शाहरूख खान, आमीर खान आणि असहिष्णुता !

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2015 - 16:48

धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.

म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.

या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्‍या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.

मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.

पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्‍या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.

असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.

लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..

"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.

मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?

आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्‍या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.

वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्‍या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्‍याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.

आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.

असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?

त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.

पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा Rofl

वैद्य.. तुम्ही त्या ब्लॉगशी सहमत आहात म्हणून ती लिंक दिली आहे की फक्त इतरांच्या माहितीकरता?

या ब्लॉगमधे अकबराला चांगला आणि सहिष्णू म्हटल्याबद्दल त्यांना कोणि धमक्या दिल्या नाहीत का? आणि मग त्याच न्यायानं त्याच्याच वंशावळीतल्या औरंगजेबालाही ते चांगले म्हणतील का?

वैद्य.. तुम्ही त्या ब्लॉगशी सहमत आहात म्हणून ती लिंक दिली आहे की फक्त इतरांच्या माहितीकरता?
>>

म्हैती करता! मतांशी सहमत आहे म्हणून शेअर नै केली. सहमती किंवा डिस्कशनला दिशा देणे माझ्याचानी होत नाही.

---
या ब्लॉगमधे अकबराला चांगला आणि सहिष्णू म्हटल्याबद्दल त्यांना कोणि धमक्या दिल्या नाहीत का?
>>

ऐकिवात नाही अजून तरी.
---

आणि मग त्याच न्यायानं त्याच्याच वंशावळीतल्या औरंगजेबालाही ते चांगले म्हणतील का?
>>
त्येंनी औरंग्यावर लेखन केलेले नैये अजून. लेख यदाकदाचित आला तर पोचवेल तुमच्याकडे.

आता तुम्ही औरंगजेब आणलाच आहे तर मी माझे मत लिहितो.

मला वंशावळीचा पुण्यवाद नाही दिसला त्यात.

अकबरास चांगला आणि सहिष्णू त्याने केलेल्या कामामुळे, दिन ए इलाही वगैरे निरीश्वरवादी धर्म, मुल्ला मौलवींचे कोणालाही ईश्वरनिंदक ठरवण्याचे आततायी हक्क काढून घेतले ह्यामुळे म्हंटले. त्या सगळ्यांचा उल्लेख आमिरच्या घराण्याने केला. नंतर मौलानाविषयी त्यांनी काही लिहिले (ह्याच्याशी मी सहमत नाही, कारण मला त्याबद्दल अजून माहिती मिळाली नाहीये) पुन्हा आमिरला त्याच आयडीओलॉजिस फोलो करतोय ते सांगितलेय.

आता औरंगजेबाने अकबराची आयडीओलॉजी फोलो केली नाही हे मला माहिती आहे.

तर, जर तुम्हास औरंगजेबाने अकबराची आयडीओलॉजी फोलो केली आहे असे वाटत असेल तर तुम्ही म्हनु शकता.

म्हैती करता! मतांशी सहमत आहे म्हणून शेअर नै केली >> ओके. धन्यवाद Happy

मला काहीच म्हणायचे नाहिये.. पण ते सगळे वाचल्यावर त्यांच्या लॉजिकमधला फोलपणा जाणवला म्हणून तसं विचारलं.

मनीष, तुम्ही ते सगळं वाचलंत? _/\_

ते नाव वाचल्यावर अमक्याच्या चष्म्यातून तमकं हे सगळं आठवलं आणि वेळ वाचवता आला.

परदेशात जाईन असे नुसते बोलून बसलेला आमीर

आणि

परदेशात जाईन असे धमकावून फ्लायओवरचे काम बंद पाडून विकास कार्यात खीळ घातलेली कोकिलाबेन

यातलं नेमकं देशप्रेमी कोण , द्रोही कोण , तटस्थ कोण हे समजेना झालय.

जरा सांगाल का ?

त्यांनी तसे का म्हटले? जेव्हा म्हटले तेव्हा ते त्यांच्यात आणि तेथील स्थानीक प्रशासनामधील वाद होता.
येथे आमीर आणि संपुर्ण भारतातील शांततेने त्यांचे त्यांचे जीवन जगणारे सामान्य लोक असा वाद आहे.
हे सगळे शांतपणे जगणारे सामान्य लोक कधीही आमीरच्या वाटेला गेले नाहीत. त्यांनी आमीरला कोणताही त्रास दिलेला नाही.
त्यांनी त्याची रोजीरोटी हडपलेली नाही. त्याला शारीरीक ईजा केलेली नाही. त्याच्या हिंडण्याफिरण्यावर , विशिष्ट कपडे घालण्ञावर कोणतेही बंधन आणलेले नाही.

