धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.
म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.
या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.
मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.
पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.
असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.
लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..
"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.
मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?
आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.
वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.
आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.
असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?
त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.
पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
बाप रे! काय ती लफडी!!
बाप रे! काय ती लफडी!!
बाळाजीपंत यांच्या पोर्टलवरून
बाळाजीपंत यांच्या पोर्टलवरून आमीरखान च्या खाजगी आयुष्याच्या बाबतीतल्या ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्या किती ख-या किंवा खोट्या हे ठाऊक नाही. जर तर स्वरुपात असल्याने पास. चुकीच्या वागणुकीचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. पण या बातम्या देणा-या या पोर्टलवर जसोदाबेन, वाणी गणपती आंणि मिसेस ऋत्विक रोशन, जरीन खान यांच्याबद्दल माहिती मिळेल काय ? टोल फ्री नंबर असल्यास द्यावा.
(No subject)
(No subject)
My Husband And I Are Thriving
My Husband And I Are Thriving Muslim Professionals In India. We Have Only Felt Acceptance
http://www.huffingtonpost.in/dr-sofia-rangwala1/my-husband-and-i-are-thr...
एका विशिष्ट धर्माविरुद्ध गरळ
एका विशिष्ट धर्माविरुद्ध गरळ ओकण्यापुरता असलेला प्रचार आता बहीष्कार घालण्यापर्यंत पोहोचलेला आहे. या द्वेषपूर्ण प्रचारास आवर घालण्यात यावा ही मायबोली प्रशासनास नम्र विनंती. हे शक्य नसल्यास किमानपक्षी हा धागा बंद करण्यात यावा.
या ठराविक लोकांचा जो काही राग आहे तो जितका समजावून घ्यायचा तो समजलेला आहे. या पुढच्या पातळ्यांची आवश्यकता नसावी.
तसेच बाळाजीपंत या आयडीने
तसेच बाळाजीपंत या आयडीने व्हॉट्स अप फॉरवर्ड इथे आणून डकवलेले आहे. मूळचा मजकूर कुठून आणला , त्याचा लेखक कोण याबद्दल कुठलीही माहीती नाही, खातरजमा करण्यास काहीही संधी नाही. प्रताधिकाराचा मुद्दा आहेच. शिवाय जे संदर्भ दिले आहेत त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. एक ट्विटर अकाउंट दिलेले आहे, ते कितपत खरे आणि कितपत फेक याची कल्पना नाही. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या मुलांची अकाउंट फेक असल्याचे निष्पन्न झालेले आहे तसेच राज ठाकरे यांच्या मुलांचीही अकाउंट फेक असल्याचे निष्पन्न झालेले आहे. हा आयडी एखादे कार्टून आवडले नाही म्हणून प्रताधिकाराच्या मुद्द्यावरून नेहमी प्रशासकांच्या वहीत तक्रारी करत असतो हे अत्यंत मनोरंजक आहे.
Now, a site to slap Aamir
Now, a site to slap Aamir Khan
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/To...
http://slapaamir.com/
पन्त, नाय आवडले हे.
पन्त, नाय आवडले हे. टाईम्सवाल्यानी हे छापायला नको होते. आणी ज्यानी कोणी हे उद्योग केले आहेत, तो चूकलाच आहे. अमीरने मत बोलुनच प्रदर्शीत केले, मग यान्चे हात का उठतायत? आपल्या कडच्या लोकाना वैचारीक भूमिका समजत नाहीत असे दिसते आहे.
शिवसेनावाले पण डोक्यावर पडले
शिवसेनावाले पण डोक्यावर पडले आहेत. जरा मारामार्या आणी खळखट्याक मधून हे लोक बाहेर आले तर बरे.
टीपी म्हणून घ्या हो. बाकी
टीपी म्हणून घ्या हो.
बाकी मात्र बरिक खरे हो
देश सोडून जाण्याची भाषा
देश सोडून जाण्याची भाषा करणारे, उठसुट इतरांना देशद्रोही म्हणणारे, या देशात जन्मल्याची लाज वाटणारे इ. सगळ्यांच्या नावाने अशी वेबसाईट तयार करावी. बघूया कुणाला किती पडतात.
अर्थात टीपी म्हणून.
भारतात इन्टॉलरन्स वाढतोय असं
भारतात इन्टॉलरन्स वाढतोय असं म्हणणं हा एका आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा भाग आहे आणि याचा संबंध थेट सीरिया-आयसिस यांच्याशी आहे असा एक ढकलचेंडू वाचला होता.
