धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.
म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.
या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.
मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.
पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.
असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.
लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..
"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.
मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?
आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.
वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.
आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.
असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?
त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.
पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
हे महाशयच बोलायचे बाकी राहीले
हे महाशयच बोलायचे बाकी राहीले होते. हजारो वर्षापासुन देशावर आक्रमणे झाली तेव्हा आमच्या पूर्वजानी केले ते वाईट होते, असे कबुल करायची हिम्मत आहे का यान्च्यात? आमच्यात आहे ती कबुल करायची हिम्मत की, आमचे जे कोण खापर- बापर पणजोबा वगैरे आहेत त्यानी जर इतर जातीच्या लोकान्वर जर अत्याचार केले असतील तर त्याबद्दल आम्ही मनापासुन दिलगीर आहोत. जे पूर्वी झाले ते खरोखर वाईटच होते.
आता खानबाबा काय बोलणार? अरेरे! ज्या अतीरेकी हिन्दुनी अत्याचार चालवले आहेत, तेच या खानावळीला डोक्यावर घेत आहेत. काय असहिष्णुता माजलीय देशात!
आमच्यात आहे ती कबुल करायची
आमच्यात आहे ती कबुल करायची हिम्मत की, आमचे जे कोण खापर- बापर पणजोबा वगैरे आहेत त्यानी जर इतर जातीच्या लोकान्वर जर अत्याचार केले असतील तर त्याबद्दल आम्ही मनापासुन दिलगीर आहोत. जे पूर्वी झाले ते खरोखर वाईटच होते.
+११११
तुर्कीने अन्य १९
तुर्कीने अन्य १९ राष्ट्रप्रमुखांच्या स्टँपसोबत मोदींचा स्टँप काढला याला जी-२० संबंधित एका औपचारिकेतेपेक्षा अधिक कसलेही महत्त्व नाही. त्यांनी मोदींचा स्टँप काढायला नकार दिला नाही म्हणजे भारताच्या सद्य सहिष्णुतेबद्दल काही स्टेटमेंट केलं हा निष्कर्ष ओढूनताणूनच्याही पुढचा आहे.
दुसरं खलफ-अर-अल्बीचा लेख आता चर्चेत असला तरी तो तसा जुना आहे. तो लिहिल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.
त्यांनी अरब देशांना दिलेला If we took all the Arabs and placed them in India as part of a grand experiment, they would not make up any recognizable majority. They would, instead, dissolve in a fearless human ocean. Their nationalistic trends and sectarian extremism would also dissolve with them and they would realize that nothing in the world can justify the killing of their brothers and sisters हा सल्ला इथल्या नॅशनलिस्टिक आणि टोकाच्या .सांप्रदायिक विचारसरणीच्या लोकांना लागू व्हायची वेळ आलीय.
If we took all the Arabs and
If we took all the Arabs and placed them in India as part of a grand experiment, they would not make up any recognizable majority. They would, instead, dissolve in a fearless human ocean.
>>
य्यो माणसा!!! केवढा दुर्दम्य आशावाद! इतक्या वर्षात झालं नाही ते आता होईल ... नक्कीच! २०१९ मध्ये येतंय न सहिष्णू सरकार ... मग या म्हणावं
तसे ह्यांचे वहाबी येतंच आहेत ... हेही येतीलच, नैका?
they would realize that
they would realize that nothing in the world can justify the killing of their brothers and sisters हा सल्ला इथल्या नॅशनलिस्टिक आणि टोकाच्या .सांप्रदायिक विचारसरणीच्या लोकांना लागू व्हायची वेळ आलीय. >>
मग तो त्यांनाच द्या.
मी कोणाच्याही हत्येचे समर्थान करत नाहीये आणि कोणत्याही टोकाच्या भुमिकेचेही समर्थन करत नाही.
इथेच सांगायचे तर हा मुद्देसुद प्रतिसाद तुम्ही आधीही देउ शकला असतात. पण तुम्हाला आधी तो मसाला महत्वाचा वाटला यातच काय ते आले.
जी-२० संबंधित एका
जी-२० संबंधित एका औपचारिकेतेपेक्षा अधिक कसलेही महत्त्व नाही. >> त्या अवार्ड वापसी ला, असहिष्णूता वाढली आहे म्हणण्याला आणि देश सोडून जाण्याच्या भुमिकेला ही असेच औपचारीकतेपेक्षा अधिक कसलेही महत्व नाही.