उलट या आमीरने बहुसंख्यांच्या देवाचे विडंबन करणारे चित्रपट बनवले त्याला सहिष्णुपणे प्रदर्शीत होऊ दिले आणि कोट्यावधीची कमाई करण्याची संधी दिली.

असे असताना आमीरने या सगळ्या सरळमार्गी सामान्य जनतेवर असा खोटा आरोप का करावा की यांच्या मुळे मला असुरक्षीत वाटते?

लता दिदींनी जो काही आरोप केला तो फक्त त्या स्थानीक प्रशासनाविरुद्ध होता. ते दोघे बघुन घेतील त्यांचे काय ते.
त्यांना स्थानीक प्रशासनकडून खुप त्रास होत असेल तर त्यांना पुर्ण हक्क आहे त्यांच्या आवडत्या ठिकाणी निघुन जाण्याचे.

आमीर जेव्हा आमच्यावर आरोप करतो की आमच्यामुळे त्याला असुरक्षीत वाटते, तर आम्ही त्या आरोपाला उत्तर का देऊ नये? असुरक्षीत वाटण्यामागील घटनांचे कोणतेही पुरावे न देता आरोप करणे हा सेक्युलर सोशलिस्ट भारताच्या नागरिकांचा विश्वासघात नाहीतर काय आहे?

लता दिदींनी जो काही आरोप केला तो फक्त त्या स्थानीक प्रशासनाविरुद्ध होता<< यात ट्राफिक सुरळीत होणे हा सामाजीक मुद्दा सामन्य जनतेशी जोडलेला होताच.

आणि आता जाऊ द्या ना...कोण आमीर कसली सहिष्णूता-असहिष्णूता...आपण समाजासोबत व्यवस्थित वागावं एवढं करा. संजय नंतर आमीर नंतर आणि कोणतरी येईल.दिव्य चर्चा घडेल.पाणी ओसरेल.परत जैसे थे...आता आणि किती उकरता राव.

यात ट्राफिक सुरळीत होणे हा सामाजीक मुद्दा सामन्य जनतेशी जोडलेला होताच. >> मग त्यांनी सामान्य जनतेमुळे मला असुरक्षीत वाटते, भिती वाटते किंवा हे सामन्य फार असहिष्णू झाले आहेत असा काही बिन पुराव्याचा आरोप केला होता का?

त्यांनी तसे का म्हटले? जेव्हा म्हटले तेव्हा ते त्यांच्यात आणि तेथील स्थानीक प्रशासनामधील वाद होता.
येथे आमीर आणि संपुर्ण भारतातील शांततेने त्यांचे त्यांचे जीवन जगणारे सामान्य लोक असा वाद आहे.
हे सगळे शांतपणे जगणारे सामान्य लोक कधीही आमीरच्या वाटेला गेले नाहीत. त्यांनी आमीरला कोणताही त्रास दिलेला नाही.
त्यांनी त्याची रोजीरोटी हडपलेली नाही. त्याला शारीरीक ईजा केलेली नाही. त्याच्या हिंडण्याफिरण्यावर , विशिष्ट कपडे घालण्ञावर कोणतेही बंधन आणलेले नाही.

उलट या आमीरने बहुसंख्यांच्या देवाचे विडंबन करणारे चित्रपट बनवले त्याला सहिष्णुपणे प्रदर्शीत होऊ दिले आणि कोट्यावधीची कमाई करण्याची संधी दिली.

असे असताना आमीरने या सगळ्या सरळमार्गी सामान्य जनतेवर असा खोटा आरोप का करावा की यांच्या मुळे मला असुरक्षीत वाटते?

लता दिदींनी जो काही आरोप केला तो फक्त त्या स्थानीक प्रशासनाविरुद्ध होता. ते दोघे बघुन घेतील त्यांचे काय ते.
त्यांना स्थानीक प्रशासनकडून खुप त्रास होत असेल तर त्यांना पुर्ण हक्क आहे त्यांच्या आवडत्या ठिकाणी निघुन जाण्याचे.

आमीर जेव्हा आमच्यावर आरोप करतो की आमच्यामुळे त्याला असुरक्षीत वाटते, तर आम्ही त्या आरोपाला उत्तर का देऊ नये? असुरक्षीत वाटण्यामागील घटनांचे कोणतेही पुरावे न देता आरोप करणे हा सेक्युलर सोशलिस्ट भारताच्या नागरिकांचा विश्वासघात नाहीतर काय आहे?

>>>

.

.

.

.

.

एवढ्या मोठ्या पोस्टची गरज नव्हती.
दोघेही चुकले म्हणत चेंडू समोरच्याच्या कोर्टात ढकलायचा होता.

