शाहरूख खान, आमीर खान आणि असहिष्णुता !

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2015 - 16:48

धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.

म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.

या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्‍या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.

मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.

पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्‍या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.

असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.

लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..

"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.

मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?

आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्‍या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.

वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्‍या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्‍याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.

आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.

असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?

त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.

पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमिर खानच्या बायकोला भारतात असुरक्षित वाटत असेल तर मोदींच्या विमानात बसवून द्यावं. संपूर्ण खान फ्यामिलीला हवं तिथे ड्रॉप करतील ते Proud

- व्हॉट्सॅप फॉरवर्ड जोक

देश का माहौल इतना बिगड़ गया है कि आमिर खान, शाहरूख खान को तो छोड़ीये ।।
अब तो स्वयं मोदी जी भी देश मे नही रहते....!!

- हा देखील एक जोक

अमिर बराच चांगला आहे शा.खा.पेक्षा !
>>
असहिष्णूतेबाबत हे विधान केले आहे का? प्लीज क्लीअर करा म्हणजे मला त्या अनुषंगाने उत्तर देता येईल.

कारण याबाबतीत शाहरूखचे जे आत तेच बाहेर असे क्लीअरकट असते, आमीर बरेच छुपे खेळ खेळतो.
आमीर या बाबतीत पक्का पॉलिटीशीअन आहे तर शाहरूखसाठी त्याचे सुपर्रस्टारपद मिरवणे हेच ध्येय असते.

आणि त्याच स्टारडम बद्दल बोलायचे झाल्यास शाहरूखने अ बोलताच त्यातून असहिष्णूतेचे पुर्ण स्टेटमेंट शोधणारे पत्रकार आहेत, त्याच वेळी आमीरला मात्र पुर्ण असहिष्णूता असे बोलावे लागते. आणि मग स्वता कसे बोलायचे म्हणत आपल्या बायकोचे नाव घ्यावे लागते.

असो, हा धागा आमीर विरुद्ध शाहरूख करायला नाही, पण धाग्याच्या अनुषंगाने निरीक्षण नोंदवले ईतकेच!

अमीर पॉलीटीशयन नाही तर पक्का डिप्लोमॅटीक आहे.:फिदी: शाहरुख आणी सलमानला असे जमणार नाही. याचा अर्थ अमीर धर्मान्ध आहे असाही अजीबात नाहीये.

याचा अर्थ अमीर धर्मान्ध आहे असाही अजीबात नाहीये.
>>
तसे तीनही खान नसावेत हे समजून येते.

अमीर पॉलीटीशयन नाही तर पक्का डिप्लोमॅटीक आहे >> याच बाबतीत बरी त्याची डिप्लोमॅटीकगिरी चालते. तो नेहमी राजकीय वादात फायदा बघून स्वताहून उतरतो.

सलमान याबाबतीत मठ्ठ आहे याबाबत वाद नाही.

येता इराक , जाता सीरीया. वास्तव्यास मुलुख बहुत असे. चढे गाढवानिशी .. उदईक जावयाचे ते आजच जा. ... असा ऐतिहासिक भाषेत खलीता धाडून द्यावा काय ? Lol

दुर्दैवाने या अभिनेत्यांच्या कोणत्याही पब्लिक कॉमेण्ट्स चा संबंध त्यांच्या आगामी चित्रपटाच्या मार्केटिंग शी नाही यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते. हे आमिर बद्दल अनफेअर असेल, पण त्यांच्या जातभाईंनी (म्हणजे फिल्मी लोकांनी. मुस्लिमांनी नव्हे) एक पॅटर्न करून ठेवलेला आहे.

नाहीतर मग त्याला जे वाटले ते तो बोलला. जगात्/भारतात बाकी मुस्लिमांनी काय केले याचे प्रतिनिधीत्व तो करत नाही, त्यांनी काय केले त्याला तो जबाबदार नाही, ते बॅगेज त्याच्या डोक्यावर ठेवणे चुकीचे आहे. त्याच्या कुटुंबाला ज्याबद्दल काळजी वाटली त्याबद्दल तो म्हंटला.

प्रणव राय यांनी घेतलेली रघुराम राजन व अरविंद सुब्रमणियम यांची मुलाखत नुकतीच पाहीली होती. त्यांनाही प्रणव राय ने आपल्या सोफिस्टिकेटेड भाषेत दोन दोन वेळ असहिष्णूते बद्दल विचारल. " वी हॅव टू काम डाउन " जरा शांत व्हा अस रघुराम राजन बोलले ( टी आर पी साठी उगाच बडबड करू नका अन मला ही बोलायला लावू नका अशा अर्थाने )

माझी आमीरखान सारख्या कडून अस काही तरी ऐकण्याची अपेक्षा होती. अपेक्षाभंग झाला. असो.

लोकांचा रोष ओढवुन घेणारे काहीतरी बोलल्याशिवाय लोक आपल्याला बुद्धीवादी वगैरे म्हणणार नाहीत असा एक्न्दरीतच सर्व विचारवंत टाइप्स लोकांचा समज झालेला दिसतोय!

ही वरची कॉमेंट फक्त आमिरसाठी आहे
शाहरुख याला अपवाद आहे.... अपवाद अश्यासाठी की तो विचारवंत टाइप्स बिल्कुल नाहिये आणि कुणी त्याला बुद्धीवादी वगैरे म्हणाव अशीही त्याची अपेक्षा नसणार Proud

लोक ज्या प्रकारे ता विधानावरुन एकत्र आलेत एकमत झालय...भारतात अजुन बरीच बरीच सहीष्णूता शिल्लक आहे असे दिसते आहे. तेव्हा तो बोलला ते बरेच झाले.

