टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यावर वर एक चित्र काढले आहे मी चिडलो नाही पण नंदिनी माझ्या विरुद्ध असे नेहमी बोलत असते. मी कधीच तिला त्याबद्दल विरोध केला नाही. वाटल आज ती समजेल उद्या ती समजेल पण ती जरा जास्तच करत आहे म्हणून लिहिले वरचे वाक्य. फार संधीसाधू बाई आहे. वाहती नदी दिसली की लगेच येते बोलायला.

धमाल चालू आहे इथे.

एक आकाशकंदिलाच्या प्रकाशात चिकनचं जेवण जेवतानाचं चित्रं येऊ द्या.

बी, अति करू नकोस. तू चिडला आहेस की नाही हे सगळ्या मायबोलीला कळतंय. उगाच तणतण करत बसू नकोस.

हा बीबी विनोदी चित्रांचा आहे. कृपया याचे भान ठेवा अन्यथा अ‍ॅडमिन साहेबांनी विपू नामक गोष्ट दिली आहे त्यात वैयक्तिक हल्ले करत रहावे.
स्वतःचा नसेल तरी इतरांचा मान राखण्यात यावा.

अरारारारारारा ....... इंग्रजी आलं ...... सुधारणेपलिकडे पोचलेत.

बरं जाऊंद्यात ... अजून चित्रं येऊ द्यात मंडळी.

निनाद, साती, कापोचे, जयंत.१ ...

वत्सला, शट अप म्हणजे गप्प बस आणि गेट लॉस्ट म्हणजे चालते व्हा. ह्यात कुठेच हीन भाषा दिसत नाही मला तरी. जर ही हीन भाषा वाटत असेल तर मग मला जे ह्यांच्याकडून वारंवार ऐकायला लागते त्याची पातळी तर ह्यापेक्षा कैक पटीने वाईट असते. तू तुझ प्रेम जरा आवर आणि वेळ मिळाला की ह्या दोघी माझ्या मागे मी कितीही गप्प बसलो तरी किती लागलेल्या असतात ते न्याहाळ. चीड येणे हे खूप स्वाभाविक लक्षण आहे मनुष्याचे. मला चीड आली ती मी व्यक्त केली.

अरे काय चाललंय काय हे?
ज्यांना जे काही बोलायचे असेल ते फक्त चित्र काढूनच बोला बरं!

Pages