दोघेही चुकले म्हणत चेंडू समोरच्याच्या कोर्टात ढकलायचा होता. >> हो पण लता दिदींनी कुठे सामान्य जनते वर खोटे आरोप केले? त्यांना गैरसोय होते म्हणून त्या रागात काहीतरी म्हणाल्या.
ईथे आमीरने शांत डोक्याने सामान्य जनतेवर खोटे बिन पुराव्याचे आरोप केले आहेत.

मुद्दा देश सोडून जाण्याची धमकी देण्याचा आहे. अमीरने ती न देता उगाच गदारोळ. त्याने मांडलेले मुद्दे , मुलाखत वाचली तर दिसतील.कळतील का ते माहीत नाही. असहिष्णुता वाढतेय हे अनेकांनी आपल्या वागण्यानेच सिद्ध केलंय. या देशात जन्माला आलो याची लोकांना लाज वाटते असं परदेशस्थ भारतीयांसमोर प्रधानसेवक बोललेले. त्याचंही स्पष्टीकरण असेलच.
मी इतका पराकोटीचा राष्ट्राभिमानी असतो तर जोवर माझ्या मनासारखं सरकार येत नाही तोवर जन्मच घेतला नसता.

स्वतःच्या स्वार्थापोटी देशाच्या विकासाचे फ्लायओव्हरचे काम बंद पाडण्याची धमकी देऊन देश सोडण्याच्या बाता करणे आणि असुरक्षतेचीच्या भावनेने देश सोडण्याचा विचार करणे यात फरक करणे मंदबुध्दी नमोरुग्णांना येणार नाही

मर्ढेकरांसोबत आणि घाशीराम नंतर विजय तेंडुलकर याच्यासोबत सामान्य जनता कशी वागली याची आठवण होते.सामान्यांना जे कळते,पटते,रुचते,सुरक्षीत वाटते ते सगळं मान्य्,चांगलं आणि त्यांच्या आवाक्यापलीकड्चं,आकलनापलीकडचं सगळं त्याज्य...असा नियम भारतात चालतो.तेव्हा अमीर बोलला त्यानंतर लोकं त्याच्या हाजारपट बोलून मोकळी झाली.तेव्हा सगळे सारखेच...सब घोडे बारा टक्के.
ऑरवेल येडा होता म्हणून म्हटला 'ऑल (अ‍ॅनिमल्स) आर इक्वल्,सम (अनिमल्स्) आर मोर इक्वल'
इथे 'मोर इ॑क्वल'वाले कोण आमिर की त्याविरोधात बोलणारे आपण्,याचं उत्तर अस्थित्वात नसेल तर बर!

अजून एक फेबु पोस्टर्स: आधी लोकांना उचाकावयचं आणि मग म्हणायचं बघा बघा माझा मुद्दा लोकांनीच सिद्ध केला Proud

आमीरखानचे वक्तव्य हे नुसते वक्तव्य होते , पण फ्लायओवरबाबत धमकीचा सूर लावून इतरांच्या सोयीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेचा वापर केला गेला.
.......

गीर्वाणवाणी उर्फ संस्कृत भाषेत एक न्याय दिलेला आहे ... पात्र श्वान न्याय ( नेमके नाव माहीत नाही. हे नाव मी आतापुरते वापरतोय. )

हा न्याय असे बोलतो की मनुष्य डिप्लोमॅटिक असतो. एका लहान पात्रात कुत्र्याने तोंड घातले तर त्या पात्रातील सर्वच अन्न फेकून देतात. पण पात्र अगदी मोठे असेल तर कुत्रे स्पर्शलेले थोडेच अन्न टाकून उरलेले सर्व शुद्ध मानावे.

.....

कोकिळाबाई , मुन्नभाई ही मोठी पात्रे ... म्हणून दोषास्पद वाक्ये वगळून उर्वरीत व्यक्ती शुद्ध .

आमीरखान , रहमान इ ही लहान पात्रे ... म्हणून ते , त्यांचे घर , त्यांचा धर्म , त्यांचे चित्रपट .... सर्वच टाकावू !

....

संस्कृत भाषेचा व त्यातील सुसंस्कृत न्यायाचा विजय असो. !

फ्लायओव्हर प्रकरण आणि आमिरखान प्रकरण ह्यातला फरक.
फ्लायओव्हर प्रकरण हा निव्वळ स्वार्थ आहे. त्यात धर्म वगैरे गोष्टींचा काही संबंध नाही हे तर उघड आहे.