बाकीचं राहू द्या,
पण त्या कुठल्यातरी रोलसाठी आमीरखानने वजन वाढवलंय (कि व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत ?) आणि सतत अनबघणेबल पांढ-या खुरट्या दाढीत (आमीरबद्दल) फिरत असतो तो लुक याच सिनेमाचा आहे का ?

इतके दिवस चांगलं मेन्टेन करून आता वजन खरोखर वाढलं असेल तर लवकर उतरणे अवघड दिसतेय. या बाबतीत त्याचा कमल हसन ऐवजी शशी कपूर होण्याची शक्यता वाटते. सांभाळ बाबा !

वॉटसप वरून, बघा पटतेय का..

खरं तर अमिरच्या अगोदरच ३ नोव्हे ला देशभरातल्या वृत्तपत्रक संपादकांच्या संघटनेने
असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती. त्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही.
अमिरवर तोंडसुख घेताना बरेच
दिसतात, कारण अमिर पडला
सेलेब्रीटी त्यामूळे त्याच्या वक्त्यव्याकडे लोकं जास्त लक्ष देतायत. तसं बघायला
गेलं तर अमिर हा काही विद्वान नाही पण त्यालाही त्याचं मत आहेच.
त्याच्या वक्त्यव्याशी असहमत असणंही तितकेच योग्य. फार फार तर अमिरशी मी सहमत नाही इतकं बोलून हा विषय इथेच संपवता येतो.
पण अमिरखानवर वैयक्तिक
पातळीवर उतरून टिका करणं
हेच मुळात असहिष्णू आणि
असांस्कृतिक आहे; हेच मुळी
वैयक्तिक टिका करणा-यांना कळत नाही ही खरी शोकांतिका आहे.

वॉटसप वरून, बघा पटतेय का..

खरं तर अमिरच्या अगोदरच ३ नोव्हे ला देशभरातल्या वृत्तपत्रक संपादकांच्या संघटनेने
असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती. त्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही.
अमिरवर तोंडसुख घेताना बरेच
दिसतात, कारण अमिर पडला
सेलेब्रीटी त्यामूळे त्याच्या वक्त्यव्याकडे लोकं जास्त लक्ष देतायत. तसं बघायला
गेलं तर अमिर हा काही विद्वान नाही पण त्यालाही त्याचं मत आहेच.
त्याच्या वक्त्यव्याशी असहमत असणंही तितकेच योग्य. फार फार तर अमिरशी मी सहमत नाही इतकं बोलून हा विषय इथेच संपवता येतो.
पण अमिरखानवर वैयक्तिक
पातळीवर उतरून टिका करणं
हेच मुळात असहिष्णू आणि
असांस्कृतिक आहे; हेच मुळी
वैयक्तिक टिका करणा-यांना कळत नाही ही खरी शोकांतिका आहे.

अमिरखानवर वैयक्तिक
पातळीवर उतरून टिका करणं
हेच मुळात असहिष्णू आणि
असांस्कृतिक आहे; हेच मुळी
वैयक्तिक टिका करणा-यांना कळत नाही ही खरी शोकांतिका आहे.

>>

अश्या चपखल शब्दांमध्ये कधी लिहिता येईल देव जाणे Proud

>>मला तर ,अमीर अजूनपर्यंत गप्प कसा? असा प्रश्न पडलेला.<<
कारण बायकोच्या "त्या" प्रश्नावर तो अजुन भारतातच आहे, हे उत्तर दडलेलं आहे. त्याच्या बायकोच्यामते असहिष्णुता खरोखर वाढलेली असती, आणि तो तिच्याशी सहमत असता तर त्याने आत्तापर्यंत गाशा गुंडाळला नसता का? Proud

ढोंगी लोकांनी सरसकट असहिष्णूतेचे आरोप करावे अन लोकांनी वाभाडे काढले तर ती आरोप सिद्ध करणारी टीका हे अजब लॉजिक आहे.
या सार्‍या प्रकारात मीडीयाचा ही मोठा वाटा आहे. आपल्या टी आर पी करता हे लोक दिवसेंदिवस कसलाही विधीनिषेध बाळगेनासे झालेत. एखादा विषय इतका चघळतात की विचारू नका. प्रत्यक्ष परिस्थिती अन रंगवली जाणारी प्रतिमा या मधे मुंगी अन हत्ती इतका फरक असतो. मुंगीचे असणे कुणी नाकारत नाही पण हत्ती माजलेत अशा बातम्या रंगवण बेजबाबदार पणा आहे.

.

वैद्य साहेब, आपली लिंक अजून सविस्तर पाहिली नाही. पण मला खात्रीच होती की शाहरुख उगाचच स्वताहून भडकाऊ विधाने करणार नाही. हे काहीतरी त्याच्या तोडी घातलेय किंवा त्याचा विपर्यास केलाय. म्हणूनच तर शाहरूखचा चाहता या नात्याने खरेखोटे करायला हा धागा काढलाय.

आणि हो, आमीरच्या वक्तव्याची आणि त्या मागच्या हेतूची गॅरंटी मी देऊ शकत नाही.

Pages