ह्यांच्यापेक्षा कमाल खान बरा
ह्यांच्यापेक्षा कमाल खान बरा ... किमान काही दिवस परदेशीतरी गेला होता

परदेशी गेला नी परत आला पण.
परदेशी गेला नी परत आला पण. आव-जाव घर तुम्हारा.
अवॉर्ड वापसी आणि बाकीच्या
अवॉर्ड वापसी आणि बाकीच्या गोष्टींत औपचारिकता कसली?( औपचारिकतेचा काय अर्थ लावलाय?) Rather they are putting themselves in the line of fire and it takes courage to do that.
धार्मिक रंग देऊन केलेल्या हत्यांना वैयक्तिक वादाची रंगसफेदी करून वर मी त्यांचं समर्थन करत नाही असं म्हणण्याला नक्की काय म्हणायचं ?
आव-जाव घर तुम्हारा. >> ते फार
आव-जाव घर तुम्हारा.
>>
ते फार प्राचीन काळापासन आहे रश्मी ... आर्य आले ... शक कुशाण हूण क्षत्रप अरब तुर्क मंगोल किती किती लिहायचे ...
म्हणून आपण कायम सहिष्णूच आहोत ...
धार्मिक रंग देऊन केलेल्या
धार्मिक रंग देऊन केलेल्या हत्यांना वैयक्तिक वादाची रंगसफेदी करून वर मी त्यांचं समर्थन करत नाही असं म्हणण्याला नक्की काय म्हणायचं ?
>>
तुमच्या समाजवादी यादवान अजून चार्जशीट फाईल केली का, दादरीमध्ये?
आमचे? ते तुमच्या त्या
आमचे? ते तुमच्या त्या ह्यांच्याबरोबर hand in gloves आहेत असं आमचं मत आहे.
अय्योयो ... मंग तिकड बी करा
अय्योयो ... मंग तिकड बी करा जरा शिमगा ... आकाशातला देव (मानत असल्यास) पावेल की
Rather they are putting
Rather they are putting themselves in the line of fire and it takes courage to do that.
आमिर खान ज्या पध्दतीने बोलला
आमिर खान ज्या पध्दतीने बोलला आवडले बुवा. सरळ भाजपाच्या नेत्यांना टारगेट केले
टिव्ही डिबेट मधे काहीही विचारले की ८४चा मुद्दा उकरून काढतात परंतू सध्याच्या घडामोडींवर ठामपणे मत मांडत नाही. आज कडक भुमिका घेणारा नेता हवा. जुने मुद्दे काढून परिस्थितीचे दुर्लक्ष करणारे नेते नको.
अय्यो! सिक्युरीटीमध्ये
अय्यो! सिक्युरीटीमध्ये फिरणारे सुरक्षीत नाहीत आणी आमच्या सारखे सामान्य मात्र सुरक्षीत आहेत. अजब न्याय की गजब दुनिया.
जुने मुद्दे काढून परिस्थितीचे
जुने मुद्दे काढून परिस्थितीचे दुर्लक्ष करणारे नेते नको.
>>
आमिरच जून प्रकरण काढलं वाटते ईडीनी. अस टार्गेट करायला नको.
इथे विचारल्या गेलेल्या काही
इथे विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची उत्तरे अमीरने कालच दिलीत.
He spoke of growing discomfort within the majority of moderate Muslims over such incidents. “If I’m not mistaken, a number of Muslim organisations have begun to speak openly against the ISIS and similar terror organisations, at least in India,” he said. Voicing his opinion as a Muslim, he said, makes him uncomfortable. “Firstly, why should I be representing anyone? Secondly, I have to represent anyone, why not everyone? Why Muslims? My birth may be in a Muslim household, but I speak for everyone,” he said.
अमीर अबोलतोय ना? मग तो स्वतःच खान म्हणजे मुस्लिम आहे , त्याने हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या, चित्रपट काढले, ते इथल्या हिंदूंनी पाहिले , त्यामुळेच त्याला इतके पैसे मिळाले, त्याने दोन हिंदू मुलींशी लग्न केले केले, एकीला तलाकही दिला, त्याच्या चित्रपटांत तो हिंदू धर्माची खिल्ली उडवतो असं सगळं म्हटलं जातंय ते वाढत्या असहिष्णुतेचं आणि समाजातल्या वाढत जाणार्या बेबनावाचंच द्योतक आहे.
