टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो अंधुक येतो त्याचे काय करावे कळत नाही. मला पण तो प्रश्न सतावतो. आणि त्याचे माप पण फार मोठे होते. त्याला १०० किलोबाईट मध्ये आणताना कसरती कराव्या लागतात. Happy

चित्र पेन्सिलने काढत असाल तर फोटो अंधुकच येणार. चित्र काढून झाल्यावर जाड काळ्या पेनाने गिरवा सगळ्या लाइन्स मग फोटो काढा. मग फोटोशॉप किंवा तत्सम एडिटरमधे फोटोचा कॉन्ट्रास्ट वाढवा. अंधुकपणा उडन छू!

फोटॉशॉपमधेच फोटो वेब वर टाकण्यासाठी डिटेल्स गायब न होता कॉम्प्रेस केला जाण्याची सोय आहे. सेव्ह फॉर वेब अ‍ॅण्ड डिव्हायसेस असा ऑप्शन मिळतो. तो वापरा. त्यात इमेज डिटेल्स मधे लांबी रूंदी मॅनिप्युलेट करून अपेक्षित साइजच्या आतली फाइल मिळवता येते.

मोबाइलवरून फोटो काढणार असाल तर मोबाइलात इमेज एडिटर नावाचे अ‍ॅप टाकून घ्या. फोटोशॉपचे लाइट व्हर्जन असावे तसे आहे ते.

अवांतराबद्दल क्षमस्व.

मी पण फोटो अ‍ॅपलवर काढून तो जड फोटो मग सिंपल रिसाईझ नावाच्या अ‍ॅपने हलका करून घेते.
मग मायबोलीवर टाकते.

महाभारतात दुर्याधन आणि भीम यांचे द्वंद युध्द ठरले असते. मुलाची काळजी वाटुन , गान्धारी ने आपल्या मुलास - दुर्योधनास - निरोप पाठविला की उद्या सकाळी माझ्याकडे ये , पण अंगावर कोणतेही वस्त्र न घालता ये. मी, लग्न झाल्यापासुन माझ्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे. ती मी तुझ्यासाठी काढेन, त्यामुळे त्याच्या पुण्याईमुळे तुला पाहताच, तुझे सर्व अंग वज्रासारखे कठीण होईल, मग भीमापासुन तुला काहीही होणार नाही. त्याप्रमाणे दुर्याधन निघाला. " नागडा " ! ! पण , वाटेत त्याला किसन देवांनी बरोबर गाठलेच. विचारणा केली. दुर्योधनाने खरे तेच सांगुन टाकले ! त्यावर किसन देव म्हणाले, " अरे वेड्या , आई झाली म्हणुन काय झाले ? आईसमोर नागडा लहान होता तेव्हा ठीक होते , आता तु मोठा झाला आहेस. कमीत कमी ही फुलांची माळ तरी कमरेभोवती असु दे " असे म्हणुन किसन देवाने आपल्या गळ्यातील फुलांची माळ दुर्योधनास दिली. त्यालाही ते पटले आणि त्याने कमरेभोवती ती माळ गुंडाळली. गांधारी कडे पोहोचला. गांधारी ने विचारले, " बाळ , आलास काय ? " बाळाने उत्तर दिले, ' होय माते ." पुन्हा गांधारीने विचारले, ' माझी सुचना लक्षात आहे ना ? ' दुर्योधन ' होय , माते ' आणि त्यानंतर गांधारीने डोळ्यांवरची पट्टी काढली. दुर्योधनाकडे पहाताच गांधारी म्हणाली, " घात झाला रे पोरा, घात झाला . " दुर्योधनास काही कळेचना. त्यावर गांधारी म्हणाली, "वाटेत तुला कोणी भेटले होते कां ? ' दुर्योधनाने झालेला प्रकार सांगितला. त्यावर गांधारी म्हणाली,'
" देख, वह नटवर, तुझे फुलोंकी माला दे गया, जिंदगीके फुल तेरे चुनके ले गया !
मेरा क्या है दोष ईसमें , मै तो सच्ची रह गयी, जिस जगह पर्दा किया , वोह जगह कच्ची रह गयी !
आता यात विनोद कुठला आला ? असे काही विचारणारे विचारु शकतील. पण दुर्योधनाला किसन देवांनी कसे हातोहात बनविले, त्याची ष्टोरी सांगावीशी वाटली, म्हणून टंकीले.

या वरच्या कथेत एक लॉजिकल मिस्टेक आहे.

दुर्योधन आपल्या महालातूनच निर्वस्त्र कशाला बाहेर पडला? गांधारीच्या महालात जाऊनही कपडे काढायचे काम करू शकला असता ना? की त्या नवरा माझा नवसाचा सारखे महालातूनच चला ना गडे करायचे होते.

ती कथा इथे क अते कळाले नाही.
ऋन्मेष +१
मी पुर्वी हाच प्रश्न विचारल्यामुळे घरातल्यांचा मार खाल्लेला Proud

मी पुर्वी हाच प्रश्न विचारल्यामुळे घरातल्यांचा मार खाल्लेला >>>>> Lol अरेरे असे प्रश्न विचारु नये बाळे.

महाभारतातल्या लॉजिकल डाउट चा विषय निघाला म्हणून

अर्जुनाला वनवासाची शिक्षा होते तेव्हाचा प्रसंग.
कोणाचातरी हल्ला होतो म्हणून गांडीव घ्यायला तो द्रौपदी च्या कक्षात जातो म्हणून त्याला वनवासाची शिक्षा होते.
पण तो धनुष्याशिवाय दुसऱ्या शस्त्राने लढू शकला असता ना
त्याला बाकीचे शस्त्र पण येत होते की.

Sagalich shastre shastragarat hoti ani tevhach droupadi ani youdhishtir tethe ekantat hote mhanun ani ti shiksha arjun swatahun gheto

vru.jpg

शस्त्रांचे कॅबिनेट बेडरुम मध्ये नसावे>>>
ते दोघे शस्त्रागारातच गप्पा मारत बसले होते. बेडरूम मधे नाही. अर्जुनाला माहीत नव्हते. शिवाय ते दोघे भावरथपणे नुसत्या गप्पाच मारत होते पण तरीही अर्जुनाने स्वतःला शिक्षा करून घेतली.

मै हू ना भारी!

Pages