धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.
म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.
या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.
मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.
पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.
असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.
लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..
"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.
मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?
आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.
वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.
आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.
असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?
त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.
पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
संपूर्ण मुलाखत काय होती ?
संपूर्ण मुलाखत काय होती ?
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो >> मला लक्षात आहे त्यावरून त्याने पाक हा चांगला शेजारी आहे असे काहीतरी विधान केले होते, म्हणून नेहमीपेक्षा जास्त गदारोळ झाला होता. प्रत्यक्षात असेच केले होते की नाही माहीत नाही.
रमेष भाव काय मग निवांत?
रमेष भाव काय मग निवांत?
मंदशा जोश्यात असणारा हा आयडी
मंदशा जोश्यात असणारा हा आयडी अजून गेला नाही ?
शाहरुख मला मोजक्या सिनेमात
शाहरुख मला मोजक्या सिनेमात आवडला पण नंतर तो आवडलाच नाही.
अंजाम, डर, बाजीगर, दिलवाले फक्त ह्याच सिनेमात आवडला. नंतर फार बोर झाला.. अजून होतो.
अरे ऋन्मेष, अति करु नकोस
अरे ऋन्मेष, अति करु नकोस रे!
ज्यात त्यात काय शाहरुख? अश्याने इथे ज्या थोड्याफार लोकांना तो आवडत असेल तो पण आवडायचा बंद व्हायचा.... कारण अति स्तुती नंतर नंतर डोक्यात जाते
तुला तो आवडतो इथपर्यंत ठीक आहे, तू इथे हिरीरीने मते मांडल्याबद्दल कुणाची त्याच्याबद्दलची मते बदलणार नाहीत किंवा जनमानसात असणार्या त्याच्या इमेजमध्ये काडीचाही फरक पडणार नाही
तू कधी कधी चांगला लिहतोस.... या शाहरुख आणि स्व जो विवादातुन बाहेर पड
अगदीच रहावले नाही म्हणून मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला दिलाय!
शाहरूख खानची संपूर्ण मुलाखत
शाहरूख खानची संपूर्ण मुलाखत पाहीलेली आहे. त्यामुळे इथे काय तारे तोडले जातात ते पाहणे ही एक करमणूकच आहे.
ताक. शनिवारी धागा नसेल तरी चालेल. प्रेम रतन धन पायो हा हिमेश रेशमियाचं संगीत असलेला सिनेमा पहायला जाणार आहे.
१) मला लक्षात आहे त्यावरून
१) मला लक्षात आहे त्यावरून त्याने पाक हा चांगला शेजारी आहे असे काहीतरी विधान..........
२) प्रत्यक्षात असेच केले होते की नाही माहीत नाही.
एकाच वाक्यातील या दोन विधानांमध्ये बघा कसा विरोधाभास आहे.
बरेचदा त्याच्या बाबतीत हेच होते.
बाकी त्याचे विधान आणि आता खुर्शीद कसुरी वा गुलाम अली प्रकरणात पाकिस्तान्यांचे भारतातले स्वागत संबंधित राजकारण्यांनी कसे जस्टीफाय केले यातील फरक बघणे रोचक.
की फक्त ते शाहरूखखानचे विधान होते म्हणूनच त्यावर गदारोळ उठवा. ते देखील नक्की काय शब्द कश्या अर्थाने वापरले ते देखील अर्ध्या जनतेला माहीत नसताना.
बूमरॅंग ओके, पण या काही मुद्द्यांचा मला शाहरूखचा चाहता या नात्याने नेहमीच सामना करावा लागतो म्हणून म्हटले एकदाची यातील हवाच काढून टाकूया.
१) मला लक्षात आहे त्यावरून
१) मला लक्षात आहे त्यावरून त्याने पाक हा चांगला शेजारी आहे असे काहीतरी विधान..........