वर्तमानकाळात काय चाललंय याबद्दल बोलणं चालू असताना भूतकाळाकडे पळायची गरज का भासते? त्यामुळे वर्तमानात जे होतंय ते योग्य ठरतं का?
इट टेक्स करेज
इट टेक्स करेज
आमीर स्वताहून बोलला की त्याला
आमीर स्वताहून बोलला की त्याला बोलायला लावले?
आमीरचे हे विधान म्हणजे राजकीय खेळी कश्यावरून नसेल?
असल्यास याचा राजकीय फायदा कोणाला होईल?
बिहार मधे शाहरुखच्या विधानाचा
बिहार मधे शाहरुखच्या विधानाचा जबरद्सत फायदा झालेला आहे
अजून एक - आमीर म्हणालाय की
अजून एक - आमीर म्हणालाय की त्याच्या पत्नीला या देशात सुरक्षित वाटत नाही. कोणी त्याच्या पत्नीला विचारून खरे खोटे केले आहे का एवढ्यात?
तसेच सध्या व्हॉटसपवर शाहरूखपाठोपाठ आमीरच्या या वक्तव्याने त्यांच्या अल्पसख्यांक असण्यावरूनही वादळ उठलेय.
पण जर खरेच हे विधान त्याच्या बायकोचे असेल तर तिचा धर्म काय आहे हे देखील लक्षात घ्यायला हवे.
आणि हो, आमीरला डिफेंड करण्यात मला जराही रस नाही,
फक्त बाहेरून जे दिसते ते आपल्याला दाखवले जाते आणि आपण तेच खरे मानतो, पोळ्या शेकणार्यांचा उदो उदो करत.
अमिर बराच चांगला आहे
अमिर बराच चांगला आहे शा.खा.पेक्षा !
पण आमिर अरुण जेटली यांच्या
पण आमिर अरुण जेटली यांच्या समक्ष बोलला. अगदी तोंडावर. आता पर्यंत जेटली साहेब कुठे आहे असहिष्णुता असे विचारत फिरत होते. स्टेजवर जाऊन अमिरला जाब का विचारला नाही
ऋन्मेऽऽष जी .. कृपया
ऋन्मेऽऽष जी .. कृपया 'सर्वसमावेशक' असे काही करता येईल का? लेखाचे शिर्षक हालते ठेवावे लागणार असे दिसतेय.
अजून एक - आमीर म्हणालाय की
अजून एक - आमीर म्हणालाय की त्याच्या पत्नीला या देशात सुरक्षित वाटत नाही. कोणी त्याच्या पत्नीला विचारून खरे खोटे केले आहे का एवढ्यात?>>
<<<<<Wife suggested leaving
<<<<<Wife suggested leaving India’: Aamir joins intolerance debate >>>>>
http://www.hindustantimes.com/india/alarmed-by-incidents-says-aamir-khan...
अरे जा ना सोडुन कोणी हात धरुन ठेवलाय का ? मग बघु या किती शिणेमे काढतो काणी कोण बघायला येतो ते ?
रच्च्याक ने,
आमिरच्या दोन बायकांना त्याने सहजच तलाक दिलेला होता,
पण (हिंदु) रितीकच्या मुस्लिम बायकोने तलाकचे ४०० कोटी वसुल केले !!
:G:
बाकी शहारुख खानला असहीष्णू
बाकी शहारुख खानला असहीष्णू तेचा विंचु का चावला
KKR faces ED trouble over Rs 100 crore forex violation
http://www.dnaindia.com/sport/report-kkr-faces-ed-trouble-over-rs-100-cr...
ED questions Shah Rukh Khan in IPL forex probe caseदिनांक ११ नोव्हेंबर २०१५
http://www.thehindubusinessline.com/news/sports/ed-questions-shah-rukh-k...
आता पर्यंत काँग्रेजच्या राज्यात सर्व चालुन जात होत , आता च्या सरकारने नाड्या आवळल्या मग हे लोक असहीष्णूतेचाच राग आळवणार !!
:G:
ह्म्म्म्म तरीच.
ह्म्म्म्म तरीच.
सरकार नाड्या आवळाण्यासाठी
सरकार नाड्या आवळाण्यासाठी मोदीने देशात राहायला हवे
Pages