टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, लय भारी अर्थ..

आताची ट्रेंड बघता, धागे विणले नाहीत तर उसवले जाणार आहेत असे दिसतेय.. डोळे उघडे ठेवायचे का बंद करायचे... हा प्रश्न आहे......................................................... ( एकदम नाना स्टाईल, आणि पुढचा पॉज.. विक्रम स्टाईल.. )

हा हा हा जयंतराव भारी फॉर्मात आहात... चालू ठेवा! Wink
भिंत आणि धागा... झकास!

साती, म हा न आहात! Biggrin

धागे विणले नाहीत तर उसवले जाणार आहेत असे दिसतेय.. Biggrin

hbpdaki1.jpg.

देवा!:हाहा:

माबो विडंबनकार विश्रांतीगृह >>> :D. आणि फक्त नंबर्स आहेत थडग्यांवर. जो हमारा विडंबन करेगा उसका नामोनिशान मिट जायेगा.

गुगलवर चुटकी सरशी नवीन जिलब्या आय मीन लेखं कधी पाडून मिळणार ?
फक्त तारीख घातली कि झाले !!!

हे भारी आहे दिनेशदा!
खरं तर ही मराठीची तंत्रज्ञानातील पिछेहाट आहे.
मराठी माणसांनी याबाबत काही पावले उचलली पाहिजेत.
Happy

शाळेत असतांना पारखी आडनावाचा माझा एक मित्र होता. तो मराठीच्या पुस्तकात खाली सूचना लिहायचा.
पहिल्या पानावर लिहीलेलं असायचं की ६९ क्रमांकाचं पान जर तुम्ही नाही पाहीलं तर काय फायदा ?
मग उत्सुकतेनं ६९ पान उघडलं तर त्यावर मेसेज असायचा की अरेच्चा, थेट इकडेच आलात ? १७ वं पान गाळलंत ?
मग १७ व्या पानावर गेलं की तिथे सूचना असायची खरं तर ८४ नंबरच्या पानावर जायला पाहीजे होतं. ८४ वर गेलं की ५९, ५९ वर गेलं की शेवटचं पान , शेवटच्या पानावर गेलं की २४.

आणि २४ व्या पानावर लिहीलेलं असायचं, मराठीचा अभ्यास करून पैकीच्या पैकी गुण मिळणार नाहीत. म्हणून गणित, शास्त्राकडे लक्ष द्या. खूप अभ्यास करा. या पारखी मुळेच मराठी भाषेला आजचे दिवस आले असं माझं स्पष्ट मत आहे. डोळे मिटण्यापूर्वी या विषयावर शनिवारवाड्यावर चढून मी भाषण देणार आहे मराठी भाषेची मूळ समस्या कुणामुळे हे एकदा जगाला कळालं की सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील.

Pages