हण्जे मंडळी आपली अन्जू माझ्यापेक्षा फक्त काही दिवसांनीच मोठी !!!!!!!!! Wink
पंत ची मुतले नीले जाम्भले...>>>>>>>>>> अग' साधना शाळ्करी दिवस आठवले...:खोखो:

मानुषी, वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा !!! ह्या सदाफुली सारखी नेहमी फुलत रहा.

गिफ्ट तर काय ह्या वर्षी तुला ऑलरेडी मिळालंच आहे आणि ते सुद्धा अगदी अनमोल ( स्मित )

From mayboli

सर्व नि.ग.करांचे गुच्छ, फुलं सर्व पोचलं.
धन्यवाद मंडळी.
ममो....पिल्लं चार्जिंगला.....:खोखो:..... चो च्वीट!
गिफ्ट तर काय ह्या वर्षी तुला ऑलरेडी मिळालंच आहे आणि ते सुद्धा अगदी अनमोल ( स्मित ).>>>>>>>>...हो गं ममो....सध्या गिफ्टाबरोबरच आहे. म्हणूनच इथे यायला जास्त वेळ मिळ्त नाही.
दिनेश सध्या पुण्यात. नगरला गेले की मग भरपूर पक्ष्यांना दाणे घालता येतात.

भुईमूगाचे शेत किती जणांनी बघितलेय ? याची फुटभर उंचीची झाडे असतात. त्याला पिवळी फुले येतात. या फुलांचे परागीभवन झाले कि त्याची आरी होते. ती जमिनीत जाणे आवश्यक असते आणि ती जमिनीत गेल्यावरच तिला शेंग लागते. या आर्‍या जमिनीत जाव्यात म्ह्णून खास प्रयत्न करावे लागतात. त्यावरून रिकामा ड्रम फिरवावा लागतो वगैरे. हे शेत पायानी तुडवले तरी शेतकर्‍याला राग येत नाही, कारण त्याने आर्‍या जमिनीत जायला मदतच होते.. हे सगळे आठवायचे कारण म्हणजे आमच्या सोसायटीच्या आवारात अशीच एका प्रकारच्या झाडाची लागवड केलीय, ती पाने आणि फुले दिसतातही छान पण अजून त्या आर्‍या मी उचकटून बघितल्या नाहीत ( बरं नाही
दिसणार म्ह्णून Happy ) पण फोटो मात्र बघा..

ही फुले ( आकारानी नखाएवढीच आहेत )

हे शेत

हे ही

दा माझ्या वडीलांनी एक वर्ष लावल होत शेंगदाण्याच शेत. छान शेंगा धरल्या होत्या. पण आमच्याइथे डिमांड नाही.

मी पण नंतर हौस म्हणून लावायचे भुईमुगाच्या शेंगा.

पिल्ल्लं चार्जिंगला लावली आहेत >> Lol

मानुषीतै.. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दिनेश्दा.. आम्ही कुंडीतच २ शेंगदाणे पेरले होते.. तेव्हा नीट फुले बघितली ..शेतात अश्या सीझनला जाणं जमलं नव्हतं कधीच.. वेल पिवळी झाल्यावर काढली तर ४ ओले शेंगदाणे मिळाले Proud

पिल्ल्लं चार्जिंगला लावली आहेत >> Rofl

दिनेशदा, हिरवळ सुंदर! Happy

दिनेश्दा.. आम्ही कुंडीतच २ शेंगदाणे पेरले होते.. तेव्हा नीट फुले बघितली ..शेतात अश्या सीझनला जाणं जमलं नव्हतं कधीच.. वेल पिवळी झाल्यावर काढली तर ४ ओले शेंगदाणे मिळाले>>>>>>>>>+ १ . Happy

आमच्याकडे भुईमुगाची लागवड क्वचीतच झाल्याचे आठवते पण मामाकडे दरवर्षी असायचा. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांनी आम्हा सगळ्या (डझनभर) नातवंडांकडून भुईमुग उपटून आणि शेंगा तोडून घेतल्या होत्या. सकाळी सकाळीच जावून ढिगभर भुईमुग उपटून शेजारच्या आंब्याच्या बागेत आपापला ढीग घालायचा. मग गप्पा मारत, आजोबांच्या गोष्टी ऐकत दिवसभर सावलीत बसून शेंगा तोडायच्या. संध्याकाळी घरी जाताना प्रत्येकाने किती झाडाच्या शेंगा तोडल्या ते आजोबा वहीत लिहून ठेवायचे. प्रति झाड १० पैसे हा दर ठरला होता आमच्यासाठी. Happy

आईशप्पत.. बिन तूरेवाला बुलबुल बघितला तर मला वाटायचे याला अजून अक्कलदाढ यायचीय !!!

नले, संगमनेर तालुक्यात बकव्हिट चे पिक घेतात ते माहित आहे का ? प्रा, घाणेकरांच्या एका लेखात उल्लेख होता तसा.

Pages