नोबेल पारितोषिक दिल्या गेलेल्या कैलाश सत्यार्थींनी (अमीरच्या बरंच आधीच) असं म्हणावं यावरून ते खरं वाटू लागलं आहे
There is significant intolerance in our society. Not only intolerance but fear and apathy has also risen in the society at large which is dividing it.
"This situation is prevailing because there is dialogue deficit between the government and some sections of the society, which should be resolved as soon as possible,"
Not only in India but the rising intolerance is a world wide phenomenon. But I wish the government soon breaks the monologue and starts dialogue with an open mind," .
Kailash Satyarthi’s Nobel
Kailash Satyarthi’s Nobel Prize decoded
http://www.niticentral.com/2014/10/12/kailash-satyarthis-nobel-prize-dec...
Not All Indians Are Celebrating Kailash Satyarthi's Nobel Prize
http://www.nbcnews.com/news/asian-america/not-all-indians-are-celebratin...
THE NOBEL PEACE PRIZE FRAUD
http://libertarianeconomist.com/the-nobel-peace-prize-fraud/
Kailash Satyarthi’s Nobel
Kailash Satyarthi’s Nobel Prize decoded >>>>छोटा भीम मधे दाखवले असणार.
वा वा.. कोणिही सरकारच्या
वा वा.. कोणिही सरकारच्या विरूध्द (देशाविरूध्द नव्हे) बोललं की तो कसा नाकर्ता आहे, त्याला/तिला पुरस्कार (मग तो नोबेल का असेना) कसे मॅनेज करून दिले आहेत हे सांगायची चढाओढच लागते. तेच तो सरकारकडून बोलला की त्याला/तिला (मग तो पाकिस्तानी किंवा ती बांगलादेशीही का असेना) चांगले म्हणायची चढाओढ लागते..
इथंच माबोवर एकांनी काही दिवसांपुर्वी देशात काही खरं नाही त्यामुळं देश सोडून जावंसं वाटतं असं लिहिलेलं वाचलंय. त्यांच्यासाठी साइट नाही तर एक धागातरी काढलाच पाहिजे..
अरे वा, मस्त तिळपापड झालेला
अरे वा, मस्त तिळपापड झालेला दिसतो आहे. लगेच इन्टोलरंट प्रतिसाद आलाच.
छोटा भीम
छोटा भीम
मनिष बाण जागेवर लागला
मनिष बाण जागेवर लागला
२००
२००
धन्यवाद महेश, तुम्ही धाग्याचा
धन्यवाद महेश, तुम्ही धाग्याचा मोहम्मद अझरुद्दीन होऊ दिला नाही..
तुम्ही धाग्याचा मोहम्मद
तुम्ही धाग्याचा मोहम्मद अझरुद्दीन होऊ दिला नाही.. >>>
...
...
लोकमतने चुकून वाईट आर्टिकल
लोकमतने चुकून वाईट आर्टिकल छापले. त्याबद्दल लगेच दुसऱ्या दिवशी चूक लक्षात आणून दिल्यावर संबंधितांवर कारवाईसुद्धा केली.
ह्याला म्हणतात सहिष्णुता. सांगारे आमीरला कोणी हे.
http://www.opindia.com/2015/11/newspaper-draws-piggy-bank-to-show-isis-f...
www.slapaamir.com वर गेलं की
www.slapaamir.com वर गेलं की त्याचं ऑटोमॅटिक http://www.kissaamir.com/ होतंय.
आमिर त्या सोनाक्षीसारखा
आमिर त्या सोनाक्षीसारखा म्हणेल आता - थप्पड से डर नहीं लगता बाबूजी....
पब्लिकने ह्याक कर दिया क्या
पब्लिकने ह्याक कर दिया क्या डीएनएस! गजब माहोल
आमिर त्या सोनाक्षीसारखा
आमिर त्या सोनाक्षीसारखा म्हणेल आता - थप्पड से डर नहीं लगता बाबूजी....
>>
त्यावर एक कार्टून आलेलं ना?
त्यावर एक कार्टून आलेलं ना? आमीरने दोन्ही गाल(फडां)वर मोदीकाकांची चित्र चिकटवल्याने थोबाडीत मारायला गेलेला हात हवेतच लटकला.
येस, व्हाटसअप वर बघितली ती.
येस, व्हाटसअप वर बघितली ती. फालतूपणा होता ती साईट म्हणजे. बरे झाले असले काही झाले. उद्या परत इकडला ह्याकर येऊन काड्या करणार!
Pages