छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुस्लीम असूनही देशभक्त असलेले, असा उल्लेख करण्याचे आदेश मिळालेले दिसत नाहीत अद्याप. कुठे गेली ती शिस्त?

साधनाताई, पंत,

माझे मत: मुस्लिम रानटी वगैरे नव्हते, फक्त जग इस्लाममय करायच्या इर्षेने झपाटले होते. व्यवस्थित सुसंस्कृत होते ते. त्यांच्यातही काव्ये, शास्त्रे आदींचा भरपूर विकास झालेला होता. सो मी रानटी नक्कीच म्हणणार नाही.

राहिली गोष्ट १००० वर्षांची, संपूर्ण हिंदुस्थान (हो, तेव्हा हिंदुस्थानच म्हणायचे Wink ) नव्हता जमातींच्या ताब्यात. दक्षिण आणि पूर्व हिंदुस्थान आदी इस्लामी तडाख्यात आलेले नव्हते. रुढार्थाने बघायचे झाले तर तेव्हा (चाणक्याच्या मत जे इथेही लागू पडते) केंद्रीय सत्ता नसल्याने सगळी छोटी मोठी राज्ये एकेकटी लढत गेली आणि हारत गेली, जे नैसर्गिकच आहे. पण वेळ मिळताच उसळून आपले राज्य परत मिळवत गेली.

जातीपातींचा फटका अर्थात तेव्हाही बसलाच आणि आपल्याच चुकांचाही.

पण जिथे जिथे इस्लामी राजवट येत गेली, तिथे कत्तली खूप झाल्या. त्यामुळे ह्या होलोकॉस्टची माहीती बाहेरच्या जगाला मिळणारच नाही ह्याशी सहमत.

वैद्यांशी सहमत आहेच पण इस्लाममय विश्व करण्यासाठी झपाटलेले असणे आणि त्या प्रक्रियेतच क्रूर कत्तली करणे हे त्यांच्यात मुळातच असलेल्या (इतरांपेक्षा अधिक) क्रौर्याचे किंवा अमानवीपणाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात रानटी म्हणणे अगदीच गैर ठरू नये. (सगळे तसे नसतात हे मान्यच आणि काव्य शास्त्र वुनोद हे प्रामुख्याने इराणी संस्कृतीकडून त्यांनी उचललेले भाग होते. मुळात अरब तसे नव्हते, ते रानटीपणे टोळ्या टोळ्या करूनच हिंडणारे आणि हिंसेच्या आधारावर जगणारे होते).

अगदी कारगिलनंतरही चार भारतीय जवानांचे ज्या प्रकारे एक एक अवयव कापून अनन्वित हाल करून त्यांना मारण्यात आले तसे प्रकार सहसा इतर प्रकारचे लोक करताना दिसत नाहीत. (कोणाला अपवादाची उदाहरणे द्यायची असल्यास अत्यंत हिणकस भाषेत देऊ नयेत एवढीच विनंती. तसेही, अपवाद असू शकतील हे मान्य आहेच).

रक्ताशी बांधिलकी लहानपणापासूनच जोपासली जाते, कुर्बानीच्या रुपात! त्यामुळे खुनशीपणा आपोआपच वाढीस लागतो. या बाबतीत कधीच कोणत्याही जाणत्याने आवाज उठवलेला दिसत नाही.

आणि कोंबडी , शेळी बाकी दगडधोंड्यांपुढे बाकी धर्माचे लोक कापतात त्याने काय होते म्हणे ?

>>आणि कोंबडी , शेळी बाकी दगडधोंड्यांपुढे बाकी धर्माचे लोक कापतात त्याने काय होते म्हणे ?
नंतर अहिंसा परमो धर्मः आले ना ! Happy

हिंदु धर्माला क्लीन चीटचा प्रश्न नाही... जर मांसाहाराने कट्टरता येते तर हिंदूही मांसाहार करतात. मग त्याना कट्टर होऊ नका असे कुणी सांगितले आहे का ?

>>>>> या समजुतींमुळॅच इथल्या लोकांनी आपल्याच लोकांविरुद्ध बाहेरच्या जमातीला मदत करुन त्यांना इथल्या फुटीची कल्पना करुन दिली आणि त्याचा पुरेपुर फायदा त्या जमातीने घेतला. <<<<<
साधना, या वाक्यावर मी माझे मत नुसते राखुन ठेवत नाहीये, तर इथे मांडुही शकणार नाही. कधी प्रत्यक्ष भेटलो, तर जरुर बोलू. तरी साधारण क्ल्यु देतो की गेल्या दोन हजार वर्षात निमार्ण झालेले धर्म, त्यांचा कालखंड, भारतावरील त्यांचा विविध ठिकाणचा प्रभाव व प्रभावाची कारणे, आदी शंकराचार्यांचा उदय, व पुढील हजार वर्षे असे सगळे मोजदाद केले व कड्या गुंफल्या, तर फार वेगळेच सत्य पुढे येत जाते. असो.

मोगा,
पाकिस्ताना त जायला विजा लागत नाही, बजरंगी भाईजान ला विचारा तो सोडुन येईल तुम्हाला !!
लाईटली घेऊ नका सिरियसली सांगतोय !

ते दाढीवाले आदरणीय वंदनीय सद्गृहस्थ कोण आहेत ?? आणि लाल जाकीटवाले त्यांच्या सोबत सोशियालाइज का करत आहेत??

ते राष्ट्रवाद राष्ट्रवाद खेळत आहेत. अदाणींच्या प्रोजेक्टमधे पैसे गुंतवले की दाढीवाले राष्ट्रवादी, भारतमित्र असं काहीसं डील चालू आहे बहुतेक. खखो ते मिशाळ काकाच सांगतील संत्रीबर्फी वाले. त्यांचं सारं म्हणे सीक्रेट असतं.

Pages