शाहरूख खान, आमीर खान आणि असहिष्णुता !

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2015 - 16:48

धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.

म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.

या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्‍या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.

मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.

पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्‍या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.

असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.

लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..

"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.

मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?

आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्‍या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.

वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्‍या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्‍याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.

आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.

असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?

त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.

पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>नुसत्या संशयावरून वाळीत टकावे .... ठार करावे ? हॅ अगाध ज्ञान संघात देतात , असा मला संशय अहे !

छान संशय आहे. पण तसे होताना दिसते आहे का?
आमिरखानने एका बिगर इस्लामी स्त्री शी लग्न केले आहे. पण त्याच्या मुलांचा धर्म इस्लामच आहे हे विसरू नका.
आमिरखानने वहाबी इस्लामचा धिक्कार करणे उघडपणे टाळले आहे. अशा काही गोष्टी लक्षात घेतल्यास त्याच्या विरुद्ध येणारा संशय इतका बिनबुडाचा नाही असे लक्षात येईल.
अर्थात मोदीद्वेषाने आंधळे झाले असल्यास वा निधर्मी अफूचे अती सेवन केले असल्यास असे काही लक्षात येणार नाही.

गोल्ड सिनेमा पालघर ने दिलवाले चा एकही शो न दाखवण्याचा दावा केला आहे(मला निश्चय म्हणायचं होतं पण व्हॉअ‍ॅ पोस्ट असल्याने सत्यतेची खात्री नाही म्हणून दावा म्हणतेय.)

बिचार्‍या रेहमानला कोणिच भाव दिला नाही, बहुतेक त्याची असहिष्णुता एका विशिष्ठ 'सहिष्णु ग्रुप' कडून आली असल्यामुळे असेल Wink

उठसुठ भक्त म्हणुन स्वत:ची दाखवायची खरच गरज आहे का? असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे..
बाकी ह्या लोटांगण वाल्यांना काय म्हणतात ते बी सांगा...
49790725.cms_.jpg चित्र - टाइम्सऑफइंडिया

जेष्ठांचे पाया पडणे हे भारतीय संस्कार आहे.
भाजपाच्या मंत्री तर पाया पडणार्‍या गरीब मुलाला लाथा मारतात. हे भाजपाचे संस्कार

पदाने जेष्ठ आहे. तर मान राखला जातो.

तुमच्या जेष्ठांनी कनिष्ठांची बिहारनिवडणुकि नंतर तासली ते बघा. मग इतरांचे बोला. Biggrin

असो चालुद्या....
irrespective of पक्ष, व्यक्ती, जात, धर्म, लिंग, रंग न बघता जे वाइट आहे ते वाइटच आणि जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणायची बुद्धी कधीतरी सगळ्यांना (ह्यात म्या बी आलो) मिळेल अशा भाबडा आशावाद ठेवणारा- अग्निपंख..

irrespective of पक्ष, व्यक्ती, जात, धर्म, लिंग, रंग न बघता जे वाइट आहे ते वाइटच आणि जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणायची बुद्धी कधीतरी सगळ्यांना (ह्यात म्या बी आलो) मिळेल अशा भाबडा आशावाद ठेवणारा- अग्निपंख..
>>

पण काय चांगले आणि काय वाईट हे कोण ठरवते? बहुमत?

#‎KnowYourAamirKhan‬
During his love affair with Jessica Hines, a London journalist, when the great liberal, tolerant Aamir Khan was told that he had had impregnated her, he threatened her to undergo abortion!! (Yes, the same Aamir Khan who was preaching us about evils of abortion in Satyameva Jayate, was threatening his lover to undergo abortion a decade ago).

When she refused, he abandoned the child!!
In 2005, this was published in several magazines & newspapers. There was immense pressure mounted upon him to accept the child but he still chose to remain mute.
Today, that child is 12 years old, and as you can see in the uploaded image, the child looks just like Aamir Khan.

