छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्गोबै ... मला श मं प्रतियुती आहे.

पण आता मुसल्मान झाल्यावर पत्रिका नस्ते बघायची.

लिंब्या औरंग्याची पत्रिका जरा बघ की.

नुकतेच वाचनात आलेय. चोप्यपस्ते .>>>>>
...............................................................
औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर बसविला असे आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलोय. तो कर म्हणजे नक्की काय होते ?
तो एक लष्करी कर होता. तो कर भरल्यावर हिंदुना लष्करात भरती होण्याची सक्ती नसे. जे हिंदू औरंगजेबाच्या सैन्यात होते त्यांच्यावर हा जिझिया कर नव्हता. तसेच हिंदू पुरोहित ,भट , महंत ,भटजी , मजूर , कारागीर यांना कर लागू नव्हता . जिझिया करापेक्षाही जास्त जाचक असलेली ' जकात ' त्याने मुसलमानांवर लादली होती. ( हिंदू मुस्लीम मिलाफ - ले. सय्यद अमीन / राम मनोहर लोहिया स्मृती केंद्र ' वार्तापत्र ' मार्च एप्रिल १९८३)

https://en.m.wikipedia.org/wiki/Jizya

http://www.preservearticles.com/2012031126674/what-was-the-jizya-policy-...

नशीब क़ुराणाचा अर्थ स्वतला सूटेबल असा लावता येत नाही. जे लिहिलेय तेच खरे. नाहीतर हिन्दुना डोक्यावर बसवून त्यांचा सत्कार करा असा अर्थ निघाला असता काफ़िर वाल्या आयतातून.

जिझिया म्हणजे लष्करी कर !!!
मला चुकून जदुनाथ सरकार, रियासतकार आणि आदीप्रभूतींचे चेहरे दिसून आले Wink

Rofl !

जो मायनस
खालची लिंक पण वाचा. जिझ्या या कराचे वेगवेगळ्या पंथांप्रमाणे अन्वयार्थ दिलेले आहेत. औरंगझेबाने जिझ्या कर भरला तर सक्तीची लष्करी भरती करावी लागणार नाही अशी सुट दिली होती. अर्थात तुम्ही वाचून पण जग मूर्ख आहे अशा थाटात गैस पसरवणार. शाखेवरचं शिक्षण वाया जाणार नाही.

आधी धर्माप्रमाणे वेदशिक्षण घेतल्यावर काय शिक्षा होत्या त्याचा अभ्यास शिकवा की म्हणावं शाखांवर, मग कुराणं, आयतं पढत जा. दुस-याच्या शेपटीला नावं ठेवण्याआधी आपल्याआमागे वळून पहावं. Rofl

ते काढलं की हे म्हणणार शंभर वर्षांपूर्वीचं कशाला काढता Biggrin

आणि हे पार बाबराची वंशावळ आणि पत्रावळ इथून सुरूवात करणार. हिंदुस्थान मे मुसलमानोंने इथून संघशाखा भरतात आणि बदला लेके रहेंगे वर थांबतात.

तर अशांना लिंका कशा दिसायच्या ?

http://www.hastakshep.com/intervention-hastakshep/issue/2014/10/31/%E0%A...

हे बघा संघाचे सर्वात लोकप्रिय नेते काय म्हणतात ते.

काही लोकांच्या मागे कुणीही उभे राहू नये अशी एक कविता नुकतीच वाचनात आलेली आहे. प्रत्यय आला(च).

मिशीवाले काका मेरा भजन चला दो

The [jizyah] is not imposed on the idol worshippers from among the Arabs or from among the apostates, where they exist. Their women and children [are considered] as part of a single liability group (fi’). [In other words], whoever from among their men do not submit to Islam shall be killed, and no jizyah is imposed upon their women, children, ill persons or the blind, or likewise on the paraplegic, the very old, or on the unemployed poor, as is stated in al-Hidayah

रेफरन्स सुनियादयांनीच दिलेली लिंक : https://www.sscnet.ucla.edu/southasia/History/Mughals/Aurnag_fatwa.html

मी औरंगजेबाचे आभारच मानतो Wink किमान त्याने उदारता दाखवून हिंदुना जगू दिले Happy
परमदयाळू, उच्चविचारी, मानवतावादी औरंगजेबाचा विजय असो.

ब्राह्मणांनाही हा कर लागू नव्हता इकडे आपले अद्याप लक्ष गेलेले नाही. तसंच स्त्रिया, मुले, विधवा, अपंग इ. इ. इ. ना कर लागू नव्हता. तो अन्यायी होता म्हणजे कसा हे काही कळले नाही.

कोण आहेत सुनियाद ? काय चालवलय ? कशासाठी चालू आहे हे उदात्तीकरण ?
ते लेखक अमीन आणि तुम्ही काय महाराजांपेक्षा भारी आहात की काय ?
आणि तो कर कसा का असेना, औरंगजेब आणि त्याची राजवट ही चांगली नव्हतीच नव्हती.
अरे ज्याने संभाजी राजांना हाल हाल करून मारले, गुरू तेगबहाद्दूरांना मारले तो काय फार चांगला होता की काय ?
येथे धर्माचा काही एक संबंध नाही, हे लक्षात घ्या. त्या जागी कोणी अन्य धर्माचा जुलमी राजा असता तरी त्याला कोणी चांगले म्हणले नसते.