२) प्रत्यक्षात असेच केले होते की नाही माहीत नाही.>>> हो साहेब, माझ्या वाक्यातला महत्त्वाचा भाग गाळलात तर विरोधाभासच दिसेल त्यात. मी गदारोळ कशामुळे झाला ते लिहीले - त्याच्या नेहमीच्या विरोधकांपेक्षा जास्त लोकांना त्याचा तेव्हा राग आला, तेव्हा चांगला शेजारी वगैरे वाक्ये त्यात होती. मला काय माहीत तो प्रत्यक्षात काय म्हंटला ते? गदारोळ मी केला नाही
अरे तसे नाही, म्हणजे "मला
अरे तसे नाही, म्हणजे "मला लक्षात आहे त्यावरून" .. म्हणजे काहीतरी धुरळा उठतो आणि काही शब्द लोकांवर हॅमर केले जातात.. नंतर लोकांच्या तेच लक्षात राहतात..
पण "प्रत्यक्षात असेच केले होते की नाही माहीत नाही.." असे देखील असते..
अॅ उरणच्या डुकरा बस झाड आता.
अॅ उरणच्या डुकरा
बस झाड आता. किती मूर्ख बनवतो पब्लिकला.
याला प्रतिसाद का देतात लोक?
ऋन्मेष, त्या मुलाखतींची लिंक
ऋन्मेष, त्या मुलाखतींची लिंक दिली तर बरे होईल. मगच मत व्यक्त करता येईल.
हो, जरा दिवाळीत व्यस्त आहे.
हो, जरा दिवाळीत व्यस्त आहे. त्यामुळे शोधकाम आज किंवा उद्या आईने चकल्या गाळण्यातून फुरसत दिल्यावर करेन.
मलाही त्या नेमक्या शब्दांची उत्सुकता आहेच. जो माणूस ईतर ईंटरव्यू देताना किंवा अॅवार्ड शोचे अँकरींग करताना बोलण्यात हुशारी दाखवतो तो संवेदनशील बाबींवर बोलताना नक्कीच मुक्ताफळे उधळत नसणार.
अरे तसे नाही, म्हणजे "मला
अरे तसे नाही, म्हणजे "मला लक्षात आहे त्यावरून" .. म्हणजे काहीतरी धुरळा उठतो >>> ओह आले लक्षात. माय मिस्टेक. तो कॉमा चुकीच्या ठिकाणी पडला :). ते वाचताना "मला लक्षात आहे त्यावरून त्याने असे विधान केले होते" अशा अर्थाने न वाचता "त्याने तसे विधान केले होते असे पसरल्याने तो गदारोळ झाला" असे वाच. शाखा चे पर्मनंट विरोधक बरेच आहेत. पण त्या गदारोळाच्या वेळेस इतरही अनेकांना ते आवडले नव्हते.
नरेश माने, आज व्हॉटस अॅप वर
नरेश माने,
आज व्हॉटस अॅप वर हे फिरतेय .. बघा चेक करून
This is how media twisted SRK STATEMENT ON INTOLERANCE http://youtu.be/5hEQVmVu4eE
हे खरे असेल तर शाहरूखचा नेहमीच वापर केला जातो हे खरे आहे
एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये
एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार.>
अफवा अश्याच तयार होत असतात ओ.
मोदिंना मतांची कमाई करण्यासाठी शारुक च्या निगेटीव्ह ब्रॅडींग ची गरज असणार का. बास का राव
आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते.>
२६/११ नंतर पाकिस्तानि खेळाडूंना बॅन करण्याची जोरदार मागणी देश भरातुन होत होती.... आणि त्यांना बॅन्/वाळीतही टाकले गेले.... ऑक्शन च्या वेळी कोणिही त्यांच्यावर बोली लावली नाही... एव्हडा गंभीर रेफरन्स "तळ्यात मळ्यात" खाली झाकू नका ओ.
