टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी चित्र बदलले आहे.
आधीच्या चित्रात प्रताधिकार भंग झाला असल्यास क्षमस्व!

सिंडरेला यांना चित्र वापरण्यास परवानगी दिली तर जुने चित्र परत टाकता येईल.

तो फोटो तिनेही बहुतेक नेटवरूनच घेतला असवा. कल्पना नाही.
मग मी किंकर्तव्यमूढ!
Wink

(मिळाला बुवा एकदाचा किंकर्तव्यमूढ हा शब्द वापरायला. Proud )

सिंडरेला यांना चित्र वापरण्यास परवानगी दिली तर जुने चित्र परत टाकता येईल. >> त्यांना परवानगी देउन तुला कसे ते टाकता येइल इथे? Light 1 की ती परवानगी कॅस्केड होत येथे लागू होईल?

सिंडरेला यांनी वापरलेले त्यांचे शेवपुरीचे चित्र म्हणतोय मी...
की मला तुमचा दिवा समजला नाहीये? Proud

अरे हो की रे फारएण्ड्या! लक्षातच आले नाही माझ्या! Happy
गुड फाईंड हां!

टायपो बदलू म्हणताय मग? का राहू देउअ?
राहूच देतो आता इतके झाल्यावर... Wink

सध्याच्या धागा धागा अखंड विणुया महाभागांचे तर चित्र रोज दिसते मला. एकावर ते हे व एका मशिनवर तो हा. दोघे गाणे म्हणत आहेत. 'धागा धागा अखंड विणुया' समोर तयार माल. त्यात त्या हातमागाच्या मशिनला नविन धागाकल्पनेचा पुरवठा करणारे आयडी व मागणी तसा पुरवठा या तत्वावर प्रतिसाद तितके धागे हे अखंड चक्र चालु आहे. Proud

केपी. मी हल्ली असले बीबी वाचतच नाही. डायरेक्ट प्रतिसाद.

तो नवीन आलेला नकलत घडलेली चूक मात्र एकदम विनोदी किस्सा आहे.

फारेंड चे दिव्यचक्षू !
खरेच आहे ते. आता कुर्बानी मधले "क्या देखते हो" गाणे बघताना आपल्यासारख्या पामरांचे लक्ष झीनत अमान ( व महिलांचे लक्ष फिरोझ खान) सोडून कुठे जाणार नाही. पण तिथेही हा सूर्य पश्चिमेकडे कसा उगवला? खारे वारे व मतलई वारे यांची गफलत, असे चुका काढत असतो.

Pages