>>पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर. +१०१

लोकहो, कोणी काहीही म्हणो, औरंगजेब अजिबात म्हणजे अजिबात चांगला नव्हता.
कोणाच्याही काहीही लिहिण्याने इतिहास बदलणार नाहीये.

कुठे Uhoh

अ‍ॅडमिन, खरेच लक्ष द्या आणि उगाचच चुकीचे सांगणार्‍या आयड्यांना समज द्या. म्हणे औरंगजेब चांगला होता.

शत्रुला क्रूरपणे मारले या क्रायटेरियावर वाइट लेबल लावायचे ठरवले तर कृष्ण , राम , कौरव , पांडव हेही कूर ठरतील की.

येस त्यांच्या शत्रुच्या दृष्टीने ते क्रूरच होते. कोण कोणाच्या बाजुने आहे यावर अवलंबून आहे.

सुनियाद,

जीझीया म्हणजे नुसता कर नव्हता. तुम्ही मुस्लिम राष्ट्रात राहता, म्हणून द्यायची खंडणी होती. सिम्बोलिक मीनिंग Proud आणि हा कर सगळयांनाच लागू होता. मासिरे आलमगीर मध्ये काय म्हणतो ते बघा:

---
As all the aims of the religious Emperor were directed
to the spreading of the law of Islam and the overthrow of the
practices of the infidels, he issued orders to the high diwani
officers that from Wednesday, the 2nd April, 1079 /lst
Rabi. A., in obedience to the Quranic injunction "till they
pay commutation money (jazia) with the hand in humility"
and in agreement with the canonical traditions, jazia should
be collected from the infidels (zimmis) of the capital and the
provinces. Many of the honest scholars of the time were
appointed to discharge the work (of collecting jazia). May
God actuate him to do that which He loves and is pleased
with, and make his future life better than the present !
---

हे वाचल्यावर माझ्यामनात प्रश्न आला की नेमकं काय प्रकरण आहे हे? विकिवर ही माहिती मिळाली:

Fight those who believe not in Allah nor the Last Day, nor hold that forbidden which hath been forbidden by Allah and His Messenger, nor acknowledge the religion of Truth, (even if they are) of the People of the Book, until they pay the jizya with willing submission, and feel themselves subdued.

ह्याचा अर्थ ' until they pay the jizya with willing submission, and feel themselves subdued.' फक्त युद्धकर नक्कीच नाहीये Wink

जिझिया म्हणजे एकच कर नसतो. तो मंथली पे करायचा असतो, स्वतःला दुय्यम नागरिक लेखून. त्याशिवाय खरज म्हणून अजून एक कर असतो, जो एकूण संपत्तीवर द्यावा लागतो. जकात फक्त आयकरासारखा असतो.

नंतर मासिरे आलमगीर असेही म्हणतो

About the middle of his reign he decided to levy the
jaziya tax on the Hindus, as ordained by the Shara' and it
was enforced throughout his empire; and this rare piece of
good work (hasndt-i-gharib) had not been done in Hindustan
and the Hindus had not been degraded to such a degree in
any other period.

From translation of Masir-e-Alamgir by Jadunath Sarkar
https://archive.org/stream/Maasir-i-alamgiriAHistoryOfEmporerAurangzebAl...

https://en.wikipedia.org/wiki/Jizya#Islamic_scriptures

विकीपीडीयातली माहीती आणून ओतणे,
दम देणे
वैयक्तिक शेरेबाजी करणे
अवांतर गप्पा मारून धागा भरकटवणे

या गोष्टी नेहमीप्रमाणे इथे कोण सुरू करतंय याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे.

इतिहासावरची चर्चा आहे. लेखकाने अभिनिवेशात लिहीलं, त्याला समविचारी लोकांनी अभिनिवेशात उत्तरं दिलीत.
पण इतिहासाला वेगळं वाटेल असं मत मांडलं की लिहीणा-याची औकात वगैरे काढणे हे मायबोलीवर मान्य आहे काय ?

प्रशासनाकडून डोळेझाक झाल्यानंतर त्या चर्चेला वेगळं वळण लागतं आणि नंतर चोर सोडून संन्याशाला फाशी या न्यायाप्रमाणे कारवाई होते. अशी धृतराष्ट्री कारवाई झाली की मायबोली ही विशिष्ट लोकांना धार्जिण आहे हा समज पक्का होत जातो.

वर संदर्भ देऊन म्हणणे मांडलेले आहे. त्याला आदळ आपट करून उत्तर दिलेलं का चालवून घेतलं जातंय ? ठराविक लोक नेहमीच मुजोर कसे काय वागू शकतात ? नेहमीच यांना चार चार आयडीज घेईपरपर्यंत प्रशासन कसं काय झोपी गेलेलं असतं. काही लोकांना एकही आयडी उरणार नाही ही दक्षता कशी काय घेतली जाते ?

कृपया खुलासा करण्यात यावा ही विनंती.

Pages