वानखेडेवरील सुरक्षारक्षक- ‘खान विरुद्ध मराठी’>
मला तरी असा कूठलाही मेसेज आला नाही... पण एव्हढा "मोठा" माणुस-रोल मॉडेल अश्या वेळेस कसा वागू शकतो हे मात्र दिसलं.
आणि असहिष्णुता !>
शाहरूख चा पन्नासाव्वा वाढदिवस- बर्खा दत्त ने घेतलेला इन्टर्व्ह्यू- आणि NDTV
माझ्या द्र्य्ष्टीने तरी ह्याची किम्मत शून्य आहे.
देशात खरोखरीच असहिष्णुता वाढू
देशात खरोखरीच असहिष्णुता वाढू लागलीय. २ दिवस झाले, साधी पंचविशी गाठली नाही धाग्याने.
काय म्हणावे याला?
(No subject)
अनिरुद्धजी, कारण विषयात तसा
अनिरुद्धजी,
कारण विषयात तसा दम नाही. एकतर्फी चर्चा लांबत नाहीत. म्हणून कमी पोस्टींचा मला आनंदच आहे.
माझा मूळ हेतू काही लोकांचे गैरसमज क्लीअर करणे होते, तसेच कधी पुन्हा कुठे कोणी शाहरूखचा विषय निघालेला धागा भरकटवायचा प्रयत्न केला तर त्यांना इथे यायचे आमंत्रण देत तो धागा भरकटवण्यापासून वाचवता येईल.
Famous, liberal Saudi Arabian
Famous, liberal Saudi Arabian columnist Khalaf Al-Harbi calls India the most tolerant nation in the world
http://www.ibnlive.com/news/india/famous-liberal-saudi-arabian-columnist...
...
...
Turkey issues special stamp
Turkey issues special stamp featuring PM Narendra Modi
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/turkey-issu...
त.टी.
त.टी. https://en.wikipedia.org/wiki/Religion_in_Turkey
King Abdullah II calls upon
King Abdullah II calls upon Muslims to lead the fight against terrorism
http://www.albawaba.com/news/king-abdullah-ii-calls-upon-muslims-lead-fi...
King Abdullah claimed that confronting extremism is “both a regional and international responsibility, but it is mainly our battle, us Muslims, against this who seek to hijack our societies and generations with intolerance takfiri ideology.”
संपूर्ण बातमी न वाचताच लिंक
संपूर्ण बातमी न वाचताच लिंक दिलेली दिसतेय.
तुर्कस्थानात आताच G20 शिखर संमेलन झालं त्याला हजर असलेल्या प्रत्येक देशाच्या प्रमुखांच्या सन्मानार्थ पोस्टल स्टेंप्स काढले गेले. एकूण ३३ स्टँप्स त्यातले १९ राष्ट्रप्रमुखांवर.
खलफ अल-हरबीच्या लेखासंबंधीची बातमी मे २०१५ ची आहे. लेखातलं हे वाक्य वाचलं तर मंगलयान मंगळाच्या कक्षेत पोचण्यापूर्वी तो लिहिलेला दिसतोय.They have all joined hands to build a strong nation that can produce everything from a sewing needle to the rocket which is preparing to go to Mars.
No matter how the world speaks about tolerance, India remains the oldest and most important school to teach tolerance and peaceful co-existence regardless of the religious, social, political or ethnical differences."
यात पोलिटिकल टॉलरन्सही म्हटलंय. मोदीं सरकारच्या किंवा विशिष्ट लोकांच्या कृतींना/वक्तव्यांना विरोध करणारे देशद्रोही, पाकिस्तानात पाठवायच्या लायकीचे असल्याची भाषा पोलिटिकल टॉलरन्समध्ये बसते का?
पुढची काही वाक्ये अधिकच रोचक आहेत.
If we took all the Arabs and placed them in India as part of a grand experiment, they would not make up any recognizable majority. They would, instead, dissolve in a fearless human ocean. Their nationalistic trends and sectarian extremism would also dissolve with them and they would realize that nothing in the world can justify the killing of their brothers and sisters.
