निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गच्च बहरलेला कैलासपती सुंदरच होता. त्याखाली 'शालवृक्ष' हे नाव दिले आहे. शालवृक्ष म्हणजे कैलासपति का? मला माहीत नव्हते.
गंगावर्णनाच्या एका श्लोकातली पहिली ओळ आठवली.
"एतत्तालतमालसालसरलव्यालोलवल्लीलताs
च्छनं सूर्यकरप्रतापरहितं शङ्खेन्दुकुन्दोज्ज्वलम्"
ताल, तमाल, साल असे सरळसोट वृक्ष आणि त्यांमध्ये गुंतलेल्या लतावल्लींनी आच्छादित केलेले आणि त्यामुळे सूर्यकिरणांच्या तापापासून दूर राहिलेले असे हे शंखासारखे नितळ आणि कुंदफुलांसारखे उज्ज्वल गंगाजल...

अनिल, बया पक्षाचे आणि घरयाचे फोटो अप्रतिम..
आणि बाकीचे फोटोज पण खुपच छान..
आज खुप दिवसांनी आली नि,.ग वर आणि मस्त मस्त फोटोंची मेजवानीच मिळाली...:)

कुंदफुलांसारखे उज्ज्वल गंगाजल...>>> उच्चारायला कठीण असलेल्या श्लोकाचा अर्थ किती सुरेख आहे.धन्यवाद, हीरा!

माझ्या बटनशेवंतीला vaaTaaNyaaएवढ्या भरपूर कळ्या आल्या आहेत.जवळ जवळ महिना होत येईल,पण एकही कळी उमलली नाही.एका फांदीवरच्या कळ्या तर जळून(?) काळ्या झाल्या आहेत.उरलेले अन्न,तांदूळ धुतलेले पाणी,चहा पावडर हेच खत म्हणून वापरते.कळ्या उमलायला एवढा वेळ लागतो का?

आमच्याकडे १५ तारखेपासून आंब्याचा सिझन सुरु झाला. आंब्याची झाडे भरपूर आहेतच आणि बाजारातही खुप असतो. गुलमोहोरही याच दिवसात फुलतो इथे.

Wow! Ata १५ pane wachun kadhali. Khup diwasani nig war ale. Mast watale.

खुपच गप्पा झालेल्या दिसताहेत...
मी आज नेट वर किवी फळाच रोप कस लावायचं ते बघीतल..
आपल्या घरच्या वातावरणात वाढेल का ते ? कि किवी ला काही वेगळ हवामान लागत ?

देवकी.. आम्च्या पण शेवंतीच्या कळ्या अजुन उमलल्या नाहीत.. १-२ आठवडे तरी झाले क्ळ्या येवुन... गुलाब पण तसाच. Sad .. अजुन वाट बघतोय
मोगर्याला नवीन फाटे येतायत.. रोज २-३ नवीन पाने

टीना, माझ्या लेकीच्या घरी ( ऑकलंड, न्यू झीलंड ) किवीचा वेल आहे. ऑकलंडचे हवामान थंड असते. पण ते समुद्रकिनारी देखील आहे. किवीचा मोठा वेल असतो. मांडव लागतो. कुंपणावरही वाढतो तिथे तो. रोपावर प्रयोग करून पहाच.

व्वा ! मस्त पीक आहे कांद्याचे...
दिनेश दा, काय मस्त ना, घरीच किवी चा वेल.. लकी आहे लेक तुमची...:)

दहिसर पूर्वेला समाज कल्याण केंद्राच्या आवारात फुले पडली होती म्हणून वर पाहिले. बहुतेक आपटा आहे ना? ताजी पाने आणि फुले कधी बघितली नव्हती...

सुर्यकिरण,
अबब...कांदेच कांदे..कितीला दिले मनल ?

दिनेशदा,
मज्जाच मज्जा लेकीची तुमच्या...
लावण्यापूर्वी जरा माहिती वाचावी म्हणतेय जराशी किवीबद्दल..

किवी seedlings take seven years before they flower, so determining whether the kiwi is fruit bearing or a pollinator is time consuming.

Sad

कीवी , वा !
आत्ता दिवाळीत मला डेंग्यू झाला होता, त्यावेळी प्लेटलेट वाधन्यासाठी खूप ख़ाल्ले कीवी ! मस्त लागतात

Pages