Why did Aamir Khan abandon the child? He is anyway allowed to marry as many women as he wants (whereas a Hindu cannot marry many women because our civil codes are not uniform across religion. This is one of the several examples which show how our laws discriminate citizens on the basis of religion. That's why we need uniform civil code so that Hindus & Muslims are treated equally).
He already has multiple wives & several children. But still he wants to abandon this child.

There might be a reason: Aamir Khan has always been saying that his wives maybe non-Muslims, but he wants his children to always follow Islam, as we had discussed it in this link here:
https://www.facebook.com/photo.php?fbid=10207771105264848

Probably Jessica is not ready to convert her son to Islam, due to which Aamir Khan is still abandoning it.

(Some might say we must not discuss these things because it is his personal life. My question to them: If he can preach people about evils of abortion and request people not to carry out abortions, then isn't he interfering into people's personal lives? If he can preach people to stay away from abortions, then shouldn't we question him why he himself was threatening his lover to undergo abortion few years ago?)

Links:
http://bollywoodjournalist.com/articles-i-like/supporting-pages/statemen...

https://twitter.com/londonishstyle/status/663860485553594368

http://daily.bhaskar.com/news/CEL-when-aamir-khan-was-accused-of-having-...

ऋत्विकच्या घटस्फोटाबद्दल असे फॉर्वर्डेड मेसेजेस नाहीत येत का तुमच्यात ? झालंच तर करीनाचा ब्रेक अप, दीपिकाचा रणवीर कपूर आनि युवराज सिंग यांच्यापासून ब्रेक अप...

तुम्ही तक्रार करा.

There is a difference in App ranking and sales. I hear that sales are down. Big time.

मी तर न्यूज ऐकली की त्यांनी आमीरखानला हटवले.
मुळात अ‍ॅपला फायदा तोटा व्हावा यासाठी हे लोकांनी केले नव्हते, तर आमीरला तोटा व्हावा म्हणून केलेले. त्याला हटवले असेल तर त्याला तोटा झाला म्हणू शकतो.

Great

तरी म्हटलं अजून जेसिका हाईन्स या सर्वात कधी काय आली नाही?? अमिताभ बच्चनवर पीएचडी करयाला भारतात आली होती ते पार बॉलीवूड गाजवूनच गेली.

बाळाजीपंत, त्यानं तिच्याशी लग्न केलं नाही कारण "ती" लग्नाला तयार नव्हती, पण मुलाला त्यानं ना व्द्यावं अशी तिची अपेक्षा होती. इमेजला धोका होइल म्हणून त्यानं अर्थात ते केलं नाही, आणि नंतर त्यावरूनच बायकोचं आणि त्याचं लग्न मोडकळीला आलं. पुढे हेच लफडं किरण रावसोबत चालू झाल्यानं मात्र तिनं घटस्फोट घेतला.

किरण रावबद्दल बर्‍याच अतरंगी सतरंगी गमतीजमती माहित आहेत. बघू त्यापैकी किती बाहेर येतात.

म्हणजे माबोच्या असहिष्णु म्हणतात त्या तुम्ही ? Wink
(हे वाक्य बाबा म्हणजे मला तुम्ही दुक्कर म्हणता ते हे! अशा चालीवर वाचावे)

बरं आता ज्यांना ज्यांना असहिष्णुता वाढतेय असं वाटतंय त्यांची त्यांची लफडी कुलंगडी बाहेर काढायची मोहीम हाती घ्या.
गुलजारनीही त्यांच्या बायकोला सोडलं. त्याआधी एका विवाहित अभिनेत्रीचं आयुष्य त्यांच्याचमुळे वाहावत गेलं.

कुलदीप नय्यर यांच्याबद्दलही काही गॉसिप आहे का? Wink

^^^^

ऋतिकनेही आमीरला ट्विटरवर सपोर्ट केलाय.
एवढा गदारोळ होऊनही आमीर स्वताच्या मतावर ठाम राहिला आणि त्याने आपली मूद्देसूद बाजू मांडली याबद्दल त्याने त्याचे कौतुकही केलेय.

तर या हृत्विकचेही एक लग्न तुटलेय बरं का ..

एकंदरीत व्यभिचारी मंडळी एक झालीत या असहिष्णूतेविरोधात..

Pages