India is one of the largest and oldest democracies in the world. It had never known huge differences in religions or races. The country does not disdain its poor people nor hate its rich citizens. It is a nation which is proud of Gandhi and the British colonialists at the same time.
दुसरे खान साहेबही बोललेत आज.
दुसरे खान साहेबही बोललेत आज. रामनाथ गोयनका पुरस्कार वितरण सोहळ्यात आमीर खान म्हणाला की त्याची पत्नी किरण राव देशातील असहिष्णू वातावरणामुळे आपल्या मुलांकरता चिंताक्रांत आहे व देश सोडून जावा अस वाटत आहे. यावर झी न्यूज च्या पत्रकारा ने कर्नल संतोष महाडीक यांच्या होतात्म्याचा उल्लेख करून आमीर ला प्रश्न विचारला की वाईट घटनांनंतर प्रतिक्रियांमधे डबल स्टॅण्डर्ड का असत ?
इस्लामी दहशतवादाबद्दल बोलत विख्यात पत्रकार तवलीन सिंग यांनी तर आमीर ला गालीब च्या ओळी सुनावल्या....
खुदाके वास्ते पर्दा न काबेसे उठा जाहिद
कही ऐसा न हो यां भी वही काफिर सनम निकले.
आमीर खान आणि मोदींचे
आमीर खान आणि मोदींचे आधीपासूनच वाकडे आहे ना.
त्याच्या कुठल्याश्या पिक्चरला गुजरातमध्ये बंदी होती.
तो मौका मिळताच आपले हात साफ करणारच. स्कोअर सेटलमेंटचा भाग आहे हा.
ऋन्मेऽऽषने अजुनपर्यंत आमीर
ऋन्मेऽऽषने अजुनपर्यंत आमीर खान आणि असहिष्णुता हा नविन धागा काढला नाहि म्हणुन इथेच लिहितो -
या वादात आमीरने हि हॅट फेकली आहे. मी त्याच्याशी आणि त्याच्या बायकोशीहि १००% सहमत आहे. देशात असहिष्णुता कित्ती वाढलेली आहे, आपल्या कुटुंबियांसोबत बाणेदारपणे त्याने देश सोडुन समविचारी लोकांसमोर उदाहरण ठेवावे...
बायकोच्या तोंडी का घालावी
बायकोच्या तोंडी का घालावी वाक्य?
मुळ मुद्दा काय आहे? तुर्की ने
मुळ मुद्दा काय आहे? तुर्की ने तिकीट छापले. एखाद्या पत्रकाराने काय मसाला घातला हा नाही. त्या मसाल्याशी मी सहमत नाही.
मुळ मुद्दा बाजुला ठेवुन पत्रकाराने काय लिहीले तिकडे लक्ष वळवू नका.
एवढे असहिष्णू वातावरण आहे की हजारो लोकं अवार्ड वापसी करत आहेत. लोक देश सोडुन जायची भाषा करत आहेत. वयक्तीत वादातुन झालेल्या हत्यांना धार्मीक रंग देऊन "व्हाय हिंदुस आर किलींग मुस्लीम्स" अशा अर्थाच्या बातम्या सगळीकडे पसरवल्या जात आहेत? मोठे मोठे अभिनेते शेजारी शत्रु देशाला चांगले म्हणत आहेत.
अस असताना मुस्लीम ब्रदरहुड मधील एक देश असलेल्या तुर्कीने बाणेदारपणे आम्ही मोदींचे तिकीट छापणार नाहीत अशी भुमीका का घेतली नाही? इतर १९ जणांचेच छापायचे ना? स्वतंत्र देश म्हणून काही अधिकार आहेत की नाही?
की भारतात हा जो काही असहीष्णूतेचा बनाव चाललेला आहे तो तुर्की ओळखुन आहे आणि त्याच्याशी सहमत नाही?
Pages