टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या प्रसंगात बरेच संवाद आहेत. लहान भावाने शिक्षा करून घ्यायची गरज नाही असेही धर्म सांगतो.... पण..

अर्जूनला २४ पूर्ण करायचे होते !!!!

ऋन्मेऽऽष +१

मी पुर्वी हाच प्रश्न विचारल्यामुळे घरातल्यांचा मार खाल्लेला >>>>> Lol

अरेरे असे प्रश्न विचारु नये बाळे.>> हो ना, मोठी माणसे अडचणीत येतात. Wink

मी पण विचारलं होत रामायणावरुन, ते पण दुसर्‍याच्या घरी गेलेले असताना. सीतेला चोळी शिवायला सोन्याच्या हरिणाचं कातड हवं पण तिच्या भगव्या साडीवर मॅचिंग कसं होईल ते? Uhoh
तिथे असणार्‍या आजी आईकडे हिला काही शिकवलंच नाही का अशा नजरेने आणि आई माझ्याकडे हिला कुठ्ठे म्हणून न्यायची सोय नाही अशा नजरेने पाहत होत्या. Happy

आणि उकाडा किती होईल कांचन मृगाच्या कातड्याची चोळी घालून नाशिक मध्ये ते तर विचारायलाच नको. Happy
फक्त टिकेल जास्त, कॉटन इतकी लवकर खराब होणार नाही इतका एकच फायदा.

गांधारीने दुर्योधनाला गंगा स्नान करून त्याच अवस्थेत तिच्या कक्षेत बोलावले असते. म्हणून तो मातृ आज्ञेला जागून तसाच येत असतो. आणि कृष्ण डाव साधतो.
- इति धर्मक्षेत्र from Epic channel

हिवाळ्यात असले तरी??
नाशकाच्या हिवाळ्यात लेदर जॅकेट किंवा लेदर चे बनियान सतत अंगावर वागवून पाहिले आहे काय ? Happy

म्हणून तो मातृ आज्ञेला जागून तसाच येत असतो आणि कृष्ण डाव साधतो >> Lol सॉरी.. टवाळकीचा धागा असल्याने राहावले नाही

जयंत... काही मायबोलीकरांनी चिरंतन चिंतन करुन ठेवले आहे इथे ( फुसके बार नैत काई ) पण तेवढे खोलात जायला वेळ नसेल तर कुठल्याश्या चॅनेलवर उन्मत्त उलुपी, मॉडेल चित्रांगदा ( चित्रासाठी अंग देते ती ), पृथुल सुभद्रा... अश्या कथा सादर होतील त्याची वाट बघा... तोपर्यंत २४ या संख्येला १,२,३,४,६,८, १२ आणि २४ या अंकांनी नि:शेष भाग जातो, एवढेच लक्षात ठेवा... ( जातो हो अनंत संख्यांनी जातो, पण नि:शेष नाही. )

वरचे सलमानचे चित्र भारी दुसर्‍यात चेहर्‍यावरचे भाव झाक्कास्स..>> + १००००० . अगदी अगदी Happy

दिनेश साहेब आले लक्षात. Happy

थोर जाणकारांनी काल आमच्या अज्ञानाच्या सागरात ज्ञानरुपी अमृताची अमुल्य भर घातली. यामुळे आमचे ज्ञानःचक्षू लख्ख उघडले आणि परमानंदचा अनुभव प्राप्त जाहले.

हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे का याची चौकशी व्हावी. Wink तसेच वरच्या निळ्या गृहस्थांना काँटॅक्ट लेन्स बीबीचा पत्ता द्यावा.

ओहो! उत्तम प्रश्न!
तो धागा उघडून माबोच्या पडद्याचा फोटो घेतला आहे.
सरळ चित्र वापरलेले नाही. म्हणूनच वरील काही भाग तसाच ठेवला आहे.
त्यामुळे भंग नाही/नसावा.
जसे तुम्ही स्पिकर समोर रेकॉर्डर ठेउन गाणी रेकॉर्ड केली तर जसा भंग होत नाही तसाच प्रकार हा पण.

अर्थात माझा समज चुकीचा असेल तर तसे कळवा प्लिज!

Pages