धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.
म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.
या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.
मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.
पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.
असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.
लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..
"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.
मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?
आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.
वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.
आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.
असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?
त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.
पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
अगदि ताजी बातमी; या घटनेला
अगदि ताजी बातमी; या घटनेला असहिष्णुतेचं प्रदर्शन म्हणाल कि जाज्वल्य देशाभिमान?..
मी आता त्या साईटवर जाऊन
मी आता त्या साईटवर जाऊन आमीरला किस घेऊन आलो.. विथ साऊंड इफेक्ट
मी आता त्या साईटवर जाऊन
मी आता त्या साईटवर जाऊन आमीरला किस घेऊन आलो.. विथ साऊंड इफेक्ट
सॉरी पोस्ट दोनदा पडली.. पण
सॉरी पोस्ट दोनदा पडली.. पण एकदाच घेऊन आलो
हायला ! चित्रावर थप्पड मारली
हायला ! चित्रावर थप्पड मारली की झालं !
कोथळा काढा , बोटं तोडा .. असली कामं महाराज विनाकारण करत बसले ! नुस्तं चित्रावरच भागवायचं
आमिर त्या सोनाक्षीसारखा
आमिर त्या सोनाक्षीसारखा म्हणेल आता - थप्पड से डर नहीं लगता बाबूजी.... >>
सॉरी पोस्ट दोनदा पडली.. पण एकदाच घेऊन आलो >> ऋन्मेऽऽष.
(No subject)
बेटा, शहारुख खान ला काय
बेटा,
शहारुख खान ला काय वाटेल याचा विचार केला ?
India’s Biased Debate on
India’s Biased Debate on Intolerance
By ignoring Islamist extremism, Indian intellectuals do their country no favors.
http://www.wsj.com/articles/indias-biased-debate-on-intolerance-1449078739
https://www.facebook.com/phot
किती असहिष्णुता
जयंत! भारीच!
जयंत!
भारीच!
जयंत १ या चित्राबद्दल
जयंत १
या चित्राबद्दल धन्यवाद.
पण खालचा मजकूर काढून टाका. अॅडमिनने केलेल्या कारवाईनंतर सर्वांनीच संयम पाळूयात.
कापोचे आपला मान राखण्यात आला
कापोचे
आपला मान राखण्यात आला आहे
हिताची गोष्ट सांगाविशी वाटली.
हिताची गोष्ट सांगाविशी वाटली. बाकी काही नाही.
माझ्या कानावर आज आले की
माझ्या कानावर आज आले की दिलवालेची पहिल्या दिवसाची कमाई देणार आहे..
इथे एक करोड लिहिले आहे..
हे खरे की ते खरे? की दोन्ही खरे की दोन्ही खोटे? गूगाळायला हवे जरा..
देशप्रेमी, देशभक्त,
देशप्रेमी, देशभक्त, स्वातंत्र्यवीर, अनुपम खेर यांनी किती मदत केली ? माहीती करून घेण्यास आनंद होईल
पण नेट आर्मीतर बोंबलतेय की
पण नेट आर्मीतर बोंबलतेय की त्याने चेन्नै एक्स्प्रेसमधून पैसे कमवले आणि पूर आला तर गायब.
स्वयंघोषित अतिसहिष्णु अनुपम
स्वयंघोषित अतिसहिष्णु अनुपम खेर यांनी चेन्नैची तुलना दादरीशी केल्याचं वाचलं.
त्यांच्या मालकाने जसे
त्यांच्या मालकाने जसे सांगितले तसेच बोलणार . असे ही खोटे बोलणे आणि पसरवणे हेच काम तर दिले आहे. नाही तर पैसे कसे मिळणार?
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...
ओमपुरी यांनी बीफ बॅन विरोधात कमालीचे ईटरेंस्टींग वक्तव्य केलेले दिसत आहे. थेट पाकिस्तानात जाऊन स्थायिक होईन असे म्हटलेले दिसत आहे. पण यांची ब्रांड वॅल्यू तुलनेत कमी असल्याने तितकासा गदारोळ होईल असे तुर्तास वाटत नाही. लेटस सी.
मयेकर उत्तराखंडासाठी ३३ लाख
मयेकर
उत्तराखंडासाठी ३३ लाख दिलेले आणि काही प्रोग्रॅमपण केलेले. पण तिकड
आता पहिल्या दिवसाची कमाई देतो म्हणे ब्वा!
रेड चिलीजने ऑलरेडी एक करोड
रेड चिलीजने ऑलरेडी एक करोड दिलेत. पहिल्या दिवसाची कमाई २२ करोड आहे.
रिलायन्स, बजाज, टाटा, अंबानी. धूत, बिडला इ. इ. शासकीय गरीबांना जे जमलं नाही ते या टीमने केलंय की !
Pages