टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनंती
हे सारे आक्षेपार्ह वाटत असेल तर,
माझे मागील वर्तन पाहून मला तांबी देऊन सोडण्यात यावे ही विनंती.
कृपा करून आय डी उडवू नये - एकुलता एका आहे!

मी माझी सर्व चित्रे मागे घेऊन माफी सुद्धा मागेन...
तेव्हा प्लिज बरंका एडमीनराव!!

खुर्चीला तीनच पाय, ते ही जोड वगैरे देऊन उभे केलेले, असूनही ती न डगमगता उभी आहे हे फारच सूचक आहे.

टेबलवरचे स्टँपस .... Lol लै भारी!

निनाद,

तुम्ही आडवळणाने चित्र कशाला पाठवताय इथे? बिनधास्त स्वतःच पोस्टा की? उगाच काहीतरी रहस्य असल्यासारखे वातावरण निर्माण होते. Proud

निनाद तुमची चित्रे लय भारी.:हाहा: आणी सातीला आलेले पण लय भारी.:हाहा: सातीला आलेल्या चित्रात त्या माणसा च्या नजरेत भीती स्पष्ट दिसतेय.:फिदी:

निनाद

त्या ह्यांना त्या याचे हे असल्याने ते लगेच इकडे हे करतील
भाषांतर :त्या डाकुंना विनोदाचे वावडे असल्याने ते लगेच इकडे पाय आपटत येतील (मोल्सवर्थ)

तेव्हां आपण खन्ना हा कोडवर्ड वापरूयात.
टवाळा आवडे खन्ना,

Pages