आता आमिरखान जेव्हा त्याला असुरक्षित वाटल्याचे सांगतो तेव्हा त्या गोष्टीला अनेक पैलू आहेत. एक म्हणजे त्याला मोदींचा तिटकारा आहे आणि तो संधी मिळेल तेव्हा तो ह्या ना त्या प्रकारे तो व्यक्त करतो आहे असा संशय.
दुसरा पैलू म्हणजे त्याला हिंदूबहुल देशात रहावे लागत असल्याचाही राग आहे आणि जरी अफाट लोकप्रियता आणि पैसा त्याद्वारे मिळाला असला तरी त्याच्या मनात कुठेतरी अपराधीपणा आहे की आपण काफिरांच्या देशात रहातो. कित्येकदा सिनेमात त्यांच्यासारखे रानटी धार्मिक विधी करतो. अशा धेडगुजरी देशात रहात असल्यामुळे शुद्ध इस्लाम आपल्या नशिबी नाही अशी एक रुखरुख त्याला खाते आहे. असा अजून एक संशय.

भारताचा इतिहास पाहिला तर आपण सर्व धर्मांना सन्मानाने वागवतो हे दाखवण्याकरता कित्येकदा (माझ्या मते) नको इतके नमते घेतले आहे. उदा. पाकिस्तानने मुस्लिमांकरता देश वेगळा तोडला तेव्हा तोच न्याय लावून भारत हिंदूंचा असे म्हणता आले असते. पण तात्कालिन नेत्यांना बहुसंख्य लोकांना तसे वाटत नव्हते म्हणून ते केले गेले नाही. सेक्युलर असूनही नागरी कायदे हे प्रत्येक धर्माच्या आवडीप्रमाणे केले आहेत. आता इतके करुनही आमिरखानसारखे दिग्गज त्यांचा धर्म सुरक्षित नाही असा कांगावा करत असतील तर तो घाव बहुसंख्य भारतीयांच्या जास्त वर्मी लागत असणार ह्यात आश्चर्य ते काय?
तेव्हा फ्लायओव्हर आणि ह्याची तुलना तितकीशी तर्कसंगत नाही. इंग्रजीत अ‍ॅपल अँड ऑरेंजेस कंपॅरिजन म्हणतात तसे होते आहे.

>> आमिरच्या वक्तव्यामधे फक्त आंधळ्या नमोभक्तांनाच धर्म दिसणार

हा एक अत्यंत गोड गैरसमज आहे. आमिरखान हा मुसलमान आहे. त्याने ह्या वस्तुस्थितीचा कधीही इन्कार केलेला नाही. ज्याप्रमाणे एखाद्या शाळेत वाढलेला विद्यार्थी त्या शाळेचे संस्कार जन्मभर बाळगतो तसेच एखाद्या धर्मात जन्मलेला आणि तो धर्म मानणारा, त्या धर्माचा प्रभाव बाळगून असतोच. प्रत्येक वेळी उघडपणे मी मुसलमान आहे म्हणून मी हे म्हणतो असे म्हणायची गरज नाही.
माझ्या मते सर्वसामान्य लोकांना आमिरखानच्या बोलण्यात त्याचा धर्म जाणवत असणारच. त्याकरता नमोभक्त आणि तोही आंधळा असण्याची अट नाही.
ह्या उलट आंधळ्या मोदीद्वेष्ट्यांना आमिरच्या बोलण्यात सर्वधर्मसमभाव दिसत असेल तर आनंद आहे.

वरची एक पोस्ट
>>>>>>>>>>>>> दुसरा पैलू म्हणजे त्याला हिंदूबहुल देशात रहावे लागत असल्याचाही राग आहे आणि जरी अफाट लोकप्रियता आणि पैसा त्याद्वारे मिळाला असला तरी त्याच्या मनात कुठेतरी अपराधीपणा आहे की आपण काफिरांच्या देशात रहातो. कित्येकदा सिनेमात त्यांच्यासारखे रानटी धार्मिक विधी करतो. अशा धेडगुजरी देशात रहात असल्यामुळे शुद्ध इस्लाम आपल्या नशिबी नाही अशी एक रुखरुख त्याला खाते आहे.
>>>>>>>

जर हे खरे मानले तर त्याने हिंदू स्त्री शी का विवाह केला? ही सल तर मग दिवसरात्र त्याच्या मनात नाही का राहणार?

जर इथे शाहरूखलाही जोडले तर त्याचीही बायको गौरी आहे. चांगले चाललेय दोघांचे. कुटुंबवत्सल प्राणी आहे. पोरांची नावेही आर्यन वगैरे छान ठेवली आहेत. त्याचे खास मित्र करण जोहर आणि काजोल हे हिंदूच आहेत. अर्थात हिंदूबहुल देशात हिंदूंशीच जास्त संबंध येणार हे खरे मानले तरी लग्नासाठी आपल्या धर्मातील मुलगी मिळायला हरकत नसते. अर्थात आता इथे याला कोणी लव जिहादचे नाव दिले तर मात्र माझी पंचाईत Happy

Pages